01/02/2024
राकट देशा, कणखर देशा, दगडाच्या देशात………
महाराष्ट्राचे हृदय म्हणजे मराठवाडा.सामाजिक व राजकीय क्रांतीची भूमी म्हटले तरी वावगे ठरणार नाही, असा समृद्ध इतिहास या मराठवाड्याला लाभलेला आहे. मराठवाड्याचा इतिहास आणि संस्कार जितके समृद्ध तितकेच इथला विकास मात्र कायम दुर्लक्षित.
निसर्गाची अवकृपा व औद्योगीकरणाच्या अभावामुळे विकासाच्या घोडदौडीमध्ये मराठवाडा कायम मागे राहिला. तब्बल ९ जिल्हे असलेल्या मराठवाडा ला ना चांगल्या पायाभूत सुविधा मिळाल्या ना विकास व रोजगाराच्या समतोल संधी मिळाल्या. परिणामी कौटुंबिक उदरनिर्वाहासाठी आपली जन्मभूमी सोडून नव्या ठिकाणी जाण्याची वेळ अनेकांवर आली. महाराष्ट्राभर पसरलेल्या या सर्व नागरिकांनी मराठवाड्यातील कणखर पणा आणि कोणत्याही परिस्थित हार न मानण्याच्या बाण्याने ज्या ठिकाणी गेले तेथे स्वकष्टाने व्यवसाय उभारले, त्या ठिकाणाच्या व महाराष्ट्रच्या व प्रगतीमध्ये आपली मोठी भूमिका बजावली अशा कर्तुत्ववान उद्योजकाचा सन्मान करत आहोत म्हणून आम्ही सांगतो
पुरस्कार प्रेरणा देतात, प्रेरणेने राष्ट्र मोठे होते.. या विचार सुत्रावर आयोजित केलेल्या उद्योजक फाऊंडेशनच्या मराठवाडा रत्न पुरस्कार 2024 उपक्रमात आपण आपले नामांकन पाठवुन आपला सहभाग नोंदवा.
गुणवंतांनो या... प्रेरणेच्या चैतन्यदायी प्रवाहात सहभागी व्हा..!
संपर्क - 9767966368