EagleEyed News

EagleEyed News JÀYSHREE DIMBLE

परफॉर्मन्सच्या स्टाइलवरून मलाइका आणि गीतामध्ये वाद: “इंडियाज बेस्ट डान्सर व्हर्सेस सुपर डान्सर: चॅम्पियन्स का टशन” मध्ये...
29/11/2024

परफॉर्मन्सच्या स्टाइलवरून मलाइका आणि गीतामध्ये वाद: “इंडियाज बेस्ट डान्सर व्हर्सेस सुपर डान्सर: चॅम्पियन्स का टशन” मध्ये रेमोच्या उपस्थिती तणाव वाढला

या वीकएंडला सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील “इंडियाज बेस्ट डान्सर व्हर्सेस सुपर डान्सर: चॅम्पियन्स का टशन” मध्ये एक जबरदस्त एपिसोड बघायला मिळणार आहे. हर्ष लिंबाचियाच्या सूत्रसंचालनात जेव्हा दोन टीम्सची टक्कर होईल तेव्हा मलाइका अरोरा आपल्या इंडियाज बेस्ट डान्सरच्या टीमला आणि गीता सुपर डान्सरच्या छोट्या उस्तादांना जोरदार पाठिंबा देताना दिसेल. लॉर्ड ऑफ डान्स रेमो डिसूझा प्रमुख परीक्षक म्हणून काम करेल. या शोमध्ये एकूण बारा सहभागी आहेत – इंडियाज बेस्ट डान्सर आणि सुपर डान्सर या दोन्ही शोजमधले प्रत्येकी सहा-सहा! या स्पर्धकांना दोन टीम्समध्ये विभाजित करण्यात आले आहेत. आणि प्रत्येक टीमचे नेतृत्व करण्यासाठी तीन प्रसिद्ध कोरिओग्राफर्स आहेत.

रेमो डिसूझाच्या ‘पहिया-ए-परेशानी’ व्हीलने दोन्ही प्रतिस्पर्धी संघांना एक अनोखे आव्हान दिल्यानंतर त्यांच्यातील संघर्ष पेटला. ‘गाना एक डान्स अनेक’ असे हे आव्हान होते. आणि नियम? सर्व प्रतिभावान डान्सर्सना ‘जिस देश में गंगा रहता है’ चित्रपटातल्या ‘प्रेम जाल’ गाण्यावरच परफॉर्म करायचे होते, पण आपल्या परफॉर्मन्समधून दोन वेगळ्या शैली दाखवायच्या असे हे आव्हान होते. या गाण्याला सर्वोत्तम न्याय कोणी दिला हे मग परीक्षक ठरवणार. मलाइकाने आपल्या टीममधून देवपर्णा या अत्यंत लवचिक शरीराच्या मुलीला निवडले. तर, सुपर डान्सर टीमची मालकीण गीता कपूर हिने तुषार आणि रूपसा म्हणजे ‘तुरूप’ यांना आपल्या टीमचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवडले.
देवपर्णाने नाट्यमय एंट्री घेत अनेक स्टंट केले, जे हृदयाची धडधड वाढवणारे होते. तिचा तो आगळावेगळा दृष्टिकोन पाहून रेमो डिसूझा खूपच प्रभावित झाला. तो म्हणाला, “तू उभे केलेले स्पाइडरमॅन हे पात्र विलक्षण होते. तू ज्या रीतीने त्यात उप-शास्त्रीय अंग आणलेस ते अप्रतिम होते. तुला दिलेल्या गाण्याला तू योग्य न्याय दिलास. परंतु, गीता मात्र तितकी प्रभावित झाली नव्हती. ती म्हणाली, “तुझी एंट्री मस्त होती, पण पण डान्सिंग बीट्समध्ये स्पष्टता दिसली नाही. स्टंट मस्त होते पण डान्सचा जो भाग होता, त्यात ती धार दिसली नाही. तुझा प्रयत्न उत्तम होता, पण तो पुरेसा स्पष्ट नव्हता. विशेषतः बदलताना!” साहजिकच मलाइका गीताच्या टिप्पणीचा विरोध करत म्हणाली, “मी गीताशी सहमत नाही. तिला जे वाटते आहे, ते मी समजू शकते, पण माझ्यासाठी हा परफॉर्मन्स दमदार होता. बघू या, पुढे काय होते.”
त्यानंतर तुषार आणि रूपसाची पाळी होती. त्यांनी याच गाण्यात आपला वेगळाच ढंग आणला. या परफॉर्मन्समध्ये पराकोटीची ऊर्जा आणि धाडसी स्टंट होते. पण मलाइकाला तुषारची ऊर्जा पुरेशी वाटली नाही. तिने कठोर टिप्पणी करत सांगितले, “रूपसा, तुझी ऊर्जा पुरेपूर होती. आणि डान्स करताना तू अगदी परिपक्व दिसलीस. पण तुषार, आज तुझी ऊर्जा मंद होती. धूर, दिवे, आग आणि वारा यांसारख्या प्रॉप्सच्या मागे तुम्ही लपू शकत नाही. त्यांच्यामुळे तुमचा परफॉर्मन्स अधिक उठावदार होऊ शकतो, पण त्या कुबड्या आहेत. आम्हाला तुझा अस्सल डान्स दाखव.” आपल्या टीमची बाजू घेत गीता म्हणाली, “जर तू प्रॉप्सना कुबड्या म्हणत असशील, तर मी म्हणेन, की तुम्ही युक्त्यांच्या मागे लपू शकत नाही. यांचा परफॉर्मन्स नुसता स्टंट नाही, तर डान्स होता.”
या तापलेल्या वादावादीत मध्यस्थाची भूमिका घेत रेमोने दोन्ही टीम्सच्या मालकिणींशी आपण सहमत नाही असे नमूद केले. तो म्हणाला, “दोन्ही परफॉर्मन्समध्ये दोन आगळेवेगळे दृष्टिकोन होते. त्यांचा प्रकार आणि संकल्पना भिन्न होत्या. पण मुद्दा हा आहे की कोणी या गाण्याला अधिक चांगला न्याय दिला. शरीराची लवचिकता दाखवण्याचा प्रकार डान्समध्ये असतो. तुम्ही त्याला स्टंट म्हणू शकत नाही आणि देवपर्णाने उत्तम परफॉर्म केले. दोन्ही टीम्सची कामगिरी उत्कृष्ट होती, पण मलाइका तुषारबद्दल म्हणाली, ते मला पटले नाही. मला तर वाटते की त्याचा परफॉर्मन्स अफलातून होता.”
अजिबात चुकवू नका, “इंडियाज बेस्ट डान्सर व्हर्सेस सुपर डान्सर: चॅम्पियन्स का टशन” शनिवारी आणि रविवारी रात्री 7:30 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर!

02/07/2024

👌👍राहूल गांधी यांचा लोक सभेत सत्ता पक्ष
विरुध्द हल्ला बोल !!
सत्ताधाऱ्यांचे वस्त्रहरण!शहाचा मदतीसाठी टाहो!!
****************************************
दहा वर्षात जे न घडले..ते आज घडले!
गेली दहा वर्ष मोदीजी सत्ताधारी समर्थकांच्या साथीने... हशा आणि टाळ्यांच्या गजरात काँगेस पक्षाची पिसे काढून त्यांना घायाळ करून "एक अकेला भारी" अशा गर्जना करत होते...

आज संसदेत "एक अकेला भारी" नक्की कोण आहे ते जनतेला कळले.

राहुल ने आज सत्ता पक्षाचे संपूर्ण वस्त्रहरण केले.
सत्ताधाऱ्यांनी धारण केलेले मुखवटे आणि बुरखे राहुल टराटरा फाडत असताना लाखो प्रेक्षकांनी संसदेतील live नाट्याचा पुरेपूर आनंद घेतला.
विरोधी पक्षनेत्या अभावी मुक झालेली संसद आज पहिल्यांदा जिवंत भासली....
राहुल ने परखडपणे सत्य मांडत सत्तेला उघडे नागडे केले...आपले वस्त्र फेडली जाताहेत हे जाणवताच,सर्व सत्ताधारी मंत्री उठून उभे राहून राहुल ला विरोध करू लागले...अवतारी मोदींनी दोनदा विफल प्रयत्न केला...पण वस्त्रहरण सुरूच राहिले...
द्रौपदी ने असहाय्य होऊन कृष्णाला मदतीची हाक दिली...तशीच हाक गृहमंत्री अमित शहा यांनी सभापती यांना केली...म्हणाले - तुम्ही तरी यांना थांबवा...सभापती यांनी निष्फळ प्रयत्न केला.पण राहुल ने ओम बिर्ला यांनाही सोडले नाही.सभापती यांनी हुजरेगिरी चे संस्कारी कारण राहुल यांना दिले,तेंव्हा राहुल यांनी सभापती यांना त्यांच्या महत्तेची आणि महत्वाची जाणीव ज्या प्रकारे करून दिली त्या मूळे सभापती ओम बिर्ला यांचा चेहरा बघण्या लायक झाला.
संसदेत पहिल्यांदा "मन की बात" नाही तर "जन की बात" मांडली गेली.
राहुलने जे सांगितले ते शब्द न शब्द खरे आणि सत्य होते.एवढे कडवे सत्य ऐकण्याची सवय सत्ता पक्षाला नाही....राहुल खोटं बोलतोय,असा गलका सत्ताधाऱ्यांनी केला खरा...पण आज खोटे पणाचा आवाज क्षीण होता.सत्याची धार प्रखर आणि तेज होती.राहुल चे वक्तव्यावर टीका टिप्पणी होत असताना राहुलने प्रत्येक वेळी ज्या तडफेने प्रत्युत्तर दिले त्यांनी सत्ता पक्ष मौन झाला.एका क्षणाला राहुलने सत्ता पक्षाला विजयी झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले...पण शांतता होती.निरव शांतता.
राहुल म्हणाला ...अहो मी तुमचे कौतुक करतोय.स्वीकार करा...पण तोपर्यंत सत्ता पक्ष गलितगात्र होऊन शरणागतीला आलेला.

विरोधी पक्षनेता म्हणून दहा वर्षाने पहिल्यांदा बोलायला उभा राहिलेल्या राहुलचा आजचा अवतार वेगळाच होता...डरो मत...हा नारा देणारा राहुल आज निर्भय पणाने सत्ता बाकाकडे पाहत बोलत होता.पंतप्रधान यांच्याकडे पाहून बोलत होता...
हे सत्ताधारी सदस्यांना सहन झाले नाही.कधी नव्हे ते सत्ताधारी सदस्यांनी संसदेतील नियमांचे पुस्तक उघडले आणि राहुलने speaker कडे तोंड करून बोलले पाहिजे असा बालिश आग्रह धरला...सत्य कटू अस्त.राहुल च्या सत्याला नजर भिडवून त्याला प्रत्युत्तर देण्याची धमक आज एकाही मंत्र्यात नव्हती....सरकारी सत्य जनतेच्या हिताचे नसते,हे राहुल वारंवार पटवून देत राहिला...
नोट बंदी,मणिपूर,अग्निविर, किसान संप,महागाई,GST, अडाणी अंबानी,महिलांचे प्रश्न, छोट्या व्यापाऱ्यांचे प्रश्न,नीट परीक्षा...हे सर्व मांडत असताना,सत्ताधारी पक्षाने भीतीचे आणि दहशतीचे वातावरण निर्माण करून भांडवल शाही पद्धतीचे समर्थन करणारी एकाधिकारशाही कशी आणली..हे पद्धतशीर रीतीने मांडले...युक्तीने,चलाखीने मांडले.त्याच्या प्रश्नावर सत्ताधाऱ्यांना बोलावे लागले.त्याचा आवाज दाबण्या साठी सत्ताधारी सदस्यांना ओरडा करावा लागला.सभापती आज त्याचा आवाज बंद करू शकले नाही...कारण माईक बंद का करता? असा खडा सवाल त्याने बिर्ला यांना केला....सभापती या आसनावर दोन भिन्न व्यक्तिमत्त्व बसतात असा उल्लेख करून राहुलने सभपाती यांना वारंवार चिमटे घेतले आणि निरूत्तर केलं.आज सभापती यांनी राहुल यांना थांबवलं असतं तर नाचक्की सभापती यांचीच होणार होती.
चाणाक्ष राहुल ने हे जाणले आणि निर्भयपणे विरोधी पक्ष नेतेपदाची भूमिका बजावली.
मोदी शहा यांना समोर बसवून त्यांची इतकी शोभा आजवर कोणाही भारतीय नेत्याने काढली नसेल.
काँग्रेस पक्षाची टिंगल करताना मोदी यांनी हाताची बोटे नाचवली होती...आज राहुलने आपल्या शाब्दिक बाणांनी सत्ताधाऱ्यांना नाचवले.

संसद भवनात लोकशाही जिवंत असल्याचे दृश्य भारतीय जनतेने दहा वर्षानंतर पहिल्यांदा अनुभवले.

मला दिवार सिनेमातील एक सीन आज आठवला.
अमिताभ बच्चन एकटा गोदामात शिरतो. आतून कडी लावतो.कुलूप घालतो आणि उन्मत्त गुंडा कड़े चाबी फेंकू म्हणतो... पिटर,अब ये ताला तेरी जेब से चाबी निकलकर ही खोलूंगा...मग एकटा अमिताभ त्या मारेकऱ्यांच्या चक्रव्यूहात घुसतो...सर्वांना घायाळ करून सुखरूप बाहेर येतो...बाहेर अन्यायाने पिचलेली मजदुर सेना त्याचा जयजयकार करत त्याला खांद्यावर घेते...
एक कमजोर मजदुर एका प्रसंगात गरीब जनतेचा आवाज बनतो....
आज राहुल तसाच भासला.
धीट, निडर....
सर्व सत्ताधाऱ्यांना तो एकटा पुरून उरला.

राजू तुलालवार

|| हद है अन्याय की ||*अधिकारो का हनन *एक निर्दोष संत पर हो रहे अत्त्याचार इससे बडी पराकाश्ठा और क्या हो सकती है कि कई घा...
27/06/2024

|| हद है अन्याय की ||

*अधिकारो का हनन *
एक निर्दोष संत पर हो रहे अत्त्याचार
इससे बडी पराकाश्ठा और क्या हो सकती है
कि कई घातक बिमारियो के बावजूद भी
कोई राहत या रीहायत नही |

https://www.pune24news.com/archives/632बातमी साठी संपर्कPune24newsउपसंपादक जयश्री डिंबळे9623968990
27/05/2024

https://www.pune24news.com/archives/632

बातमी साठी संपर्क
Pune24news
उपसंपादक
जयश्री डिंबळे
9623968990

माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभुमीवर कोथरूड परिसरातील ओढे-न...

03/05/2024

💐 काय म्हणतायत पुणेकर!
तुमचा नेता कसा असावा याचे एक जागरूक
उदाहरण म्हणजे श्री रविंद्रभाऊ धंगेकर

💥आजही तो तुमच्या दारात टू व्हिलरवर येतो💥

Address

PUNE
Pune
411038

Telephone

+919623968990

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when EagleEyed News posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to EagleEyed News:

Share