Wajir News

Wajir News Day to day activities from Pune & Maharashtra ! Interesting facts & knowledge & Entertaining content all around
Jay Maharashtra !

Note :- Content we are posting is only & purely for entertainment purpose.

*मनवा आणि श्लोकच्या केमिस्ट्रीची धमाल झलक**‘‘मना’चे श्लोक’चा भन्नाट टीझर प्रदर्शित*‘‘मना’चे श्लोक’ या चित्रपटाचा जबरदस्त...
09/09/2025

*मनवा आणि श्लोकच्या केमिस्ट्रीची धमाल झलक*

*‘‘मना’चे श्लोक’चा भन्नाट टीझर प्रदर्शित*

‘‘मना’चे श्लोक’ या चित्रपटाचा जबरदस्त टीझर नुकताच प्रेक्षकांसमोर आला आहे. काही दिवसांपूर्वी पोस्टर प्रदर्शित झाले होते आणि तेव्हापासून प्रेक्षक या चित्रपटाची वाट पाहात होते. आता टीझर येताच चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत.

टीझरमध्ये आजच्या तरुण पिढीची नाती, त्यांचे विचार दाखवले आहेत. मनवा आणि श्लोक ही दोन वेगवेगळी पात्रं विशेष आकर्षण ठरत आहेत. मनवा ही धाडसी आणि बिनधास्त मुलगी आहे, तर श्लोक हा शांत आणि समंजस मुलगा आहे. त्यांच्यातील संवाद चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढवणारे आहेत. हे दोन भिन्न स्वभावाचे लोक जेव्हा एकत्र येतात, तेव्हा त्यांच्या प्रेमकथेत काय घडतं, हे जाणून घेण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत.

चित्रपटात मृण्मयी देशपांडे, राहुल पेठे, पुष्कराज चिरपुटकर, सुव्रत जोशी, सिद्धार्थ मेनन, हरीश दुधाडे आणि करण परब असे कलाकार आहेत.

दिग्दर्शिका मृण्मयी देशपांडे म्हणते, “हा माझ्यासाठी खास चित्रपट आहे. माझ्या मनाजवळचाच हा चित्रपट आहे, असं म्हटलं तरी चालेल. मनवा आणि श्लोकचा हा प्रवास प्रेक्षकांच्या मनाला नक्कीच आवडेल.”

प्रस्तुतकर्ते नितीन वैद्य म्हणतात, “हा चित्रपट प्रेक्षकांना एक वेगळा अनुभव देईल. मुळात हा एक कौटुंबिक चित्रपट असल्याने यातील व्यक्तिरेखा आपल्याच घरातील वाटतील.’’

निर्माते संजय दावरा म्हणाले, “या चित्रपट प्रेक्षकांना मनोरंजनच करेल, कथा, कलाकार, दिग्दर्शन अशा सगळ्याच गोष्टी खूप छान जुळून आल्या आहेत.’’

‘मना’चे श्लोक’ हा चित्रपट १० ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. याचे लेखन आणि दिग्दर्शन मृण्मयी देशपांडे यांनी केले असून निर्माते श्रेयश जाधव आणि संजय दावरा आहेत. हा चित्रपट स्टारलाईट बॉक्स थिएटर्स आणि नितीन वैद्य प्रॉडक्शन्स यांच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येणार आहे.

9 सप्टेंबर  #दिनविशेषभारताच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी चले जाव आंदोलनात झालेल्या गोळीबारात 16 व्या वर्षी आपल्या प्राणाची आ...
09/09/2025

9 सप्टेंबर #दिनविशेष
भारताच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी चले जाव आंदोलनात झालेल्या गोळीबारात 16 व्या वर्षी आपल्या प्राणाची आहूति देणारे हुतात्मा शिरीषकुमार यांचा स्मृतीदिन

*कला आणि भक्तीचा संगम!**’दशावतार’ मधील हृदयस्पर्शी  ‘रंगपूजा’ ही भैरवी रसिकांना अर्पण**गुरु ठाकूर, अजय गोगावले आणि ए. व्...
09/09/2025

*कला आणि भक्तीचा संगम!*
*’दशावतार’ मधील हृदयस्पर्शी ‘रंगपूजा’ ही भैरवी रसिकांना अर्पण*
*गुरु ठाकूर, अजय गोगावले आणि ए. व्ही. प्रफुल्लचंद्र हे भन्नाट त्रिकूट एकत्र !*

मराठी सिनेसृष्टीतील सर्वाधिक चर्चेत असलेला झी स्टुडिओज प्रस्तुत ‘दशावतार’ या बहुप्रतीक्षित चित्रपटाचे वेध प्रेक्षकांना लागले आहेत. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशातील अनमोल ठेवा असलेल्या दशावतार परंपरेला मोठ्या पडद्यावर भव्यतेने मांडणाऱ्या या चित्रपटातील हृदयस्पर्शी ‘रंगपूजा’ ही भैरवी नुकतीच रसिकांच्या भेटीस आली आहे.

या गाण्यातून एका निस्सीम कलावंताची कलेवरील नितांत श्रद्धा, भक्ती आणि समर्पणाची भावना मांडली गेली आहे. हे गीत म्हणजे कलावंताच्या रंगभूमीवरील कलाप्रवासाला भावपूर्ण अभिवादन आहे. विशेष म्हणजे गीतकार गुरु ठाकूर, गायक अजय गोगावले आणि संगीतकार ए. व्ही. प्रफुल्लचंद्र हे त्रिकुट प्रथमच या गाण्यात एकत्र आलं असून हे गाणं या चित्रपटाचं, नायक बाबुली मेस्त्रीच्या आयुष्याचं मर्म मांडतं.
गुरु ठाकूर यांची अर्थपूर्ण शब्दरचना , त्याला अजय गोगावले यांचे आर्त स्वर यामुळे गाण्याला अनोखा आयाम मिळाला आहे. तर ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांच्या सुमधुर सुरावटींनी गाण्यात खास रंगत आणली आहे.

गायक अजय गोगावले म्हणाले, ‘’दशावतार नाटकांमध्ये जितके नांदीला महत्व आहे तितकेच ‘रंगपूजा’ ह्या भैरवी भैरवीला! भैरवी झाल्याशिवाय नाटकातील कुठलाही कलावंत आपल्या चेहऱ्यावरील रंग उतरवत नाही. म्हणूनच ‘दशावतार‘ चित्रपटातील ही ‘रंगपूजा’ ही भैरवीसुद्धा तितकीच महत्त्वपूर्ण आहे. गुरु ठाकूरच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेली ही भैरवी प्रत्येक कलाकाराचं मर्म आहे. ही भैरवी मलाही खूप रीलेट करुन गेली. गुरु ठाकूरचे शब्द नेहमीच भावोत्कटता आणतात. आणि ए. व्ही. प्रफुल्लचंद्रने त्याला संगीताचं उत्तम कोंदण केलंय. त्यामुळे ती गाताना वेगळं समाधान मला मिळालं. या भैरवी मुळे मीसुद्धा या चित्रपटाचा भाग होऊ शकलो, याचा मला खरोखर आनंद आहे.”

संगीतकार ए. व्ही. प्रफुल्लचंद्र म्हणाले, “अजय गोगावले यांच्यासोबत काम करायची माझी खूप आंतरिक इच्छा होती आणि ‘दशावतार’मुळे ती पूर्ण झाली. हा माझ्या संगीतप्रवासातील सर्वात आनंदाचा क्षण आहे.”

गीतकार गुरु ठाकूर म्हणाले, “कलावंताच्या आयुष्यावरचा हा सिनेमा आहे. कुठलीही कलाकृती तुम्ही करता, असं म्हणण्यापेक्षा, त्यासाठी तुमची निवड होणे, हे तुमच्या भाग्योदयात लिहिलेलं असतं, असं मी मानतो. या चित्रपटाचे संवाद, गाणी दिग्दर्शक सुबोध खानोलकरने माझ्याकडून लिहून घेतली आणि एकेक योग जुळत गेले. गीतकाराने फक्त शब्द लिहिणे पुरेसे नसते, तर ते शब्द आणि त्यातील भावना रसिकांपर्यंत पोहोचवणारा आवाज महत्त्वाचा असतो. आणि माझ्या गाण्यांना अजयचा आवाज लाभतो तेव्हा मी आश्वस्त होतो. अजय गोगावलेने आजवर मी लिहिलेली कित्येक गाणी अजरामर केली आहेत. रेकॉर्डिंग स्टुडिओत अजय ही भैरवी गात होता तेव्हा मी आणि सुबोध अक्षरशः हळवे झालो होतो.

झी स्टुडिओज प्रस्तुत, ओशन फिल्म कंपनी आणि ओशन आर्ट हाऊस निर्मित ‘दशावतार’चे लेखन, दिग्दर्शन सुबोध खानोलकर यांनी केले आहे. दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, सिद्धार्थ मेनन, अभिनय बेर्डे, प्रियदर्शिनी इंदलकर, विजय केंकरे, रवी काळे यांसारखे दिग्गज कलाकार यात भूमिका साकारत आहेत. येत्या १२ सप्टेंबरला ‘दशावतार’ जगभर मोठ्या दिमाखात प्रदर्शित होणार असून, अजय गोगावलेंच्या आवाजातील ‘रंगपूजा’ ही भैरवी हा या चित्रपटाचा कळसाध्याय आहे!

कोतुळेश्वर देवस्थानकोतुळ हे गाव अहिल्यानगर जिल्ह्यात अकोले तालुकात मुळा नदी किनारी आहे. ह्या गावचे पूर्वीचे नाव कुंतलपूर...
08/09/2025

कोतुळेश्वर देवस्थान

कोतुळ हे गाव अहिल्यानगर जिल्ह्यात अकोले तालुकात मुळा नदी किनारी आहे. ह्या गावचे पूर्वीचे नाव कुंतलपूर होते, जी चंद्रहास राजाची राजधानी होती. येथे कोतुळेश्वर नावाचे महादेवाचे मंदिर आहे.

श्री क्षेत्र कोतुळेश्वर देवस्थान हे कोतूळ गावाचे ग्रामदैवत आहे. अकोले शहरापासून १९ कि.मी. अंतरावर निसर्गाच्या सान्निध्यात, वनराईत वसलेले आणि ऐतिहासिक व पौराणिक परंपरा असेलेले हे एक देवस्थान आहे.

व्यास लिखित महाभारतातील "जैमिनी अश्वमेध" या ग्रंथात कोतुळेश्वर तथा कुन्तलेश्वर देवस्थानाचा उल्लेख आढळतो. भागवत भक्त चंद्रहास्य या दानशूर राजाची कोतूल किंवा कुंतलपूर नगरी पुढे शब्द अपभ्रंशाने कोतूळ तथा कोतुळेश्वर या नावाने ओळखली जाऊ लागली. येथेच पांडवांचा विश्वविजयी अश्व अडविला गेल्याची कथा आहे. ऐतिहासिक काळात पेशव्यांच्या सेवेत असणा-या साडेतीन शहाण्यांपैकी एक विठ्ठल सुंदर परशुरामी याच गावातले.

महाशिवरात्रीला येथे मोठी यात्रा भरते. तीन ते चार लाख भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. विविध धार्मिक विधी, उत्सव, हरिनाम सप्ताह असे उपक्रम दरवर्षी देवस्थान कमिटीद्वारे आयोजित केले जातात.

अकोले तालुक्यातील कोतूळ येथे अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण अशी लवणस्तंभाची भौगोलिक रचना दिसून येते. एका ठिकाणी छोटीशी गुहा बनून तिच्यात लवणस्तंभ तयार झालेले दिसले... स्थानिक लोक याला लवणस्तंभ म्हणत असले तरी भूगर्भात पाण्याच्या संचयन कार्यामुळं तयार झालेला हा भूआकार म्हणावा लागेल. भूगर्भतज्ज्ञाच् या मते दगडातून झिरपलेले 'कॅल्शियम काबरेनेटयुक्त' क्षार विरघळतात आणि ते तळाशी खडकांच्या पृष्ठभागावर जमा होतात. त्यांच्या संचयन क्रियेतून स्तंभासारखे आकार बनू लागतात. जाणकारांच्या मते, अशी भूरूप वैशिष्टये ग्रेट ब्रिटन, युगोस्लोव्हाकिय 1, अंदमान बेटांवर आणि भारतात उत्तर प्रदेशात काही ठिकाणी आहेत.

भारताने ८ वर्षांनंतर हॉकी आशिया कप जिंकला आणि गतविजेत्या दक्षिण कोरियाला ४-१ ने हरवले!
08/09/2025

भारताने ८ वर्षांनंतर हॉकी आशिया कप जिंकला आणि गतविजेत्या दक्षिण कोरियाला ४-१ ने हरवले!

07/09/2025

DJ पुढे आम्हाला झुकावं लागलं...!

आँस्ट्रेलिया मध्ये स्थानिक विरूद्ध,स्थलांतरित संघर्ष पेटला.तेथिल नागरीकांनी " आम्हाला आमचे White Nation परत द्या अशी माग...
07/09/2025

आँस्ट्रेलिया मध्ये स्थानिक विरूद्ध,स्थलांतरित संघर्ष पेटला.
तेथिल नागरीकांनी " आम्हाला आमचे White Nation परत द्या अशी मागणी केली आहे. अनेक ठिकाणी भारतीय दूकानांवर व भारतीय लोकावर देखील हल्ले करण्यात आले..व ईथून निघून जा अशा घोषणा देण्यात आल्या. गेल्या दोन तीन वर्षात भारतीय विद्यार्थ्यांच्या हत्या झाल्याच्या बातम्या आपण पाहिल्याच असतील.
थोडी थोडकी लोक बाहेरुन येवून राहिली तर कोणाला त्रास नसतोच....पण जेव्हा ही संख्या खूप वाढते व त्यामूळे रोजगार जात असतील,त्रास वाढत असेल तेव्हा संघर्ष निर्माण होतो.

हीच गोष्ट आपण मुंबई,पुणे,ठाणे येथे रोजच्या जिवनात अनुभवत असतो...मग तो मराठी विरूद्ध गुजराती,मारवाडी असेल किंवा मराठी विरूद्ध भैय्या असेल.

भारतीय क्रिकेट संघात एकेकाळी कपील देव,मनोज प्रभाकर,अजित आगरकर,आर.पी.सिंग,जवागल श्रीनाथ,बालाजी,जहिर खान,ईरफान पठान तर अला...
06/09/2025

भारतीय क्रिकेट संघात एकेकाळी कपील देव,मनोज प्रभाकर,अजित आगरकर,आर.पी.सिंग,जवागल श्रीनाथ,बालाजी,जहिर खान,ईरफान पठान तर अलाकडीलच श्रीशांत असे सरस गोलंदाज होते . त्यांच्या गोलंदाजीचा वेगही सरासरी १४०- ते १५० किमी प्रतितास असा होता. समोरचा क्रिकेट संघ यांच्या वेगवान मा-याने तसेच स्विंग गोलंदाजीने हैराण असायचा.
पण गेली ६-७ वर्ष भारतीय संघाला एकही चांगला वेगवान गोलंदाज मिळालेला नाही. आताही जे वेगवान {?} गोलंदाज आहेत त्यांच्या गोलंदाजीचा वेग ताशी १२० ते १३५ किमीने गोलंदाजी करत आहेत, ना स्विंग ना कटर,ना बाऊंसर ,ना याॅर्कर गोलंदाजीत धारच नसल्याने ईतर संघातील शेवटची फळीसुद्धा सहजपणे षटकार,चौकार मारताना आपण पाहत आहोत.
सर्व क्रिकेटप्रेमींना हाच प्रश्न आहे की १५० कोटी जनतेमधून भारतीय क्रिकेट संघाला २ चांगले वेगवान गोलंदाज मिळू नयेत ??
आणि वेगवान गोलंदाज गेले कुठे ??

श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती!
06/09/2025

श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती!

पुण्यातील मानाचा पहिला गणपती श्री.कसबा गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ!    #पुणेगणपतीविसर्जन
06/09/2025

पुण्यातील मानाचा पहिला गणपती श्री.कसबा गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ! #पुणेगणपतीविसर्जन

ज्या गोष्टीमूळे समाजातील अनेकांना त्रास होतो,ती गोष्ट गणपती बाप्पाला तरी आवडेल का ?
06/09/2025

ज्या गोष्टीमूळे समाजातील अनेकांना त्रास होतो,ती गोष्ट गणपती बाप्पाला तरी आवडेल का ?

04/09/2025

Address

Bajirao Road
Pune
411030

Alerts

Be the first to know and let us send you an email when Wajir News posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Wajir News:

Share