Lokvarta

Lokvarta महाराष्ट्राचं एकमेव निर्भिड निष्पक्? Lokvarta marathi news Agency

मतदारांची निराशा करणाऱ्यांना निवडून देणार का ?कवठे येमाईतील मेळाव्यात आढळराव पाटील यांची डॉ. कोल्हेंवर टीकाकवठे येमाई : ...
14/04/2024

मतदारांची निराशा करणाऱ्यांना निवडून देणार का ?
कवठे येमाईतील मेळाव्यात आढळराव पाटील यांची डॉ. कोल्हेंवर टीका

कवठे येमाई : "पाच वर्षे खासदार राहून त्यांनी अनेक वचने दिली; पण एकही पूर्ण केले नाही. सर्वसामान्य नागरिकांची निराशा केली. एकही रुपयाचा निधी आणला नाही. अशांना आता निवडून देणार का?" अशा शब्दांत शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी समाचार घेतला. गावगप्पा मारणार्यांना घरी बसविण्याची हीच वेळ असल्याचे सांगत डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर त्यांनी निशाणा साधला.

कवठे येमाई येथे झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी पूर्वा दिलीप वळसे पाटील, प्रदीप वळसे पाटील, माजी आमदार पोपटराव गावडे, मानसिंगराव पांबूरकर, डॉ. सुभाष पोकळे, मारुतराव शेळके, सुदाम इंचके, अनिल शिंदे, बाळासाहेब बेडे, भगवान शेळके, बापूसाहेब शिंदे, प्रकाशराव पवार, सविताताई बगाटे आदी उपस्थित होते. आढळराव पाटील म्हणाले की , आता ही देशाची निवडणूक आहे. आपल्या सर्वांचे भवितव्य ठरवणारी आहे. गेल्या वेळी केलेली चूक परत करू नका. संसदेत कोणी किती प्रश्न मांडले याचा हिशोब त्यांनी सांगितला. ते म्हणाले की विद्यमान खासदाराने संसदेत ६२९ प्रश्न मांडले, मी ११०२ प्रश्न मांडले. याचा वेध घेण्याची हीच वेळ आहे. पोपटराव गावडे म्हणाले की,

विकासकामांसाठी विकासपुरुष आढळराव पाटील यांना निवडून आणावेच लागेल. विद्यमान खासदार आले आणि गायब झाले. मात्र आढळराव पाटील यांनी जमिनीशी असणारी नाळ केव्हाच तुटु दिली नाही. जमिनीशी नातं असणारा हा नेता आहे. मतदारसंघात भरघोस निधी त्यांनी आणला आहे.

डॉ. सुभाष पोकळे म्हणाले, कवठे येमाई गाव आणि आढळराव यांचे वेगळे नाते आहे. त्यांच्यासाठी आपण ठामपणे मागे आहोत. ज्यांना नियी असूनही वापरता आला नाही, त्यांचे हे काम नव्हे, त्यासाठी आढळराव पाटील यांना पर्याय नाही.

अभिजित बोराटे म्हणाले, सेटवरचा माणूस सेटवर पाठवायची हीच वेळ आहे. त्यांनी केवळ निधी आणण्याचे नाटक केले, म्हणून तर त्यांच्या काळातला ८० टके निधी परत गेला; मात्र अनुभवी अशा आढळराव यांनी दीड हजार कोटी रुपयांचा निधी आणला आहे त्यांच्यासाठी आपले मत महत्वपूर्ण आहे.

भोसरीतून आढळराव पाटील यांना लाखाचे मताधिक्य देणार - आमदार महेश लांडगेपुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दहा वर्षांची का...
13/04/2024

भोसरीतून आढळराव पाटील यांना लाखाचे मताधिक्य देणार - आमदार महेश लांडगे

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दहा वर्षांची कारकीर्द सर्वोत्तम असल्यामुळे तिसऱ्यांदा ते पंतप्रधान होणार आहेतच. त्यांचे हात बळकट करण्यासाठी शिरूर लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांना विजयी करण्यासाठी आपण सगळे कामाला लागू या. भोसरी विधानसभा मतदारसंघातून आढळराव यांना एक लाखापेक्षा चे अधिकचे मताधिक्य मिळवून कही देण्याची जबाबदारी माझी, असे प्रतिपादन भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी केले.

वाघोली येथे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजर पदाधिकाऱ्यांची सा समन्वय बैठक घेतली. या वेळी आमदार लांडगे बोलत होते. यावेळी शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार राहुल कुल, हडरसरचे माजी आमदार योगेश टिळेकर, माजी मंत्री बाळा भेगडे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, आशाताई बुचके, जयश्री पलांडे, आबा तुपे, जयसिंग एरंडे, डॉ. ताराचंद कराळे, राम गावडे, संतोष खैरे, आदींसह शिरूर लोकसभेतील भावपचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जगामध्ये भारताचा आदरयुक्त दबदबा निर्माण झाला आहे. राज्यामध्ये महायुती आहे. सगळ्यांच्या विचाराने शिवाजीराव आढळराव यांना शिरूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. त्यांना सर्वाधिक मतांनी विजयी करण्याची जबाबदारी आपली सगळ्यांची आहे. खासदार अमोल कोल्हे या मतदारसंघात कधी फिरकले नाहीत. याउलट शिवाजी आढळराव यांनी मागील पाच वर्षांत मतदारसंघात जास्तीत जास्त कामे केली आहेत.

दरम्यान चंद्रशेखर बावनकुळे यांच्या बैठकीमुळे भोसरी व जुनर तालुक्यासह आंबेगाव, खेड, शिरूर, हवेली व हडपसरमधील भाजप कार्यकर्ते अधिक जोमाने कामाला लागणार असल्याने शिवाजीराव आढळराव यांना अधिक बळ मिळण्यास फायदा होणार आहे. दख्यान, महायुतीचे उमेदवार आढळराव पाटील यांना मताधिक्य मिळवून देण्याचे वचन सर्व पदाधिकान्यांनी यावेळी दिले.

खेड आळंदी विधानसभेची जागा ठाकरे गटाला द्या अन्यथा.. ठाकरे गट आक्रमक, नियोजित दौरा रद्द करण्याची कोल्हेंवर नामुष्कीराजगुर...
12/04/2024

खेड आळंदी विधानसभेची जागा ठाकरे गटाला द्या अन्यथा..
ठाकरे गट आक्रमक, नियोजित दौरा रद्द करण्याची कोल्हेंवर नामुष्की

राजगुरूनगर : खेड तालुक्यात शिवसेनेची ताकद मोठी आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या विधानसभेच्या जागावाटपात खेड-आळंदी विधानसभेची जागा शिवसेनेच्या वाट्याला मिळावी, यासाठी आपण आपल्या वरिष्ठ नेत्यांशी विचारविनिमय करून शब्द द्यावा. तोपर्यंत आपल्या प्रचारात सहभागी होणार नाही. अशी स्पष्ट भूमिका ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी घेतल्याने महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अमोल कोल्हे यांना सांडभोरवाडी काळुस जिल्हा परिषद गटातील शुक्रवारी नियोजित असलेला दौरा तातडीने रद्द करण्याची नामुष्की ओढावली आहे. त्यामुळे मतदारसंघात आता उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

भाजपचे खेड आळंदी विधानसभा समन्वक आणि जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अतुल देशमुख यांनी पाच दिवसांपुर्वी भाजपला राम राम ठोकला. तर शुक्रवारी त्यांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी शरदचंद्र पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. या सर्व प्रक्रियेत महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार अमोल कोल्हे यांनी प्रमुख भूमिका बजावली होती.

या प्रवेशामुळे कोल्हे यांनी देशमुख यांना विधानसभेचा शब्द दिला असावा. असे संकेत मिळत मिळाल्यानंतर ठाकरे गटात अस्वस्थता पसरली असल्याची माहिती समोर येत आहे. त्यानंतर संध्याकाळी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी थेट कोल्हे यांचं घरं गाठलं. या बैठकीत शिवसैनिकांकडील इच्छूक उमेदवारांपैकी भलतीच नावं पुढे केल्याचं समजत आहे. ही सर्व बैठक गुपित झाली. मात्र खात्रीशीर सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही माहिती समोर आली आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची आक्रमक भूमिका पाहता कोल्हेंना आपला प्रचार थांबवण्याची नामुष्की ओढावली आहे. आता या मतदारसंघात आघाडीत निर्माण झालेला पेच कोल्हे आणि नेते मंडळी कशा पद्धतीने सोडवतात. याकडे सगळ्याचं लक्ष लागून राहिलं आहे. यातच विधानसभेसाठी खेड-आळंदीची जागा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना देण्याचा शब्द वरिष्ठ नेत कार्यकर्त्यांना देणार का ? आणि तसे झाल्यास इतर पक्षातून नव्याने सामील झालेल्या इच्छुकांचे काय होणार ? याकडे आता मतदारसंघांंचं लक्ष लागून राहिलं आहे.

"जनतेच्या प्रश्नांची जाण असणारे नेतृत्व म्हणजे शिवाजी आढळराव पाटील" : अपूर्व आढळराव पाटीलशिरूर :  शिरूर लोकसभा मतदारसंघा...
12/04/2024

"जनतेच्या प्रश्नांची जाण असणारे नेतृत्व म्हणजे शिवाजी आढळराव पाटील" : अपूर्व आढळराव पाटील

शिरूर : शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार अशी लढत होत आहे. शरद पवार राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे विरोधात अजितदादांचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटीत अशी रंगतदार लढत होत आहे. सध्या शिरूर लोकसभा मतदारसंघात दोन्ही पक्षाच्या वतीने प्रचार सुरू आहे.

शुक्रवारी मुस्लिम बांधवांचा रमजान ईद हा सण मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे. या रमजान ईद च्या निमित्ताने शिरूर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांचे चिरंजीव अपूर्व शिवाजी आढळराव पाटील यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघातीत भोसरी विधानसभा मतदारसंघात मुस्लिम बांधवांना भेटून ईदच्या शुभेच्छा दिल्या.

या शुभेच्छा देताना अपूर्व आढळराव पाटील यांनी मतदारांना आवाहन करताना सांगितले की, शिरूर लोकसभेचा खरा नायक म्हणजेच शिवाजी आढळराव पाटील यांना निवडून द्यावे. शिरूर लोकसभेच्या विकासाचे प्रश्न सोडविण्यासाठी शिवाजी आढळराव पाटील यांच्याशिवाय पर्याय नसल्याचेही यावेळी अपूर्व शिवाजी आढळराव पाटील यांनी सांगितले. यावेळी शिवसेनेचे उपनेते इरफान भाई सय्यद तसेच भारतीय जनता पार्टीचे पुणे उपाध्यक्ष किसन बावकर, युवासेना संपर्कप्रमुख संकेत चावरे व भारतीय जनता पार्टी चे नगरसेवक उत्तम केंदळे आदी कार्यकर्ते पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते.

"खासदार निवडणूक आला, आणि गायब झाला..!" आढळरावांचा कोल्हेंना खोचक टोलापुणे : गेल्या पाच वर्षात आमच्या मतदारसंघाला खासदारच...
11/04/2024

"खासदार निवडणूक आला, आणि गायब झाला..!" आढळरावांचा कोल्हेंना खोचक टोला

पुणे : गेल्या पाच वर्षात आमच्या मतदारसंघाला खासदारच नव्हता. भारतातील असा एकमेव हा लोकसभा मतदारसंघ होता. अस म्हणत महायुतीचे उमेदवार माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्यावर घणाघात चढवला. आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ कवठे येमाई येथे निर्धार मेळावा आयोजित केला होता. त्यावेळी ते बोलत होते.

जनतेकडून आम्ही वचनं घेतली म्हणून आम्ही प्रत्येक भागात गोरगरिबांसाठी जनता दरबार भरवतो. यासाठी ठिकठिकाणी माझी कार्यालय लोकांसाठी सुरू केली आहेत. मात्र मागच्या खासदाराने तुमची आमची सर्वांची फार निराशा केली आहे. गेल्या पाच वर्षात या मतदारसंघाला खासदारच नव्हता. आपल्या मतदारसंघात खासदार फिरकलाच नाही. त्यामुळे भारतातील हा असा एकमेव मतदारसंघ होता की या मतदारसंघात खासदार नव्हता. असे म्हणत आढळरावांनी कोल्हे यांच्यावर प्रखर शब्दात टिका केली.

पुढे बोलतांना ते म्हणाले की, मागची निवडणुक झाली. त्यात खासदार निवडून गेले पण त्यानंतर खासदार गायब होता. असेही आढळरावांनी सांगितले. त्यावर आढळराव पाटील हे शेतकऱ्यांच्या प्रश्नांऐवजी फक्त टिका करत आहेत. त्यांच्याकडे बोलण्यासारखं काही नाही. मात्र मी त्यांचं वय पाहता त्यांना एवढ्याच शुभेच्छा देतो की गेट वेल सुन असे म्हणत कोल्हेंनी त्यावर पलटवार केला.

दरम्यान, निवडणुकीसाठी आता शिरूरमध्ये प्रचार शिगेला पोहचला आहे. शिवाजीराव आढळराव पाटील यांनी काल कवठे येमाई येथे निर्धार मेळावा घेतला. या मेळाव्यात महायुतीतील घटक पक्षांच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी झाडून हजेरी लावली. त्यावर महायुतीच्या पाठीशी असलेला माय बाप जनतेचा भक्कम पाठिंबा अमुल्य असल्याचे शिवाजीराव आढळरावांनी म्हटले.

'खासदार झाल्यापासून मतदारसंघात फिरकले नाहीत.. आता कशाला गप्पा मारता??' : आमदार अतुल बेनकेंकडून कोल्हेंचा समाचार“..म्हणून...
10/04/2024

'खासदार झाल्यापासून मतदारसंघात फिरकले नाहीत.. आता कशाला गप्पा मारता??' : आमदार अतुल बेनकेंकडून कोल्हेंचा समाचार

“..म्हणून आढळरावांना मतदारसंघात जनतेचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळतोय,” अतुल बेनकेंनी सांगितली खरी हकीकत

शिरूर : गेल्या पाच वर्षात डॉ. अमोल कोल्हे मतदारसंघात फिरकले नसल्याने ठिकठिकाणी त्यांच्याविरोधात मतदारांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. अलिकडेच शिरोली फाट्याजवळ खासदार अमोल कोल्हे यांच्याविरोधात पोस्टर लावत गावकऱ्यांनी काही प्रश्नांची सरबत्ती केली होती. तर दुसऱ्या बाजूला माजी खासदार आणि महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील मागच्या निवडणुकीत पराभव होऊनही जोमाने काम करतांना दिसत आहे. यावरून अमोल कोल्हे यांनी आढळरावांवर टिका केली होती. त्यावर आता राष्ट्रवादी अजित पवार गटातील आमदार अतुल बेनके यांनी कोल्हेंचा चांगलाच समाचार घेतला आहे.

आढळरावांना विजयी करण्यासाठी महायुतीच्या सर्व नेत्यांनी जोरदार सुरूवात केलीय. राष्ट्रवादी अजित दादा गटाचे आमदार अतुल बेनके देखील दररोज गावकऱ्यांच्या गाठीभेटी घेतांना दिसत आहेत. यातच त्यांनी कोल्हे यांच्यावर टिका करत आढळरावांचं कौतुक केलं आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे गेल्या पाच वर्षांत कोरोना काळ वगळता मतदारसंघामध्ये फिरकलेच नाहीत, याउलट शिवाजीराव आढळराव कोरोना काळ आणि त्यानंतर देखील पायाला भिंगरी बांधल्यागत संपूर्ण मतदारसंघामध्ये जनतेची कामे मार्गी लावण्यासाठी फिरत राहिले आणि म्हणूनच आज शिवाजीराव आढळराव यांना शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये जनतेचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळतोय, असे प्रतिपादन जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी केले.

नरेंद्र मोदी यांनी संसदेत कौतुक केल्यानंतर तुम्ही किती दिवस त्यांच्या पदराखाली लपणार ? भाजप प्रवेशाच्या वेळी कितीवेळा तुम्ही अमित शाह यांच्या भोवती पिंगा घातला. हे सर्वांना माहिती आहे. एखादा खासदार निवडून गेल्यानंतर आपल्या मतदारसंघात किती टक्के उपस्थितीत होती. ते आपण स्वतलाच विचारा. ज्या ज्या गावात तुम्ही भाषणं केली आहेत. याआधी तुम्ही कधीच त्याठिकाणी आले नाही. त्याठिकाणी तुमचा शुन्य रूपयाचा निधी आहे. त्यामुळेच विकास काम तर करायची नाही, मात्र इतर गोष्टींच्या गप्पा हाणायच्या. याला आता लोकं भुलणार नाहीत. तुम्ही लोकांना बराच वेळा भुलवण्याचं काम केलं आहे. त्यांना फक्त काम पाहिजे. त्यामुळेच आता शिवाजीराव आढळराव पाटील घड्याळ चिन्हावर निवडून आल्याशिवाय राहणार नाही. असाही हल्लाबोल त्यांनी केलाय.

दरम्यान, आढळरावांचा प्रचार करतांना अतुल बेनके यांना आलेला एक अनुभव त्यांनी कथन केला आहे. ते म्हणाले की, अजितदादा पवार यांचे आणि त्यांच्या कार्यपद्धतीचे अनेक चाहते राज्यभर भेटतात. शिरुर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित जनसंवाद दौऱ्यादरम्यान असेच अजितदादांवर प्रेम करणारे एक व्यक्तिमत्त्व भेटले.

बोरी बु. गावचे बाळासाहेब जाधव यांची आज भेट झाली, त्यांनी अजितदादांचे अनेक अनुभव सांगत त्यांच्या विकासाच्या कार्य पद्धतीचे कौतुक केले. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांबद्दल अतोनात आदर आहेच. परंतु भविष्यात महाराष्ट्र राज्याला गतीने पुढे नेण्याची क्षमता फक्त अजितदादांमध्ये आहे तेच सक्षमपणे नेतृत्व करू शकतात असे जनसामान्यांचे मत आहे असेही त्यांनी आवर्जून सांगितले. जाधव यांनी यावेळी माननीय अजितदादांशी केलेले जुने पत्र व्यवहार, फोटोंच्या स्वरूपातील आठवणींना उजाळा दिला तसेच जाधव यांनी जुन्नर तालुक्याच्या विकासकामांबद्दल समाधान व्यक्त केल्याचंही बेनके यांनी सांगितलं.

#शिरूर
#लोकसभा2024


विलास लांडेंची नाराजी दूर..! आढळरावांना  मताधिक्य मिळवून देणार.. भोसरी : उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज झालेल्या भोसरीतील...
09/04/2024

विलास लांडेंची नाराजी दूर..! आढळरावांना मताधिक्य मिळवून देणार..

भोसरी : उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज झालेल्या भोसरीतील माजी आमदार विलास लांडे यांची भेट घेऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केला आहे. लांडे यांची नाराजी दूर करण्यात आढळरावांना यश आल्यास त्यांच्या ते पथ्यावर पडणार आहे. महायुतीचा धर्म पाळल्यास भोसरीतून आढळरावांना मोठे मताधिक्य मिळेल असे राजकीय गणित जाणकारांकडून मांडण्यात येत आहे.

महायुतीमधील अजित दादांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून शिरूरसाठी उमेदवारी मिळेल असा आडाखा माजी आमदार विलास लांडे यांनी बांधला होता. दरम्यानच्या काळात उमेदवारीवरून राजकीय घमासान झाले. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या बाबत मतदारसंघ विजयी होण्यासाठी अनुकूल असल्याचे स्पष्ट झाले त्यामुळे राष्ट्रवादीत पक्षप्रवेश घडवून आणत त्यांना उमेदवारी देखील बहाल करण्यात आली. या निर्णयामुळे भोसरीचे चाणक्य असलेले विलास लांडे नाराज झाले. उमेदवारी आढळरावांना जाहीर झाल्यापासून ते राजकीय विजनवासात गेल्याचे चित्र होते. माध्यमांना त्यांनी त्यानंतर प्रतिक्रिया दिल्या नाहीत. तसेच राजकीय सार्वजनिक कार्यक्रमांना दांडी मारण्यास त्यांनी सुरुवात केली.

भोसरी विधानसभेत तब्बल पाच लाखांपेक्षा अधिक मतदार आहेत. या मतदारसंघात असणारे विलास लांडे हे महत्वाचे आणि मोठे नेते आहेत. लांडे नाराज झाले तर त्याचा निवडणुकीत मोठा फटका बसू शकतो याची जाणीव आढळराव पाटील यांना आहे. त्यामुळे त्यांनी भोसरी येथील राजमाता जिजाऊ महाविलयातील कार्यालयात जाऊन लांडे यांची भेट घेतली. त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर विविध माध्यमांना प्रतिक्रिया देताना लांडे यांची नाराजी दूर झाल्याचे नरेटिव्ह तयार करण्याचे काम आढळराव पाटील यांनी केले. सोशल मीडियावर देखील लांडे आणि आढळराव यांच्या भेटीचे फोटो व्हायरल झाल्याने त्याची चांगलीच चर्चा रंगली होती. ही चर्चा आढळरावांना सकारात्मक ठरेल असे सांगितले जात आहे. प्रत्यक्ष त्याचा निवडणुकीत किती फायदा होतो पाहणे रंगतदार ठरणार आहे.

'भोसरी विधानसभेत विलास लांडे यांची मोठी ताकद' :
गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत माजी आमदार विलास लांडे यांना ९० हजार मते पडली आहेत. त्यांचा पराभव झाला खरा. मात्र त्यावेळी त्यांच्या राजकीय खेळ्या चांगल्याच चर्चेत राहिल्या होत्या. अपक्ष म्हणून निवडणूक लढविताना त्यांनी अजित दादांची मनधरणी करत राष्ट्रवादीच्या उमेदवाराला अर्ज भरायच्या पाच मिनिटे आधीच माघार घ्यायला लावली. थेट चिन्हावर आणि पक्षावर न लढताही त्यांनी वरिष्ठांचा आशीर्वाद आपल्या बाजूने ठेवण्याची किमया केली होती. त्यांच्या या राजकीय खेळ्या अनेकांच्या अडचणीच्या ठरू शकतात याची जाणीव आढळराव पाटील यांना होती. त्यामुळे आधीच भेट घेऊन त्यांची मनधरणी करत लांडे यांची ताकद आपल्या बाजूने ठेवण्याची गरज आढळरावांना देखील निर्माण झाल्याची चर्चा आहे.

"संसदेत प्रश्न मांडले म्हणजे काय उपकार केले नाहीत" दिलीप मोहिते पाटलांचा कोल्हेंवर घणाघात शिरूर : अजितदादा पवार गटातील स...
09/04/2024

"संसदेत प्रश्न मांडले म्हणजे काय उपकार केले नाहीत" दिलीप मोहिते पाटलांचा कोल्हेंवर घणाघात

शिरूर : अजितदादा पवार गटातील सुरवातीला काहीसे नाराज असलेले नेते आमदार दिलीप मोहिते पाटील आता शिवाजीराव आढळराव पाटलांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. महायुतीकडून शिवाजीराव आढळराव पाटलांना उमेदवारी देण्यात आली आहे. अजितदादांच्या समजुतीनंतर आता सगळेच नेते झपाटून कामाला लागले आहेत. अशातच आढळरावांचा प्रचार करत असतांना दिलीप मोहिते पाटलांनी विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.

महायुतीकडून दिलीप मोहिते पाटील यांच्याकडे खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघाचं प्रचाराचं नेतृत्व सोपवण्यात आलं आहे. यातच एका कार्यक्रमात दिलीप मोहिते पाटलांनी कोल्हेंवर जोरदार टिका करत खोचक टोला हाणला आहे. मागच्या वेळी डॉ. अमोल कोल्हे यांच्या विजयासाठी जीवाचं रान केलं. त्यांना निवडणुकीत मोठ्या मताधिक्यानं निवडून आणलं. परंतु मला त्यांनी चहा सुद्धा पाजला नाही. असा टोमणा मोहिते पाटलांनी कोल्हेंना लगावला.

पुढे बोलतांना ते म्हणाले की, खासदाराने संसदेत प्रश्न मांडण्यापेक्षा जनतेच्या दैनंदिन अडचणी समजून घ्यायला हव्यात. लोकांनी आम्हाला आमदार खासदार केलं. त्यामुळे संसदेत आणि विधानसभेत प्रश्न मांडले तर आम्ही उपकर करत नाही. तुम्ही संसदेत प्रश्न मांडले , मी विधानसभेत मांडले, लोकांनी प्रश्न मांडण्यासाठी आपापल्या निवडून दिले आहे. त्यामुळे आपण उपकार करत नाही. अशा शब्दात मोहिते पाटलांनी कोल्हेंना आपल्या जबाबदारीची जाणीव करून दिली.

दरम्यान, मागच्या निवडणुकीत कोल्हे यांनी आढळरावांचा पराभव केला. मात्र यावेळी अमोल कोल्हे यांना शिवाजीराव आढळराव पाटलांचं मोठं आव्हान असणार आहे. राष्ट्रवादी पक्ष फुटीनंतर आढळरावांच्या पाठीमागे अजितदादांसह भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची मोठी ताकद असणार आहे. या मतदारसंघात येणाऱ्या सहा विधानसभेत पाच आमदार महायुतीसोबत आहेत. त्यामुळे कोल्हेंना विजय मिळवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागणार आहे.

01/08/2023

लोकमान्य टिळक यांची आज 103 वी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त प्रतिष्ठित, समाजासाठी अतुलनीय कार्य करणाऱ्या लोकांचा लोक....

21/07/2023

महेशदादा सभागृहात नेमकं काय बोलले? पहा संपूर्ण घटनाक्रम | लोकवार्ताThank You for watchingTo create news we use below products Camera :-R6https://amzn.to/3tDn...

21/07/2023

लोकवार्ता : पिंपरी-चिंचवडमध्ये महापालिका प्रशासनाकडून सुरू असलेली उपयोगकर्ता शुल्काची दंड वसुलीला अखेर स्थगित....

16/07/2023

यावेळी मुख्याध्यापक प्रकाश पारिजात यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. परिषदेत या विद्यार्थ्यांचे भाषण, वे....

Address

Moshi Spine Road
Pune
412105

Alerts

Be the first to know and let us send you an email when Lokvarta posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share