14/05/2021
🚩🚩 साडेतीनशे वर्षे बदनामीच्या कारस्थांणाला पुरून उरलेला आद्यहुतात्मा❗️......स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजीराजा ‼️
‘क्षत्रियत्व’ संपवणारा पैदाच झाला नाही.! होणार पण नाही ! आज 14 मे छ.शंभुराजे जयंती,🚩
आयुष्यभर अनेक प्रवादांना आणि कटकारस्थानांना तोंड देत आपल्या कारकिर्दीचा दिवस अन रात्र निकराची झुंज देणारा राजा
छत्रपती संभाजी महाराज. पाच लाखांचे खड़े सैन्य घेऊन आलेल्या आलमगीर औरंगजेबाला नऊ वर्षे झुंज देणारा राजा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज.
पोर्तुगीजांना सळो की पळो करून सोडणारे छत्रपती संभाजी महाराज, आयुष्याची अखेर होत असताना ही स्वाभिमान न सोडता स्वराज्यासाठी बलिदान देत येणाऱ्या पिढीला प्रेरणा देणारा कर्तुत्ववान राजा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज,
३५० वर्षांनंतर ही ज्या राजबिंडया व्यक्तिमत्वाचे आकर्षण इतिहासाला ही आहे असे राजे म्हणजे छत्रपती संभाजी महाराज .. आपल्या अपार राष्ट्रप्रेम, कुशाग्र बुद्धिमत्ता आणि अलौकिक पराक्रम यांनी दाही दिशा तळपत ठेवणारे इतिहासातील महानायक रणधुरंदर, राजनीतीधुरंदर, भाषापंडित राजाधिराज छत्रपती संभाजी महाराज
हे जगश्रेष्ठ राजकारणी, धुरंधर व मुत्सद्दी इंग्रजांनाही कोड्यात टाकणारे करार करणारा, अरबी समुद्रकिनारा पोर्तुगीजा-विरुध्द पेटवून उठविणारा " छत्रपती संभाजीराजा " नादान युवराज कसा ?
गोवळकोंड्याची कुतुबशाही आणि विजापूरची अदिलशाही, इक्केरीच्या बसप्पा नाईकासह एकत्रीत करून दक्षिण भारताच्या तत्कालीन शासकांचा गट तयार करुन दिल्ली् च्या पातशहाला आव्हान निर्माण करणारा राजा संभाजी कोपिष्ठ व चंचल कसा असू शकतो?
अवघ्या नऊ वर्षाच्या कालखंडात २५०० लढाया करीत घोड्यावर सिंहासन घेऊन फिरणारा राजा संभाजी बदफैली कसा असू शकतो.
या देशातल्या त्या सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शंभूराजाच्या समर्पित रक्ताचा पोटभरु इतिहासकार, नाटककारांच्या शाईने प्रचंड दुःस्वास केला आहे. त्याचा परिपाक म्हणजे थोरातांची कमळा, मोहित्यांची मंजुळा आणि झेबुनिस्सा सारखी प्रकरणे. झेबुनिस्सा राजांपेक्षा चौदा वर्षांनी मोठी होती. शंभुराजांना अलौकिक सौंदर्य जन्मजात प्राप्त होते. आधीच कर्तबगार, शुरवीर त्यात दिमाखदार व्यक्तीमत्वाची भर हजारो पुरुषांना हेवा वाटणारा आणि हजारो स्त्रियांना भुरळ पाडणारा हे अगदी स्वाभाविक आहे.
शंभुराजांच्या चरित्रावरचे बखर लेखन मल्हार रामराव चिटणीसांसारख्या बाळाजी आवजी चिटणिसांचा वंशज संभाजी राजांच्या मृत्यू नंतर ११८ वर्षांनी करतो. तेंव्हा राजद्रोहाबद्दल बाळाजी आवजीची मृत्यूदंडाची शंभूराजांनी दिलेली शिक्षा त्याच्या मनाच्या आत कोठेतरी जखम बनुन भळभळली असणार आणि परिणामी बखर लेखन हा सत्यकथनाचा भाग न राहता एक सुडाचा प्रवास झाला नसतातर नवल होते.
पोर्तुगीजांकडून दारुंची पिंपे घेतली अशा वर्णनामध्ये 'दारू' उडविण्याची, लढाईची होती. पिण्याची, नशेची नव्हती. याचा तपशील सोईस्करपणे विसरला जातो.एक कर्तव्यकठोर आदर्श राजा शब्दांच्या ह्या हेराफेरीत बदनाम होईल अशी पध्दतशीर रचना करण्यात येते. साधा, सरळ वाचक वाचणात हे तकलादू वाचन ग्रहन करतो.
' बुद्धभूषण' सारखा संस्कृत ग्रंथ लिहणारा राजा संभाजी ! '" नायिकाभेद, सातसतक, नखशिखांत " सारखी हिंदी किव्ये लिहिणारा राजा संभाजी ! "काशी प्रचारणी सभेकडे आजही असणारी 'ब्रिजभाषी' काव्ये लिहणारा राजा संभाजी !" आमच्यापुढे जाणीवपूर्वक का आणला गेला नाही ? ,या प्रश्नांचे मनामध्ये एक मूक आक्रंदन सुरु होते. साठ सत्तर हजार मावळ्यांची फौज घेऊन एकीकडे आप्तस्वकीयांशी लढा देत हा राजा सर्वबाजुंच्या विविध कारस्थानी शत्रुशी कसा झुंजत असेल याचा विचार करावा म्हणजे छत्रपती संभाजीराजांचे असामान्यत्व लक्षात येईल.
" इथे गवतास भाले फुटतात" हे महाराष्ट्राच्या मातीच्या लढवय्येपणाचे एक वैशिष्ट्य आहे. तशा काळात सावत्र भाऊ असणाऱ्या राजाराम महाराजांवर पुत्रवत प्रेम करणारा, सावत्रमाता सोयराबाईना 'स्फटीकासारख्या निर्मळ मनाची माता' म्हणणारा संभाजी समजुन घेण्यासाठी मोठी प्रगल्भता लागते.
स्वतः लढाईत उतरुन फोंडा किल्ल्याच्या आक्रमणात गोव्याच्या व्हॅाईसरॅायचा पाठलाग करत घोड्यासह खाडीत उडी घेणारा राजा संभाजी इतिहासात एखांदाच असतो.
म्हणून खाफीखान म्हणतो" शंभूराजा तो सिवासे दसगुणा सता रहा है " व्यापारी बनुन आलेले राज्यकर्ते बनतील या अंदाजाने इंग्रजांच्या राजापूर कखारीवर हल्ला करणारे राजे संभाजी मुंबई बंदरावर त्यांचा धान्यपुरवठा आणि गुलामांचा व्यापार बंद करणारे राजे संभाजी आम्हाला सांगणारा इतिहास अपेक्षित आहे.
चित्ता - वाघांनी हेवा करावा असे शंभुराजांचे चपळ झडपतंत्र आळशी, चैनी युवा पिढीला जागे केल्याशिवाय राहणार नाही. अवघ्या ३१ वर्षे १० महिन्याच्या वयात वाघनख्यांनी कातडी सोलल्यावर आत तप्तपोलादी सळईने डोळे काढल्यावर इराद्मावर अटळ राहण्याची हिम्मत आजच्या तरुण पिढीला प्रेरणा देईल हा विश्वास वाटतो...❗️
स्वराज्य रक्षक शंभुराजेंना मानाचा मुजरा !🚩🚩