09/03/2023
Maharashtra Budget 2023 | महाराष्ट्रातील शेतकर्यांना आता 12,000 रुपयांचा सन्माननिधी; केवळ 1 रुपयांत पीकविमा
Maharashtra Budget 2023 | शिंदे-फडणवीस सरकारनं आपला पहिला अर्थसंकल्प आज सादर केला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Finance Minister Devendra Fadnavis) यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Maharashtra Budget 2023) शेतकऱ्यांसाठी घोषणांचा पाऊस पाडला.
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये मिळणार असून शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा योजनेचाही लाभ घेता येणार आहे, अशी घोषणा अर्थमंत्र्यांनी (Maharashtra Budget 2023) केली. शेतकऱ्यांसाठी 6 हजारांच्या निधीत आणखी 6 हजारांची भर टाकण्याचा निर्णय झालाय. त्यामुळे आता शेतकऱ्यांना वर्षाकाठी 12 हजार रुपये मिळणार आहेत
नमो शेतकरी महासन्मान निधी योजना
– महाराष्ट्रातील शेतकर्यांना आता
– 12,000 रुपयांचा सन्माननिधी
– प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेत (Pradhan Mantri Krishi Samman Nidhi Yojana)राज्य सरकारची भर
– प्रतिशेतकरी, प्रतिवर्ष 6000 रुपये राज्य सरकार देणार
– केंद्राचे 6000 आणि राज्याचे 6000 असे 12,000 रुपये प्रतिवर्ष मिळणार
– 1.15 कोटी शेतकरी कुटुंबांना लाभ
– 6900 कोटी रुपयांचा भार राज्य सरकार उचलणार
महाराष्ट्रातील शेतकर्यांना आता केवळ 1 रुपयांत पीकविमा
– आधीच्या योजनेत विमाहप्त्याच्या 2 टक्के रक्कम शेतकर्यांकडून
– आता शेतकर्यांवर कोणताच भार नाही. राज्य सरकार भरणार हप्ता
– शेतकर्यांना केवळ 1 रुपयांत पीकविमा
– 3312 कोटी रुपये भार राज्य सरकार उचलणार
महाराष्ट्रातील शेतकर्यांसाठी महाकृषिविकास अभियान
– राज्यातील शेतकर्यांच्या उत्पन्नवाढीसाठी महाकृषिविकास अभियान राबविणार
– पीक, फळपीक घटकाच्या उत्पादनापासून ते मूल्यवर्धनापर्यंत
– तालुका, जिल्हानिहाय शेतकरी गट, समूहांसाठी योजना
– एकात्मिक पीक आधारित प्रकल्प आराखडा तयार करणार
– 5 वर्षांत 3000 कोटी रुपये उपलब्ध करून देणार
महाराष्ट्रातील शेतकर्यांना कर्जमाफी योजनांचे लाभ
– 2017 च्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील उर्वरित पात्र शेतकर्यांना योजनेचे लाभ देणार
– महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील लाभ या सरकारने दिले.
– 12.84 लाख पात्र शेतकर्यांच्या खात्यात 4683 कोटी रुपये थेट जमा.
‘मागेल त्याला शेततळे’ योजनेचा आता व्यापक विस्तार
– मागेल त्याला शेततळे योजनेचा आता व्यापक विस्तार
– आता मागेल त्याला शेततळे, फळबाग, ठिबक सिंचन, शेततळ्यांचे अस्तरीकरण
– मागेल त्याला शेडनेट, हरितगृह, आधुनिक पेरणी यंत्र, कॉटन श्रेडर
– या योजनेवर 1000 कोटी रुपये खर्च करणार
काजू बोंडूवर प्रक्रिया केंद्र, काजू फळ विकास योजना!
– 200 कोटी रुपयांच्या भांडवलासह कोकणासाठी काजू बोर्ड
– काजू बोंडूपेक्षा प्रक्रिया काजू बोंडूला 7 पट भाव
– उत्पन्नवाढीसाठी कोकणात काजू बोंडू प्रक्रिया केंद्र
– कोकण, चंदगड तसेच आजरा (कोल्हापूर) येथे काजू फळ विकास योजना
– 5 वर्षांसाठी 1325 कोटी रुपयांची तरतूद