Digital Prabhat PUNE

Digital Prabhat PUNE 'Dainik Prabhat' Pune's Marathi Daily News Paper

Official Whatsapp Channel : https://whatsapp.com/channel/0029Va3rspz3rZZTSvqANJ3K
(1)

08/09/2026

लोणावळ्यातील गोल्ड व्हॅलीतील बंगल्यात नको ते धंदे! पोलिसांची मोठी कारवाई...

08/09/2026

लाडक्या बहिणींना ओवाळणी मिळाली अन् सावत्र भावाच्या…! चित्रा वाघ यांचा नाना पटोलेंवर घणाघात

07/09/2026

हिंजवडीत आयटीयन्सचा मुकमोर्चा..! एमआयडीसीच्या मुख्य रस्त्यावर सांडपाणी; नागरिकांचा संताप

07/09/2026

पुढचं आंदोलन अधिक तीव्र असेल..! हिंजवडीत आयटीयन्सचा मुकमोर्चा; संतप्त नागरिकांचा सरकारला इशारा

07/09/2026

देवेंद्र फडणवीस राजीनामा द्या..! MPSC मोर्च्यात सहभागी विद्यार्थ्यांची मागणी

07/09/2026

पुण्यात दहीहंडी उत्सवाच्या गर्दीत मोबाईल हरवला! तरुणांचा प्रशासनावर संताप

07/09/2026

...अटक करून किती जणांचा आवाज दाबणार! भर सभेत पोरगी थेट सरपंचांना भिडली

नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील माळेगाव ग्रामसभेतील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रोहिणी राऊत यांनी ग्रामसभेत सरपंच आणि प्रशासनाला गावातील मूलभूत समस्यांवरून थेट जाब विचारला. रस्ते, पाणी, शौचालय, सॅनिटरी नॅपकिन आणि गावातील सुरक्षेसाठी CCTV बसवण्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. कुणाकुणाला अटक करून कितीजणांचा आवाज दाबणार, असा थेट सवालही त्यांनी सरपंचांना केला.

07/09/2026

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील नव्या कनेक्टिंग लिंकला शिंग्रोबा धनगरांचे नाव द्या..! धनगर समाजाची मागणी

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील नव्या कनेक्टिंग लिंकला वीर हुतात्मा शिंग्रोबा धनगर यांचे नाव देण्याची मागणी रायगड जिल्हा धनगर समाजाने केली आहे. यासंदर्भात खालापूर तहसीलदार अभय चव्हाण यांना निवेदन देण्यात आले.

धनगर आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी सरकारने सर्वोच्च न्यायालयातील लढाई पूर्ण ताकदीने लढावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. यासोबतच आमदापूरच्या बाळूमामा देवस्थान ट्रस्टमध्ये धनगर समाजाला प्रतिनिधित्व, चर्चगेट रेल्वे स्थानकाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यासह चार मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या आक्रोश मोर्चाला रायगड धनगर समाजाने जाहीर पाठिंबा दिला आहे.

07/09/2026

PUNE | तहसीलदारांची गाडी रस्त्यातचं..! भीमाशंकर परिसरात तासभर वाहतूक ठप्प; भाविकांचा प्रशासनाविरोधात संताप

भीमाशंकर मंदिर परिसरात वाहतूक नियोजनाच्या अभावाचा फटका भाविकांना बसल्याचं समोर आलं आहे.

मंदिर परिसरातील रस्त्यावर तहसीलदारांची गाडी लावण्यात आल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला. त्यामुळे जवळपास तासभर भाविकांना रस्त्यातच ताटकळत थांबावं लागलं.

एकीकडे बेशिस्त वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी, तर दुसरीकडे नियोजनाचा अभाव... यामुळे भाविक आणि नागरिकांना मोठ्या मनस्तापाला सामोरं जावं लागलं.

धार्मिक स्थळी मोठ्या संख्येने भाविक येत असताना वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासनाकडून योग्य नियोजनाची गरज आहे.

दरम्यान, या प्रकारामुळे भाविकांमध्ये नाराजी व्यक्त होत असून, वाहतूक व्यवस्थेबाबत प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.

05/09/2026

सोमेश्वर कारखाना निवडणुक : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ऍक्टिव्ह, इच्छूकांना मोलाचा सल्ला...

Address

304 Narayan Peth
Pune
411030

Alerts

Be the first to know and let us send you an email when Digital Prabhat PUNE posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Digital Prabhat PUNE:

Shortcuts

Share