07/11/2025
🚨 Breaking News : पुण्यातील त्या जमिनीचा व्यवहार रद्द..!
पुण्यातील कोरेगाव पार्कनजिक जमिनीच्या खरेदीवरुन वादंग निर्माण झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आरोपांना परखड उत्तरं देत हा व्यवहार रद्द करण्यात आल्याचं जाहिर केलं.. या प्रकरणातील जी काही कागदपत्रे तयार झाले होती, ती सर्व रद्द करण्यात आली आहेत. तसेच, महसूल सचिव यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीला एक महिन्याच्या आत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जनतेला सर्व स्पष्टीकरण कळले पाहिजे,' अशी भूमिका त्यांनी यावेळी घेतली.