Maratha Magazine

  • Home
  • Maratha Magazine

Maratha Magazine Maratha Magazine is a Digital News & Magazine web portal which is Created for everyone who want to c

04/03/2025

औरंगजेबाचं गुणगान गाणाऱ्या अबू आझमींना नवनीत राणांनी ठणकावलं !

आरोपींना फाशी झालीच पाहीजे
04/03/2025

आरोपींना फाशी झालीच पाहीजे

सजा होण्या साठी आजुन किती वाट पहावी हद्द पार केली ह्या लोकांनी आणखीन ही वाट कसली पाहताय
04/03/2025

सजा होण्या साठी आजुन किती वाट पहावी हद्द पार केली ह्या लोकांनी आणखीन ही वाट कसली पाहताय

04/03/2025

क्रुरतेची हद्द पार नराधमाना शिक्षा कधी गुन्हा सिध्द झाल्यावर ही वाट कसली पहिली जात आहे

जय शिवराय
19/02/2025

जय शिवराय

25/01/2025

तब्बल 30 लाख लाडक्या बहिणी अपात्र !

रायगड विकास प्राधिकरणाच्या वतीने दुर्गराज रायगडावर हिरकणी बुरुज, श्रीगोंदा तलाव, आणि नाणेदरवाजा येथे संवर्धनाचे व पुनर्ब...
25/01/2025

रायगड विकास प्राधिकरणाच्या वतीने दुर्गराज रायगडावर हिरकणी बुरुज, श्रीगोंदा तलाव, आणि नाणेदरवाजा येथे संवर्धनाचे व पुनर्बांधणी कामे सुरू आहेत या ठिकाणी काल भेट देऊन पाहणी केली. हिरकणी बुरुज: संवर्धनाच्या कामादरम्यान येथे एक पाण्याचे प्राचीन टाके आढळले आहे. या टाक्याचा पूर्ण गाळ काढण्यात आला असून, सध्या बुरुजाच्या मजबुतीकरणाचे काम सुरू आहे. श्रीगोंदा तलाव: गडाच्या श्रीगोंदा टोकावरील तलावाचे गाळ काढण्याचे आणि गळती रोखण्याचे काम प्रगतीपथावर आहे. येत्या पावसाळ्यात हा तलाव पूर्ण क्षमतेने भरला जाईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. नाणेदरवाजा: गडाच्या मुख्य प्रवेशद्वार असलेल्या नाणेदरवाजाच्या पुनर्बांधणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. दारासाठी लागणारे मोठे दगड तयार करून त्यांना बसवण्याचे काम सुरू असून लवकरच हे काम पूर्ण होईल. महत्त्वाची सूचना: गडावर मोठ्या संख्येने पर्यटक व शिवभक्त येत आहेत. मात्र, ज्या ठिकाणी संवर्धन, जतन, आणि पुनर्बांधणीचे काम सुरू आहे, त्या ठिकाणी जाणे टाळावे. रायगड दुर्गसंवर्धन शिवरायांचा_गड ऐतिहासिकवारसा संवर्धनकार्य #रायगड #दुर्गसंवर्धन #शिवरायांचा_गड #ऐतिहासिकवारसा #संवर्धनकार्य

सातारच्या श्रीमंत छत्रपती संभाजीमहाराज वैदयकिय महाविदयालयासाठी केंद्रशासनाकडून विशेष सहाय्य म्हणून  पहिल्या टप्यातील 100...
25/01/2025

सातारच्या श्रीमंत छत्रपती संभाजीमहाराज वैदयकिय महाविदयालयासाठी केंद्रशासनाकडून विशेष सहाय्य म्हणून पहिल्या टप्यातील 100 कोटी रुपये प्रदान करण्यात आले आहेत. सातारच्या वैदयकिय महाविदयालयासाठी कोणत्याही परिस्थितीत निधी कमी पडू दिला जाणार नाहीच तथापि राज्यातच नव्हे तर देशामध्ये एक आदर्श वैदयकिय महाविदयालय म्हणून छत्रपती संभाजीमहाराज वैदयकिय महाविदयालय लवकरच नावारुपाला आणण्याचे संर्वकष प्रयत्न केले जातील.

सातारच्या वैदयकिय महाविदयालयासाठी अनेकांचे योगदान मिळाले असले तरी वैदयकिय महाविदयालय होण्यासाठी सर्वप्रथम 500 खाटांच्या निकषाची पूर्तता करण्यासाठी स्व.क्रांतिवीर नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात 100 खाटांचे स्वतंत्र स्त्री रुग्णालय मंजूर करुन घेण्यात आले, त्यानंतर लागणा-या विस्तीर्ण जागेचा प्रश्न राज्यशासनाशी चर्चा करुन, सोडवण्यात आल्यावर आता कृष्णानगर येथील विस्तीर्ण जागेवर वैदयकिय महाविदयालयाची उभारणी सुरु आहे. या वैदयकिय महाविदयालयात 100 विदयार्थ्यांच्या प्रवेशाची प्रक्रीया सुरु करुन, आज महाविदयालयाचे 4 थे वर्ष सुरु आहे. येत्या दोन वर्षात याठिकाणी पोस्टग्रॅज्युएशनची सुविधासुध्दा निर्माण होणार आहे. दरम्यानच्या काळात या महाविदयालयाला स्वराज्याचे दुसरे छत्रपती श्रीमंत संभाजी महाराज यांचेच नाव देण्याचा प्रस्ताव शासनाकडून मंजूर करुन घेण्यात आला. या वैदयकिय महाविदयालयामुळे सातारच्या अर्थकारणाला बळ मिळण्याबरोबरच छत्रपती संभाजी महाराज यांचे नावामुळे सर्वाना नवीन प्रेरणा देखील सातत्याने मिळणार आहे.

वैदयकिय महाविदयालयाचे सुमारे 50 टक्के काम पूर्ण होत आलेले आहे. राज्यशासनही अंदाजपत्रकीय तरतुदीनुसार निधी उपलब्ध करुन देत आहे. तथापि वैदयकिय महाविदयालयाला विशेष सहाय्य म्हणून केंद्राकडूनही जरुर तो पाठपुरावा करुन आज रोजी 100 कोटी रुपये प्राप्त करुन घेण्यात आले असून, सदरची रक्कम महाविदयालयाकडे कालच जमा झाली आहे. केंद्राकडून एकाच वेळी इतका मोठा निधी प्राप्त होण्याची ही कदाचित पहिलीच घटना आहे.

या सहाय्य निधी मधुन महाविदयालयाची इमारत, निवास वसतीगृह, इत्यादी कामांसाठी उपयोगात येणार आहेत, आणखी दुस-या टप्यातील भरीव निधी देखिल येत्या सहा महिन्यामध्ये मिळवण्यात येणार आहे .

वैदयकिय महाविदयालयाचे उभारणीचे कामात असाधारण विलंब होवू नये म्हणून आमचे सातत्याने लक्ष आहे. वैदयकिय महाविदयालयाचे बांधकाम जलद पूर्ण होण्याच्या दृष्टीने विशेष प्रयत्न केले जाणार आहेत.

ज्योती मंगल जाधव यांच्या नावे सोलापूर जिल्ह्यात 4 सातबारे ज्योती जाधव ह्या वाल्मिक कराडच्या दुसऱ्या पत्नी ही प्रॉपर्टी क...
18/01/2025

ज्योती मंगल जाधव यांच्या नावे सोलापूर जिल्ह्यात 4 सातबारे ज्योती जाधव ह्या वाल्मिक कराडच्या दुसऱ्या पत्नी ही प्रॉपर्टी कोणाची याला कोणी पैसे दिले याची चौकशी व्हावी !

16/01/2025

Hi everyone! 🌟 You can support me by sending Stars – they help me earn money to keep making content that you love.

Whenever you see the Stars icon, you can send me Stars.

श्री शंभु छत्रपती राज्याभिषेक सोहळा
15/01/2025

श्री शंभु छत्रपती राज्याभिषेक सोहळा

2017 साली बेंगळुरू येथील एका रेस्टॉरंटमध्ये मित्रांसोबत जेवण करत असताना, सिटीगृपमध्ये बँकर असलेल्या अजय गोपिनाथ यांना सल...
12/01/2025

2017 साली बेंगळुरू येथील एका रेस्टॉरंटमध्ये मित्रांसोबत जेवण करत असताना, सिटीगृपमध्ये बँकर असलेल्या अजय गोपिनाथ यांना सलाड प्लेटवर काही मायक्रोग्रीन्स दिसले.

त्यांना मायक्रोग्रीन्स बद्दल कुतूहल निर्माण झाले आणि त्यांनी यावर रिसर्च सुरू केले. मायक्रोग्रीन्स म्हणजे भाज्या, धान्ये आणि औषधी वनस्पतींची पहिली पालवी.

अजय यांनी 2020 साली, वयाच्या 48 व्या वर्षी, बँकिंगच्या नोकरीला राजीनामा दिला आणि कोचीला परत जाऊन मायक्रोग्रीन्सची शेती सुरू केली. “Grow Greens” नावाने कंपनी रजिस्टर्ड करून एर्नाकुलम येथे ऑफिस सुरू केले.

अजय यांनी आपले 5 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट करत सेंद्रिय बियाणे, ट्रे आणि कोकोपिट खरेदी केले. सुरुवातीला त्यांनी 64 स्वे. फूट खोलीत एक रॅक ठेवून मायक्रोग्रीन्स उगवायला सुरुवात केली.

आज ते रोज 7-8 किलो मायक्रोग्रीन्स उगवतात. ते दर महिना 5 लाख रुपये कमावत असून त्यांच्या बिझनेसची वार्षिक उलाढाल 40 लाख रुपये आहे, आणि यावर्षी त्यांचे 60 लाख रुपये उत्पन्नाचे ध्येय आहे.

अजय यांच्या बिझनेस मॉडेलमध्ये, मायक्रोग्रीन्सच्या फ्रँचायझीमध्ये 30 पेक्षा जास्त युनिट्स तयार केले आहेत. ते फ्रँचायझी सिस्टीममध्ये ट्रेनिंग आणि साहित्य पुरवतात.

त्यांच्या मायक्रोग्रीन्सची विक्री रेस्टॉरंट्स, हॉटेल्स, योग केंद्रे आणि हॉस्पिटल्समध्ये केली जाते. मायक्रोग्रीन्सचे प्रोडक्शन विविध प्रकारच्या भाज्या, कडधान्ये आणि औषधी वनस्पतींपासून होते, ज्यामुळे त्यात अधिक पोषणतत्त्व मिळते.

अजय यांच्या मते, मायक्रोग्रीन्स फक्त सलाडमध्येच नाही, तर रोटी, भाकरी, सूप, इडली, डोसा आणि भाजीमध्ये देखील वापरता येतात. मायक्रोग्रीन्स फक्त 5 स्टार हॉटेल्समध्येच नाही तर सामान्य माणसांच्या आहारात देखील सामील होणे आवश्यक आहे.

Address


Alerts

Be the first to know and let us send you an email when Maratha Magazine posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Maratha Magazine:

  • Want your business to be the top-listed Media Company?

Share