NAG News Network

NAG News Network hey friends.. कोरोनाबाबत तसेच अन्य अपडेटेड, ले

पुण्यावरील 'पाणी संकट' टळले; धरणे 75 टक्के भरलीपुणे: जून आणि जुलै महिन्यात पावसाने पाठ फिरवल्याने पुणेकरांवर पाणीकपातीचे...
15/08/2020

पुण्यावरील 'पाणी संकट' टळले; धरणे 75 टक्के भरली

पुणे: जून आणि जुलै महिन्यात पावसाने पाठ फिरवल्याने पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट ओढवले होते. 5 ऑगस्टपर्यंत जेमतेम 9 टीएमसी असणारा पाणीसाठा 15 ऑगस्ट रोजी तब्बल 22 टीएमसी एवढा झाला आहे. गेल्या 5-6 दिवसांपासून पुणे शहर व परिसरात पावसाची दमदार बॅटिंग सुरू आहे. परिणामी वरसगाव, टेमघर, पानशेत, खडकवासला धरणे मिळून तब्बल 75 टक्के एवढा पाणीसाठा झाला आहे. खडकवासला 100 टक्के भरले आहे. पुण्याला दरवर्षी 15 टीएमसी पाणी लागते. त्यामुळे पुढील वर्षाची तहान भागवली गेल्याचे दिसून येते. पुढील आठवडाभर पुण्यात दमदार पाऊस सुरूच राहण्याचा अंदाज आयएमडी पुणेने वर्तविला आहे, त्यामुळे सर्व धरणे लवकरच 100 टक्के भरतील अशी शक्यता आहे.

कोरोना, मरे ना ! पुणे: कोरोना, मरे ना! अशी आताची अवस्था आहे. विज्ञान-विषयक काही आंतरराष्ट्रीय नियतकालिके सांगू लागली आहे...
15/08/2020

कोरोना, मरे ना !


पुणे: कोरोना, मरे ना! अशी आताची अवस्था आहे. विज्ञान-विषयक काही आंतरराष्ट्रीय नियतकालिके सांगू लागली आहेत की, तो आणखी दोन वर्षे आपल्याला छळणार आहे. या कोरोनाचा उगम चीनमधून झाला आहे. या आधीही अशा काही महामाऱ्या तेथूनच आल्या, पण त्या जेवढ्या घातक नव्हत्या, तेवढा हा कोरोना घातक आणि विधूळवाटी आहे. चीनमधल्या वुहानच्या इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीतून हा विषाणू निघाला आणि काही महिन्यांमध्ये काही लाख लोकांना त्याची बाधा झाली. कोण, केव्हा, कधी त्याच्या त्या संसर्गात येईल ते कळेनासे झाले. वुहानमध्ये हा विषाणू सापातून आला की वटवाघळातून आला याबाबत चर्चा होत राहिली आणि चीनने आपल्याकडे वटवाघळांचे मांस खाल्ले जातच नाही, असा खुलासा केला. त्यानंतर चीनने जंगली श्वापदांच्या मांसविक्रीवर बंदी घातल्याचे जाहीर केले. याचा अर्थ काय? त्यासाठीच ही शोधयात्रा पुस्तकातून घेण्यात आली आहे. ‘श्री गंधर्व-वेद’ प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ‘ड्रॅगनचे करोनास्त्र’ या मराठीतील पहिल्या-वहिल्या कोरोनाबाबतच्या पुस्तकातून अशा अनेक प्रश्नांची उत्तरे वाचकप्रेमींना मिळू शकणार आहेत.
ज्येष्ठ पत्रकार अरविंद व्यं. गोखले व वासुदेव कुलकर्णी यांनी ते लिहिले आहे. जगासह भारताला कोरोनामुळे पुरते वेठीस धरले असून अनेक उद्योग-धंद्यांची पुरती वाट लागली आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. कोरोनाच्या महामारीमुळे अमेरिका, ऑस्ट्रेलिया, भारतासह जगभराचा चीनकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला. करोनाचा उगम मानवनिर्मित आहे की नैसर्गिक, याबाबत अनेक चर्चांना उधाण आले आहे. मात्र तो मानवनिर्मित असावा, आणि चीनमधून त्याचा उगम झाला असेल, अशी शंका या पुस्तकात व्यक्त करण्यात आली आहे. खुद्द अमेरिकेने हा कोरोनाचा विषाणू प्रयोगशाळेत निर्माण झाल्याची शंका व्यक्त केली असून त्यापाठोपाठ एका फ्रेंच शास्त्रज्ञाने तो मानवनिर्मितच होता, असे सांगून चीनच्या शिडातली हवाच काढून टाकली आहे. मर्कजचे महापापी, श्रमिक वाऱ्यावर, कोरोनानंतरचे जग, पृथ्वीच्या अंताची नांदी, महासंहारक जैवास्त्र आदी गोष्टींचा वस्तुनिष्ठ उहापोह या पुस्तकात लेखकांकडून करण्यात आला आहे. कोव्हिड १९ ने घातलेल्या धुमाकुळाने पुरविलेल्या बी-बियाणांद्वारे पुढील काळात उदंड पिकणाऱ्या साहित्यशिवाराला, त्या साऱ्या वाताहतीचे साक्षेपी चित्रण करणारे हे पुस्तक पायाभूत खतपाणी पुरवत राहील, यात शंकाच नाही.

पुस्तकाचे नाव- ‘ड्रॅगनचे करोनास्त्र’
लेखक- अरविंद व्यं. गोखले, वासुदेव कुलकर्णी
प्रकाशक- श्री गंधर्व-वेद प्रकाशन
पृष्ठं- २१५
किंमत- २५० रु.

कंटेन्मेंट झोन असूनही बिबवेवाडी ओट्यावर उडवले फटाके...-ठोस कारवाईची नागरिकांकडून मागणीपुणे: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढ...
03/07/2020

कंटेन्मेंट झोन असूनही बिबवेवाडी ओट्यावर उडवले फटाके...

-ठोस कारवाईची नागरिकांकडून मागणी

पुणे: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढदिवस, पार्ट्या, सिलिब्रेशन करू नयेत, असे आवाहन करण्यात आले असताना काही नागरिकांना याचे काहीही घेणं-देणं नाही. अशा या निर्ढावलेल्या माणसांकडून व ज्यांना कोरोनाबाबत गांभीर्य नाही, अशांकडून गुरुवारी (दि. 2) मध्यरात्री 12 वाजता फटाके फोडले गेले. बिबवेवाडी ओटा परिसर नव्याने कंटेन्मेंट झोनमध्ये समाविष्ट करण्यात आला. गेल्या 9-10 दिवसांपासून येथे पत्रे लावून मुख्य रस्ता बंद केला गेला आहे. परंतु, धक्कादायक बाब म्हणजे कंटेन्मेंट झोन असूनही बिबवेवाडी ओट्यावरील काही नागरिकांकडून गुरुवारी मध्यरात्री जोराच्या आवाजाचे फटाके फोडले गेले. सुमारे 10 मिनिटे हा फटाके फोडण्याचा उद्योग बिबवेवाडी ओट्यावर सुरू होता. दरम्यान, बिबवेवाडी पीआय कुमार घाडगे आणि बिबवेवाडी वॉर्ड ऑफिसर सोनवणे यांना निरंत वसाहतीकडून बिबवेवाडी ओट्यावरील दोन लेन सीलबंद कराव्यात असे निवेदन दिले गेले होते. मात्र अजूनही या दोन लेन पत्रे लावून सील करण्यात आलेल्या नाहीत. यापूर्वी या ठिकाणी पत्रे होते, मात्र ओट्यावरील काही नागरिकांनी ते तोडले. बिबवेवाडी ओट्यावर 100 च्या वर कोरोना रुग्ण आढळले असून कोठारी ब्लॉक्स येथे एकही रुग्ण नाही. तरीदेखील संपूर्ण रस्ता का बंद करण्यात आला आहे, अशी विचारणा नागरिकांकडून होत आहे. बिबवेवाडी ओट्यावरील बेशिस्त नागरिकांवर त्वरित कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

वस्तूंची होळी करत 'रिपाइं'कडून चीनचा निषेध...पुणे : मोबाईल, खेळणी, इलेक्ट्रॉनिक उपकरणे आदी चिनी वस्तूंची होळी करून रिपब्...
28/06/2020

वस्तूंची होळी करत 'रिपाइं'कडून चीनचा निषेध...

पुणे : मोबाईल, खेळणी, इलेक्ट्रॉनिक उपकरणे आदी चिनी वस्तूंची होळी करून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) 'रिपाइं'ने चीनने गलवान खोऱ्यात भारतीय जवानांवर केलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध केला. तसेच जगभर पसरलेल्या कोरोना महामारीला चीन जबाबदार असल्याच्या कथित पार्श्वभूमीवरही हे होळी आंदोलन करीत चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचे आवाहन 'रिपाइं'ने केले. यावेळी गलवान खोऱ्यात शहीद झालेल्या भारतीय सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. 'रिपाइं'चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार पक्षाचे प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, राष्ट्रीय निमंत्रक advocate मंदार जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी कोथरूडमधील कर्वे पुतळ्यासमोर हे आंदोलन करण्यात आले. कोरोना प्रतिबंधात्मक नियम पाळून हे आंदोलन झाले. यावेळी कोथरूड विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी केशव पवळे, बाबासाहेब तुरूंकमारे, जितेश दामोदरे, रेखा चव्हाण आदी उपस्थित होते.

रुग्ण बिबवेवाडी ओट्यावर, मात्र संपूर्ण परिसर सील...-कोठारी ब्लॉक्स येथील नागरिकांना विनाकारण भुर्दंडपुणे: बिबवेवाडी ओटा ...
25/06/2020

रुग्ण बिबवेवाडी ओट्यावर, मात्र संपूर्ण परिसर सील...

-कोठारी ब्लॉक्स येथील नागरिकांना विनाकारण भुर्दंड

पुणे: बिबवेवाडी ओटा आणि निरंत कॉलनी (कोठारी ब्लॉक्स) परिसर कालपासून (दि. 24 जून) सील केले गेले. बिबवेवाडी ओटा येथील नागरिकांमुळे संपूर्ण रस्ताच सील केला गेला असून त्यांच्यामुळे नागरिकांना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे. शनी/गणपती मंदिर (अण्णाभाऊ साठे चौक) येथे पत्रे लावून रस्ता वाहतुकीकरिता बंद केला गेला आहे. दरम्यान, बिबवेवाडी ओटा येथील नागरिकांना अजूनही कोरोनाचे गांभीर्य नसून विनामास्क फिरत निरंत वसाहत बाहेर ठिकठिकाणी थुंकले जात आहे. बिबवेवाडी ओट्यावर शंभरावर रुग्ण आहेत.तर कोठारी ब्लॉक्स येथे मात्र एकही कोरोना रुग्ण नाही. असे असूनही कोठारी ब्लॉक्स परिसर ओट्यावरील काही निर्लज्ज माणसांमुळे सील केला गेला आहे. बिबवेवाडी ओटा येथील नागरिकांपासून कोठारी ब्लॉक्स येथील नागरिकांना धोका असून संपूर्ण रस्ता बंद करण्यापेक्षा ओटा आणि निरंत कॉलनी मध्ये पत्रे उभारावे, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. हा निर्णय आता क्षेत्रीय कार्यालयाच्या अखत्यारीत येत असून याबाबत कोठारी ब्लॉक्स येथील नागरिकांकडून निवेदन सादर केले जाणार आहे.

एसटी महामंडळास १००० कोटींचे अनुदान देण्याची मागणीमुंबई:  महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचा-यांचे वेतन कोर...
25/06/2020

एसटी महामंडळास १००० कोटींचे अनुदान देण्याची मागणी

मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचा-यांचे वेतन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १००० कोटींचे अनुदान एस.टी.महामंडळास द्यावे, कर्मचा-यांचे माहे मे देय जून २०२० या महिन्याचे १००% वेतन देण्यात यावे यासह विविध मागण्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली असल्याचे महाराष्ट्र एस.टी. वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघटनेचे अध्यक्ष जयप्रकाश छाजेड व सरचिटणीस मुकेश तिगोटे यांनी सांगितले. महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील विविध सवलतींच्या प्रतिपूर्तीच्या २९७ कोटी रकमेतून एस.टी. महामंडळाला २७० कोटी रुपये दिले आहेत. सदर २७० कोटी रूपयांमधून केवळ एस.टी. कर्मचा-यांचे पूर्ण वेतन करण्यासंदर्भात महाराष्ट्र एस.टी. वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघटनेने एस.टी. कर्मचा-यांच्या वेतनापोटी दरमहा २४९ कोटी रूपये लागतात. त्यामुळे खाजगी शिवशाही, ब्रिक्स, इतर कोणत्याही खाजगी कंत्राटदारांची बिले अदा करू नयेत अशी मागणी केली होती. एस.टी. प्रशासनाने काढलेल्या परिपत्रकानुसार ५० टक्के वेतन अदा करण्याचा निर्णय घेतला आहे. सदर निर्णयामुळे एस.टी. कर्मचा-यांच्या मूलभूत गरजा भागविणे शक्य नाहीत. तसेच सदर पगार कपातीमुळे कर्मचारी व त्यांच्या परिवारावर उपासमारीची वेळ येणार आहे. तसेच जून महिन्यामध्ये एस.टी. कर्मचा-यांच्या पाल्याच्या शाळेत प्रवेश घेणे, शैक्षणिक साहित्य खरेदी, प्रवेश फी अदा करणे या खर्चिक बाबी असल्याने मासिक खर्चात वाढ झालेली आहे. एस.टी. महामंडळास २७० कोटी रुपयांमधून १०० टक्के वेतन अदा करणे शक्य असताना देखील ५० टवके वेतन अदा करण्याचा निर्णय घेतल्यामुळे उर्वरित रकमेचे काय करण्यात येणार आहे? तसेच उर्वरीत ५० टक्के वेतन कधी अदा करण्यात येणार आहे? याबाबत स्पष्ट करण्यात आलेले नाही. तसेच ५० टक्के वेतन देऊन विविध कपाती करण्यात येणार असल्याने निव्बळ वेतन अत्यंत कमी मिळणार आहे. मुळातच एस.टी. कर्मचा-यांचे वेतन अत्यंत कमी आहे त्यातच ७ तारखेला होणारा पगार २४ तारखेपर्यंत झालेला नाही त्यामुळे एस.टी कर्मचा-यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे.

24/06/2020

बिबवेवाडी ओटा परिसर सील

-विना मास्क अन थुंकणारे नागरिक

पुणे: पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या काही केल्या कमी होताना दिसत नाही. गेल्या 24 तासात बिबवेवाडी ओट्यावर तब्बल 70 हून अधिक कोरोना पॉसिटीव्ह रुग्णांची नोंद झाल्याने महापालिकेकडून कोठारी ब्लॉक्स (निरंत कॉलनी) आणि बिबवेवाडी ओटा परिसर पत्रे टाकून सील करण्यात आला. त्यामुळे बाहेरील नागरिक येथील रस्त्याचा वापर करू शकणार नसून स्थानिकांनी ओळखपत्र दाखवल्यास त्यांना जीवनावश्यक वस्तू आणण्यासाठी सोडण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली. दरम्यान, बिबवेवाडी ओट्यावरील नागरिक अद्यापही विना मास्क फिरत असून रस्त्यावर थुंकताना दिसतात. कोरोना दारात असूनही गांभीर्य नसल्याने रुग्ण संख्या वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

दमदार पाऊस आता जुलैमध्येच !पुणे: गेल्या 7-8 दिवसांपासून दडी मारलेला पाऊस आता जुलैतच बरसणार आहे. 14 जून रोजी पुण्यासह राज...
24/06/2020

दमदार पाऊस आता जुलैमध्येच !

पुणे: गेल्या 7-8 दिवसांपासून दडी मारलेला पाऊस आता जुलैतच बरसणार आहे. 14 जून रोजी पुण्यासह राज्याचा बहुतांश भाग मान्सूनने व्यापला. कोकण, मुंबई वगळता पाऊस दमदारपणे कुठेच पडला नाही. गेल्या आठवडाभरापासून पाऊस पडत नसून मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, नाशिक, कोल्हापूरसह अन्यही काही ठिकाणी नागरिकांना चक्क उन्हाचा सामना करावा लागत आहे. निरभ्र वातावरण निर्माण झाल्याने नेमका कोणता ऋतू सुरू आहे, असा प्रश्न पडत आहे. अरबी समुद्रात तसेच बंगालच्या उपसागरात कमी दाबाची क्षेत्रे सध्या अस्तित्वात नसून परिणामी पावसाने उसंत घेतल्याचे पुणे वेधशाळेने सांगितले. जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाकरिता पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता असून पुढील 6-7 दिवस राज्यात विशेष पाऊस पडणार नसल्याचे नमूद करण्यात आले.

मध्य रेल्वेची सुपरफास्ट कामगिरी...पुणे:  मध्य रेल्वेने लॉकडाऊन कालावधीत  २.१८ लाख वाघिणीद्वारा ११.४६ दशलक्ष टन मालाची वा...
22/06/2020

मध्य रेल्वेची सुपरफास्ट कामगिरी...

पुणे: मध्य रेल्वेने लॉकडाऊन कालावधीत २.१८ लाख वाघिणीद्वारा ११.४६ दशलक्ष टन मालाची वाहतूक मध्य रेल्वे संपूर्ण जगात पसरलेल्या कोविड १९ साथीच्या आजाराला रोखण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न करून महत्त्वपूर्ण भूमिका वठवित आहे. पुरवठा साखळी कायम राखण्यासाठी देशव्यापी लॉकडाउन -१ पासूनच रेल्वेने माल आणि पार्सल वाहतूक सुरू ठेवली आहे.
लॉकडाऊन कालावधीत जेव्हा सर्व देशभर कोरोना व्हायरस साथीच्या आजाराच्या भीतीने सर्वजण आपल्या घरातच अडकले आहेत, तेव्हा मध्य रेल्वेने ११.४६ दशलक्ष टन मालाची २.१८ लाख वाघिणी द्वारे वाहतूक केली आहे. त्यात कोळसा, अन्नधान्य, साखर, पेट्रोलियम पदार्थ, खते, कंटेनर, लोखंड व स्टील, सिमेंट, कांदे आणि इतर संकीर्ण वस्तू यांचा समावेश होता.
या कोरोना विषाणूचा धोका असताना, विजेचा अखंडित पुरवठा व्हावा यासाठी केवळ मध्य रेल्वेने कोळशाच्या ८७,५५९ वाघिणी विविध वीज प्रकल्पांकडे नेल्या. तसेच सर्वांना वेळेवर धान्य व पुरवठ्याचे वितरण राखण्यासाठी अन्नधान्य व साखर यांचे २,५७७ वाघीनींची वाहतूक केली; शेतकर्‍यांच्या हितासाठी ८,१९४ वाघिणी खते व २,०९३ वाघिणी कांदा, सर्व भागधारकांना सुरळीत इंधन पुरवठा करण्यासाठी २१,८६० टँक पेट्रोलियम पदार्थ; उद्योग चालविण्यासाठी लोह व स्टीलच्या ४,६०० वाघिणी, कंटेनरच्या ६९,५८८ वाघिणी आणि इतर विविध उत्पादनांच्या सुमारे ९,२११ वाघीनींचा समावेश आहे . या लॉकडाऊन कालावधीत जवळपास २.२२ लाख वाघिणी मध्य रेल्वेच्या सर्व ५ विभागांतील हद्दीत उतरले आहेत. जीवनावश्यक वस्तूंची पुरवठा साखळी राखण्यासाठी मध्य रेल्वेनेही विशेष पार्सल गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या लॉकडाऊन कालावधीत मध्य रेल्वेने १२,६२५ टन जीवनावश्यक वस्तूं ज्यात औषधे / फार्मा उत्पादने, अन्न / नाशवंत वस्तू, ई-कॉमर्स उत्पादनांचा समावेश आहे.

'ड्रॅगनचे करोनास्त्र' पुस्तक आता घरपोच मिळवा !पुणे: करोनाबाबत जगातील पहिल्याच पुस्तकाचे प्रकाशन दि. १६ जून रोजी झाले. ज्...
22/06/2020

'ड्रॅगनचे करोनास्त्र' पुस्तक आता घरपोच मिळवा !

पुणे: करोनाबाबत जगातील पहिल्याच पुस्तकाचे प्रकाशन दि. १६ जून रोजी झाले. ज्येष्ठ पत्रकार अरविंद व्यं. गोखले आणि वासुदेव कुलकर्णी लिखित व श्री गंधर्व-वेद प्रकाशित 'ड्रॅगनचे करोनास्त्र' हे पुस्तक या लॉकडाऊनच्या काळात 'सवलतीच्या दरात' घरपोच मिळवायचे असल्यास http://www.booksgate.in या वेबसाईटवर संपर्क साधावा अथवा देवेंद्र राक्षे यांना ८३०८३१३८००/८३०८३१३९०० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन वाचनप्रेमींना करण्यात आले आहे.

सुवार्ता. कोरोनावर भारतात उपलब्ध झाले प्रभावी औषध !पुणे: नागरिकांकरिता गुड न्यूज आहे. सर्वांना वेठीस धरणाऱ्या कोरोनावर प...
21/06/2020

सुवार्ता. कोरोनावर भारतात उपलब्ध झाले प्रभावी औषध !

पुणे: नागरिकांकरिता गुड न्यूज आहे. सर्वांना वेठीस धरणाऱ्या कोरोनावर प्रभावी ठरणारे फेविपिरावीर औषध भारतात उपलब्ध झाले आहे. औषध तयार करणार्‍या ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स या कंपनीने या संदर्भातला दावा केला आहे. या औषधाला सरकारतर्फे मंजुरीही मिळाल्याचे वृत्त आहे. कोरोनाची सौम्य लक्षणे जाणवणार्‍या रुग्णांना हे औषध दिले जाऊ शकते. भारतीय औषध महानियंत्रक संस्थेकडून औषधाच्या उत्पादन आणि वितरणाला सहमती देण्यात आली असल्याचे मुंबईतील कंपनीने सांगितले. कोरोना संसर्गावर अशा प्रकारे मंजुरी मिळालेले हे पहिलेच औषध आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषध उपलब्ध होणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे. औषधाच्या एका गोळीची किंमत 103 रुपये आहे.

'ड्रॅगनचे करोनास्त्र' पुस्तक हवंय? येथे संपर्क साधा !पुणे: कोरोनाबाबत मराठी भाषेतील पहिलेच, किंबहुना जगातील या विषयीच्या...
17/06/2020

'ड्रॅगनचे करोनास्त्र' पुस्तक हवंय? येथे संपर्क साधा !

पुणे: कोरोनाबाबत मराठी भाषेतील पहिलेच, किंबहुना जगातील या विषयीच्या एकमेव पुस्तकाचे प्रकाशन मंगळवारी पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या हस्ते झाले. ज्येष्ठ पत्रकार अरविंद व्यं. गोखले व वासुदेव कुलकर्णी लिखित 'ड्रॅगनचे करोनास्त्र' हे पुस्तक सध्या पुण्यातील टिळक रस्त्यावर असणाऱ्या ग्राहक पेठेत तसेच बाजीराव रस्त्यावरील अक्षरधारा बुक गॅलरी येथे उपलब्ध आहे. तसेच श्री गंधर्व-वेद प्रकाशनाकडे देखील पुस्तकाच्या प्रती उपलब्ध आहेत. खालील दिलेल्या क्रमांकावर वाचकांनी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

*श्री गंधर्व- वेद प्रकाशन 020-24493502,
+919823190734 *

Address

Pune

Telephone

+919923517877

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when NAG News Network posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to NAG News Network:

Share