ShabdaShahi News

ShabdaShahi News Newspaper & Digital (Marathi)

04/10/2025
29/09/2025

पाण्यासंदर्भात......संपादकीय ✍🏻

पाणी हे जीवन म्हंटले जाते पण आपल्या देशात यावरून पण राजकारण करणारे विविध पक्षांचे राजकीय नेते आपण पाहिले आहेत, पाहतो आहे व भविष्यातही पाहायला मिळतील, पण राष्ट्रीय व अनेक राज्यांच्या पातळीवर जर खरोखरच सत्ताधारी नेत्यांनी व प्रशासनाने देखील पाण्याचे प्रामाणिकपणे नियोजन करायचे ठरवले तर काहीही अवघड नाहीये पण अनेकांचे वैयक्तिक आर्थिक हितसंबंध जोपासण्याच्या हेतुमुळे आणि राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे गेली कित्येक वर्षे नागरिकांना पाण्यासारख्या मुलभूत समस्येला तोंड द्यावे लागत आहे, कित्येक देशांमध्ये पाऊस खुप कमी प्रमाणात पडतो पण त्यांनी योग्य नियोजन केल्यामुळे त्या देशातील नागरिकांना पाण्याची कमतरता कधी पडत नाही, याउलट आपल्या देशात वर्षातील 4 महिने पाऊस पडून देखील व किती तरी वेळा पुर येऊन देखील आपल्या इकडच्या राजकीय इच्छाशक्ती अभावी पाण्याचे योग्य नियोजन होऊ शकत नसल्यामुळे नागरिकांना पाण्यासारख्या मुलभूत सुविधेपासून वर्षानुवर्षे मुकावे लागले आहे, लागत आहे व असेच धोरण राहिले तर भविष्यात देखील लागू शकते. पण जर योग्य नियोजन केले तर आपल्या देशातील पाणी समस्या तर दूर होईलच उलट साठवणुकीची व्यवस्था केली तर ज्या देशांमध्ये पाणी कमी आहे अशा देशांना भारत मदत करू शकतो किंवा ते पाणी विकू शकतो. तसेच हे पाण्याचे नियोजन करताना "नदीजोड प्रकल्पासारख्या" उपक्रमांचाही विचार करता येऊ शकतो. सध्या महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये महापूर आल्यामुळे अनेकांचे मोठे नुकसान झाल्याच्या बातम्या बघून खुप वाईट वाटते पण राजकारणी मात्र अजूनही फक्त राजकारणच करताना दिसत आहेत, (यामध्ये सत्ताधारी व विरोधी असे दोन्ही प्रकारचे राजकारणी सामील आहेत) हे राजकारणी त्यांच्या आभासी विचारसरणीतून बाहेर पडून "माणूस" म्हणून केव्हा विचार करणार, हाच खरा प्रश्न आहे........आता फक्त आशा "देशभक्त" राजकारण्यांनी मनावर घेतले तर यावर कायमस्वरूपी तोडगा निघू शकतो इतकीच..........लिहिण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत पण आताच्या वाचकवर्गांला मोठे लेख वाचण्यास आवडत नसल्यामुळे थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न केला आहे........

31 व्या "पुणे नवरात्र महोत्सवाचे" आज पुण्यातील गणेश कला क्रिडा रंगमंच येथे राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्...
22/09/2025

31 व्या "पुणे नवरात्र महोत्सवाचे" आज पुण्यातील गणेश कला क्रिडा रंगमंच येथे राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे, दरवर्षी नवरात्रीचे 9 दिवस चालणारा हा उत्सव, यामध्ये कला, क्रिडा, गायन, वादन, नृत्य, भजन व सांस्कृतिक कार्यक्रम असे उपक्रम घेतले जातात, यावर्षी मदुराई येथील मिनाक्षी मंदिराचा देखावा शिवदर्शन येथील लक्ष्मीमाता मंदिराच्या आवारात उभारला जाणार आहे, अशी माहिती संस्थापक अध्यक्ष आबा बागुल यांनी दिली.

16/09/2025

पुणे शहरात लवकरच "डबल डेकर बस" धावणार, ही बस इलेक्ट्रिक असून ती CCTV व AC सुविधायुक्त असणार आहे.....

मराठी-हिंदी छोट्या पडद्यावरील अभिनेत्री "प्रिया मराठे" हीचं अवघ्या 38 व्या वर्षी कॅन्सरने निधन झाले.......
31/08/2025

मराठी-हिंदी छोट्या पडद्यावरील अभिनेत्री "प्रिया मराठे" हीचं अवघ्या 38 व्या वर्षी कॅन्सरने निधन झाले.......

३७ व्या "पुणे फेस्टिव्हलचे" २९ ऑगस्ट रोजी उपराष्ट्रपती मा. सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते उद्घाटन!कला, संस्कृती, गायन,...
25/08/2025

३७ व्या "पुणे फेस्टिव्हलचे" २९ ऑगस्ट रोजी उपराष्ट्रपती मा. सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते उद्घाटन!

कला, संस्कृती, गायन, वादन, नृत्य, संगीत, क्रीडा आणि पर्यटनविकास यांचा मनोहारी संगम असणारा ‘पुणे फेस्टिव्हल’ यंदा गौरवशाली ३७वे वर्ष साजरे करीत आहे. यंदा २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या काळात ‘पुणे फेस्टिव्हल’ संपन्न होईल. याचे उद्घाटन शुक्रवार, दि. २९ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ४.३० वाजता महाराष्ट्राचे राज्यपाल मा. सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते श्री गणेश कला-क्रीडा रंगमंच, स्वारगेट, पुणे येथे संपन्न होईल. केंद्रीय पर्यटन व सांस्कृतिकमंत्री मा. गजेंद्रसिंह शेखावत, केंद्रीय नागरी हवाई उड्डाण राज्यमंत्री मा. मुरलीधर मोहोळ, महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री मा. चंद्रकांत पाटील, महाराष्ट्राचे पर्यटनमंत्री मा. शंभूराज देसाई आणि महाराष्ट्राच्या महसूल राज्यमंत्री मा. माधुरी मिसाळ हे याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. यासोबतच खा. सुप्रिया सुळे, खा. मेधा कुलकर्णी, खा. श्रीरंग बारणे, खा. सुनेत्रा पवार, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, पुणे मनपा आयुक्त श्री. नवलकिशोर राम, महाराष्ट्र पर्यटनविकास महामंडळाच्या पुणे विभागाच्या उपसंचालिका सौ. शमा पवार हे याप्रसंगी विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित राहतील. तसेच अनेक परदेशी पाहुणे व परदेशी विद्यार्थीदेखील उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहण्याची शक्यता आहे, अशी माहिती पुणे फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल आणि मुख्य संयोजक अॅड. अभय छाजेड यांनी पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी पुणे फेस्टिव्हलचे सांस्कृतिक कार्यक्रम समन्वयक डॉ. सतीश देसाई, माजी गृह राज्यमंत्री रमेश बागवे, आझम कॅम्पसचे अब्दुल इनामदार यावेळी उपस्थित होते.
भव्य उद्घाटन सोहळा, अशोक हांडे प्रस्तुत 'आवारा हूँ’ कार्यक्रम, ऑल इंडिया मुशायरा, मनीषा साठे प्रस्तुत ‘डिव्हाइन कॉन्फ्लुएन्स’ (जपानी नृत्याविष्कार), केरळ महोत्सव, जुळ्यांचे संमेलन, संगीत सौभद्र, नारदीय कीर्तन महोत्सव, मराठी कविसंमेलन, हिंदी हास्यकविसंमेलन, इंद्रधनु, उगवते तारे, ‘मिसेस पुणे फेस्टिव्हल’ स्पर्धा, व्हॉइस ऑफ पुणे फेस्टिव्हल, महिला नृत्य स्पर्धा, मेकअप स्पर्धा, लावणी, मराठी-हिंदी गीते, पर्यटनविषयक परिसंवाद, पुण्यातील प्रेस फोटोग्राफर्सचे छायचित्र प्रदर्शन, महाराष्ट्रातील व्यंगचित्रकारांचे प्रदर्शन, वारली पेंटिंग्ज प्रदर्शन, युनेस्कोने नामांकित केलेल्या १२ किल्ल्यांचे पेंटिंग्ज प्रदर्शन व स्पर्धा, पेंटिंग्ज स्पर्धा व प्रदर्शन याबरोबरच गोल्फ कप टुर्नामेंट, बॉक्सिंग, द डर्ट ट्रॅक, मल्लखांब, कॅरम, बुद्धिबळ, शरीरसौष्ठव व स्केटिंग अशा क्रीडा स्पर्धाही यंदाच्या पुणे फेस्टिव्हलची वैशिष्ट्ये आहेत.

ज्येष्ठ गायिका माणिक वर्मा, ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे, संगीतकार मदनमोहन, ओ.पी. नय्यर व सलिल चौधरी आणि नाट्य संगीत गायिका व अभिनेत्री जयमाला शिलेदार या सहा कलावंतांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या गाण्यांवर आधारित विशेष कार्यक्रम मनाला हळवा करेल.

पुणे फेस्टिव्हलचे कार्यक्रम श्री गणेश कला-क्रीडा रंगमंच, बालगंधर्व रंगमंदिर व कलादालन, महाराष्ट्र साहित्य परिषद, सावरकर स्मारक भवन आणि विविध ठिकाणी क्रीडा स्पर्धा संपन्न होतील. पुणे फेस्टिव्हलचे सर्व कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य आहेत.
१९८९मध्ये महाराष्ट्र पर्यटनविकास महामंडळाचे तेव्हाचे अध्यक्ष खा. सुरेश कलमाडी यांनी ‘पुणे फेस्टिव्हल’ या भव्य सांस्कृतिक महोत्सवाची सुरुवात केली. सलग १० दिवस आणि ३७ वर्षे सुरू असलेला पुणे फेस्टिव्हल देशातील मोठा सांस्कृतिक महोत्सव मानला जातो. पुणे फेस्टिव्हलला ‘मदर ऑफ ऑल फेस्टिव्हल्स’ म्हटले जाते. भारतरत्न पं. भीमसेन जोशी प्रथमपासून पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष होते. ज्येष्ठ अभिनेत्री, नृत्यांगना पद्मश्री खा. हेमामालिनी पुणे फेस्टिव्हलच्या पॅट्रन आहेत.
पुणे फेस्टिव्हल कमिटी, पुणेकर नागरिक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि भारत सरकारचा पर्यटन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे फेस्टिव्हलचे आयोजन केले जाते.
३७व्या पुणे फेस्टिव्हलच्या ‘श्रीं’ची प्रतिष्ठापना बुधवार, दि. २७ ऑगस्ट रोजी सकाळी १०.०० वा. हॉटेल सारस, नेहरू स्टेडियम, पुणे येथे पुणे महानगरपालिकेचे आयुक्त श्री. नवलकिशोर राम सपत्नीक करतील. वेदमूर्ती पं. धनंजय घाटे गुरुजी हे याप्रसंगी पौरोहित्य करतील.
३७व्या ‘पुणे फेस्टिव्हल’चे महाराष्ट्र पर्यटनविकास महामंडळ आणि कोहिनूर ग्रुप हे मुख्य प्रायोजक असून, पंचशील व सुमा शिल्प हे सहप्रायोजक आहेत. भारत फोर्ज, एनईसीसी, आयआयएफएल कॅपिटल, डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, सुहाना मसाले आणि अहुरा बिल्डर्स हे उपप्रायोजक आहेत.
विविध क्षेत्रांत दीर्घकाळ उत्तुंग कामगिरी करणाऱ्या नामवंतांना पुणे फेस्टिव्हलच्या उद्घाटन सोहळ्यात ‘जीवनगौरव’ पुरस्कार, तसेच ‘पुणे फेस्टिव्हल अवॉर्ड’ देऊन गौरविले जाते. यंदा भारती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शिवाजीराव कदम आणि डॉ. पी. ए. इनामदार विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. ए. इनामदार यांना ‘जीवनगौरव’ पुरस्काराने गौरविले जाईल. तसेच ज्येष्ठ नाट्यलेखक डॉ. सतीश आळेकर, भारतीय क्रिकेटपटू केदार जाधव, ‘महाराष्ट्र केसरी’ पृथ्वीराज मोहोळ, माउली कृषी पर्यटन केंद्राचे ज्ञानदेव कामठे आणि उद्योजिका सुप्रिया बडवे यांना ‘पुणे फेस्टिव्हल अवॉर्ड’ देऊन सन्मानाने गौरविले जाईल.
सार्वजनिक गणेशोत्सवाची शताब्दी साजरी करणाऱ्या पुण्यातील मंडळाचा पुणे फेस्टिव्हलमध्ये दरवर्षी उद्घाटन सोहळ्यात श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे कै. प्रतापराव ऊर्फ तात्या गोडसे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ 'जय गणेश पुरस्कार’ देऊन गौरव केला जातो. यंदा रास्ता पेठेतील नायडू गणपती मंडळ यांना या पुरस्काराने गौरविले जाईल.
उद्घाटन सोहळा :-

दरवर्षीप्रमाणे यंदाचा उद्घाटन सोहळादेखील नेत्रदीपक असेल. सुरुवातीला ज्येष्ठ सनईवादक तुकाराम दैठणकर व त्यांचे सहकारी यांच्या सुमधुर सनईने कार्यक्रमाचा प्रारंभ होईल. दीपप्रज्वलन व श्री गणेश आरती होईल. नृत्यांगना अरुंधती पटवर्धन यांच्या कलावर्धिनी नृत्यशाळेतर्फे भरतनाट्यम् गणेशवंदना सादर होईल. नृत्यांगना अरुंधती पटवर्धन यांनी याचे नृत्यदिग्दर्शन केले आहे. जानकी ग्रुप ऑफ गरबा अँड फोक संस्थेतर्फे ‘शिवतपस्वींचे नृत्य’ सादर होईल. भैरवी सचदेव यांनी याचे नृत्यदिग्दर्शन केले आहे. सिम्बायोसिस संस्थेत शिकणाऱ्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचे नृत्याविष्कार याचे आयोजन रूपाली चौधरी यांनी केले आहे. महाराष्ट्र मंडळाच्या युवा कसरतपटूंनी सादर केलेली मल्लखांब प्रात्यक्षिके हे वेगळे आकर्षण असेल. सिक्कीम भारतात विलीन झाला, त्यास यंदा ५० वर्षे झाल्यानिमित्त ऋतुरंग कल्चरल ग्रुप यांनी आयोजिलेले सिक्कीमचे ‘मरोनी’ लोकनृत्य व आसामचे ‘बिहू’ नृत्य सादर होईल. करुणा पाटील व देविका बोरठाकुर यांनी याचे आयोजन केले आहे. पुण्यातील ईश्वरपुरम संस्थेत शिकणाऱ्या नागालँड व अरुणाचल प्रदेशच्या विद्यार्थ्यांचा ‘वॉर डान्स ऑफ नागालँड’ आणि ‘फेस्टिव्हल डान्स ऑफ अरुणाचल’ हे नृत्याविष्कार सादर होतील. विनीत कुबेर यांनी याचे आयोजन केले आहे. ‘पुणे मल्याळी फेडरेशन’तर्फे पुण्यातील केरळी कलावंतांचा राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडविणारा ‘मिले सूर मेरा-तुम्हारा’ हा नृत्याविष्कार सादर होईल. याचे आयोजन फेडरेशनचे अध्यक्ष राजन नायर यांनी केले आहे. आदिवासी संचालनालयाच्या आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेतर्फे ‘तारपा’ हे आदिवासी लोकनृत्य सादर होईल. पुष्पलता मडावी यांनी याचे आयोजन केले आहे. कथ्थक व लावणी यांची जुगलबंदी पायालवृंद डान्स अॅकॅडमीतर्फे सादर होईल. याचे नृत्यदिग्दर्शन निकिता मोघे यांनी केले आहे. ही सारी उद्घाटन सोहळ्याची सांस्कृतिक वैशिष्ट्ये असतील.

या उद्घाटन सोहळ्याचे मराठीतून योगेश देशपांडे व इंग्रजीतून सरिता मूलचंदानी हे सूत्रसंचालन करतील.

10/08/2025
दै. केसरी चे संपादक, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती तसेच लोकमान्य टिळकांचे पणतू "डॉ. दिपक टिळक" यांचे निधन झाले आहे...
16/07/2025

दै. केसरी चे संपादक, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती तसेच लोकमान्य टिळकांचे पणतू "डॉ. दिपक टिळक" यांचे निधन झाले आहे, त्यांना शब्दशाही परिवाराच्या वतीने भावपुर्ण श्रध्दांजली......

11/07/2025

महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयकाबाबत नागरिकांची काय मते आहेत ?

दै. प्रभात चे सहसंपादक अविनाश गोडबोले लिखीत "असा डांगोरा शब्दांचा" या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा राज्याचे माजी मुख्यमंत्री ...
01/07/2025

दै. प्रभात चे सहसंपादक अविनाश गोडबोले लिखीत "असा डांगोरा शब्दांचा" या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते पुण्यातील एस. पी. कॉलेज येथे पार पडला. यावेळी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, ज्येष्ठ पत्रकार अनंत बागाईतकर आदींसह पुणेकर यावेळी उपस्थित होते.
अविनाश गोडबोले यांच्या दै. प्रभात मधील 37 वर्षाच्या कार्यकाळात 1000 च्या वर विविध विषयांवर अग्रलेख लिहिले. त्यामधील निवडक 500 अग्रलेखांचे दोन खंड प्रकाशित करणार आहेत. त्यामधीलच पहिल्या खंडाचे प्रकाशन झाले.
#पत्रकार

Address

Pune

Telephone

+918767758421

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when ShabdaShahi News posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to ShabdaShahi News:

Share