SuraajNews

SuraajNews फक्त बातमी नाही एक विचार तुमचा आणि आमचा.

" आमचं जिवंत राहण मुश्किल केलच आहे, किमान आता निवांत मरणाची तरी चांगली सोय करा. पुण्यातील खराब झालेल्या स्मशानभूमी साठी ...
26/10/2023

" आमचं जिवंत राहण मुश्किल केलच आहे, किमान आता निवांत मरणाची तरी चांगली सोय करा. पुण्यातील खराब झालेल्या स्मशानभूमी साठी ' Aam Aadmi Party - Pune यांची मागणी..

मायबाप सरकार PMC Pune तुमच्या काळात दवाखाना चांगला नाही, शिक्षण चांगल नाही, आरोग्य व्यवस्थित राखाव म्हटल तरी हवा दूषित हे सगळ सहन होत नाही म्हणून आता मरावं म्हटलं तरी स्मशानभूमी खराब ?

सरकार तुम्ही आमचे जगणे अवघड केलेच आहे पण मरतानाही मृत शरीराची विटंबना तुमच्या कडून सोडवली जात नाही ! सामान्य जनता कष्टातून पोटाला चिमटा देऊन तुम्हाला Tax स्वरूपात दिलेल्या पैशाची हीच का परतफेड ?

अश्या कठोर शब्दात चे युवा आघाडी अध्यक्ष Amit Mhaske ( अमित म्हस्के ) यांनी मागणी केली आहे !

लवकरात लवकर स्मशानभूमी दुरुस्त नाही झाल्या तर आंदोलनाच्या इशारा सुद्धा ' आप पुणे च्या वतीने देण्यात आला आहे !

#स्मशानभूमी

20/10/2023

गाडी चा रेस वाढवताना दोन सेकंद विचार करा

#दुर्दैव
हिरो सारखा सुंदर दिसणारा मुलगा जो बेंगलोरच्या नामांकित विद्यापीठात M.Tech चे उच्च शिक्षण घेत होता, अजून चार महिन्यांनी तो मोठ्या नोकरीवर रुजू होणार होता. पुढील वर्षात त्याने परदेशातही नोकरीस जाण्याची तयारी सुरु केली होती. ज्याची आई त्याच्या लग्नाची स्वप्न रंगवत होती. पोरगा हाताखाली आल्याचा बापाला अभिमान वाटत होता. सगळं अतिशय सुखा, समाधानात सुरु होते.

आणि मग अचानक २२ सप्टेंबरच्या रात्री वडिलांना बेंगलोर वरून त्यांच्या मुलाच्या मित्राचा फोन येतो की “तुमच्या मुलाचा अक्सिडेंट झालाय, डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे, तुम्ही तातडीने निघा” अंगावर अचानक वीज कोसळावी अशी ही दुर्देवी बातमी त्या बापाने कशी झेलली असेल ? बापाला बेंगलोरला पोहोचायला दुसऱ्या दिवशीची दुपार होणार होती. एवढ्या लांबच्या प्रवासात त्याची काय मानसिकता असेल.

अपघात झाल्यानंतर त्या मुलाच्या मित्रांनी त्याला तातडीने हॉस्पिटलमधे दाखल केले. वडिल प्रवासात असतानाच मित्रांचा दुसरा फोनयेतो की “डॉक्टर म्हणालेत, मेंदूचे ऑपरेशन करावे लागेल, पण ते करूनही पेशंटचा फक्त एक टक्का चान्स असेल जगण्याचा” काय निर्णय घेतला असेल बापाने. दुसऱ्याच क्षणाला हॉस्पिटलच्या अकाऊंटवर पैसे जमा केले आणि बेंगलोर मधील नामांकित न्यूरोसर्जनला ब्रेन सर्जरीसाठी परवानगी दिली.

वडील दुसऱ्या दिवशी दुपारी पोहोचले, ICU मधे मुलगा व्हेंटिलेटरवर होता. पुढील अठ्ठेचाळीस तासात जर बॉडीने काही रिफ्लेक्स दिले तरच पुढील उपचार होणार होते अन्यथा त्याच रात्री पेशंट गेल्यात जमा होता. मुलाच्या सर्व नातेवाईकांनी देव पाण्यात ठेवले, प्रचंड प्रार्थना सुरू झाली आणि चमत्कार घडावा असे मुलाने थोडे तोंड हलवले. गेलेला जीव परत आला. सर्वांच्या आशा पल्लवित झाल्या. मुलाने डोळे उघडले या आनंदाने आईला खास महाराष्ट्रातून बेंगलोरला बोलवून घेतले गेले. पोराचे उघडलेले डोळे पाहून आणि हाक मारल्यावर त्याच्याकडून मिळणारा प्रतिसाद पाहून आईच्या जीवात जीव आला होता.

दुसऱ्याच दिवशी डॉक्टरांनी उपचार सुरू केले. दिवसाला लाख सव्वालाखांचा खर्च होता. वडील डॉक्टरला म्हणाले “कितीही खर्च होवूद्या, पण माझ्या मुलाला वाचवा” २३ सप्टेंबर पासून प्रकृती वेगाने सुधारण्यास सुरुवात झाली, पुढील आठवड्यात व्हेंटीलेटर काढला, त्यानंतर पाच दिवसांनी ऑक्सिजन काढला. मुलाने आता स्वतः श्वास घ्यायला सुरुवात केली होती, हात हलवणे, तोंड हलवणे, डोळ्यांच्या पापन्या फडफडणे अशा क्रिया सुरू झाल्याने पेशंट आता धोक्याच्या बाहेर आलाय असे वाटत होते. डॉक्टर म्हणाले आता दोन तीन दिवसात तुमचा पेशंट ICU मधून जनरल वार्ड मधे शिफ्ट होईल.

पण नियतीच्या मनात काही दुसरंच होतं. अचानक १३ ऑक्टोबर रोजी फुफ्फुसात इन्फेक्शन झाल्याने मुलाला पुन्हा व्हेंटिलेटर लावण्यात आला. गेली २२ दिवस हायर अँटीबायोटिक्सच्या वापरामुळे त्याच्या बॉडीने औषधांना रेसिस्ट करायला सुरुवात केल्याने इन्फेक्शन आटोक्यात आणणे आता शक्य नव्हते. पेशंट सिरियस झाल्याचे डॉक्टरांनी वडिलांना सांगताच ते हतबल होवून रडायला लागले. गेल्या वीस बावीस दिवसात हा बाप पोराच्या काळजीने किमान दोनशे वेळा रडला असेल. मुलगा सिरिअस आहे ही गोष्ट आईपासून लपवून ठेवायची असल्याने वडिलांनी आईला १५ ऑक्टोबर रोजीच घरी पाठवले.

१६ ऑक्टोबर काळा दिवस उजाडला आणि सकाळी १०:३० वाजता उपचारादरम्यान मुलाची प्राणज्योत मालवली आणि इथूनच सगळ्या अडचणी सुरु झाल्या. काहीही झाले तरी मुलगा गेल्याची बातमी त्याच्या आईपर्यंत पोहचू द्यायची नव्हती. कारण तिला सावरणे सर्वांसाठीच कठीण जाणार होते. पण हळू हळू ही बातमी वाऱ्यासारखी वडिलांच्या आणि मुलाच्या मित्रपरिवारात पसरू लागली. हॉस्पिटलचे अवाढव्य बील, पोलिस परवानग्या, पोस्ट मॉर्टेम ह्या सगळ्या प्रोसेस पूर्ण व्हायला चोवीस तास गेले. अखेर १७ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता मुलाचे शव घेवून त्याचे वडील काही नातेवाईक आणि मुलाच्या मित्रांसह रुग्णवाहिकेत कर्नाटकातून महाराष्ट्राकडे निघाले.

घरी पोहोचायला त्यांना १४ तास लागणार होते. तोपर्यंत मुलाच्या आईला हॉस्पिटलमधे ऍडमीट करून ठेवले होते. मुलगा गेलाय हा धक्का तिला सहन होणारा नव्हता. अखेर रुग्णवाहिका जवळ आल्यावर रात्री ९:३० वाजता डॉक्टरच्या उपस्थितीत मुलाच्या आईला तिचं लेकरू गेल्याचे सांगितले. तिच्या हंबरड्याने सगळं हॉस्पिटल हादरलं, एका क्षणात दुःखाचा डोंगर तिच्यावर कोसळला. रडता रडता तिची वाचा गेली. ती बेशुद्ध झाली. शुद्धीवर आली की पुन्हा टाहो फोडायली. तिचं पिल्लू आता कधीच दिसणार नव्हतं. त्याच्यासाठी तिने पाहिलेली स्वप्न आता फक्त दिवास्वप्न बनून राहणार होती.

१७ सप्टेंबरच्या मध्यरात्री रुग्णवाहिका मुलाचे शव घेवून घरी पोहोचली. वडील कोणत्या तोंडाने मुलाच्या आईला सांगणार होते की मी तुझं पिल्लू जिवंत आणू शकलो नाही. त्या मुलाच्या आई वडिलांनी मिठी मारुन फोडलेला हंबरडा ऐकून प्रत्येकाच्याच काळजाचा थरकाप उडाला. रात्री १:३० च्या सुमारास मुलावर शोकाकुल वातावरणात स्मशानभूमीत विधीवत अंत्यसंस्कार झाले. उपस्थित सर्व नातेवाईक आणि मित्रपरिवाराने साश्रू नयनांनी त्याला निरोप दिला. तरुण मुलाच्या जळत्या चितेला फेऱ्या मारणाऱ्या या बापाच्या हृदयावर किती खोल जखम झाली असेल याची कल्पना करवत नाही.

पोरांनो,
गाडी चालवताना ऍक्स्लेटरच्या मुठीला पीळ द्यायच्या आधी, आतडी पिळवटून रडणारे आईबाप आठवा. आपल्या धडकेमुळे दुसऱ्यांचा आणि दुसऱ्याच्या धडकेमुळे आपला जीव जाणार नाही याची सर्वतोपरी काळजी घ्या. जीवन अनमोल आहे, त्याहीपेक्षा आयुष्यात एकदाच मिळणारे आई बाप बहुमूल्य आहेत. आपल्या शिवाय त्यांचे काय होईल याचे भान ठेवा. एवढी वाईट वेळ कुणावरही येवू नये.

विशाल गरड
१८ ऑक्टोबर २०२३, बार्शी

https://suraajnews.com/2023/10/13/aam-aadmi-party-pune-team/Aam Aadmi Party Pune Team मध्ये अध्यक्षा पासून सदस्या पर्यंत...
13/10/2023

https://suraajnews.com/2023/10/13/aam-aadmi-party-pune-team/

Aam Aadmi Party Pune Team मध्ये अध्यक्षा पासून सदस्या पर्यंत 80% उच्यशिक्षितांनी स्विकारला पदभार ! नवीन आरखडा रचून निवडणुकांना सामोरे जाण्याचे महाराष्ट्र प्रदेश संघटक मा.अजित फाटके पाटील यांचे कार्यकर्त्याना आवाहन !

Aam Aadmi Party - Pune Sachin Dilip Kotwal सचिन-नाना कोतवाल

Aam Aadmi Party Pune Team ( Aam Aadmi Party Pune President ) च्या अध्यक्ष स्थानी दिसेल ! आपल्याला भारतातील सामान्य नागरिक सामान्य विचार करून नोकरी, धं.....

Indian Team चे Time Table
08/10/2023

Indian Team चे Time Table

नैनीताल मध्ये मोठी दुर्घटना !         😢...
08/10/2023

नैनीताल मध्ये मोठी दुर्घटना ! 😢...

https://suraajnews.com/2023/10/07/aam-aadmi-party-pune/Aam Aadmi Party Pune चे कार्यकर्ते पोहचले फुलांचे गुच्छ घेऊन पोली...
07/10/2023

https://suraajnews.com/2023/10/07/aam-aadmi-party-pune/

Aam Aadmi Party Pune चे कार्यकर्ते पोहचले फुलांचे गुच्छ घेऊन पोलीस स्टेशन मध्ये !

Aam Aadmi Party Pune चे कार्यकर्ते पोहचले फुलांचे गुच्छ घेऊन पोलीस ( Police Department Pune ) स्टेशन मध्ये !

https://suraajnews.com/2023/09/18/aam-aadmi-party-warje-vahak-din/Aam Aadmi Party Waraje च्या वतीने वाहक दिन साजरा करण्य...
18/09/2023

https://suraajnews.com/2023/09/18/aam-aadmi-party-warje-vahak-din/

Aam Aadmi Party Waraje च्या वतीने वाहक दिन साजरा करण्यात आला.

Aam Aadmi Party warje Vahak Din आम आदमी पार्टीच्या वतीने श्री पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. संपूर्ण जगामध्ये एका ठिकाणची वस्तू दुसऱ...

https://youtu.be/EOlHQL8PU6oAam Aadmi Party Pune च्या महिलांनी पाकिस्तानच्या प्रतीकात्मक पुतळ्याला जोडे मारून केला संताप...
15/09/2023

https://youtu.be/EOlHQL8PU6o

Aam Aadmi Party Pune च्या महिलांनी पाकिस्तानच्या प्रतीकात्मक पुतळ्याला जोडे मारून केला संताप व्यक्त !

Anantnag हल्ल्याच्या निषेधार्थ Aam Aadmi Party Pune कडून पाकिस्तानला जोडे मारो आंदोलन | Aap Pune anantnag terror encounter, Anantnag Encounter News, Aam Aa...

https://suraajnews.com/2023/09/15/aam-aadmi-party-pune-andolan-2/Aam Aadmi Party Pune चे Pakistan विरोधात भर रस्त्यावर ज...
15/09/2023

https://suraajnews.com/2023/09/15/aam-aadmi-party-pune-andolan-2/

Aam Aadmi Party Pune चे Pakistan विरोधात भर रस्त्यावर जोडे मारो आंदोलन.

मराठा वार मेमोरियल, ईस्ट सट्री पुणे च्या समोर आम आदमी पार्टी पुणे च्या कार्यकर्त्यांचा पाकिस्तान विरोधी आक्रमक पवित्रा पाहायला मिळाला !

Aam Aadmi Party Pune जम्मू कश्मीरच्या अनंतनाग मध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत भारतीय लष्कराच्या चार जवानांना वीरमरण आल...

16/08/2023

Address

Disha Apartment, Digambar Colony, Ganganagar, Fursungi
Pune
412308

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm
Sunday 9am - 5pm

Telephone

+919860845127

Alerts

Be the first to know and let us send you an email when SuraajNews posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to SuraajNews:

Share