DQ Publication

DQ Publication प्रकाशन समूह

बिलाल इब्न रबाह आणि इस्लामी संस्कृती ह्या दोन पुस्तकांची बल्क ऑर्डर ५०० + ५०० पारनेर (अहमदनगर) येथे रवाना करण्यात आली.श्...
17/02/2022

बिलाल इब्न रबाह आणि इस्लामी संस्कृती ह्या दोन पुस्तकांची बल्क ऑर्डर ५०० + ५०० पारनेर (अहमदनगर) येथे रवाना करण्यात आली.
श्रीयुत डॉ. रफीक सय्यद यांच्या मुलीच्या लग्नात प्रत्येक निमंत्रण पाहुण्यांना ते सदरील पुस्तक भेट देणार आहेत...
डॉ. सय्यद यांच्या ह्या उपक्रमाला शुभेच्छा....
आपली ऑर्डर नोंदविण्यासाठी संपर्क साधा...

मो : 9421661259

#इस्लाम #बिलाल

असा होता टिपू सुलताननोंदणी सुरू झाली..सवलतीच्या दरात उपलब्धपोस्टेजसह केवळ १०० रुपये...खाते नंबरIDFC FIRST Bank Deccan Qu...
12/02/2022

असा होता टिपू सुलतान
नोंदणी सुरू झाली..
सवलतीच्या दरात उपलब्ध
पोस्टेजसह केवळ १०० रुपये...

खाते नंबर
IDFC FIRST Bank
Deccan Quest Foundation
A/C 10064214696
Undri Branch, Pune
IFSC Code : IDFB0041373
MICR Code : 411751013

गुगल पे : 9421661259

(पैसे भरल्यानंतर आपला संपूर्ण पोस्टल पत्ता, मोबाईल नंबर इनबॉक्स करावा किंवा 95034 29076 / 9422694029 या नंबरवर व्हाट्सएप करावे.)

नवीन पुस्तकटिपू सुलतान संदर्भातील सर्वच वादावर व्यापक चर्चा घडविणारे महत्त्वाचे पुस्तक...लेखक : सरफराज अहमदसवलतीच्या दरा...
11/02/2022

नवीन पुस्तक
टिपू सुलतान संदर्भातील सर्वच वादावर व्यापक चर्चा घडविणारे महत्त्वाचे पुस्तक...
लेखक : सरफराज अहमद
सवलतीच्या दरात नोंदणीसाठी संपर्क साधा..
पोस्टेजसह केवळ १०० रुपये...

खाते नंबर
IDFC FIRST Bank
Deccan Quest Foundation
A/C 10064214696
Undri Branch, Pune
IFSC Code : IDFB0041373
MICR Code : 411751013

गुगल पे : 9421661259

(पैसे भरल्यानंतर आपला संपूर्ण पोस्टल पत्ता, मोबाईल नंबर इनबॉक्स करावा किंवा 95034 29076 / 9422694029 या नंबरवर व्हाट्सएप करावे.)

संपर्क : 86240 50403
: 9421661259

#टिपू

सुफी तत्त्वज्ञानाचे अभ्यासक प्रा. मुहंमद आजम यांना आज बिलाल इब्न रबाह या पुस्तकाच्या प्रत पोहोच झाल्या. त्यांनी अधिकच्या...
02/02/2022

सुफी तत्त्वज्ञानाचे अभ्यासक प्रा. मुहंमद आजम यांना आज बिलाल इब्न रबाह या पुस्तकाच्या प्रत पोहोच झाल्या. त्यांनी अधिकच्या प्रती नोंदवल्या होत्या.
योगायोग असा की, प्रा. आजम यांच्या मैदर्गी येथील निवासस्थानी ज्येष्ठ साहित्यिक प्रा. फ. म. शहाजिंदे देखील उपस्थित होते. त्यांनादेखील बिलाल पुस्तकाची प्रत देण्यात आली.
मान्यवरांसोबत संस्थेचे संपादक जनाब सरफराज अहमद....

***
सवलतीच्या दरात आजच आपल्या प्रति नोंदणी करा..
पुस्तकाची मूळ किंमत १५० रुपये आहे. अतिरिक्त पोस्टेज चार्ज ३० भरून पुस्तक घरपोच मिळू शकेल.
परंतु ज्यांना पुस्तक वाचायचे आहे पण १८० रुपये देणे शक्य नाही, अशांना पुस्तक केवळ १०० रुपयात उपलब्ध करून दिले जाईल. पण जे एका पुस्तकांसाठी १८० रुपये सहज खर्च करू शकतात, अशा व्यक्ती, संस्था, संघटनांनी जास्तीस जास्त प्रतीची नोंदणी करावी.
अधिक संख्येने पुस्तके खरेदी केल्यास माफक सवलत दरात मिळेल. आपल्या या खरेदीतून डेक्कन क्वेस्ट फाऊंडेशनला अर्थसाहाय्य उपलब्ध होऊन संस्थेच्या संशोधन कार्याला हातभार होईल. त्यामुळे शिक्षण संस्था, संघटना, समाजसेवी संस्थांनी जास्तीत जास्त प्रती खरेदी कराव्यात.
________________________________________
IDFC FIRST Bank
Deccan Quest Foundation
A/C 10064214696
Undri Branch, Pune
IFSC Code : IDFB0041373
MICR Code : 411751013
गुगल पे : 9421661259

(पैसे भरल्यानंतर आपला संपूर्ण पोस्टल पत्ता, मोबाईल नंबर इनबॉक्स करावा किंवा 95034 29076 या नंबरवर व्हाट्सएप करावे.)

डेक्कन क्वेस्ट पब्लिकेशन, पुणे
#इस्लाम #बिलाल

दुसऱ्या आवृत्तीची मुद्रणपूर्व नोंदणी सुरूअसा होता टिपू सुलतान!लेखक : सरफराज अहमदपाने : १२० (सहा रंगीत)मूळ किंमत : १८० रु...
28/01/2022

दुसऱ्या आवृत्तीची मुद्रणपूर्व नोंदणी सुरू

असा होता टिपू सुलतान!
लेखक : सरफराज अहमद

पाने : १२० (सहा रंगीत)
मूळ किंमत : १८० रुपये
सवलतीत ९० + ३० (पोस्टल)
पाच पेक्षा अधिक प्रती घेतल्यास पोस्टेज खर्चात सूट

खाते नंबर
IDFC FIRST Bank
Deccan Quest Foundation
A/C 10064214696
Undri Branch, Pune
IFSC Code : IDFB0041373
MICR Code : 411751013

गुगल पे : 9421661259

(पैसे भरल्यानंतर आपला संपूर्ण पोस्टल पत्ता, मोबाईल नंबर इनबॉक्स करावा किंवा 95034 29076 या नंबरवर व्हाट्सएप करावे.)

#टिपू

वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते फारुख अहमद यांना 'बिलाल इब्न रबाह' पुस्तकांचा संच सुपुर्द करताना डेक्कन क्वेस्टचे सं...
27/01/2022

वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते फारुख अहमद यांना 'बिलाल इब्न रबाह' पुस्तकांचा संच सुपुर्द करताना डेक्कन क्वेस्टचे संपादक कलीम अजीम आणि सरफराज अहमद...
सवलतीच्या दरात आजच आपल्या प्रति नोंदणी करा..

***
पुस्तकाची मूळ किंमत १५० रुपये आहे. अतिरिक्त पोस्टेज चार्ज ३० भरून पुस्तक घरपोच मिळू शकेल.
परंतु ज्यांना पुस्तक वाचायचे आहे पण १८० रुपये देणे शक्य नाही, अशांना पुस्तक केवळ १०० रुपयात उपलब्ध करून दिले जाईल. पण जे एका पुस्तकांसाठी १८० रुपये सहज खर्च करू शकतात, अशा व्यक्ती, संस्था, संघटनांनी जास्तीस जास्त प्रतीची नोंदणी करावी.

अधिक संख्येने पुस्तके खरेदी केल्यास माफक सवलत दरात मिळेल. आपल्या या खरेदीतून डेक्कन क्वेस्ट फाऊंडेशनला अर्थसाहाय्य उपलब्ध होऊन संस्थेच्या संशोधन कार्याला हातभार होईल. त्यामुळे शिक्षण संस्था, संघटना, समाजसेवी संस्थांनी जास्तीत जास्त प्रती खरेदी कराव्यात.

IDFC FIRST Bank
Deccan Quest Foundation
A/C 10064214696
Undri Branch, Pune
IFSC Code : IDFB0041373
MICR Code : 411751013

गुगल पे : 9421661259

(पैसे भरल्यानंतर आपला संपूर्ण पोस्टल पत्ता, मोबाईल नंबर इनबॉक्स करावा किंवा 95034 29076 या नंबरवर व्हाट्सएप करावे.)

डेक्कन क्वेस्ट पब्लिकेशन, पुणे
#इस्लाम #बिलाल

साने गुरुजी लिखित 'इस्लामी संस्कृती'ची दुसरी आवृत्ती पुण्यातील राष्ट्र सेवा दलाच्या कार्यालयात दाखल झाली. लोकभारतीचे अध्...
26/01/2022

साने गुरुजी लिखित 'इस्लामी संस्कृती'ची दुसरी आवृत्ती पुण्यातील राष्ट्र सेवा दलाच्या कार्यालयात दाखल झाली. लोकभारतीचे अध्यक्ष श्रीयुत कपिल पाटील यांनी पहिली प्रत उदगीर येथे नियोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे यांना दिली.
राष्ट्र सेवा दलाचे अध्यक्ष डॉ. गणेश देवी यांनी इस्लामी संस्कृतीची बल्क ऑर्डर दिली आहे. लवकरच ती पोहोच केली जाईल. या शिवाय आज होणाऱ्या सोहळ्यात प्रमुख उपस्थितांना ही प्रत सप्रेम देण्यात येईल, यासाठी स्वतंत्र ऑर्डर त्यांनी दिली आहे...
#इस्लामीसंस्कृती #सानेगुरुजी

डेक्कन क्वेस्ट द्वारा प्रकाशित बिलाल इब्न रबाह पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रविवारी पुण्यातील कौसर बाग मस्जिद येथे संपन्न झाल...
24/01/2022

डेक्कन क्वेस्ट द्वारा प्रकाशित बिलाल इब्न रबाह पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रविवारी पुण्यातील कौसर बाग मस्जिद येथे संपन्न झाला.
ह्या कार्यक्रमाला विनोद शिरसाठ, प्रमोद मुजुमदार, संदेश भंडारे, अली इनामदार, डॉ. रफीक सय्यद, सरफराज अहमद, कलीम अजीम व मस्जिद कमेटीचे पदाधिकारी उपस्थित होते.
रविवारी कौसर बाग मस्जिद परिसरात गैरमुस्लिम बांधवाशी समाज संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यात पुस्तकाचे प्रकाशन केले गेले.
प्रमुख कार्यक्रमानंतर डेक्कन क्वेस्ट फाऊंडेशनचे सरफराज अहमद यांचे 'मस्जिदींचा इतिहास व इस्लामी परंपरा' या विषयावर विशेष व्याख्यान झाले.
त्यानंतर मान्यवरांची भाषणे झाली. ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख यांनी विविध धर्मातील समूह संवादावर भर दिला. हिंदू-मुस्लिम सांस्कृतिक विलास चे प्रयत्न सातत्याने झाले पाहिजे असेही मत त्यांनी मांडले.
सात दशकांपूर्वी इस्लामी संस्कृती व इस्लाम समजून घेण्याचा प्रयत्न साने गुरुजींनी केला होता, तो प्रयत्न आता अशा समूह संवादाच्या माध्यमातून सातत्याने व्हायला हवे, असे मत साधना साप्ताहिकाचे संपादक विनोद शिरसाठ यांनी मांडले.
सलोखा मंचचे समन्वयक प्रमोद मुजुमदार म्हणाले सामाजिक सद्भाव व सलोखा वृद्धिंगत व्हावा असा प्रयत्न नागरिक समूहाने करायला हवा; त्यासाठी अल्पसंख्यांक समुदायाला विश्वासात घ्यावे लागेल. त्यांच्या मनातून बहुसंख्यांकाबद्दल असलेली दूर करण्यासाठी सलोखा विशेष प्रयत्न करेल, असेही ते म्हणाले.
या सोहळ्याला सुमारे दोनशे ते अडीचशे जण हिंदू मुस्लिम बांधव उपस्थित होते. कार्यक्रमानंतर सर्व उपस्थितांना बिलाल व साने गुरुजी यांच्या इस्लामी संस्कृतीच्या (दूसरी आवृत्ती) प्रती विनामूल्य वितरीत करण्यात आल्या.

#पुणे #मुस्लिम #बिलाल #इस्लाम

Deccan Quest Publication ने प्रकाशित खेलें  ‘बिलाल : प्रेषितांचे एक सोबती’ हे दुसरं पुस्तक आहे. त्याची प्रकाशनपूर्व नोंद...
09/01/2022

Deccan Quest Publication ने प्रकाशित खेलें ‘बिलाल : प्रेषितांचे एक सोबती’ हे दुसरं पुस्तक आहे. त्याची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू केली होती. त्याला चांगला प्रतिसाद लाभला.
एकाच दिवसात तब्बल १२५ पुस्तकांची नोंदणी झाली. त्यानंतरच्या काही दिवसात सुमारे २०० पुस्तकांची नोंदणी झाली. शिवाय अनेकांनी फोनवरुन ऑफलाईन नोंदणीही केली. नोंदणीची प्रक्रिया अद्यापही सुरू आहे.
नोंदणी केलेल्या सर्व वाचकांना व सेंटरच्या हितचिंतकांना अद्याप पुस्तके पोहचली असेल. नोंदणी करून अजूनही ज्यांना पुस्तक पोस्टाने प्राप्त झालेले नाही, त्यांनी ‘डेक्कन क्वेस्ट पब्लिकेशन’ किंवा ‘गाजिउद्दीन रिसर्च सेंटर’च्या प्रतिनिधींशी संपर्क साधावा.
बिलाल पुस्तक विक्रीसाठी उपलब्ध आहे. त्याची मूळ किंमत १५० रुपये आहे. अतिरिक्त पोस्टेज चार्ज ३० भरून पुस्तक घरपोच मिळू शकेल.
परंतु ज्यांना पुस्तक वाचायचे आहे पण १८० रुपये देणे शक्य नाही, अशांना पुस्तक केवळ १०० रुपयात उपलब्ध करून दिले जाईल. पण जे एका पुस्तकांसाठी १८० रुपये सहज खर्च करू शकतात, अशा व्यक्ती, संस्था, संघटनांनी जास्तीस जास्त प्रतीची नोंदणी करावी.
अधिक संख्येने पुस्तके खरेदी केल्यास माफक सवलत दरात मिळेल. आपल्या या खरेदीतून सेंटरला अर्थसाहाय्य उपलब्ध होऊन संशोधन कार्याला हातभार होईल. त्यामुळे शिक्षण संस्था, संघटना, समाजसेवी संस्थांनी जास्तीत जास्त प्रती खरेदी कराव्यात.
सदरील पुस्तकाला निवडक देणगीदारांनी अर्थसाहाय्य उपलब्ध करून दिले होते, त्यामुळे पुस्तकाची किंमत कमी ठेवणं शक्य झालं.
मूळात हे पुस्तक सेंटरकडून विनामोबदला वितरित करण्याची कल्पना होती. परंतु प्रिटिंगसाठी लागलेला खर्च अवाढव्य आहे. शिवाय पुस्तक इतरत्र पाठविण्यासाठी कुरिअर चार्जेस लागतात. त्यामुळे फक्त निर्मिती खर्चात पुस्तक वितरित करीत आहोत.

खाते नंबर
IDFC FIRST Bank
Deccan Quest Foundation
A/C 10064214696
Undri Branch, Pune
IFSC Code : IDFB0041373
MICR Code : 411751013

गुगल पे : 9421661259

(पैसे भरल्यानंतर आपला संपूर्ण पोस्टल पत्ता, मोबाईल नंबर इनबॉक्स करावा किंवा 95034 29076 या नंबरवर व्हाट्सएप करावे.)

गाजिउद्दीन रिसर्च सेंटर, सोलापूर
डेक्कन क्वेस्ट पब्लिकेशन, पुणे
#बिलाल #इस्लाम

बिलाल पुस्तकाविषयी थोडेसं १९७०च्या दशकात अमेरिकेत कृष्णवर्णीयांची मोठी चळवळ उभी राहिली. मूलभूत हक्क, अस्तित्व व राष्ट्र ...
09/01/2022

बिलाल पुस्तकाविषयी थोडेसं

१९७०च्या दशकात अमेरिकेत कृष्णवर्णीयांची मोठी चळवळ उभी राहिली. मूलभूत हक्क, अस्तित्व व राष्ट्र योगदानाच आपला वाटा सिद्ध करणे व दाखवून देणे हे या चळवळीचा उद्देश होता.
त्याच काळात अमेरिकेतील ‘बिलालीयन सोसायटी’ या अफ्रिकन वंशीय मुस्लिम संस्थेने प्रेषितांचे सोबती हब्शी गुलाम हजरत बिलाल यांचे चरित्र उभे केले.
त्यातून आपल्या पूर्वजांचा समृद्ध इतिहास जनतेसमोर मांडणे हा या संस्थेचा उद्देश होता. शिवाय बिलाल हे गुलामगिरी प्रथेतून मुक्त झालेले जगातील पहिले व्यक्ती होते. गुलामाला आदराने वागविले व त्यांना सन्मान दिला. त्या सन्मामाचे प्रतीक म्हणूून ह्या संस्थेने हजरत बिलाल यांनी प्रस्थापना केली.
इस्लामने बिलालना मुक्त करून सरंजामी व शोषणावर आधारलेल्या भांडवली समाजव्यवस्थेत न्याय्य हक्काची उभारणी केली. तसेच हजारों वर्षांपासून चालत आलेली वर्णभेदाची चौकट तोडून टाकली.
प्रेषित मुहंमद (स) यांनी इस्लामच्या इतिहासातील पहिली ‘अज़ान’ देण्याचा मान हजरत बिलाल यांना दिला. इस्लामी समतेच्या मुल्याची ही कृतिशील उद्धोषणा होती. ज्या अरबी समुदायाने बिलाल यांना गुलाम म्हणून जेरबंद केले, त्यांच्यावर गुलामगिरीचा सामाजिक अपमान लादला. त्याच अरबांनी बिलाल यांचे नेतृत्व स्वीकारून त्यांना सामाजिक आणि राजकीय सन्मान व प्रतिष्ठा मिळवून दिली. अरब समाज जीवनातील हे परिवर्तन साऱ्या मानवी समाजाला समतेची नवी दृष्टी देण्यात यशस्वी ठरले.
‘हजरत बिलाल’ हे इस्लामी समाजाने वर्णविषमतेत पिचलेल्या कृष्णवर्णीयांना दिलेल्या सन्मानाचे प्रतीक आहेत.

#बिलाल #इस्लाम

बिलाल इब्न रबाहनोंदणी केलेल्या सर्वांना पुस्तके पाठविण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे.
27/12/2021

बिलाल इब्न रबाह
नोंदणी केलेल्या सर्वांना पुस्तके पाठविण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे.

कृतज्ञता

गाजिउद्दीन रिसर्च सेंटरचं बहुप्रतिक्षित पुस्तक 'बिलाल इब्न रबाह' अखेर प्रिंट होऊन आलं आहे. संस्थेचं हे दुसरं स्वयंप्रकाशित पुस्तक आहे. यापूर्वी सेंटरनं साने गुरुजी यांचे इस्लामी संस्कृती पुनर्प्रकाशित केलं होतं. त्याला चांगला प्रतिसाद लाभला. सध्या त्याच्या प्रति संपलेल्या आहेत. दुसरी आवृत्ती लवकरच येईन..
हजरत बिलाल हे इस्लामी समतेच्या चळवळीचे प्रमुख संघटक होते. त्यांच्यावर मराठीत एकही पुस्तक उपलब्ध नव्हते. 1970च्या दशकात अमेरिकेत कृष्णवर्णीयांनी आपल्या नागरी हक्कासाठी मोठी चळवळ सुरू केली होती. त्याचाच भाग म्हणून स्थानिक बिलालीयन सोसायटीनं आपली रुट्स शोधून काढण्यासाठी या पुस्तकाची निर्मिती केली होती. आजही हे पुस्तक विक्रमी संख्येनं वाचलं जातं. संबंधित पुस्तक महत्वकांक्षी प्रकल्प म्हणून सेंटरनं अनुवाद करून घेतलं.
पुस्तकाचे अनुवादक डॉ. मीर इसहाख शेख सेंटरचे मार्गदर्शक होते. दुसऱ्या लाटेत कोविडनं त्यांचं निधन झालं. हे पुस्तक त्यांना समर्पित करीत आहेत. त्यांंनी अनुवाद केलेली अजून काही पुस्तकं निर्मिती प्रक्रियेत आहेत.
बिलाल पुस्तकासाठी लागणारा खर्च सेंटरनं लोकनिधीतून संकलित केला. त्याला चांगला प्रतिसाद लाभला. परंतु अपेक्षित खर्च आणि जमा निधी यात तफावत होती. निधीची कमतरता असल्याने पुस्तकाला उशीर झाला. काही जणांनी उर्वरित निधी पुरवण्याची जबाबदारी घेतली आहे. यथावकाश ती प्राप्त होईल.
लोकनिधी प्राप्त झाल्याने पुस्तक निर्मितीला अर्थसाहाय्य लाभले. त्यामुळे वाचकांना निर्मिती खर्चात पुस्तक उपलब्ध होऊ शकेल. प्रकाशनपूर्व नोंदणीलाही उत्तम प्रतिसाद लाभला. ज्यांनी नोंदणी केली आहे, त्यांना टप्प्याटप्प्याने पुस्तके पाठवली जात आहेत.
संबंधित पुस्तक कमी किमतीत उपलब्ध आहे. शाळा, संस्था, संघटना इत्यादींनी हे पुस्तक जास्तीत जास्त खरेदी करावे. तसंच सेंटरचे हितचिंतक व मित्रवर्यांनी भेट देण्यासाठी ह्या पुस्तकाला प्राप्त करावे.
आपल्या या खरेदीतून सेंटरला आर्थिक साहाय्य लाभेल. सेंटरचं कार्य लोकनिधीतून चालते. त्यासाठी सेंटरच्या वतीने अपील केलं जात आहे की, जास्तीत जास्त पुस्तकाच्या प्रति खेरदी कराव्यात.
शेवटी ज्यांनी या पुस्तकाच्या निर्मितीमध्ये लोकनिधी देऊन सहकार्य केलं त्यांच्याबद्दल डेक्कन क्वेस्ट फाउंडेशन कृतज्ञ आहे...

* नोट : पुस्तकासाठी खरेदीसाठी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना फोन करुन किंवा मॅसेंजरमध्ये संपर्क साधावा..

विनित
सरफराज अहमद
कलीम अजीम
27 डिसेंबर 2021
#बिलाल

प्रकाशनपूर्व नोंदणीचा आज अखेरचा दिवसपुस्तकाचे नाव : बिलाल इब्न रबाहलेखक : डॉ. मुहंमद अब्दुल रऊफमूळ किंमत : १५० रुपयेसवलत...
19/12/2021

प्रकाशनपूर्व नोंदणीचा आज अखेरचा दिवस

पुस्तकाचे नाव : बिलाल इब्न रबाह
लेखक : डॉ. मुहंमद अब्दुल रऊफ
मूळ किंमत : १५० रुपये
सवलतीत : १०० रुपये (टपाल खर्चासहित)
पाच किंवा त्यापेक्षा जास्त प्रती मागविल्यास अतिरीक्त सवलत दिली जाईल.

सवलत फक्त आज रविवार १९ डिसेंबर पर्यंत लागू...
आठवडाभरात पुस्तक उपलब्ध होईल.
(पैसे भरल्यानंतर आपला संपूर्ण पोस्टल पत्ता, मोबाईल नंबर इनबॉक्स करावा किंवा 95034 29076 या नंबरवर व्हाट्सएप करावे.)
#बिलाल #इस्लाम

Address

6/48, Raheem Manzil, Near Quba Mazjid, Kondhwa
Pune

Opening Hours

Monday 10am - 5pm
Tuesday 10am - 5pm
Wednesday 10am - 5pm
Thursday 10am - 5pm
Friday 10am - 5pm
Saturday 10am - 5pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when DQ Publication posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to DQ Publication:

Share

Category