17/05/2025
डॉ विश्वनाथ कराड
यांची पुणे फॅमिली कोर्ट मधील ग्रंथालय उद्घाटन प्रसंगी भेट झाली .
त्यांच अमोघ वक्तृत्व ,तिन्ही भाषेवरची प्रभुत्व , अध्यात्मा पासून विज्ञापर्यंत च अगाध असे ज्ञान पाहून आम्ही मंत्र मुग्ध झालो .
लातूर येथील रुई सारख्या खेड्यात जन्मलेला शेतकरीचा मुलगा आपल्या बुद्धी आणि मेहनतीने एवढा मोठा होऊ शकतो याच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे कराड सर .
ते लहानपणीच्या आठवणी सांगत असताना आमचे डोळे ओले झाले .त्यांची शाळा जनावरांच्या गोठ्यात भरायची .जनावरे चरायला गेली की गोठा साफ करून शाळा भरायची आणि जनावरे परत आली की त्यांच्या गळ्यातल्या घंटा नादाने शाळासुटायची ,शाळेला दुसरी अशी घंटा नसायची त्यांचे हे कथन अंगावर काटा आणणारे होते , आम्हाला आई वडिलांनी कॉन्वेंट ला घातलं नाही म्हणून आमची प्रगती झाली नाही असे म्हणणाऱ्या साठी ती एक चपराक होती.
एका रेल्वे स्थानकावर विवेकानंदांच एक पुस्तक नजरेस पडल आणि जेवणा साठी वाचवलेले चार आणे नी ते पुस्तक विकत घेऊन वाचल
आणि अवघे जीवन बदलून गेले .
इंजिनियरिंग कॉलेज ची नोकरी सोडून सोशियल इंजिनियरिंग सुरू केली आणि स्वतःच अस्तित्व निर्माण केल . शिकागो येथील जागतिक धर्म परिषदे मधे विवेकानंदनंतर २०० वर्षांनी कराड सराना भाषणासाठी आमंत्रण मिळाल ही भारतासाठी गौरन्वित करणारी बाब आहे .
जगातल्या अनेक नामवंत विद्यापीठाच्या मानद डिग्री नी त्याना सन्मानित केले गेल.
आईन्स्टाइन सोबत संत ज्ञानेश्वरा च्या साहित्याचा अभ्यास त्याना सर्वांगीण विकासासाठी अत्यावश्यक वाटतो आणि त्यासाठी अध्यात्माची वैज्ञानिक प्रयोग शाळा हा त्यांचा अनोखा प्रयोग त्यांनी विश्वशांती गुरुकुल च्या रूपाने प्रत्यक्ष सत्यात आणला .
आळंदी अधायात्मिक केंद्र पासून कोथरूड च्या MiT कॉलेज पर्यंतचा प्रवास त्यांच्या दूरदृष्ट्री चे आणि त्यागच द्योतक आहे .अशी माणस फुलपखरा सारखी फुलांचा रंग न बघता त्यातला मध गोळा करत असतात आणि एखाद्या जवाहिरा प्रमाणे पैलू पाडत असतात म्हणून ती जातीअंती ठरतात
एवढा मोठा वटवृक्ष गगनाला भिडून देखील त्याच्या परंब्या जमिनीला घट्ट चिकटून आहेत
“अहंकाराचा वारा न लागो मनाला “म्हणणारे ते खऱ्या अर्थाने विश्वगुरू शोभणारे कराड सर ना कसलाही अहंकाराचा लवलेश नाही हे त्यांच्या चालण्या बोलण्यातून क्षणा क्षणाला जाणवते .
अशी माणस प्रचंड अशी ऊर्जा स्त्रोत आणि प्रेरणा देणारी जिवंत विद्यापीठ असतात. आव्हाड सरानी माझी ओळख बार्शीचा आहे म्हणून करून दिली तेव्हा कराड यांनी बार्शी आणि जगदाळे मामा च्या आठवणी सांगितल्या आणि बार्शीत प्राथमिक शिक्षण झाल्याच सांगितलं
आम्हा वकिलांचे गुरु सुधाकर आव्हाड सर आणि सरांचे गुरु विश्वगुरू कराड सर यांची भेट म्हणजे दुग्ध शर्करा योग ठराला दोघांची भेट आणि मार्गदर्शन अनोखआणि अनमोल ठरल.
ॲड सचिन झालटे पाटील
जिल्हा व सत्र न्यायालय पुणे
दि १७ मे २०२५ दिल्ली