04/01/2024
आम्ही सावित्रीच्या लेकी समाज हिताच्या कार्यासाठी नेहमीच पुढे.
दापोडी : दत्ता सूर्यवंशी. सावित्रीबाई फुले यांची 193 वि जयंती देशभर साजरी होत असताना दापोडी येथिल त्रिरत्न हॉल मध्ये मुव्हमेंट 21 च्या वतीने सावित्रीमाई फुले यांच्या जीवनावर प्रकाशमान टाकणारे आम्ही सावित्रीच्या लेकी हा आशय घेऊन शालेय विध्यार्थ्यांच्या द्वारे नाट्य कृती, संगीत नृत्य आणि विशेष सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्या साठी जी एस टी चे सुपरिटेंडेंट शाम भागवतकर, स्किन स्पेशालिस्ट डॉ.रोहिणी गायकवाड, खादी ग्राम उद्योग निवृत्त अधिकारी डॉ. मिलिंद वाकोडे, डॉ. वैशाली जगताप इत्यादी मान्यवर उपस्थित होते. शालेय विद्यार्थ्यांनी विविध नाट्य छटा आणि संगीतमय नृत्य सादर करून ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांना अभिवादन केले. पालक आणि विद्यार्थी यांच्याकडून प्रश्नोत्तराचा कार्यक्रमात विजेत्या पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. मुव्हमेंट 21 च्या वतीने आयोजित केल्या कार्यक्रमाचे सर्वच उपस्थित पालक वर्ग आणि इतरांनी देखील आयोजकांचे कौतुक करून असेच कार्यक्रम सातत्याने घेतले गेले पाहिजे सावित्रीमाईंच्या आम्ही लेकी कशातच कमी पडणार नाही. असा सूर प्रत्येकाने या वेळी व्यक्त केला.