Prime Pravah

Prime Pravah Marathi Regional News Portal

*'ज्यांनी आभाळ कवेत घेतलं' पुस्तकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन**राजा माने यांचे पुस्तक जिवंत व प्रेरणादायी : राज्यपाल...
30/03/2022

*'ज्यांनी आभाळ कवेत घेतलं' पुस्तकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन*

*राजा माने यांचे पुस्तक जिवंत व प्रेरणादायी : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी*

पत्रकार राजा माने यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व राजकीय जडणघडणीत योगदान देणाऱ्या ७५ व्यक्तींचे केलेले चरित्रात्मक वर्णन सुंदर, सजीव व प्रेरणादायी झाले असून त्यांचे पुस्तक घरोघरी पोहोचावे असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक राजा माने लिखित 'ज्यांनी आभाळ कवेत घेतलं' या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते बुधवारी (दि.३०) राजभवन येथे झाले, त्यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमाला माजी राज्यपाल डॉ डी.वाय पाटील, माजी मंत्री चंद्रकांत पाटील, लोकमत समूहाचे अध्यक्ष विजय दर्डा, लेखक राजा माने, रेखाचित्रकार नितीन खिलारे व बार्शी येथील मातृभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष ठोंबरे प्रामुख्याने उपस्थित होते.

देश स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे तसेच महाराष्ट्र राज्य देखील आपले हीरक महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. अश्यावेळी राज्यातील ७५ प्रतिभावंत व्यक्तींचे व्यक्तीचित्रण करणे व त्याला सुंदर रेखाचित्रांची जोड देणे हा नाविन्यपूर्ण प्रयोग आहे. राजा माने यांनी आपल्या पुस्तकातून राज्यातील हिरेही दाखवून दिले आणि अमृतही दिले असून त्याचे रसपान वाचकांनी करावे असे राज्यपालांनी यावेळी सांगितले.

*पुस्तक विकत घेऊनच वाचावे*

पुस्तक प्रकाशनाच्या वेळी पुस्तकाच्या प्रती उपस्थितांना मोफत देण्याच्या प्रथेला विरोध करताना प्रत्येकाने पुस्तक विकत घेऊनच वाचावे अशी आग्रही सूचना राज्यपाल कोश्यारी यांनी केली. यावेळी राज्यपालांनी स्वतः पैसे देऊन 'ज्यांनी आभाळ कवेत घेतलं' या पुस्तकाची प्रत विकत घेतली.

आजकाल समाजात कर्तृत्व व नम्रता हे गुण एकत्र अभावाने आढळतात असे मत व्यक्त करताना राजा माने यांनी प्रेरणादायी व्यक्तींच्या जीवनावरील पुस्तक दिल्याबद्दल चंद्रकांत पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले. तर, महाराष्ट्राच्या राजकारणात पूर्वी असलेली सुसंवादाची परंपरा पुन्हा यावी असे मत विजय दर्डा यांनी व्यक्त केले.

यावेळी चित्रकार नितीन खिलारे यांनी काढलेल्या व पुस्तकात समाविष्ट केलेल्या व्यक्तींच्या व्यक्तीचित्रांच्या प्रदर्शनाला राज्यपालांनी भेट दिली. सोलापूर येथील शिवरत्न शेटे व संतोष ठोंबरे यांनी देखील यावेळी आपले विचार व्यक्त केले.

*Governor Koshyari releases book by journalist - editor Raja Mane*

Governor Bhagat Singh Koshyari released the book 'Jyanni Aabhal Kavet Ghetala' authored by senior journalist and editor Raja Mane at Raj Bhavan Mumbai on Wed (30 Mar). The book contains biographical sketch and illustrations of 75 leading personalities of Maharashtra.

Former Governor Dr D Y Patil, former Minister Chandrakant Patil, Chairman of Lokmat Media Group Vijay Darda, illustration artist Nitin Khilare and Chairman of Matrubhumi Pratishthan Santosh Thombre were present.

*डिजिटल मीडियाचे प्रश्न मार्गी लावणार  : मंत्री राजेश टोपे आणि अमित देशमुख यांची ग्वाही**राज्यातील कोविड योध्यांचा कृतज्...
07/10/2021

*डिजिटल मीडियाचे प्रश्न मार्गी लावणार : मंत्री राजेश टोपे आणि अमित देशमुख यांची ग्वाही*

*राज्यातील कोविड योध्यांचा कृतज्ञतापूर्ण गौरव*

मुंबई : गेल्या काही वर्षातील आलेख पहिला असता प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया मागे पडत चालले असून डिजिटल मीडिया आता फ्रंट सीटवर येऊन पोहोचला आहे असे प्रतिपादन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले.तसेच डिजीटल मिडीयाचे प्रश्न मार्गी लावू याची ग्वाही दिली.
"महाराष्ट्राचे कोविड योद्धा" या पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. संस्थापक अध्यक्ष राजा माने यांच्या डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेने या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन मुंबईतील सह्याद्री अतिथी गृहात केले होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे व राज्याचे संस्कृतिक मंत्री अमित देशमुख उपस्थित होते. संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी प्रास्ताविक तसेच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचे स्वागत केले तर मंत्री अमित देशमुख यांचे उपाध्यक्ष तुलसीदास भोईटे व प्रफुल्ल वाघोले यांनी केले. कोरोना महामारीच्या काळामध्ये राज्यामध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या संस्था व व्यक्तींना यावेळी महाराष्ट्राचे कोविड योध्या म्हणून गौरवण्यात आले.
यावेळी बोलताना वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री हे खरेच डिजिटल हिरो आहेत असे प्रतिपादन केले. राज्यामध्ये कोरोना महामारी सुरु असताना राज्याचा कारभार त्यांनी डिजिटल व्यासपीठावरून उत्तम सांभाळा आहे असे ते म्हणाले. तसेच कोरोना मध्ये अनाथ झालेल्या मुलांना प्रत्येकी पाच लाख रुपये मुख्यमंत्री देणार असल्याचेही ते म्हणाले.
यावेळी नंदकुमार सुतार (सचिव, डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना), राजू वाघमारे (राष्ट्रीय समन्वयक, डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना) राज्य कार्यकारिणी सदस्य – कुंदन हुलावळे, महेश कुगावकर, दीपक नलावडे.
संजय भैरे (मुंबई अध्यक्ष), प्रफुल्ल वाघुले (ठाणे जिल्हाध्यक्ष), संजय जेवरीकर (मराठवाडा कार्याध्यक्ष) व संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

*महाराष्ट्राचे कोविड योद्धा*

*सामाजिक संस्था योगदान विभाग*
१. मुस्लिम सत्यशोधक मंडळ, पुणे – डॉ. शमसुद्दीन तांबोळी
२. भारतीय जैन संघटना, महाराष्ट्र - केतनभाई शाह, सोलापूर
३. कोल्हापूर जिल्हा बैतुलमाल कमिटी, कोल्हापूर – जाफरबाबा सय्यद
४. मातृभूमी प्रतिष्ठान, बार्शी – संतोष ठोंबरे
५. वजीर रेस्क्यू फोर्स, शिरोळ जि. कोल्हापूर – रउफ पटेल
६. हिंदवी परिवार महाराष्ट्र – डॉ. शिवरत्न शेटे
७. दिशा प्रतिष्ठान, लातूर – सोनू डागवाले
८. वंदे मातरम संघटना, पुणे – सचिन जामगे, वैभव वाघ
९. सेवांकुर, मुंबई – डॉ. नितीन गायकवाड
१०. सिंधूमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान, सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग – डॉ. प्रवीणकुमार ठाकरे

*शासकीय अधिकारी आणि व्यक्तिगत योगदान विभाग*
१. पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने
२. डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी पुणे
३. मिलिंद शंभरकर, जिल्हाधिकारी सोलापूर
४. डॉ. राजेंद्र भारूड, तत्कालीन जिल्हाधिकारी, नंदूरबार
५. अमितेश कुमार, पोलिस आयुक्त नागपूर
६. गणेश देशमुख, महापालिका आयुक्त पनवेल
७. डॉ. प्रदीप आवटे, राज्य साथरोग सर्वेक्षण अधिकारी
८. डॉ. बंडू वामनराव रामटेके, वैद्यकीय अधिकारी चंद्रपूर
९. राजेश बाहेती, दुबईस्थित उद्योजक (पुणे)
१०. प्राचार्य अजय कौल, एकता मंच, अंधेरी मुंबई
११. प्यारे खान, नागपूर
१२. डॉ. संजय अंधारे, बार्शी
१३. डॉ. महादेवराव नरके, कोल्हापूर
१४. डॉ. मुन्नालाल गुप्ता, वर्धा
१५. डॉ. नमिता आनंद सोनी, औरंगाबाद
१६. डॉ. गौतम आणि मनीषा छाजेड, पुणे
१७. मंगेश चिवटे, ठाणे
१८. मधुकर कांबळे, परभणी
१९. करण गायकवाड, परभणी
२०. बाबासाहेब पिसोरे, दौलावडगाव, ता. आष्टी जि. बीड

19/09/2021

सरकारविरुद्ध बोलणाऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातोय. महाराष्ट्रात लोकशाही संपली आहे का ?-भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

JOB: 'म्हाडा'मध्ये लिपिक,अभियंतासह इतर ५३५ पदांसाठी भरती
17/09/2021

JOB: 'म्हाडा'मध्ये लिपिक,अभियंतासह इतर ५३५ पदांसाठी भरती

Job Recruitment for 535 posts including Clerk Engineer in MHADA

सोलापूर जिल्ह्याला लस कमी पडणार नाही, लसीकरणावर भर द्या; पालकमंत्री दत्तात्रय भरणे    Dattatray Bharane
17/09/2021

सोलापूर जिल्ह्याला लस कमी पडणार नाही, लसीकरणावर भर द्या; पालकमंत्री दत्तात्रय भरणे

Dattatray Bharane

Solapur district will not be short of vaccines Dattatraya Bharane

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते ऑक्सिजन प्रकल्पाचे लोकार्पण
17/09/2021

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते ऑक्सिजन प्रकल्पाचे लोकार्पण

Dedication of Oxygen Project by Governor Bhagat Singh Koshyari

पुणे महापालिका करणार महिलांच्या सुरक्षिततेसाठी ‘विशेष कृती आराखडा’
17/09/2021

पुणे महापालिका करणार महिलांच्या सुरक्षिततेसाठी ‘विशेष कृती आराखडा’

Pune Municipal Corporation to launch 'Special Action Plan' for women's safety

मराठवाड्याचा कायापालट घडवणाऱ्या प्रकल्पांची वेळेत अंमलबजावणी करणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
17/09/2021

मराठवाड्याचा कायापालट घडवणाऱ्या प्रकल्पांची वेळेत अंमलबजावणी करणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Projects that will transform Marathwada will be implemented in time - Chief Minister Uddhav Thackeray

हिंजवडी, माण आणि मारुंजी परिसरातील रस्त्याची कामे वेगाने करा
17/09/2021

हिंजवडी, माण आणि मारुंजी परिसरातील रस्त्याची कामे वेगाने करा

Speed ​​up road works in Hinjewadi Maan and Marunji areas

जातीय विषमता नष्ट होवून सामाजिक समता निर्माण होणे गरजेचे-राज्यपाल कोश्यारी
17/09/2021

जातीय विषमता नष्ट होवून सामाजिक समता निर्माण होणे गरजेचे-राज्यपाल कोश्यारी

Ethnic inequality needs to be eradicated and social equality needs to be created - Governor Koshyari

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 'पुणे ऑन पेडल्स सायकल रॅली'चे आयोजन
17/09/2021

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 'पुणे ऑन पेडल्स सायकल रॅली'चे आयोजन

Organizing 'Pune on Pedals Cycle Rally' on the occasion of Prime Minister Narendra Modi's birthday

पुणे शहरात गणेश विसर्जनाच्या दिवशी दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय
17/09/2021

पुणे शहरात गणेश विसर्जनाच्या दिवशी दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय

Decision to keep shops closed in Pune city on the day of Ganesh Immersion

Address

209, Bhagirathi Nagar, Sade 17 Nali Hadapsar
Pune
411028

Alerts

Be the first to know and let us send you an email when Prime Pravah posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Prime Pravah:

Share