भारतीय विचार साधना पुणे प्रकाशन

  • Home
  • India
  • Pune
  • भारतीय विचार साधना पुणे प्रकाशन

भारतीय विचार साधना पुणे प्रकाशन राष्ट्रीय विचारांचे सामाजिक व वैचारि

'राष्ट्रहित सर्वतोपरि' या विचाराने सन १९७९पासून कार्यरत 'भारतीय विचार साधना प्रकाशन, पुणे' हे साहित्य गृह जनामनांत रुजले आहे. तब्बल ३७ वर्षे राष्ट्रीय विचार आणि महापुरुषांचे कार्य पुस्तकांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचवण्याचे कार्य अविश्रांतपणे करणा-या या संस्थेने bhavisa.bookbharati.com या संकेतस्थळाद्वारे ऑनलाइन माध्यमातून पुस्तक विक्री ही नवी सुविधा सुरू केली आहे. भाविसा प्रकाशित इ-बुकदेखील या

संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
संस्थेने प्रकाशित केलेली ५०० हून अधिक पुस्तके 'विचारयात्रा' या वाहनामार्फत महाराष्ट्राच्या खेडोपाडी प्रतिनिधींच्या साहाय्याने उपलब्ध होतात.

जागतिक योग दिन २०२५राष्ट्रहितासाठी सशक्त मन आणि शरीर "शक्ती अंतर्मनाची" या तत्त्वज्ञानावर विश्वास ठेवणारी भाविसा, आजच्या...
21/06/2025

जागतिक योग दिन २०२५

राष्ट्रहितासाठी सशक्त मन आणि शरीर "शक्ती अंतर्मनाची" या तत्त्वज्ञानावर विश्वास ठेवणारी भाविसा, आजच्या जागतिक योग दिनी
योगाच्या माध्यमातून व्यक्तिशक्ती आणि राष्ट्रशक्ती यांचा एक सुंदर सेतू घडविण्याचा संकल्प करते.

योग हे केवळ शरीरसौष्ठवाचे साधन नाही –
ते आहे मनाची स्थिरता, आत्मिक उन्नती, आणि राष्ट्रनिर्मितीचा आधार.

भाविसा गेली ५० वर्षे समाजमनात राष्ट्रीय विचार रुजवणाऱ्या साहित्याची निर्मिती करत आहे. आज, आपण योगाच्या साधनेद्वारे अधिक सशक्त, जागरूक आणि कृतिशील समाज घडवूया.


सर्वे भवंतु सुखिनः
सर्वे सन्तु निरामयाः।
सर्वे भद्राणि पश्यन्तु
मा कश्चिद्दुःखभाग्भवेत्।

या योग दिनी, चांगल्या आरोग्यासाठी,
उज्ज्वल विचारांसाठी आणि
राष्ट्रहितासाठी योग साधा, विचार रुजवा, भविष्य घडवा.

www.bhavisa.in

#जागतिकयोगदिवस #योगदिन #शक्तीअंतर्मनाची

शौर्य, स्वाभिमान आणि स्वराज्याच्या मूल्यांची प्रेरणा देणाऱ्या या पवित्र दिनी, छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा!आजच...
09/06/2025

शौर्य, स्वाभिमान आणि स्वराज्याच्या मूल्यांची प्रेरणा देणाऱ्या या पवित्र दिनी, छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा!

आजच्या पिढीसाठी शिवराय हे केवळ राजे नव्हेत, तर नेतृत्व, न्याय आणि धैर्याचे महान प्रतीक आहेत.

जय भवानी, जय शिवाजी!

👉 www.bhavisa.in
#भाविसा #राज्याभिषेकदिन

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंती निमित्त अभिवादन 🙏
28/05/2025

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंती निमित्त अभिवादन 🙏

ज्ञान, परंपरा आणि प्रगतीचं प्रतीक — महाराष्ट्र!"भावीसा" कडून महाराष्ट्र दिनानिमित्तसर्व वाचक आणि ज्ञानप्रेमींनामनःपूर्वक...
01/05/2025

ज्ञान, परंपरा आणि प्रगतीचं प्रतीक — महाराष्ट्र!

"भावीसा" कडून महाराष्ट्र दिनानिमित्त
सर्व वाचक आणि ज्ञानप्रेमींना
मनःपूर्वक शुभेच्छा!

शब्दांनी समृद्ध होणारा महाराष्ट्र
हीच आमची प्रेरणा, हीच आमची दिशा!

www.bhavisa.in
पुस्तकांसोबत तुमचं वैचारिक भांडार वाढवा!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडून अजूनही खूप काही शिकण्यासारखं आहे. 'भविसा'कडे त्यांच्या विचार, दृष्टिकोन आणि मार्गदर्शन...
14/04/2025

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडून अजूनही खूप काही शिकण्यासारखं आहे.

'भविसा'कडे त्यांच्या विचार, दृष्टिकोन आणि मार्गदर्शनावर आधारित पुस्तकांचा समृद्ध संग्रह आहे.

आजच www.bhavisa.in या संकेतस्थळावर भेट देऊन हा संग्रह जरूर पहा.

राम - रामायण या विषयावर भक्तिपूर्ण, गोष्टीरूप, माहितीपर अश्या असंख्य विषयांवर पुस्तके मिळतात.भा वि सा कडे मात्र संशोधनात...
06/04/2025

राम - रामायण या विषयावर भक्तिपूर्ण, गोष्टीरूप, माहितीपर अश्या असंख्य विषयांवर पुस्तके मिळतात.
भा वि सा कडे मात्र संशोधनात्मक व वैज्ञानिक तथ्यांवर आधारित पुस्तक उपलब्ध आहे.
डॉक्टर एस व्ही भावे लिखित
' रामाच्या पदचिन्हांवरून पुष्पक विमानाने पंख पसरले '
१९९२ साली प्रकाशित झालेल्या या पुस्तकाची तेव्हाही खूप चर्चा होती अजूनही आहे.
तुम्ही हे पुस्तक वाचलं का?
पुस्तकात ठाई ठाई राम भेटतो रामाच्या, रामायणाच्या खुणा सापडतात आपला विश्वास दृढ होतो....... राम होता... नव्हे आहे.

गुढीपाडवा आणि डॉ. हेडगेवार जयंतीच्या पावन पर्वावर...भारतीय विचार साधना आता समाजमाध्यमांवर !"भारतीय विचार साधना" आता आपल्...
30/03/2025

गुढीपाडवा आणि डॉ. हेडगेवार जयंतीच्या पावन पर्वावर...
भारतीय विचार साधना आता समाजमाध्यमांवर !

"भारतीय विचार साधना" आता आपल्या सर्वांसाठी Facebook, Instagram, YouTube आणि WhatsApp Channel वर उपलब्ध आहे.

आमची नवी प्रकाशने, कार्यक्रम, पुस्तकांवरील सवलती याचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

आमचे अधिकृत पेजेस:

Facebook: https://www.facebook.com/profile.php?id=61574433887828&mibextid=ZbWKwL

Instagram: https://www.instagram.com/p/DHx4sIBzut_/?igsh=dHJ4eHFiajJidDR4

Youtube: https://youtube.com/?si=AiSI4QkguhwxdUv2

WhatsApp Channel: https://whatsapp.com/channel/0029Vb5Sco9BPzjh2OMQbT1Z

|| राष्ट्रहित सर्वोपरि ||

आपल्या सहकार्याने आणि समर्थनाने भारतीय विचार साधना अधिक व्यापक प्रमाणावर पोहोचेल. आजच जॉइन व्हा आणि आपल्या राष्ट्रवादी विचारांना बळ द्या!

स्त्री म्हणजे केवळ ममता नाही, ती ताकदही आहे!ती संघर्ष करते, स्वप्ने बघते आणि ती पूर्णही करते.तिच्या कणखरतेत विश्व घडवण्य...
08/03/2025

स्त्री म्हणजे केवळ ममता नाही, ती ताकदही आहे!
ती संघर्ष करते, स्वप्ने बघते आणि ती पूर्णही करते.
तिच्या कणखरतेत विश्व घडवण्याची क्षमता आहे

आजच्या युगात स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात आपली ओळख निर्माण करत आहेत.
त्यांच्या मेहनतीला, त्यागाला आणि यशाला मानाचा मुजरा!

#स्त्रीशक्ती #महिलासन्मान #नारीत्व #शक्तिरूपा #स्त्रीसमाज

आज राष्ट्रीय विज्ञान दिवस आहे.भारतीय शास्त्रज्ञ सी. व्ही. रामन यांनी  ' रामन इफेक्ट ' चा शोध लावला तोच हा आजचा दिवस.आपल्...
28/02/2025

आज राष्ट्रीय विज्ञान दिवस आहे.
भारतीय शास्त्रज्ञ सी. व्ही. रामन यांनी ' रामन इफेक्ट ' चा शोध लावला तोच हा आजचा दिवस.
आपल्या देशाने जगाला खूप वैज्ञानिक दिले
जगाने मात्र आपल्या देशाला मागास समजले
एकदा ' अविनाशी बीज " वाचा मग कळेल
प्राचीन भारताने जगाला काय दिलंय
वैज्ञानिक दृष्टी बरोबर राष्ट्रीयत्व सुद्धा जागृत होईल नक्की !

मग भा वि सा ची गणित, शास्त्र आणि शास्त्रज्ञ यांची ओळख करून देणारी खूप पुस्तकं आधुनिक जगात टिकून राहायला मदत करतील.

www.bhavisa.in

मराठी असे आमुची मायबोलीजरी भिन्न पंथानुयायी असूहिचे पुत्र आम्ही हिचे पांग फेडूवसे आमुच्या हृदयमंदिरी ही 🙏🏼अभिजात भाषेचा ...
27/02/2025

मराठी असे आमुची मायबोली
जरी भिन्न पंथानुयायी असू
हिचे पुत्र आम्ही हिचे पांग फेडू
वसे आमुच्या हृदयमंदिरी ही 🙏🏼

अभिजात भाषेचा दर्जा सरकारनी दिलाय
तो टिकवायची जबाबदारी आपली
मराठी बोलू मराठी वाचू
आपली भाषा आपण जपू

www.bhavisa.in

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आत्मार्पण दिना निमित्त विनम्र आदरांजली. सावरकर म्हणजे तपस्वी, त्याग, सर्जनशील कवि मन आणि र...
26/02/2025

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आत्मार्पण दिना निमित्त विनम्र आदरांजली.

सावरकर म्हणजे तपस्वी, त्याग, सर्जनशील कवि मन आणि राष्ट्रीयत्वाची मशाल घेऊन ती जगभरात आई भारतीचा सन्मान गाजवणारे व्यक्तिमत्त्व.

अश्या थोर महापुरुषाच्या विचारांच्या आणि कटिबद्ध जीवन संघर्षाची ओळख तुम्हाला भारतीय विचार साधना प्रकाशित पुस्तकांत मिळते.

Visit www.bhavisa.in to shop books on स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर.

गोळवलकर गुरुजींचे  राष्ट्र समर्पित जीवन, प्रखर राष्ट्रवादी विचार यांची समाजाला विशेष गरज आहे कारण...समाज बदलतोय, सामाजिक...
19/02/2025

गोळवलकर गुरुजींचे राष्ट्र समर्पित जीवन, प्रखर राष्ट्रवादी विचार यांची समाजाला विशेष गरज आहे कारण...

समाज बदलतोय, सामाजिक विचार बदलतोय....

गरज आहे त्या विचारांना दिशा देण्याची....

श्री. गुरुजी आणि संघ यांचे कार्य आणि विचार समाजापर्यंत पुस्तक रूपाने नेऊयात...

श्री. गुरुजींना जयंती निमित्त सादर नमन 🙏🏼

www.bhavisa.in

Address

Perugate Bhave High School, Sadashiv Peth
Pune
411030

Opening Hours

Monday 10am - 6pm
Tuesday 10am - 6pm
Wednesday 10am - 6pm
Thursday 10am - 6pm
Friday 10am - 6pm
Saturday 10am - 6pm

Telephone

02024487225

Alerts

Be the first to know and let us send you an email when भारतीय विचार साधना पुणे प्रकाशन posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to भारतीय विचार साधना पुणे प्रकाशन:

Share

Category