Pune Headline News

Pune Headline News Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Pune Headline News, Media/News Company, JM Road, Pune.

आमचे जीवलग मित्र बंधुतुल्य दैनिक विद्यासंस्कार चे संपादक आणि श्रेष्ठ समाजसेवक आनंदी उत्साही व्यक्तिमत्त्व सन्माननीय हेमं...
01/09/2024

आमचे जीवलग मित्र बंधुतुल्य दैनिक विद्यासंस्कार चे संपादक आणि श्रेष्ठ समाजसेवक आनंदी उत्साही व्यक्तिमत्त्व सन्माननीय हेमंतजी बळवंत कुळकर्णी यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. श्रावी मिडिया अँड फिल्म प्रॉडक्शन्स तर्फे भावपुर्ण आदरांजली...
😭😭😭😭 Hemant Kulkarni

22/03/2023

सिद्धी देवा मीडिया प्रोडक्शन की ओर से आंतरराष्ट्रीय महिला दिन के अवसर पर पूने मे आयोजित नारी शक्ती पुरस्कार और सदाबहार गीतों के कार्यक्रम श्रोताओंका उस्फुर्त प्रतिसाद
Pune Headline News
https://youtu.be/ojtF0mFmX6I
पुने - सिद्धी देवा मीडिया प्रोडक्शन की ओर से आंतरराष्ट्रीय महिला दिन के अवसर पर नारी शक्ती पुरस्कार सदाबहार गीतों के कार्यक्रम का आयोजन पुने के पत्रकार भवन मे हाल ही मे किया गया था|इस अवसर पर मुख्य अतिथी के रूप मे उद्योजक और संगीत प्रेमी जोहेर चूनावला और व्हॉइस ऑफ मुकेश पपिश ललगुणकर उपस्थित थे|इस कार्यक्रम की संकल्पना और आयोजन सिद्धी देवा मीडिया प्रोडक्शन के संचालक विष्णू देव और निर्माती साधना पंडित इनकी थी|इस कार्यक्रम मे समाजसेविका उषा कांबले, स्कूल व्हॅन ड्रायव्हर दिना शहा, गायिका और नृत्यांगना गीतांजली कोसंदर इन महिलाओं को नारी शक्ती पुरस्कार से मान्यवरों के हाथों से सन्मानित किया गया|इस कार्यक्रम के अवसर पर सिद्धी देवा मीडिया प्रोडक्शन की संचालक निर्माती साधना पंडित, गायक मोहन नारंग , दैनिक पुण्यनगरी के मार्केटिंग हेड राहुल लिमये गायक -गायिका उपस्थित थे|इस कार्यक्रम के मीडिया पार्टनर दैनिक पुण्यनगरी और संगीत सेवा सहारा अखबार इंदौर थे|इस कार्यक्रम मे गायक शिशिर वर्मा, शिवाजी जक्का, सुरेश काले, भारती ललगुणकर, कल्पना जगताप, राजश्री दासानी, कल्पना मंडलेचा, चारुलता बेलखडे, अरुणा सुदर्शन,अपर्णा सोले, स्मिता महाबल इन गायक गायिकाओने मी सदाबहार गीत प्रस्तुत कीये|इस कार्यक्रम मे मन क्यू बहका रे बहका रे, ढोलकीच्या तालावर, संग प्रीत लगाई सजना, आखो ही आखो मे, जीवन के हर मोड पर, वल्लव रे नाखवा, ये मेरा दिल यार का गीतोंपे गाई गाई कावणे गीत प्रस्तुत किये और श्रोताओने इन गीतों पे उस्फुर्त होकर नृत्य किए |
Pune Headline News

10/03/2023

श्री. शंकर महाराज समाधी मठास ग्रॅव्हिटी ग्रुप तर्फे कार्डीॲक रुग्णवाहिका प्रदान
YouTube Link ↙️
https://youtu.be/dPqmKsiXYio

पुणे - धनकवडी येथील श्री सद्गुरू संतवर्य योगीराज शंकर महाराज समाधी ट्रस्टला पुण्यातील युवा उद्योजक मिहिर कुलकर्णी यांच्या ग्रॅव्हिटी ग्रुप तर्फे व्हेंटिलेटर सहित अन्य अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणांनी सुसज्ज अशी कार्डीॲक रुग्णवाहिका दान करण्यात आली. पुण्याचे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे पूजन करून आणि श्रीफळ वाढवून लोकार्पण करण्यात आले. मठातील भाविक तसेच आसपासच्या परिसरातील नागरिकांना रुग्णवाहिकेचा लाभ घेता येणार आहे. वेळेत उपचार मिळून रुग्णाचे प्राण वाचावे या साठी उपलब्ध केलेली कार्डीॲक रुग्णवाहिका रुग्णांना संजीवनी ठरेल असा विश्वास यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला. या प्रसंगी मिहीर कुलकर्णी, पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक धर्मादाय आयुक्त राहुल चव्हाण, रूबी हॉल क्लिनीकचे डॉ. संदिप करमरकर, नगरसेवक राजेंद्र शिळीमकर आणि विश्वस्त मंडळ प्रताप भोसले, सुरेंद्र वाईकर, सतीश कोकाटे, राजाभाऊ सुर्यवंशी, निलेश मालपाणी आदी मान्यवर उपस्थित होते.
Pune Headline News

09/03/2023

सावित्रीबाई फुले विद्यापीठा अंतर्गत रिसर्च पार्क फाउंडेशन यांच्या वतीने प्रकर्ष एम. एस. एम. ई. अँड वूमन इंटरप्रीनर्स कॉन्क्लेव परिषद उत्साहात संपन्न
https://youtu.be/0szVpnKDCjc
Pune Headline News

पुणे- 'प्रकर्ष 'आयोजित सावित्रीबाई फुले विद्यापीठा अंतर्गत रिसर्च पार्क फाउंडेशन यांच्या वतीने एमएसएमई अँड वुमन इंटरप्रेनर कॉनक्लेवचे पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील छत्रपति शिवाजी महाराज सभागृह येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अंजना गोस्वामी यांना जीवनगौरव पुरस्कार भारतीय विकास संस्थेचे चेअरमन डॉ. योगेश दुबे व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रिसर्च पार्क फाउंडेशन चे सीईओ डॉ. अरविंद शाळीग्राम याच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
यावेळी इंटरनॅशनल वूमन नेटवर्किंग ऑर्गनायझेशनच्या संस्थापिका सुचित्रा चॅटर्जी , प्रा.. वी. एस. सोनावने,अस्पायर नॉलेज अँड स्कील चे संस्थापक डॉ. संजय गांधी , व्ही 3 एम टेक्नोलॉजी च्या संस्थापिका वासंती मुळजकर , ब्रेनक्सचे सीईओ संजू उन्नी, नीलम खंडाळे यावेळी उपस्थित होते.

एक दिवसीय कार्यशाळेमध्ये आलेल्या 150 इंटरपप्रेनर याना मोटिवेशन करण्यासाठी चार स्पीकर बोलावण्यात आले होते. यावेळी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रा साठी किनेटिक कम्युनिकेशन लिमिटेडचे दीपक शिकारपुरकर , कोफाउंडर ऑफ औदुटेक कंपनी वेणु साबळे ,केसरी टूर्स एंड ट्रैवल्स संचालक झेलम चुबेल,देसरा फाउंडेशनच्या सीईओ प्रज्ञा गोडबोले यांनी चर्चासत्रा मधे भाग घेतला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुचित्रा चॅटर्जी यांनी केले तर महेश पवार यांनी आभार मानले.
Pune Headline News

09/03/2023

जागृती सेवा संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त स्नेह मेळावा संपन्न
YouTube Link
https://youtu.be/bCV2CKQePDk

08/10/2022

भाजप एज्युकेशन सेल पुणे तर्फे शिक्षक दिन उत्साहात

पुणे -शिक्षक दिनानिमित्त भाजप शिक्षण सेल, पुणे यांच्या वतीने टिळक रस्त्यावरील पदमजी सभागृहात महानगर पालिका आणि खाजगी अशा ९० शाळांमधील ११० शिक्षक आणि ७० मुख्याध्यापकांना नुकतेच नीव पुरस्कारांने सन्मानित करण्यात आले.
शिक्षकांचे कठोर परिश्रम, वचनबद्धता आणि योगदानाचा गौरव करणे हा या पुरस्कारांचा उद्देश होता. या कार्यक्रमाला भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, भाजप आमदार मानसी देशपांडे, भाजप शहर सचिव प्रशांत हरसुले आणि रेडिओ सिटी चे आरजे तरुण व पोलिस उपायुक्त बापू विठ्ठल बांगर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन भाजप एज्युकेशन सेलच्या अध्यक्षा सीमा तंवर यांनी केले होते. कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक एनार्क तर सहयोगी प्रायोजक ब्रेनस्टॉर्म इंटरनॅशनल हे होते. पाठशाला प्रीस्कूल, एक्स क्यू व्हिडिओ लॅब्स, सेपियन किड हे या कार्यक्रमासाठी सपोर्ट पार्टनर या नात्याने सहभागी झाले होते. कार्यक्रमात सुंदरजी ग्लोबल शाळेतील विशेष मुलांनी नृत्य सादर केले.

कार्यक्रमाला लकी सुराणा, मसरत तवावाला, विंदी पुजारी, पूजा पुरोहित, रोमल सुराणा, शर्वरी गोवंडे, कविता कृष्णमूर्ती, हर्षिता शर्मा, अबोली रुईकर, मोनिका भोजकर आणि शालिनी सराफ यांनी सहकार्य केले. उर्मी साळवे यांनी सूत्र संचालन केले.
https://youtu.be/w67idM20rro
Pune Headline News

19/09/2022

खासदार सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून व यशवंतराव चव्हाण सेंटर च्या माध्यमातून कुटुंब समस्या: समुपदेशन, कायदेशीर मदत व मार्गदर्शक केंद्राचे उद्‌घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर महिला अध्यक्षा मृणालिनी वाणी, खडकवासला विधानसभा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अध्यक्ष काकासाहेब चव्हाण, खडकवासला विधानसभा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ग्रामीण अध्यक्ष त्रिंबक अण्णा मोकाशी, पोलिस उपनिरीक्षक अस्मिता लाड, यांच्या हस्ते नऱ्हे येथे राजेश्वरी पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयात पार पडले.

या वेळी नऱ्हेचे मा. आदर्श सरपंच पोपाटराव खेडेकर, मा. सभापती हवेली तालुका प्रभावती भूमकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर उपाध्यक्ष सुनिता डांगे, धायरी गाव मा. सरपंच सुरेखा दमिस्टे,गौरी सोनवणे, वकील योगीराज स्वामी, खडकवासला विधानसभा ग्रामीण अध्यक्षा पुनम मते, मा. नऱ्हे ग्रामपंचायत सदस्य सुप्रिया भूमकर, मा. नऱ्हे ग्रामपंचायत सदस्य सुरेखा पवार, युवा कार्यकर्ते दशरथ मणेरे, तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते.
Pune Headline News

17/09/2022

भारतीय छात्र संसदेच्या माध्यमातून कार्यरत असणारे युवक भविष्यात विधानसभा किवा लोकसभेत प्रतिनिधित्व करू शकतील .या युवकांनी आधुनिक भारत निर्मितीमध्ये महत्वपूर्ण योगदान द्यावे अशी अपेक्षा लोकसभेच्या माजी अध्यक्षा डॉ. मीरा कुमार यांनी व्यक्त केली.
https://youtu.be/AevwFSkMGuY
Pune Headline News

🌹💐🌼🙏🏻🌹💐🌼
पुणे हेडलाईन न्युज

20/08/2022

केंद्र सरकारच्या कामगार कायद्याच्या नवीन धोरणामुळे कामगारांचे संरक्षण धोक्यात आले आहे. येत्या जानेवारी महिन्यात हा कायदा महाराष्ट्रात लागू झाला तर कोणत्याही कामगार किंवा नोकरदाराला कायमस्वरूपीची नोकरी मिळणार नाही. शिवाय अनेक कामगारांच्या नोकऱ्या जातील. हा नियम केवळ या कामागारांपूरता मर्यादीत नसून पुढे याचे परिणाम इतर खाजगी व सरकारी क्षेत्रावर देखील होणार आहेत.म्हणून राज्यशासन व विरोधी पक्षाने या कायद्याची परिणामकरकता लक्षात घेवून हा कामगार कायदा राज्यात लागू करू नये, अशी मागणी राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंतभाऊ भोसले यांनी केली आहे.
https://youtu.be/MlQ7StHO2Ic

14/08/2022

विश्व साहित्य सम्राट अण्णा भाऊ साठे यांच्या १०२ व्या जयंती निमित्ताने अण्णा भाऊ साठे फाउंडेशनतर्फे पुण्यातील सारस बाग येथील पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
https://youtu.be/UcJac1I9GZI
Pune Headline News

20/05/2022

चोर जेल से कैसे भागा... एक बार जरुर देखना l

Address

JM Road
Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pune Headline News posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Pune Headline News:

Share