06/07/2025
मृत्यु अन् जीवन,,,,,
प्रत्यक्ष मृत्यु अनुभवलेला मी
११ जुन २०२५,,,अगदी ठळकपणे आठवतेय मला.रात्री साधारणपणे रात्री ०८:३० वाजतो जरा लवकरच जेवण करुन झोपण्याच्या तयारीत होतो.थोडासा माोबाईल बघुन झोपण्याचा प्रयत्न करत होतो.साधारण अर्ध्या तासाने डोळ्यांनी झोपेची तार छेडली.डोळे बंद करुन पडलो पण काय होतंय ते समजेना.झोप येईना.सारखं या कुशीवरुन त्या कुशीवर एवढंच सुरु होतं.कोण जाणे मधेच एखादी खोकल्याची छोटीशी उबळ यायची तीही कोरडी.काही वेळानं खोकल्याची उबळ वाढतेय याची जाणीव झाली.यात सतत वाढ सुरु असतानाच पावसाची बुरबूर सुरु झाली.साधारण पहाटे एक वाजता पावसाचा वेग चांगलाच वाढला.अन् एकीकडे खोकल्याची उबळही वाढली.त्यात आणखी भर म्हणुन जरा दमही लागु लागला.हे साधारण नाही याची जाणीव मला अन् पत्नीला झाली.माझा मानस पुत्र किरणला घेवुन भर पावसात पहाटे दोन वाजता पत्नी संगमनेरच्या एका मेडिकलमध्ये जावुन खोकल्याचे औषध घेवुन आली.औषध घेवुन मला जरा बरे वाटले.पण ही अवस्था टीकली फक्त तासभर.आता मात्र दम जरा जास्तच लागु लागला.असं वाटू लागलं की छातीवर फार मोठा भार आलाय.पहाटे सहापर्यंत सहन केलं पण पुढे सहन होईल याची खात्री पटेना म्हणुन साधारण साडे सहा ते पाहणे सातला डॅा.लक्षण गाडेकर यांना फोन केला.ते मॅार्निंग वॅाक ला नुकतेच बाहेर पडले होते.त्यांना माझी अवस्था सांगितली.त्यांनी लगेच हॅास्पिटलला येण्यास सांगितले.त्याप्रमाणे तयारी करुन पत्नीने शेजारच्या तरुणाच्या मदतीने मला दवाखान्यात हलवले.डॅा.वाट बघतच होते.दवाखान्या गेल्याबरोबर ECG काढला.इतर तपासणी केली अन् त्यांनी स्पष्टपणे सांगितले की माझे ह्रूदयाचे ठोके कमी होत चाललेत.ते ४० च्या आत आहेत अन् अॅाक्सिजनची मात्राही कमी होत चाललीय.माझ्या पायाखालची जमिन सरकली.यावेळी मी जरा डगमगलो.पण मी घाबरले तर पत्नीचं काय ? म्हणुन उसणं अवसान घेवुन डॅाक्टरांच्या सल्यानुसार दुस-या दवाखान्यात अगदी दोन मिनिटांत मला नेण्यात आले.दरम्यान माझी तब्येत जरा जास्तच बिघडली.वरचा श्वास वर अन् खालचा खाली.आज आपलं काही खरं नाही याची चांगलीच जाणीव झाली.एकीकडे पत्नी धीर देण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत होती.आता माझे ह्रुदयाचे ठोके बरेच कमी झाले होते अन् साोबत अॅाक्सिजनची मात्राही.माला चांगलेच गरगरायला लागले.सभोवतालचे सारेच फिरु लागले.मन अन् शरीर दोघेही थकले.अवस्थी मिनिटांगणीक वाईट होवु लागली.दवाखान्या बेडवर मला झोपवले गेले हे मला मला समजले हे शेवटंच आठवतंय….मी कुठेय ? काय होतंय ? याचा थांपत्ताही लागेना.
एवढ्यात माझ्या सभोवतालचे सारेच वेगाने फिरु लागले.बरं फिरण्याचा वेग एवढंढी प्रतंड होता की बस.माझ्या अवतीभवतीचे सारेच वेगाने फिरत असताना मला अगदी प्रकर्षाने जाणवले की मला त्याच वेगानं सांगायचं झालं तर अति वेगाने कुणीतरी वर खेचले.वर खेचल्यावर माझ्या डोळ्यांसमोर एक लख्ख असा डोळ्यांना सहन न होणारं एक प्रकाशाच वलय तयार झालेल.डोळे ते वलय सहन करीत नव्हते.आता मी वरुन खाली बघत होतो.मी स्वत:लाच वरुन बघत होतो.माझ्या अवतीभवती बरेच जण उभे होते.कोण होते मला आठवत नाही.मला प्रकर्षाने जाणीव झाली की माझा मृत्यु झालाय.हे किती काळ चालले तेही मला आठवत नाही,पण मला जाणवेल एवढा वेळ तर नक्कीच सुरु होते.यात भर पडली.मला अति वेगाने आणखी वर खेचले गेले.यावेळी मी गडद काळ्या अंतराळात असल्याचे जाणवले.सभोवताली फक्त अन् फक्त गडद काळोख.आणखी वर खेचल्याची जाणीव झाली.आता मात्र माझ्या अवतीभोवती शांत शितल प्रकाश होती.अगदी सुखावह.नक्की रंग मला सांगता येत नाही…..अन् काही समजायच्या आत जेवढ्या प्रतंड वेगाने मला वर खेचले होते तेवढ्याच वेगाने मला खाली खाली खेचले गेले.मला कुणीतरी चक्क हाताने खाली खेचत होते.तो स्पर्ष मला आजही चांगला जाणवतोय मात्र कुणाचा स्पर्ष आहे हे आजही आठवत नाहीयं….
मी माझा स्वत:चा मृत्यु स्पष्टपणे अनुभवलायं.
या निमित्ताने एक मात्र चांगलंच लक्षात आहे.एक विलक्षण शक्ती अंतराळात आहे हे नक्की….
हो तो ‘ देव’च आहे.
मृत्यु भयावह आहेच पण सुखावयही आहे.
पण एक नक्कीच खरं आहे…….
‘ अंतराळात एक शक्ती नक्कीच आहे ‘
शब्दांकन-सचिन गिरी ( सर्पमित्र)