Baramati Vidhan Sabha

Baramati Vidhan Sabha Baramati Vidhan Sabha Matadar Sangh

08/02/2019

राज्याच्या ई पीक पाहणी पथदर्शी प्रकल्पाकरीता

#पुणे महसूल विभागातून बारामती तालुक्याची निवड



#बारामती - शेतकरी सक्षमीकरणाकरीता पीक पेरणीची माहिती मोबाईलवर ॲपद्वारे गाव नमुना नं.१२ मध्ये शेतक-यांनी स्वत: नोंदविण्याचा प्रकल्पांतर्गत ई पिक पाहणी ( Mobile App) कार्यशाळेचे आयोजन येथील कवी मोरोपंत नाटयगृह येथे करण्यात आले होते. यावेळी प्रकल्प सल्लागार टाटा ट्रस्टचे श्री.नरेंद्र कवडे (से.नि. भा.प्र.से), #ईफेरफार राज्य समन्वयक जमाबंदी आयुक्त कार्यालय,पुणेचे श्री.रामदास जगताप, प्रांताधिकारी हेमंत निकम, उपविभागीय कृषी अधिकारी श्री.बालाजी ताटे, गट विकास अधिकारी श्री.प्रमोद काळे, तालुका कृषी अधिकारी श्री.पडवळ इ.मान्यवर उपस्थित होते.

क्षेत्रीय स्तरावरुन पीक पेरणीची अद्ययावत आकडेवारी तातडीने संकलित करणे, यामध्ये पारदर्शकता आणणे आणि या पीक पाहणीच्या प्रक्रीयेमध्ये शेतक-यांचा सक्रीय सहभाग घेणे इत्यादी उद्दीष्टाकरीता पीक पेरणीची आकडेवारी मोबाईलवर ॲपद्वारा गांव नमुना नंबर १२ मध्ये नोंदविण्याची सुविधा शेतक-यांना उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने शासनाने टाटा ट्रस्टच्या सहकार्याने राज्याचे माजी मुख्य सचिव डॉ.जयंत कुमार बांठिया यांच्या मार्गदर्शनाखाली ई पीक पाहणी प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे. मा.मुख्यमंत्री यांच्या दि.१० मे २०१८ रोजीच्या पत्रान्वये यास मान्यता देण्यात येवून शासनाच्या महसूल आणि वन विभागाकडून १० सप्टेंबर २०१८ रोजी याबाबतचा शासन निर्णयही निर्गमित झाला आहे

या ई पीक पाहणी पथदर्शी प्रकल्पांतर्गत मोबाईल ॲपद्वारा पीक पेरणीची आकडेवारी घेण्यासाठी राज्यातील ६ विभागांतर्गत ६ तालुक्यांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये पुणे महसूली विभागांतर्गत बारामती तालुक्याची निवड झाली आहे. तालुक्यामध्ये सदरचे कामकाज शेतक-यांनी करण्यासाठी ॲपबाबतचे आवश्यक ते प्रशिक्षण देण्याकरीता कवी मोरोपंत पिंगळे नाटयगृह, बारामती येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित तलाठी, मंडल अधिकारी, कृषी सहायक,ग्रामसेवक तसेच शेतक-यांना पीक पेरणीची ‍ माहिती नोंदविण्याचे प्रशिक्षण देण्यात येवून त्यांच्या मोबाईल मध्ये हे ॲप डाऊनलोड करण्यात आले.

या ई पीक पाहणी ॲपद्वारे पीक अहवाल प्रक्रीयेमध्ये शेतक-यांचा सक्रीय सहभाग राहणार आहे त्यामुळे अचूक आणि विश्वसनीय पीक माहिती आधारे कार्यक्षम धोरण आखण्यास मदत होईल. यामुळे पीक विमा योजनांसारख्या शासकीय योजनांच्या अंमलबजावणीमध्ये सुलभता येईल. पीक विम्याचे दावे निपटारा करण्याची प्रक्रीया सुलभ रितीने होईल. पीकांची आपत्तीमुळे हानी / नुकसान झाल्यास त्यांना कार्यक्षमतेने मदत करता येणे शक्य होईल. शेतक-यांना हवामान, किडींचा प्रार्दूभाव आणि इतर रोगांच्या उपचारासाठी त्यांना तातडीचे संदेश देणे शक्य होईल तसेच अचूक माहितीच्या आधारे – शासकीय निर्णय प्रक्रीया आणि नियोजन सुलभ होईल.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसिलदार हनुमंत पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन महसूल नायब तहसिलदार संजय पांढरपट्टे यांनी केले.

29/10/2018

खासदार कोण ? कशासाठी ? तो कसा असावा ? आम्ही नागरिकांनी काय करावे ? ?


जर आपण मतदान केले पक्ष -धर्म-जात-प्रांत-भाषेच्या आधारावर किंवा खोट्या आशावादांवर - भाषणांवर - विज्ञापनांवर तर पुन: पुढील ५ वर्ष प्रत्येक नागारिकाला महागाई - भ्रष्टाचार - दु:ख - कष्ट - संताप - अशांति - असुरक्षा झेलावी लागेल |

जाहीर झाली मतदार संघात एका सामान्य जनाची उम्मीदवारी

अर्थात ही नाही कोणी विशिष्ट व्यक्ति किंवा वंशवृद्धीची उम्मीदवारी ||

आता जे कोणी सामान्यजन विजयी होणार,


तेथील मतदार संघात जनमन प्रभावी करणार
फक्त आपल्या भारत मातेलाच ते पूजणार
संसदेत केवळ आणि केवळ जनतेची बाजू मांडणार,

तसेच भूख, महागाई, गरिबी, बेरोजगारी, बेईमानी
आणि भ्रष्टाचार दूर सारणार, राष्ट्र विकास योजना आखणार,

youtube  चॅनेल व न्युज पोर्टल सध्या असंख्य होत आहेत. रोज एक चॅनेल आणि वेबपोर्टलच्या लिंक पाहण्यास मिळत आहेत. त्यासाठी पत...
29/08/2018

youtube चॅनेल व न्युज पोर्टल सध्या असंख्य होत आहेत. रोज एक चॅनेल आणि वेबपोर्टलच्या लिंक पाहण्यास मिळत आहेत. त्यासाठी पत्रकारांची कमतरता भासत आहे. जाहिरातीद्वारे काम करण्याची संधी दिली जात आहे. मात्र मानधन अथवा पगार देण्यास ते सक्षम नाहीत. जाहिराती गोळा करून कमिशन मिळावा किंवा काम पाहून पगार दिला जाईल असे सांगितले जात आहे. मात्र आमच्या वेबपोर्टल साठी पत्रकार नको आहेत . म्हणजे पगार अथवा मानधनावर काम करणारे नकोत . आपला स्वतःचा व्यवसाय करणारे हवे आहेत. मालक हवे आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात या वेबपोर्टलच्या माध्यमातून एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले जात आहे. प्रत्येक विधानसभेसाठी वेबपोर्टल चालवण्यासाठी मालक संपादक हवे आहेत.
www.vsabha.com
अधिक माहिती साठी.
7709906623
[email protected]

पत्रकारिता हे अन्यायाविरोधात आवाज उठवण्याचे एक महत्वाचे साधन आहे त्याच बरोबर प्रसिद्धीचे एक महत्वाचे माध्यम आहे.  विसभा ...
25/08/2018

पत्रकारिता हे अन्यायाविरोधात आवाज उठवण्याचे एक महत्वाचे साधन आहे त्याच बरोबर प्रसिद्धीचे एक महत्वाचे माध्यम आहे. विसभा डॉट कॉम हा ऑनलाईन न्युज वेबपोर्टल आहे. सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्याचे व यशस्वी लोकांना समाजासमोर आणण्यासाठी आम्ही कार्यरत आहोत .
प्रत्येक महसुली गावात पत्रकार नेमून महाराष्ट्रात 1 नंबर ऑनलाईन वेबपोर्टल करण्यासाठी आमचे उद्दिष्ट्य आहे.
याचाच एक भाग म्हणून आम्ही प्रत्येक विधानसभा मतदार संघातील सर्व व्हाट्सअप्प नंबर आमच्या प्रतिनिधी ना देणार आहोत. जेणेकरून प्रत्येक विधानसभा मतदार संघाचा व्हाट्स अँप ग्रुप असेल व त्यावर आम्ही न्युज प्रसारित करू.
आपणास जर आमच्या सोबत पत्रकार म्हणून काम करायचे असेल तर आजच संपर्क करा. अधिकृत प्रेस कार्ड आपणास दिले जाईल. पत्रकारिता बातम्या व लिखाण कसे करावे याचे प्रशिक्षण आमच्याकडून दिले जाईल.त्यासाठी आपणास मानधन हि मिळेल

आजच सहभागी व्हा.
अधिक माहिती साठी.
7709906623

काही शंका असल्यास
व्हाट्स अँप वर संपर्क साधण्यासाठी
7709906623
www.vsabha.com

Mail
[email protected]

New post added at baramati. vsabha - 'संवाद वारी' प्रदर्शन पाहून भारावले वारकरीबारामती, जिल्‍हा पुणे, दिनांक 13- मी गेल्...
13/07/2018

New post added at baramati. vsabha - 'संवाद वारी' प्रदर्शन पाहून भारावले वारकरीबारामती, जिल्‍हा पुणे, दिनांक 13- मी गेल्‍या 12-13 वर्षांपासून पंढरपूरच्‍या वारीला जात असतो. मी अपंग (दिव्‍यांग) असलो तरी विठुरायाच्‍या दर्शनाच्‍या ओढीने मी अपंगत्‍वावर मात केली आहे. बारामती येथे शासनाच्‍या योजनांची माहिती असलेले प्रदर्शन पाहिल्‍यावर मला खूप आनंद झाला. शेतक-यांनी हे प्रदर्शन पाहून यातील योजनांच्‍या मदतीने आपली आर्थिक प्रगती करुन घ्‍यावी, असे मनमोकळे मनोगत लातूर येथील शिवाजी निवृत्‍ती धुमाळ यांनी व्‍यक्‍त केले. वयाची साठी पार केलेले श्री. धुमाळ हे दिव्‍यांग व्‍यक्‍ती आहेत. आपल्‍या तिनचाकी सायकलवर ते पंढरीच्‍या वारीला जात असतात. दर वर्षी देहू येथून संतश्रेष्‍ठ तुकाराम महाराज पालखी बरोबर ते निघतात. आज पालखीचा मुक्‍काम बारामती येथे असल्‍याने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्‍या 'संवादवारी' या चित्रप्रदर्शनाचे आयोजन येथे करण्‍यात आले होते. बारामती येथे प्रदर्शनाच्‍या जवळ लावलेल्‍या स्‍पीकरवरील जाहिरातींचा आवाज ऐकून ते आले. आपल्‍या तिनचाकी सायकलवर बसूनच त्‍यांनी संपूर्ण प्रदर्शन पाहिले. प्रदर्शन पाहिल्‍यावर त्‍यांनी समाधान व्‍यक्‍त केले. अपंग (दिव्‍यांग) व्‍यक्‍तींसाठी असलेल्‍या योजनांचीही माहिती यामध्‍ये असायला हवी, असेही त्‍यांनी सुचवले. पंढरीच्‍या वारीमध्‍ये शेतकरी मोठ्या संख्‍येने सहभागी होत असल्‍याने शेती आणि ग्रामीण विकासाशी संबंधित योजनांवर प्रदर्शनात भर देण्‍यात आला असल्‍याचे जिल्‍हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांनी सांगितल्‍यावर त्‍यांचे शंकानिरसन होऊन समाधान व्‍यक्‍त केले.
व्‍हॉट्सपचा स्‍टेटस ठेवणार- नीलेश मेमाणे
एम.ए. इकॉनॉमिक्‍स झालेला नीलेश ज्ञानेश्‍वर मेमाणे बँकेतील नोकरी सांभाळून शेती करतो. बारामती येथे माध्‍यमिक शिक्षण झाल्‍यावर त्‍याने पुणे विद्यापीठातून एम.ए.ची पदवी घेतली. बारामती तालुक्‍यातच सुपा येथे त्‍याची वडिलोपार्जित शेतजमीन आहे. त्‍याने प्रदर्शनातील सर्व स्‍टॉलचे मोबाईलवर फोटो काढले तसेच सेल्‍फीही घेतला. याबाबत विचारले असता त्‍याने सांगितले. मी आज या प्रदर्शनाचा स्‍टेटस माझ्या व्‍हॉट्सपवर ठेवणार असून माझ्या 45 व्‍हॉट्सअप ग्रूपवरील मित्रांना, नातेवाईकांना हे प्रदर्शन पहाण्‍यासाठी आग्रह धरणार आहे. तसेच आता काढलेले फोटोही मी माझ्या बाहेरगावच्‍या मित्रांच्‍या ग्रूपवर फॉरवर्ड करणार आहे. प्रदर्शनातील योजनांची माहिती खूपच चांगली आहे. या माहितीचा अधिकाधिक प्रचार-प्रचार व्‍हावा, या हे‍तूनेच मी हे करणार आहे.
वडिलांना योजनांची माहिती सांगणार- वैशाली भिवरकर
बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात एस.वाय.बी.कॉम.मध्‍ये शिकत असलेल्‍या वैशाली राजेंद्र भिवरकर या विद्यार्थिनीने आपल्‍या मैत्रिणीसमवेत प्रदर्शन पाहिले. त्‍यातील काही योजनांबाबत अधिक माहितीही विचारली. ती पवारवाडी येथे राहते. तिचे वडील शेती करतात. प्रदर्शनात शेतीविषयी अधिकाधिक योजना असल्‍याचे पाहून तिने त्‍या योजनांबाबत अधिक माहिती जाणून घेतली. आपण वडिलांना या योजनांविषयी माहिती देणार असल्‍याचेही तिने सांगितले.
शाळा-महाविद्यालयातून योजनांची माहिती सांगणार- सोमनाथ विटकर
सोमनाथ मरगू विटकर हे माजी सैनिक असून 2009 मध्‍ये सेवानिवृत्‍त झाले. बारामती येथे स्‍थायिक असले तरी वेगवेगळ्या शाळा-महाविद्यालयात जाऊन विद्यार्थ्‍यांना व्‍यायामाचे महत्‍त्‍व ते पटवून देत असतात. महाराष्‍ट्र शासन वेगवेगळ्या योजना राबवत असते, त्‍या नागरिकांपर्यंत जाण्‍यासाठी प्रदर्शन हे उत्‍तम माध्‍यम असल्‍याचेही त्‍यांनी सांगितले. लोकांनीही शासकीय योजनांचा लाभ घेतला पाहिजे, असे आवाहन त्‍यांनी केले.

‘संवाद वारी’ प्रदर्शन पाहून भारावले वारकरी Posted on July 13, 2018 at 11:03 am by admin / Breaking News, बातम्या3 / 0 बारामती, जिल्‍हा पुणे, दिनांक 13- मी ग....

New post added at baramati. vsabha - उंडवडी येथील पालखी तळांची  प्रांताधिकारी हेमंत निकम यांचेकडून पाहणी बारामती दि. 12 ...
12/07/2018

New post added at baramati. vsabha - उंडवडी येथील पालखी तळांची प्रांताधिकारी हेमंत निकम यांचेकडून पाहणी बारामती दि. 12 : - यंदा आषाढी वारी निमित्ताने संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे बारामती तालुक्यात आगमन होत आहे.या पालखीचा दिनांक 12 जुलै 2018 रोजी उंडवडी गवळयाची– येथे मुक्काम होणार आहे. त्यानिमित्ताने तेथील पालखी तळांची पाहणी प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी आज केली.
या पाहणी वेळी तहसिलदार हनुमंत पाटील, गटविकास अधिकारी प्रमोद काळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता विश्वास ओव्हाळ, सहायक पोलीस निरिक्षक विकास बडवे, आरोग्य विभाग, अग्निशमन विभाग, महावितरण विभाग, नगरपरिषद विभाग, दूरसंचार व विविध प्रशासकीय विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
या पाहणी मध्ये प्रांताधिकारी निकम यांनी पालखी तळांची पाहणी करून संबंधित गावातील प्रमुख पदाधिकारी आणि ग्रामस्थांशी पालखी मुक्कामाच्या वेळी करावयाच्या सोयी सुविधा, स्वच्छता व घ्यावयाच्या दक्षतेबाबत आरोग्य विभागाच्या अधिका-यांशी सविस्तर चर्चा करून वारकऱ्यांना पालखी तळावर प्रशासनातर्फे देण्यात येणाऱ्या सुविधा बद्दल संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या. यावेळी वारक-यांना पुरविण्यात येणा-या गॅस, केरोसीनच्या उपलब्धतेबाबत तसेच वाटपाबाबत सूचना केल्या. पोलीस विभागाच्या अधिका-यांकडून या काळात करण्यात येणा-या वाहतुक नियोजनाचा आढावा घेतला. वारकऱ्यांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होवू नये याकडे सर्व प्रशासकीय विभागांनी लक्ष द्यावे, असेही ते म्हणाले.

उंडवडी येथील पालखी तळांची प्रांताधिकारी हेमंत निकम यांचेकडून पाहणी Posted on July 12, 2018 at 10:26 am by admin / Breaking News, बातम्या1 / 0 बारामती द.....

16/12/2015

संचालक ांचे आवाहन दिशाभूल करणारे

ोमेश्‍वरनगर : सोमेश्‍वरने सन २0१६-१७ हंगामातील गाळप होणार्‍या खोडवा व निडव्यासाठी १00 रुपयांप्रमाणे अनुदानाचे प्रोत्साहन व सभासदांनी कारखान्याकडे ठेव ठेवण्यासंबंधीचे संचालक मंडळाचे आवाहन दिशाभूल करणारे आहे, असा आरोप शेतकरी कृती समितीचे नेते सतीश काकडे यांनी केला आहे.
काकडे यांनी दिलेल्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे, की सभासदांनी संचालक मंडळावर विश्‍वास ठेवू नये. कारखान्याने ८६0४२ या जातीच्या ऊसलागवडीसाठी सन २0११-१२ व २0१२-१३मध्ये ७५ रुपये प्रतिटनास अनुदान जाहीर केले होते ते दिले का, याचा खुलासा संचालक मंडळाने करावा. तसेच, अध्यक्ष सभासदांना ठेव ठेवण्याचे आवाहन करीत आहेत; मात्र ठेवीसाठी किती व्याजदर देणार, यासाठी अकाउंट विभागात भेटायला सांगतात, याचा अर्थ समजत नाही. व्याजदर का जाहीर केला नाही? संचालक मंडळात व्याजदर जाहीर करण्याची क्षमता नाही का? याचा विचार सर्व सभासदांनी करावा. सन २00९-१0मधील सभासदांच्या ऊसबिलातून कपात केलेल्या ५ वर्षांपूर्वीची ठेवीची मुदत संपलेली आहे. तरीदेखील त्या ठेवी अद्याप सभासदांना परत दिलेल्या नाहीत. त्यामुळे सभासदांचे ६ ते ७ वर्षांचे व्याज बुडाले आहे. त्याचबरोबर, सन २0१३-१४ या हंगामातील थकीत एफआरपी १00 रुपये व त्याचे होणार व्याज त्याचप्रमाणे २१ रुपयांचे सप्टेंबर व ऑक्टोबर २0१५ या दोन महिन्यांचे व्याज अंदाजे ११ कोटी तसेच सन २0१४-१५ची एफआरपीची रक्कम प्रलंबित आहे. कारखान्याने काढलेली एफआरपी २,२५७ रुपये दिली आहे; मात्र त्यावरील एका वर्षाच्या व्याजाची रक्कम अंदाजे ५ कोटी ४0 लाख, असे एकूण १६ कोटी ४0 लाख रुपये देणे सभासदांना दिले गेले नाहीत. सन २0१३-१४ व २0१४-१५ची थकीत एफआरपी दिल्याशिवाय साखरविक्री करू नये, असा न्यायालयाचा आदेश आहे. न्यायालयाचा अवमान करून कारखान्याने मध्यंतरी साखरविक्री केली. याबाबत कृती समितीने दावाही दाखल केला आहे. ठेव मागायची असेल, तर त्यांनी त्यांच्या नेत्यांकडून घ्यावी, असे काकडे यांनी म्हटले आहे.

16/12/2015

बारामती : गर्भलिंग चाचणीबाबत कडक धोरण असताना देखील बारामतीसारख्या विकसित शहरात सरकारी रुग्णालयांच्या तुलनेत खासगी रुग्णालयांमध्ये गर्भपात करण्याची आकडेवारी वाढत आहे. गर्भपातासाठी भले मोठे 'पॅकेज' घेतले जात असल्याची माहिती पुढे आली आहे.
कठोर कायदे करून देखील मुलगाच हवा यासाठी छुप्या पद्धतीने गर्भलिंग निदान केले जात आहे. सरकारी रुग्णालयांमध्ये देखील मागील ५ वर्षांत गर्भपाताची आकडेवारी वाढलेली असतानाच बारामतीसारख्या प्रगत शहरात सरकारी रुग्णालयांच्या तुलनेत अनेक पटींनी गर्भपात केले जात असल्याची नोंद आहे. २0११-१२ ते २0१४-१५ या काळात सिल्व्हर ज्युबिली उपजिल्हा रुग्णालयात ४५७ गर्भपात करण्यात आले. तर या वर्षात आजअखेर ९१ गर्भपात केल्याची नोंद आहे. याच पार्श्‍वभूमीवर सरकारी रुग्णालयांच्या तुलनेत खासगी रुग्णालयांमध्ये गर्भपाताचे प्रमाण अधिक आहे.
विशेषत: गर्भलिंग चाचणीवर बंदी असताना देखील शेजारच्या जिल्ह्यांमध्ये गर्भलिंग तपासणी केली जाते. अनेक गर्भवती महिला त्या भागात जाऊन गर्भलिंग तपासणी करतात. शासकीय रुग्णालयांच्या तुलनेत खासगी रुग्णालयात गर्भपात केले जात असल्यामुळे सर्वाधिक गर्भपात स्त्री गर्भाचेच होत असावेत, अशी शंका व्यक्त केली जात आहे.
या संदर्भात पत्रकारांशी बोलताना सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. मीरा चिंचोलीकर यांनी सांगितले, की शहरात ३४ सोनोग्राफी केंद्रे आहेत. शासकीय परवानगी असलेली २७ गर्भपात केंद्रे आहेत. सरकारी रुग्णालयांच्या तुलनेत खासगीमध्ये अधिक गर्भपात होत असल्याची नोंद आहे. आम्ही सिल्व्हर ज्युबिली उपजिल्हा रुग्णालयाच्या वतीने कार्यशाळा आयोजित करणार आहे.

06/12/2015

बारामतीच्या २१ शाळा होणार डिजिटल

जनजागृती अभियान

पंचायत समितीच्या वतीने ६ डिसेंबर २0१५ ते १४ एप्रिल २0१६ पर्यंत संविधान जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे. यामध्ये सातवी, आठवी व नववीतील विद्यार्थ्यांना संविधान अभ्यास पुस्तिका देण्यात येईल. या अभ्यास पुस्तिकेसंदर्भात या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात येणार आहे. यातून गुणवंत विद्यार्थी निवडण्यात येतील. स्वयंसेवी संस्थेच्या सहभागातून हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती उपसभापती दत्तात्रय लोंढे यांनी दिली. बारामती : बारामती पंचायत समितीच्या वतीने तालुक्यातील २१ शाळांमध्ये 'डिजिटल स्कूल' संकल्पना राबवण्यात येणार आहे. यासाठी लोकसहभागाची गरज आहे. या उपक्रमाला वेगळा निधी नसल्याने लोकवर्गणीमधून ही संकल्पना राबविण्यात येईल, अशी माहिती गटविकास अधिकारी राजनंदिनी भागवत यांनी दिली.
बारामती तालुक्यातील १0९ शाळा आयएसओ प्रमाणित आहेत. या शाळांमध्ये आयएसओप्रमाणे सुविधा दिल्या जातात का, याचे सर्वेक्षण लवकरच करण्यात येईल. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा १२६ने जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थिसंख्या घटली आहे. तर, वीजबिलाअभावी २३ शाळांचे वीजजोड तोडण्यात आले आहेत, अशी माहिती गटशिक्षणाधिकारी नवनाथ वणवे यांनी दिली. पंचायत समितीच्या वतीने तालुक्यातील गावांच्या प्रश्नासंदर्भात आमसभा आयोजित करण्यात येत होत्या. काही वर्षांपासून आमसभा घेण्यात आल्या नाहीत. विकासकामांवर चर्चा होण्याऐवजी गावागावांतील अंतर्गत राजकारणावरच या आमसभांमध्ये वाद होत होते; त्यामुळे या आमसभा बंद पडल्या, असे सभापती करण खलाटे यांनी सांगितले.

06/12/2015

'भूजल सर्वेक्षण'चा बारामतीला फटका

अहवाल चुकीचा : पाणी योजना धोक्यात
बारामती : बारामती तालुक्याच्या जिरायती भागात पाणीटंचाई मोठय़ा प्रमाणात आहे. २0१२-१३मध्ये महसूल विभागाने केलेल्या भूजल सर्वेक्षणाचा अहवाल चुकीचा आहे. या चुकीच्या अहवालामुळे जिरायती भागातील पाणी योजना धोक्यात आल्या आहेत. त्यामुळे जिरायती भागातील भूजल परिस्थितीचे फेरसर्वेक्षण करण्याची मागणी पंचायत समितीचे सभापती करण खलाटे यांनी केली.
बारामती पंचायत समितीमध्ये पार पडलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही मागणी केली. या वेळी पंचायत समितीतील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. जिरायती भागातील गावांना भूजल सर्वेक्षण विभागाने अंशत: शोषित, असा दर्जा दिला आहे. त्यामुळे येथील शेतकर्‍यांना वैयक्तिक लाभाच्या योजना मिळत नाहीत. या भागातील २६ गावांमध्ये विहीर न खोदण्याविषयीचे मत भूजल सर्वेक्षण विभागाने नोंदवले आहे. जिरायती भागात मोठय़ा प्रमाणावर सध्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. पाणीटंचाईची समस्या लक्षात घेता, शासनाने टँकर मंजुरीचे अधिकार तहसीलदारांना द्यावेत, अशी मागणीही या वेळी करण्यात आली.
भविष्यकाळात टंचाई तीव्रता वाढेल
पुढील काळात टंचाईची तीव्रता वाढेल. सध्या येथील ५ गावांना आणि ३४ वाड्यावस्त्यांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. यामध्ये काळखैरवाडी, पानसरेवाडी, बाबुर्डी, शेरेवाडी, कारखेल, देऊळगाव रसाळ या गावांचा समावेश होत आहे. तर, कोळोली आणि खराडेवाडी या गावांचे प्रस्ताव आले आहेत.

30/11/2015

बारामती जिरायती भाग : उंडवडी सुपेची अवस्था; हक्काचे हंगाम हातचे गेले

साली पडलेल्या दुष्काळात उंडवडीच्या ग्रामस्थांनी 'लाल गव्हा'च्या बदल्यात शासनाकडून पाझर तलाव बांधून घेतले. उंडवडी सुपे येथील सर्वच पाझर तलाव कोरडे आहेत. ■ सध्या गावात चार दिवसाआड पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत आहे. पुढील महिनाभर पुरेल एवढाच पाणीसाठा विहिरींमध्ये शिल्लक आहे.
■ उंडवडी कडेपठार येथे जानाई-शिरासाई योजनेतून शिसरुफळ तलावात पाणी येते. त्यावर येथील शेती अवलंबून आहे. मात्र मागील चार वर्षांपासून या योजनेचे पाणी तलावात आले नाही.
■ त्यामुळे योजना असूनही त्याचा फायदा गावाला होत नाही, अशी व्यथा ग्रामस्थांनी मांडली.
■ दुधाचा व्यवसाय करणारे शेतकरी चार्‍याच्या भरमसाट वाढलेल्या किमतीमुळे व्यवसायापासून दूर झाले. पाझर तलाव, परंतु एकाही तलावात पाण्याचा टिपूस नाही.. पाऊसच पडला नाही तर पाणी कुठून येणार.. साली पडलेल्या दुष्काळात उंडवडीच्या ग्रामस्थांनी 'लाल गव्हा'च्या बदल्यात शासनाकडून पाझर तलाव बांधून घेतले. ■ टँकरच्या प्रस्तावावर निर्णय नाही
पुढील महिन्यात पाण्याचे मोठय़ा प्रमाणात दुर्भिक्ष जाणवणार आहे. त्यामुळे उंडवडी कडेपठार येथील ग्रामस्थांनी तहसीलदारांकडे टँकरचा प्रस्ताव पाठवला आहे. मात्र त्यावर अद्याप निर्णय झाला नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. ■ लिंबाच्या बागा सुकल्या मुरमाड जमीन, पाण्याची कमतरता या कारणांमुळे उंडवडी कडेपठार येथील शेतकर्‍याने शेतीतज्ज्ञांच्या सल्ल्याने लिंबाची बाग लावली. मात्र यंदा पाऊस न झाल्याने ऐन बहारात लिंबाची बाग सुकून गेली आहे. बारामती : ''गावाच्या भोवती १0 पाझर तलाव, परंतु एकाही तलावात पाण्याचा टिपूस नाही.. पाऊसच पडला नाही तर पाणी कुठून येणार.. चार वर्षे झाली शेतात डोलणारं पीक पाहिलं नाही.. की जनावराला पोटभर चारा नाही.. पाण्यासाठी वणवण भटकावं लागतंय.. आता विहिरीला पाणी हाय पण ते महिनाभर पुरल.. पण त्यापुढं लय अवघड..'' अशी कैफियत बारामती तालुक्यातील उंडवडी सुपे आणि उंडवडी कडेपठार येथील ग्रामस्थांनी 'लोकमत'शी बोलताना मांडली.
आयएसओ नामांकन मिळालेलं उंडवडी सुपे हे गाव परंतु मागील चार वर्षांपासून पडणार्‍या दुष्काळामुळे गावाची रया गेल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. १९७२ साली पडलेल्या दुष्काळात उंडवडीच्या ग्रामस्थांनी 'लाल गव्हा'च्या बदल्यात शासनाकडून पाझर तलाव बांधून घेतले.
त्यामुळे शेत असूनही शेतकर्‍यांवर शहराच्या ठिकाणी मजुरी करण्याची वेळ आली. माळेगाव, सांगवी, पाटस येथून तीन ते साडेतीन हजार रुपये गुंठय़ाने जनावरांच्या चार्‍यासाठी उसाची खरेदी येथील शेतकरी करीत आहेत. दुधाचा व्यवसाय करणारे शेतकरी चार्‍याच्या भरमसाट वाढलेल्या किमतीमुळे व्यवसायापासून दूर झाले. कारखाने बंद झाल्यानंतर ऊस मिळणे मुश्कील होणार आहे. त्यामुळे चाराछावण्या उभारण्याची मागणी येथील शेतकर्‍यांनी केली आहे. ज्यांच्या विहिरींना काही प्रमाणात पाणी शिल्लक आहे अशा शेतकर्‍यांचाच दूध व्यवसाय टिकला आहे. मात्र जनावरांच्या घसरलेल्या किमती, दुधाचे दहा रुपयांनी पडलेले दर, चार्‍याचा अभाव, पशुखाद्याच्या वाढलेल्या किमती, यामुळे दूध व्यवसाय तोट्यात गेला आहे. (वार्ताहर

Address

Baramati
Pune
413102

Alerts

Be the first to know and let us send you an email when Baramati Vidhan Sabha posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share