29/07/2025
- रेव्ह पार्टी...? पोलिसांनी बदनामी आणि राजकीय दबाव टाकण्यासाठी केलेली कृती आहे...
पोलिसांनी केलेल्या या कारवाईवर एकनाथ खडसे यांनी आक्षेप घेतला आहे. यावर त्यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली व पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न व संशय उपस्थित केले आहे.एकनाथ खडसे म्हणाले, एकनाथ खडसे यांचे जावई यांना अटक करण्यात आली असल्याचे आपल्याला माहीत आहे. मुळात पोलिसांच्या विषयी माझ्या मनात काही प्रश्न आहेत, ते तुमच्या माध्यमातून विचारतो. पहिली गोष्ट तर अशी आहे की 7 जणांची मिळून ज्या ठिकाणी संगीत नाही, ज्या ठिकाणी गोंधळ नाही, डान्स नाही काही नाही. एका घरात 7 जण बसले आहेत आणि त्यांची पार्टी चालली आहे. तर रेव्ह पार्टीची व्याख्या काय आहे नेमकी? याला जर रेव्ह पार्टी म्हणत असाल तर महाराष्ट्रात, देशात कोणत्याही घरात असे 5-7 जण बसले तर त्याला रेव्ह पार्टीच म्हणावी लागेल. त्यामुळे पोलिसांना मला हे विचारायचे आहे की रेव्ह पार्टीची व्याख्या काय आहे? असा सवाल खडसे यांनी उपस्थित केला.प्रांजल खेवलकर यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल नसताना, गुन्हा दाखल असल्याचे सांगण्यात आले. त्यांच्यावर आयुष्यात आत्तापर्यंत एकही गुन्हा नाही, ते गुन्हेगारी प्रवृत्तीचे नाही. वैद्यकीय क्षेत्रातील नावाजलेले नाव आहे. पोलिसांनी खोटे दाखवणे की यांच्यावर गुन्हे दाखल आहेत आणि त्यांना पहिल्या क्रमांकावर दाखवणे हे चुकीचे आहे. वास्तविक पोलिसांनी सांगितले की अमली पदार्थ सापडला 2.7 ग्राम काहीतरी, तो जो सापडला तो एका महिलेच्या पर्समध्ये सापडला, हे आपल्याला त्यांच्याच चित्रीकरणातून दिसत आहे. तर मग ज्या महिलेकडे अमली पदार्थ सापडला, तिला पहिल्या क्रमांकाचे आरोपी करायचे असते. तसे न करता एकनाथ खडसे यांच्या जावईला तसेच कुटुंबाला बदनाम करण्यासाठी पोलिसांनी केलेले हे कृत्य असल्याचा आरोप खडसे यांनी केला.एकनाथ खडसे म्हणाले, कालच अल्कोहोलचा रीपोर्ट आला, मग ड्रग्सचा का नाही आला अजून? मला इथे संशय घ्यायला जागा आहे की ड्रग्सच्या संदर्भात छेडखानी करण्याचा प्रयत्न केला जात असावा. कारण पोऱ्शे कारचे प्रकरण ताजे आहे, त्या ठिकाणी संपूर्ण ब्लड सॅम्पल बदलण्याचा प्रकार घडला होता. अजूनही डॉक्टर जेलमध्ये आहेत. माझ्या जावयाने मला सांगितले की मी आयुष्यात कधीही ड्रग्स घेतले नाहीत. आताही नाही घेतले. मेडिकल रीपोर्ट येईल तेव्हा ते समजेलच आपल्याला. मला या ठिकाणी संशय घ्यायला जागा आहे.
पुढे बोलताना एकनाथ खडसे म्हणाले, दूसरा भाग असा आहे की पोलिसांनी ज्या ठिकाणी कारवाई केली, त्या कारवाईचे व्हिडिओ मीडियाच्या माध्यमातून जगासमोर आणले. पोलिसांना असा कोणता अधिकार आहे की खासगी आयुष्यातील हे व्हिडिओ सगळ्या समोर दाखवावे? पोलिसांनी हे केवळ बदनामीसाठी केलेले कृत्य आहे. पोलिसांना असा कोणताच अधिकार नाही, महिलांचे देखील चेहरे दाखवण्याचा अधिकार तर मुळीच नाही. यात केवळ बदनामीचे सूत्र पोलिसांनी ठेवले होते, असा आरोप खडसे यांनी केला आहे. तसेच या सगळ्यात डॉ. खेवलकरांना पहिल्या नंबरचे आरोपी करण्याचे कारण काय? असा सवालही खडसे यांनी उपस्थित केला.
प्रांजल खेवलकर यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल नसताना, गुन्हा दाखल असल्याचे सांगण्यात आले. त्यांच्यावर आयुष्यात आत्तापर्यंत एकही गुन्हा नाही, ते गुन्हेगारी प्रवृत्तीचे नाही. वैद्यकीय क्षेत्रातील नावाजलेले नाव आहे. पोलिसांनी खोटे दाखवणे की यांच्यावर गुन्हे दाखल आहेत आणि त्यांना पहिल्या क्रमांकावर दाखवणे हे चुकीचे आहे. वास्तविक पोलिसांनी सांगितले की अमली पदार्थ सापडला 2.7 ग्राम काहीतरी, तो जो सापडला तो एका महिलेच्या पर्समध्ये सापडला, हे आपल्याला त्यांच्याच चित्रीकरणातून दिसत आहे. तर मग ज्या महिलेकडे अमली पदार्थ सापडला, तिला पहिल्या क्रमांकाचे आरोपी करायचे असते. तसे न करता एकनाथ खडसे यांच्या जावईला तसेच कुटुंबाला बदनाम करण्यासाठी पोलिसांनी केलेले हे कृत्य असल्याचा आरोप खडसे यांनी केला.
एकनाथ खडसे म्हणाले, कालच अल्कोहोलचा रीपोर्ट आला, मग ड्रग्सचा का नाही आला अजून? मला इथे संशय घ्यायला जागा आहे की ड्रग्सच्या संदर्भात छेडखानी करण्याचा प्रयत्न केला जात असावा. कारण पोऱ्शे कारचे प्रकरण ताजे आहे, त्या ठिकाणी संपूर्ण ब्लड सॅम्पल बदलण्याचा प्रकार घडला होता. अजूनही डॉक्टर जेलमध्ये आहेत. माझ्या जावयाने मला सांगितले की मी आयुष्यात कधीही ड्रग्स घेतले नाहीत. आताही नाही घेतले. मेडिकल रीपोर्ट येईल तेव्हा ते समजेलच आपल्याला. मला या ठिकाणी संशय घ्यायला जागा आहे.
महत्त्वाची गोष्ट अशी आहे की माझ्या जावयाने मला सांगितले की माझ्यावर पाळत ठेवण्यात आली. ज्या ज्या ठिकाणी जात होतो, त्या-त्या ठिकाणी पाळत ठेवण्यात आली. सिविल ड्रेसमधील पोलिस पाळत ठेवत होते. त्याचे व्हिडिओ पण आहेत. पोलिसांना पाळत ठेवण्याचे काय कारण आहे. ज्या हॉटेलमध्ये हे गेले होते, पोलिस रात्री तिथे आले. हॉटेलच्या पार्किंगमध्ये सीसीटीव्ही आहेत. जे पोलिस तिकडे होते तेच पोलिस इथे दिसले. एवढी तत्परता पोलिसांनी प्रफुल लोढा जो हनीट्रॅपमध्ये अडकला आहे, बलात्कारमध्ये अडकला आहे, ज्यांनी गिरीश महाजन यांच्यावर आरोप केले आहेत, या संदर्भात पोलिस यंत्रणा किंवा सरकार पुढे येऊन माहिती का देत नाही? असा सवाल एकनाथ खडसे यांनी केला आहे.एकनाथ खडसे बदनाम झाला पाहिजे हे यांचे प्लॅन असल्याचे दिसते. वारंवार खडसेंचे जावई म्हणत बदनामी करत आहेत. ते दोषी असतील तर नक्कीच कारवाई करावी. पोलिसांनी व्हिडिओ काढले लगेच मीडियावर आले. फोटो काढले लगेच मीडियाकडे आले. लॅपटॉप जप्त केला, मोबाइल जप्त केले. त्यातले आमचे कौटुंबिक फोटो बाहेर कसे काय जातात? कोणी अधिकार दिला खासगी आयुष्यात डोकावण्याचा? पोलिसांच्या मागे कोणीतरी आहे. पोलिसांच्या मागे सूत्रधार कोण? असा प्रश्न खडसे यांनी विचारला आहे. याचा सखोल तपास केला जायला पाहिजे, अशी मागणी खडसे यांनी केली आहे.
पुणे | एकनाथ खडसे यांची पत्रकार परिषद