पुस्तकमित्र

पुस्तकमित्र तुमच्या आवडीची सर्व प्रकारची पुस्तकं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करू 🙏

'माणसं कशी जोडावी ?'किंमत -250/-* हे पुस्तक तुम्हाला मित्र म्हणून मदत करेल. डेल कार्नेगी यांनी सांगितलेली तंत्रे वेळोवेळ...
01/08/2025

'माणसं कशी जोडावी ?'
किंमत -250/-

* हे पुस्तक तुम्हाला मित्र म्हणून मदत करेल. डेल कार्नेगी यांनी सांगितलेली तंत्रे वेळोवेळी वापरून तुम्ही तुमच्या क्षेत्रात सर्वांना आवडणारी व्यक्ती व्हाल, याची निश्चित खात्री आहे.
* सामाजिक, राजकारण, व्यावसायिक, नोकरी याचसोबत इतर प्रत्येक क्षेत्रात नेतृत्व करु इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी हे पुस्तक उपयुक्त ठरेल.

पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी संपर्क किंवा व्हॉट्सअँप करा -9527925003

चिंता, थकवा आणि अस्थिरतेवर उपाय शोधणाऱ्या प्रत्येकासाठी प्रेरणादायी पुस्तक!तणावाच्या काळात समाधान देणारं पुस्तक म्हणजे च...
23/07/2025

चिंता, थकवा आणि अस्थिरतेवर उपाय शोधणाऱ्या प्रत्येकासाठी प्रेरणादायी पुस्तक!
तणावाच्या काळात समाधान देणारं पुस्तक म्हणजे चिंता सोडा आनंदाने जगा. हे पुस्तक नक्कीच तुमचे विचार बदलण्यास मदत करू शकते!
लेखक : डेल कार्नेगी

पुस्तक ऑर्डर करण्यासाठी खालील व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करावा.
9527925003

पुस्तक : हाऊ टू स्टॉप वरिंग अँड स्टार्ट लिव्हिंग (मराठी भाषा)
किंमत : 300 रुपये

२०व्या शतकातील सर्वात प्रभावशाली व्यक्ती म्हणून टाइम मॅगझिनने गौरवलेला चे ग्वेरा आजही क्रांतीचे सर्वोच्च प्रतीक मानला जा...
07/07/2025

२०व्या शतकातील सर्वात प्रभावशाली व्यक्ती म्हणून टाइम मॅगझिनने गौरवलेला चे ग्वेरा आजही क्रांतीचे सर्वोच्च प्रतीक मानला जातो. त्याच्या क्रांतिकारी आणि वैयक्तिक आयुष्याचा सखोल वेध घेणारे हे पुस्तक, मराठी आणि इंग्रजी साहित्यात आजवर न उलगडलेल्या अनेक महत्त्वपूर्ण घटनांचा शोध घेतं.
आयुष्य “लार्जर दॅन लाईफ” जगण्याचा संदेश देणाऱ्या चे ग्वेराच्या क्रांतिकारी लढ्याचा आणि त्याच्या अर्थपूर्ण जीवनाचा अभ्यास करण्यासाठी आवर्जून वाचावं असं हे पुस्तक !

पुस्तकाचे नाव : चे ग्वेरा
लेखक : प्रणित पवार
प्रकाशक : न्यू ईरा पब्लिशिंग हाऊस , पुणे
किंमत : 300 रु
संपर्क : 95279 25003

पुस्तक घरपोच ऑर्डर करण्यासाठी संपर्क: 95279 25003
02/07/2025

पुस्तक घरपोच ऑर्डर करण्यासाठी संपर्क: 95279 25003

एक सामान्य व्यक्ती ते बॉलीवूडचा बादशाह होण्यापर्यंतचा प्रवास... दिल्लीच्या लहानश्या घरातून  झालेला प्रवास मुंबईच्या मन्न...
21/06/2025

एक सामान्य व्यक्ती ते बॉलीवूडचा बादशाह होण्यापर्यंतचा प्रवास...

दिल्लीच्या लहानश्या घरातून झालेला प्रवास मुंबईच्या मन्नतपर्यंत पोहोचतो. 'DDLJ' सारख्या अजरामर चित्रपटांपासून ते 'पठाण' सारख्या नव्या यशापर्यंतचा प्रवास जितका रोमांचकारी आहे तितकाच तो प्रेरणादायी आहे.

बॉलीवूडचा बादशाह... शाहरुख खान आता आपल्या मराठी भाषेत ...

पुस्तक घरोच ऑर्डर करण्यासाठी संपर्क : 9527925003

बॉलीवूडचा बादशाह... शाहरुख आता आपल्या भाषेत... शाहरुख खान यांच्या जीवनावर आधारित पहिल्यांदाच मराठीत पुस्तकपुस्तक ऑर्डर स...
19/06/2025

बॉलीवूडचा बादशाह... शाहरुख आता आपल्या भाषेत...

शाहरुख खान यांच्या जीवनावर आधारित पहिल्यांदाच मराठीत पुस्तक

पुस्तक ऑर्डर साठी संपर्क : 095279 25003

👑

पुस्तक ऑर्डर करण्यासाठी संपर्क: 9527925003
17/06/2025

पुस्तक ऑर्डर करण्यासाठी संपर्क: 9527925003

पुस्तक : नरकातला स्वर्ग लेखक : संजय राऊत किंमत : ३५० रुपये प्रकाशक : न्यू इरा पब्लिशिंग हाऊस पुणे पुस्तक ऑर्डर करण्यासाठ...
09/06/2025

पुस्तक : नरकातला स्वर्ग
लेखक : संजय राऊत
किंमत : ३५० रुपये
प्रकाशक : न्यू इरा पब्लिशिंग हाऊस पुणे

पुस्तक ऑर्डर करण्यासाठी संपर्क: 9527925003

२०१४ पासून भारतीय राजकारणाचा एक आगळावेगळा चेहरा सर्वसामान्य माणसाला पाहण्यास मिळाला. या चेहऱ्यावर ओढलेला बुरखा फाडण्याचा...
07/06/2025

२०१४ पासून भारतीय राजकारणाचा एक आगळावेगळा चेहरा सर्वसामान्य माणसाला पाहण्यास मिळाला. या चेहऱ्यावर ओढलेला बुरखा फाडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची मुस्कटदाबी केली गेली. तरीही काही जण गप्प बसले नाहीत. ते व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवतच राहिले. त्यांच्यामागे ईडीचा ससेमिरा लावून त्यांना तुरुंगात डांबले गेले. तरीही ते गप्प राहिले नाहीत. शासन त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांभोवती घट्ट फास आवळत राहिले. हे जुलमी फास आणि बेड्या तोडून 'संजय राऊत' यांनी आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार केला... ती अभिव्यक्ती म्हणजे 'नरकातला स्वर्ग.'

पुस्तक : नरकातला स्वर्ग
लेखक : संजय राऊत
किंमत : ३५० रुपये
प्रकाशक : न्यू इरा पब्लिशिंग हाऊस पुणे

पुस्तक ऑर्डर करण्यासाठी संपर्क: 9527925003

१००० रुपयांची पुस्तकं, आता फक्त ९०० मध्ये घरपोच.मेलुहा ते भारत (लेखक: डॉ. नितीन हांडे)किंमत: ३०० रुपये------------राजा ब...
19/04/2025

१००० रुपयांची पुस्तकं, आता फक्त ९०० मध्ये घरपोच.

मेलुहा ते भारत (लेखक: डॉ. नितीन हांडे)
किंमत: ३०० रुपये
------------
राजा बळी आपलाच आहे (लेखिका: भिख्खुनी विजया मैत्रीय)
किंमत: ३०० रुपये
-----------
वजीर शहाजी भोसले (लेखक : प्रा. डॉ. आनंद पाटील)
किंमत: ४०० रुपये

पुस्तक घरपोच ऑर्डर करण्यासाठी संपर्क: 95279 25003

चुकीच ऑपरेशन आणि हरवलेली दिशा... गॅलेक्सी हॉस्पिटल आणि डॉक्टर  शैलेश पुणतांबेकर विरुद्ध माझा लढा.....आज अनेक हॉस्पिटल्स ...
10/04/2025

चुकीच ऑपरेशन आणि हरवलेली दिशा... गॅलेक्सी हॉस्पिटल आणि डॉक्टर शैलेश पुणतांबेकर विरुद्ध माझा लढा.....
आज अनेक हॉस्पिटल्स आणि डॉक्टरांसाठी "पेशंट" म्हणजे फक्त एक केस असतो – एक नंबर, एक फाईल... आणि सगळ्यात वाईट म्हणजे पैसे कमावण्याचं साधन. वैद्यकीय व्यवसाय हे "सेवा क्षेत्र" आहे, हे ते विसरून गेले आहेत.
2023 मध्ये मला कॅन्सर डिटेक्ट झाला आणि मी पुण्यातील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये डॉ. शैलेश पुणतांबेकर यांच्याकडे उपचार सुरू केले. सुरुवातीला वाटलं की सगळं ठीक होईल, पण जे अनुभवायला मिळालं, ते आयुष्यभर विसरणं शक्य नाही.
चुकीचं ऑपरेशन, हाताचे बळी
ऑपरेशन दरम्यान डॉक्टरांच्या चुकीमुळे माझ्या हाताची C5, C6 शीर डॅमेज झाली... यामुळे माझ्या हाताची हालचाल जवळपास दीड वर्ष बंद होती. आजही माझा हात पूर्णपणे बरा झालेला नाही. इतकं मोठं शारीरिक नुकसान आणि त्यानंतर डॉक्टरांनी एकदाही मला भेटण्याची तसदी घेतली नाही. चार-चार तास हॉस्पिटलमध्ये मी त्यांची वाट बघितली, तरीही डॉक्टर मला भेटले नाहीत. 25 टाक्यांचं ऑपरेशन झाल्यानंतर जेव्हा मी ड्रेसिंगसाठी हॉस्पिटलमध्ये गेले, तेव्हा तीन-चार तास मला बसवून ठेवलं गेलं. ऑपरेशन एक तासात झालं, पण ड्रेसिंगला तीन तास लागले.
"छोटं ऑपरेशन आहे" – पण खरं काय?
कॅन्सरची स्टेज समजण्यासाठी काही आवश्यक टेस्ट्स असतात. माझं PET स्कॅन झालं, ज्यामधून कळतं की तुमचा कॅन्सर शरीरात किती पसरला आहे.
रिपोर्ट बघून डॉ. शैलेश पुणतांबेकर सतत म्हणत राहिले, “काही नाही, छोटं ऑपरेशन आहे.”
"ऑपरेशन लवकर करा, मला दोन-तीन दिवसांत फॉरेनला जायचं आहे."
ऑपरेशननंतर मला कळलं की 27 गाठी काढण्यात आल्या होत्या.
पूर्ण ट्रीटमेंट चुकीची झाली हे जेव्हा कळालं, तेव्हा मी दुसऱ्या डॉक्टरचं ओपिनियन घेतलं. त्यांना PET स्कॅन रिपोर्ट दाखवल्यानंतर त्यांनी सांगितलं की माझ्या हार्ट मध्ये अजून दोन गाठी आहेत. हा एवढा मोठा शॉक होता, की शैलेश पुणतांबेकर डॉक्टरांनी हे काहीच सांगितलं नव्हतं.
कॅन्सर" हा शब्द ऐकूनच आपण हादरतो, मग माझी मानसिक अवस्था तेव्हा कशी असेल याची कल्पना करा. पण सगळ्यात मोठा आघात म्हणजे माझी संपूर्ण ट्रीटमेंट चुकीची झाली होती.
यामुळे ट्रीटमेंटचा फ्लो बिघडला आणि त्याचे गंभीर परिणाम मला भोगावे लागले. माझा कॅन्सर अग्रेसिव्ह होता म्हणून मला वीस रेडिएशन घ्यावे लागले.. ज्यामुळे माझ्या संपूर्ण स्तनावरील आणि काखे खालची स्किन निघाली. त्यातून कंटिन्यू रक्त येत होत.. जखम काखेत असल्याकारणाने हात जर टच झाला तर, रक्ताच्या पिचकारी येत होत्या....मी काय त्रास सहन केला तो मलाच माझा माहित आहे.. . दोन महिने मी कपडे घालू शकले नाही.. आणि तब्बल आठ महिने मी शांत झोपूही शकले नाही — आणि हे सगळं कॅन्सरमुळे नव्हे, तर चुकीच्या ट्रीटमेंटमुळे."
सेवेची नुसती नाटकं... आणि खऱ्या आयुष्याचं नुकसान
माझ्यासारख्या अनेक रुग्णांना मी भेटले आहे, जे शैलेश पुणतांबेकर डॉक्टरांकडे गेले होते.
एक महिला, ज्यांना माऊथ कॅन्सर होता – ऑपरेशनदरम्यान टाके घालताना डॉक्टरांच्या चुकीमुळे त्यांची जीभ सुद्धा शिवली गेली. या चुकीमुळे त्या महिलेला ७ वर्षं जेवता आलं नाही! असंख्य लोकांना मी भेटले ज्यांची ट्रीटमेंट शैलेश पुणतांबेकर यांनी चुकवलेली आहे...
ही काय सेवा आहे? की वैद्यकीय हिंसाचार?
रुग्ण म्हणजे माणूस, केवळ केस नाही
ही गोष्ट एका व्यक्तीपुरती मर्यादित नाही. आज अनेक हॉस्पिटल्स गॅलेक्सी हॉस्पिटल, दीनानाथ मंगेशकर, आणि इतरही – अशा अनुभवांचं केंद्र बनले आहेत. डॉक्टरांचं काम केवळ नोकरी नाही, ती एक जबाबदारी आहे, ज्यात एखाद्याचं आयुष्य पणाला लागलेलं असतं.
"अशा डॉक्टरांना बॅन करायला हवा, तरच त्यांना धडा मिळेल आणि अशा चुकीच्या उपचारांचा बंदोबस्त होईल."
"त्या वेदना, शैलेश पुणतांबेकर यांनी दिलेली चुकीची ट्रीटमेंट, आणि ती निराशा मी पचवली… पण मनात एकच विचार होता — जे मी सहन केलं, ते इतर कुणालाच सहन करावं लागू नये. म्हणूनच मी माझ्या कॅन्सरच्या प्रवासासोबतच कॅन्सर अवेअरनेससाठी काम सुरू केलं… लोकांच्या मनातून कॅन्सरची भीती घालवण्यासाठी, आणि या आजाराविषयी योग्य माहिती पोहोचवण्यासाठी."
("जर कोणाला वाटत असेल की मी केवळ कोणावर आरोप करत आहे, तर कृपया गूगलवर ‘Galaxy Hospital Shailesh Puntambekar’ असं सर्च करून माझी दोन पानांची पोस्ट नक्की वाचा. ती पोस्ट एका वैयक्तिक अनुभवाची साक्ष आहे – कोणत्याही आरोपांची नव्हे, तर वास्तवाची.")

आशा नेगी हिरेमठ
लेखिका "ब्युटी ऑफ लाईफ"
(द डायरी ऑफ कॅन्सर सर्व्हायवर)

पुस्तक घरपोच मिळवण्यासाठी संपर्क: 95279 25003

Address

Mitra Mandal Chowk, Mitra Mandal Colony
Pune
411009

Telephone

+919527925003

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when पुस्तकमित्र posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to पुस्तकमित्र:

Share