The Nayak News

The Nayak News Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from The Nayak News, Media/News Company, old Sangvi, Pune.

30/11/2025

पिंपरी चिंचवड महायुतीतून जागा मिळाव्या म्हणून आपल्याला भीक मागावी लागते. खंत व्यक्त करत रामदास आठवलेंची स्वबळा.....

20/09/2025

आईस्क्रीमचा आस्वाद घेतला, पण पान नाही; अजित पवारांचा पिंपरी-चिंचवड दौरा चर्चेत...

पिंपरी चिंचवड :-
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पिंपरी- चिंचवडमध्ये आईस्क्रीम चा आस्वाद घेतला, त्यानंतर त्यांना पान खायचं होत, परंतु, त्यांना हवं असलेलं पान नसल्याने ते खाल्लं नाही. पान कुठलं आहे न्याहळून पाहिलं. पिंपरी- चिंचवड शहरात सकाळी 8 पासून ते रात्री 11 पर्यंत दौरा होता. उद्याही अजित पवार हे त्याच ऊर्जेने पिंपरी- चिंचवड दौऱ्यावर असून माजी नगरसेवकांच्या घरी भेटी देणार आहेत...

20/09/2025

निवडणुकीच्या तोंडावर अजित दादांचा जनता दरबार – राष्ट्रवादीसाठी गेमचेंजर ठरेल का...?

पिंपरी चिंचवड
पुण्यानंतर पिंपरी चिंचवडमध्येही अजित पवारांनी जनता दरबार भरवला. मात्र, अजित दादांना हा जनता दरबार घेण्याची वेळ का आली? आणि या दरबारातून नक्की कोणता संदेश द्यायचा आहे...?

पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या काही वर्षांपासून महापालिकेत प्रशासक राज सुरू आहे. आयुक्तांना निवडणुकांना सामोरे जाण्याची गरज नसल्याने, जनतेच्या प्रश्नांकडे तितकेसे लक्ष दिले जात नाही अशी नागरिकांची तक्रार आहे. याच पार्श्वभूमीवर अजित पवारांनी थेट जनता दरबार भरवत नागरिकांच्या समस्या ऐकून घेण्याचा निर्णय घेतलाय.

जनता दरबारात पाणी, रस्ते, नळजोडणी, शाळा, रुग्णालयं अशा अनेक प्रश्नांची नागरिकांनी मांडणी केली. अजित दादांनीही हे प्रश्न तातडीने सोडवण्याचं आश्वासन दिलं....

“अजित पवारांच्या जनता दरबारातून नागरिकांच्या प्रश्नांना न्याय मिळेल का, आणि त्याचा आगामी महापालिका निवडणुकीवर किती परिणाम होईल, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे...

#अजितपवार #जनतादरबार #पिंपरीचिंचवड #राष्ट्रवादीकाँग्रेस #महापालिकानिवडणूक #लोकप्रश्न #नगरराजकारण #पाणीप्रश्न #रस्तेप्रश्न #शहरविकास #

19/09/2025

पिंपरी चिंचवडमध्ये घरफोडीचा थरार; CCTV त कोयता घेऊन फिरणारे चोरटे कैद...

पिंपरी चिंचवड :-
पिंपरी चिंचवडमध्ये कोयता घेऊन दोन चोरट्यांनी सोसायटीत प्रवेश केला आणि दोन घरफोड्या करुन दागिने लंपास केलेत. सुदैवाने घरी कोणी नव्हते, त्यामुळं कोणती हानी झालेली नाही. चिंचवडमधील मंगलशिल्प सोसायटीत रात्री साडे बाराच्या सुमारास कोयता घेऊन दोन चोरटे शिरले, सीसीटीव्हीत सुद्धा ही बाब कैद झाल्याचं दिसून आलं. त्यानंतर या दोन चोरट्यांनी चौथ्या आणि सहाव्या मजल्यावरील फ्लॅट फोडले. फ्लॅटमधून प्रवेश करुन दागिने लंपास केले. नेमके किती दागिन्यांची चोरी झाली, याबाबतची माहिती चिंचवड पोलिसांकडून घेतली जातीये. मात्र या घटनेने शहरातील सोसायट्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय.


​ ​ ​ ​ ​ # ​ ​ ​ ​ ​ ​ ​ ​ ​ ​ ​ ​ ​ ​ ​ ​ ​ # ​ ​ ​ ​ ​ ​

16/09/2025

पूजा खेडकर प्रकरण : अपहरणाच्या गाडीसह आई-वडील फरार, पोलिसांचा शोध सुरू...

पिंपरी चिंचवड, पुणे :-
: वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या नवी मुंबई पोलिसांनी घरावर लावलेली नोटीस फाडण्यात आलेली आहे. नवी मुंबईतून पुजाचे वडील दिलीप खेडकरांनी ट्रकच्या हेल्परचे अपहरण केल्याचं पोलीस तपासात समोर आलंय. तर पोलिसांवर अरेरावी करणाऱ्या आणि कुत्री अंगावर सोडणाऱ्या मनोरमा खेडकरवर ही गुन्हा दाखल झालाय. पण पुजाचे आई-वडील अपहरणासाठी वापरलेल्या गाडीसह पसार झालेत. पोलीस त्यांचा शोध घेतायत....

​ ​ ​ ​ ​ # ​ ​ ​ ​ ​ ​ ​ ​ ​ ​ ​ ​ ​ ​ ​ ​ ​ # ​ ​ ​ ​ ​ ​

धर्मवीर छत्रपती श्री.संभाजी महाराज यांचे जगातील सर्वात उंच शिल्प....!तब्बल 3 हजारहुन अधिक ढोल, 1 हजार ताशा अन्‌ 500 भगवा...
14/09/2025

धर्मवीर छत्रपती श्री.संभाजी महाराज यांचे जगातील सर्वात उंच शिल्प....!

तब्बल 3 हजारहुन अधिक ढोल, 1 हजार ताशा अन्‌ 500 भगवाधारी ढोल-ताशा पथक स्वयंसेवकांची धर्मवीर छत्रपती श्री. संभाजी महाराज यांचे जगातील सर्वांत उंच स्मारकाला देत आहेत ऐतिहासिक मानवंदना | Live

आयोजक :

हिंदुभूषण स्मारक ट्रस्ट, पिंपरी-चिंचवड, पुणे.
अध्यक्ष, महेश किसनराव लांडगे.

संयोजक :
ढोल-ताशा महासंघ, महाराष्ट्र राज्य....

#धर्मवीरसंभाजीमहाराज
#संभाजीराजे
#हिंदुभूषणस्मारक
#जगातीलसर्वातउंचशिल्प
#ढोलताशामहासंघ
#ढोलताशा
#पिंपरीचिंचवड
#ऐतिहासिकमानवंदना
#मराठमोळा
#छत्रपतीसंभाजीमहाराज


ऐतिहासिक मानवंदना l धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जगातील सर्वात उंच शिल्पास

13/09/2025

पिंपरी चिंचवड शहराच्या शिरपेचात ऐतिहासिक तुरा,100 फुटी छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा...

: पिंपरी चिंचवड शहराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा आणि ऐतिहासिक तुरा रोवला जातोय. शहरात छत्रपती संभाजी महाराजांचा जगातील सर्वात उंच पुतळा उभरण्याचं काम युद्धपातळीवर सुरुये. भाजपचे आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून ही शंभुसृष्टी साकारली जात आहे. साडे एकर परिसरातील या शंभुसृष्टीत ब्रॉंज धातूचा 100 फुटी पुतळा, 40 फूट उंच चौथरा, सरसेनापती हंबीरराव मोहितेंचा शिल्प, 16 सेनापती-मावळ्यांचे पुतळे आणि महाराजांचा इतिहासावर प्रकाश टाकला जाणार आहे. यासाठी महापालिकेकडून तब्बल 48 कोटींचा खर्च केला जाणार आहे. अद्याप आणखी काम शिल्लक आहे. मात्र अनेक शिव आणि शंभू भक्त एकत्रित येत छत्रपती uसंभाजी महाराजांना ऐतिहासिक मानवंदना देणार आहेत. उद्या रविवारी दुपारी तीन वाजता 3000 ढोल, 1500 ताशे आणि 500 ध्वज असं एकत्रित वादन केलं जाणार आहे....

#

13/08/2025

व्यावसायिकावर गोळीबार करणारा निघाला पुजारी गँगचा शूटर...

पिंपरी चिंचवड
: पिंपरीतील व्यवसायीकावर गोळीबार करणाऱ्या गँगस्टर रवींद्र घारेला पिंपरी चिंचवडच्या मालमत्ता विरोधी पथकाने बेड्या ठोकल्यात, रवींद्र घारे हा पुजारी गॅंगशी संबंधित आहे, त्याच्यावर 25 पेक्षा अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत, हत्या, गोळीबार यासह इतर गुन्हे दाखल आहेत, 1 पिस्तुल, 11 जिवंत काडतुसे पोलिसांनी जप्त केलेत, पिंपरीत व्यवसायिकाच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावताना प्रतिकार केल्याने रवींद्र घारे ने पायावर गोळी झाडली, यानंतर तो फरार झाला होता, त्याचा शोध पोलीस घेत होते, अखेर मालमत्ता विरोधी पथकाने त्याला बेड्या ठोकल्या आहेत.

: शशिकांत महावरकर - अतिरिक्त पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड

#पिंपरीचिंचवड #गुन्हेगारी #पुजारीगॅंग #गोळीबार #पोलिसकारवाई #गँगस्टरअटकेत #क्राईमन्यूज #रवींद्रघारे ​ ​ ​ ​ ​ # ​ ​ ​ ​ ​ ​ ​ ​ ​ ​ ​ ​ ​ ​ ​ ​ ​ # ​ ​ ​ ​ ​ ​

07/08/2025

पिंपरी पालिकेत विधानसभा उपसभापतींचा अवमान झाला..? आयुक्तांचा खुलासा..!

पिंपरी चिंचवड
: पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रवेशद्वारावर विधानसभा उपसभापती अण्णा बनसोडेंचा अवमान झाला. त्यामुळं अण्णा बनसोडेंनी आयुक्त शेखर सिंहांच्या चौकशीची मागणी करणार असल्याचं म्हणत संताप व्यक्त केला. मात्र बनसोडे आज डीपी रद्द करण्याचं निवेदन देण्यासाठी येणार आहेत, याबाबत उपसभापती कार्यालयाने पालिकेला कळवलं नव्हतं. जेंव्हा ते पालिकेत आल्याचं समजलं तेंव्हा सहाय्यक आयुक्त मनोज लोणकरांना रिसिव्ह करायला पाठवलं होतं. असा खुलासा पालिका आयुक्तांनी केलाय. मी याबाबत उपसभापतींशी बोलल्याचा दावा ही आयुक्तांनी केलाय. मात्र यानंतर बनसोडेंचं खरंच समाधान झालंय का? हे पाहणं महत्वाचं राहणार आहे...

: अण्णा बनसोडे - उपसभापती, विधानसभा

: शेखर सिंह - आयुक्त, पिंपरी चिंचवड पालिका

#पिंपरीचिंचवडमहापालिका #अण्णाबनसोडे #विधानसभा #उपसभापती #शेखरसिंह #महापालिकाविवाद #डीपीविरोध #राजकीयसंवाद #अवमानप्रकरण #मनपा ​ ​ ​ ​ ​ # ​ ​ ​ ​ ​ ​ ​ ​ ​ ​ ​ ​ ​ ​ ​ ​ ​ # ​ ​ ​ ​ ​ ​

04/08/2025

पुण्यात आंतरजातीय विवाह करणाऱ्या मुलीचं आई-भावाकडून अपहरण, खेड पोलिसांचा ऑनर किलिंगच्या दृष्टीने तपास...

खेड पुणे
: पुण्यात आंतरजातीय विवाह केल्यानं दाम्पत्याला बेदम मारहाण करण्यात आलीये. तर विवाहितेच तिच्या आई अन भावानेचं अपहरण केलंय. या प्रकरणाचा ऑनर किलिंगच्या दृष्टीने तपास सुरुये, अशी माहिती खेड पोलिसांनी दिली. या दोघांचा आंतरजातीय विवाह 5 ऑगस्ट 2024 ला झाला होता अन लग्नाला एक वर्ष होण्याच्या दोन दिवस आधी म्हणजे 3 ऑगस्ट 2025ला तिचं अपहरण करण्यात आलं. सध्या जावयावर उपचार सुरु आहेत....

: स्नेहल राजेगुरव - एपीआय, खेड


​ ​ ​ ​ ​ # ​ ​ ​ ​ ​ ​ ​ ​ ​ ​ ​ ​ ​ ​ ​ ​ ​ # ​ ​ ​ ​ ​ ​

01/08/2025

व्यापारी तरुणावर गोळीबार करणाऱ्या घटनेचं CCTV फुटेज आल समोर

पिंपरी चिंचवड :-

: पिंपरी कॅम्प परिसरात व्यापारी तरुणावर बंदुक्तीन गोळीबार करणाऱ्या तरुणाचा एक्स्कल्युसिव सीसीटीव्ही फुटेज साम टीव्ही न्यूज च्या हाती लागला आहे.

: दुचाकी वाहनावर हेल्मेट घालून आलेल्या आरोपीने भावेश कंकरानी या वीस वर्षाच्या व्यापारी तरुणावर गोळीबार करून पळून जात असतानाचा सीसीटीव्ही फुटेज साम टीव्ही न्यूज च्या हाती लागला आहे. या सीसीटीव्ही फुटेज मध्ये आरोपी हा भावेश काकरांनी याच्या दुकानासमोर थांबलेला दिसतो. भावेश कंकरांनी याच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावल्यानंतर आरोपी तरुण आपल्या दुचाकीवरून पळून जात असताना सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. भावेश कंकरानी याच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपीच्या शोध घेण्यासाठी पिंपरी पोलिसांनी दहा पोलिस पथक तयार केली असून आरोपीच्या मुसक्या आवडण्यासाठी पोलीस युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहेत.

: शिवाजी पवार ( पोलीस उप आयुक्त गुन्हे पिंपरी चिंचवड)

#गोळीबार #पिंपरीकॅम्प #व्यापारीवरहल्ला ुटेज #क्राईमन्यूज #सोनसाखळीचोरी #पिंपरीचिंचवडपोलीस #सामटीव्हीएक्स्क्लुझिव्ह ​ ​ ​ ​ ​ # ​ ​ ​ ​ ​ ​ ​ ​ ​ ​ ​ ​ ​ ​ ​ ​ ​ # ​ ​ ​ ​ ​ ​

31/07/2025

निगडी मधील त्या दरोड्यातील आरोपींना परराज्यात 1200 किलोमीटर पाठलाग करून केली अटक...

पिंपरी चिंचवड :-
दरोड्याच्या गुन्ह्यातील कुख्यात आरोपींना पिंपरी- चिंचवड पोलिसांनी बेड्या ठोकल्यात, पोलीसांची दहा पथक दरोडेखोरांचा शोध घेत होते, 19 जुलै रोजी निगडीत वृद्ध व्यक्तीला गाठून सहा आरोपींनी दरोडा टाकला होता, यात एका महिलेचा देखील समावेश होता.

यात सहा लाखांपेक्षा अधिकचा मुद्देमाल दरोडेखोरांनी लंपास केला होता, 200 पेक्षा अधिक सीसीटीव्ही आणि गुन्ह्यात वापरलेल्या वाहनावरून मुख्य सूत्रधार *सुभाष बिष्णोई असल्याचं समोर आले आहे तर पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेने आरोपी महिपाल बिष्णोई आणि सुरेश ढाका* यांना अटक केलीय. पिंपरी चिंचवड पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेल्या महाराष्ट्र राज्यात नोंदणीकृत बनावट नंबर प्लेटचा वापर करून चारचाकी मधून पलायन करत असलेल्या आरोपींना 1200 किलोमीटर पाठलाग करून जयपूर राजस्थान या ठिकाणाहून ताब्यात घेतलं आहे. अटकेत असलेल्या सुरेश ढाकावर गंभीर स्वरूपाचे 21 गुन्हे दाखल आहेत, आरोपींनी या गुन्ह्यात मोबाईल ट्रेस होऊ नये यासाठी *वाकी टॉकी* चा वापर केला होता, पोलिसांनी चार वाकी टॉकी आणि दोन मोबाईल फोन देखील जप्त केले आहेत , दोन महिन्यांपासून दरोडेखोरांनी हा दरोडा टाकण्याचा कट रचला होता, हे सर्व पोलीस तपासात समोर आलं आहे. उर्वरित अन्य आरोपींचा शोध सुरू असून लवकरच त्यांना त्यांना ताब्यात घेणार असल्याचं पोलिसांनी म्हटले आहे.

डॉ. शिवाजी पवार ( पोलिस उप आयुक्त, गुन्हे शाखा)

#पिंपरीचिंचवडदरोडा #पोलीसकारवाई #गुन्हेगारीवरआळा #दरोडेखोरगजाआड #जयपूरपर्यंतपाठलाग #गुन्हेगारीसाखळी
#पोलिसांचेसाहसीकार्य
ुळेउलगडा
ा वापर ​ ​ ​ ​ ​ # ​ ​ ​ ​ ​ ​ ​ ​ ​ ​ ​ ​ ​ ​ ​ ​ ​ # ​ ​ ​ ​ ​ ​

Address

Old Sangvi
Pune
411027

Alerts

Be the first to know and let us send you an email when The Nayak News posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to The Nayak News:

Share