Pune MH 12

Pune MH 12 Pune.....

पुणे तिथे काय उणे.... Pune is also the 101st largest city in the world, by population.

Pune...

Pune is the 9th most populous city in India and the second largest in the state of Maharashtra after the state capital Mumbai.

10/01/2022

मग होऊन जाऊ दे...!!!

Way to heaven ☀️New day.. New hopes... Happy morning....
26/12/2021

Way to heaven ☀️

New day..
New hopes...
Happy morning....

That old Doordarshan days ❤️😇
25/12/2021

That old Doordarshan days ❤️😇

22/08/2021

One more beautiful add from chitale bandu...



३७ किलो भेंडी पिकवून जर हाती १ रुपया पडत असेल तर याहून मोठी शोकांतिका नाही..😓 ान  िसान
18/07/2021

३७ किलो भेंडी पिकवून जर हाती १ रुपया पडत असेल तर याहून मोठी शोकांतिका नाही..😓
ान िसान

🌎☕🌎☕🌎☕🌎➖➖➖➖➖➖➖_*☑ आज १५ डिसेंबर आंतरराष्ट्रीय चहा दिन / International Tea Day ....*_➖➖➖➖➖➖➖_*📚 Light*_आज जागतीक चहा दिन....
15/12/2020

🌎☕🌎☕🌎☕🌎
➖➖➖➖➖➖➖
_*☑ आज १५ डिसेंबर आंतरराष्ट्रीय चहा दिन / International Tea Day ....*_
➖➖➖➖➖➖➖
_*📚 Light*

_आज जागतीक चहा दिन.... पाण्यानंतर जगात सर्वात जास्त प्यायलं जाणारं एकमेव पेय म्हणजे चहा... भारतासोबत, व्हिएतनाम, नेपाळ, बांग्लादेश, इंडोनेशिया, केनिया, मलेशीया, युगांडा, टांझानीया, आफ्रिका या देशांत चहाचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं.._
🔲🔲🔲
*चहाची सर्वात पहिली नोंद चीनमध्ये आढळते... अमृत प्राशन केलं की अमरत्व मिळतं असं म्हणतात... म्हणूनच अमृताशी पैज जिंकणारा अमृततुल्य असा चहाच असे मानून गेल्या कित्येक वर्षांपासून अनेक देशांत आणि त्यात ही मुख्यतः भारतात चहा चवीने पिला जातो....*
🔲🔲🔲
_कल्हई काढलेल्या चकचकीत पितळी भांड्यात आलेली उकळी... कधी एकदा हा दूग्धशर्करा योग जुळून येतो अन् पृथ्वीवरच्या अमृताचा घोट ओठात आणि ओठातून घशात उतरतो याची प्रतिक्षा... उगीच नाही, याला अमृततुल्य म्हणत... अमृताशीच ज्याची तुलना होऊ शकते असा हा वाफाळलेला चहा मनाला उभारी आणतो, शरिर ताजंतवानं करतो आणि चहाच्या कपाभोवती झालेली दोस्तीही पक्की असते म्हणतात... आत्म्याचं परमात्म्याशी मिलन घडवणारा हा इहलोकीचा अविष्कार म्हणूनच आपल्या सगळ्यांनाच प्रीय... म्हणूनच हा चहा भारतीय संकृतीचा एक अविभाज्य भाग बनलाय..._

📚 *Light*
🔲🔲🔲
_*पूर्वीच्या काळी भारतात प्रचलित ब्रिटानी राजवटीत भारतातील चहाची विपुलता प्रथम ब्रिटिशांनी वापरली होती. सर्वप्रथम, 1815 मध्ये, काही ब्रिटिश पर्यटक आसाममध्ये वाढणाऱ्या आसामच्या झाडावर गेले आणि स्थानिक आदिवासी पेय व पेय पीत असत. 1834 मध्ये भारताचे गव्हर्नर जनरल लॉर्ड बॅन्ट्रिक यांनी भारतात चहाची परंपरा सुरू करण्यासाठी आणि उत्पादनाच्या संभाव्यतेची जाणीव करण्यासाठी समिती तयार केली. त्यानंतर 1835 मध्ये आसाममध्ये चहाच्या बागांची लागवड केली गेली.*_
🔲🔲🔲
_असे म्हटले जाते की एक दिवस चीनचे सम्राट शान नंग गरम पाण्याच्या कपमध्ये ठेवले होते, काही कोरडे पाने आले आणि रंग पाण्यामध्ये आला आणि जेव्हा त्याने ते छिद्र केले तेव्हा त्याला ते आवडले. ते केवळ चहावरुन सुरू होते. येशू पासून 2737 वर्षांपूर्वी आहे. चाय पिण्याच्या परंपरेचा पहिला उल्लेख 350 मध्ये आढळतो 1610 मध्ये डच व्यापार्यांनी चीनमधून युरोपमध्ये चहा घेतली आणि हळूहळू संपूर्ण जगाचा आवडता पेय बनला._
🔲🔲🔲

रिलीजला आज ४० वर्ष पूर्ण. माझे ते काॅलेजचे दिवस. आजही आठवतेय ते याची अक्षरशः प्रचंड प्रचंड प्रचंड म्हणावी अशी पब्लिसिटी....
14/12/2020

रिलीजला आज ४० वर्ष पूर्ण.
माझे ते काॅलेजचे दिवस. आजही आठवतेय ते याची अक्षरशः प्रचंड प्रचंड प्रचंड म्हणावी अशी पब्लिसिटी.
सहा कोटीचे बजेट. शाकालचा ( कुलभूषण खरबंदा) ड्रेस. त्याचा अड्डा. अमिताभचे फाईट सीन्स. 'प्यार करनेवाले.... ' गाण्याचा चकाचक सेट. अशा अनेक गोष्टींचे हॅमरिंग. दिग्दर्शक रमेश सिप्पीचा 'शोले 'नंतरचा चित्रपट म्हणून अबब... म्हणावी अशी उत्सुकता. गब्बरसिंगपेक्षा ( अमजद खान) शाकाल टेरर आहे अशी पूर्वप्रसिध्दी. मेन थिएटर मिनर्व्हावरचे डेकोरेशन पाह्यलाही झुंबड.... सिनेमा वेस्टर्नाईज स्टाईलीश. 'शोले 'च्या आसपास जराही नाही ( जाॅनरही वेगळा). गंमत म्हणजे, 'शान ' आवडला नाही असे अनेकांचे मत. तरीही.... मिनर्व्हात रौप्यमहोत्सवी यश. हिट गाण्यांमुळे एका पिढीतील हा चित्रपट पुढील अनेक पिढ्या ओलांडूनही ओळखला जातोय हेही विशेष.

20/08/2020

चितळे बंधू यांची जाहिरात नेहमीच बघणीय 😀

ह्या जाहीरातीने तर
काळजाला हात घातला...👌☺️

🧙🏻‍♂️🌧️💦🧙🏻‍♂️💦🌧️🧙🏻‍♂️➖➖➖➖➖➖➖_*📌 ‘मोसमी पाऊस’ आणि हवामाखाते या वरील संशोधनाचा ब्रिटिश काळापासून सुरू झालेला अभ्यास आणि इत...
18/06/2020

🧙🏻‍♂️🌧️💦🧙🏻‍♂️💦🌧️🧙🏻‍♂️
➖➖➖➖➖➖➖
_*📌 ‘मोसमी पाऊस’ आणि हवामाखाते या वरील संशोधनाचा ब्रिटिश काळापासून सुरू झालेला अभ्यास आणि इतिहास जाणून घेऊ...*_
➖➖➖➖➖➖➖

_*📍एच. एफ. ब्लँडफोर्ड भारतीय हवामान संशोधनाचे जनक...*_
➡️ भारतात आल्यानंतर ब्रिटिशांच्या लक्षात आलं की या देशात बरोब्बर ४ महिने पाऊस पडतो. (ब्रिटनमध्ये वर्षभरात कधीही पाऊस पडत असतो.) मग भारतातल्या या वेगळ्या, शिस्तशीर पावसाचा अभ्यास त्यांनी शास्त्रशुद्ध पद्धतीने सकरायला सुरुवात केली आणि त्यासाठी ब्रिटिशांनी भारतात हवामान खातं स्थापन केलं. इ. स. १८७५ मध्ये ब्रिटिश सरकारने एच. एफ. ब्लँडफोर्ड यांची हवामान खात्याचे सरसंचालक म्हणून नेमणूक केली. त्या आधी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने वेधशाळा प्रस्थापित केल्या होत्या. पण त्यांचा नैऋत्य मोसमी पावसाचा अंदाज आणि भारतीय पारंपरिक हवामानाचा अंदाज यात फारसा फरक नव्हता. त्या वेधशाळांचे फायदे म्हणजे अठराव्या शतकाच्या उत्तरार्धापासूनचे पडलेल्या पावसाचे आकडे हवामान अभ्यासकांना उपलब्ध आहेत.

➡️ ब्लँडफोर्डनी मोसमी पावसाच्या अंदाजशास्त्राचा पाया घातला. त्यांचं संपूर्ण आयुष्य त्यांनी मोसमी पावसाच्या अभ्यासाला वाहिलं होतं. मोसमी पाऊस ही एक अत्यंत गुंतागुंतीची प्रक्रिया असल्याचं त्यांनी जगासमोर आणलं. त्यांच्या मनावर मोसमी पावसानं घातलेली मोहिनी आयुष्यभर टिकली. जून महिन्याच्या सुरुवातीला केरळमार्गे भारतात शिरणाऱ्या वाऱ्यांमुळे संपूर्ण देशात पाऊस पडतो, हे लक्षात आल्यावर या वाऱ्यांचं नामकरण 'माॅन्सून' असं करण्यात आलं. अरबीमधल्या 'मौसम' (ऋतू) या शब्दापासून 'माॅन्सून' हा शब्द तयार झाला. मॉन्सून हे ‘मोसमी’ या शब्दाचं अपभ्रष्ट रूप असल्याचं त्यांनी सर्वप्रथम लिहून ठेवलं.

_*📍दरवर्षी पावसाळ्यात पाऊस पडतो. पण पावसाळा जूनमध्येच का सुरू होतो? पाऊस कधी कमी तर कधी जास्त का पडतो? हे ढग येतात कुठून? त्यांना माॅन्सून का म्हणतात..???? नैऋत्य मोसमी वारे कुठून येतात आणि का येतात..???*_

➡️ एप्रिल-मे महिन्यांत राजस्थानचा वाळवंट जोरदार तापतो. त्यामुळे तिथली हवा विरळ होऊन वर सरकते आणि तिथला हवेचा दबाव कमी होतो. तुलनेने हिंद महासागर कमी तापतो. थंड हवा असल्यामुळे तिथे हवेचा दबाव जास्त असतो. स्वाभाविकपणे, अधिक दबाव असलेल्या ठिकाणाहून कमी दबाव असललेल्या ठिकाणाकडे हवेचा प्रवास सुरू होतो. समुद्रावरचे वारे जमिनीवर येताना सोबत भरपूर बाष्प घेऊन येतात. भारतात प्रवेश केल्यावर या बाष्पाचा पाऊस पडतो. (हवेच्या दबावातील फरक हे माॅन्सूनच्या वाऱ्यांच्या प्रवासाचं मुख्य कारण आहे. इतरही अनेक छोटी-मोठी कारणं आहेत.)

_*📍या वाऱ्यांना नैर्ऋत्य माॅन्सून का म्हणतात?*_
➡️ कारण या वाऱ्यांचा भारतात प्रवेश नैर्ऋत्येकडून (साउथ-वेस्टकडून) होतो. मुळात माॅन्सूचे वारे भारताच्या दक्षिण टोकाजवळ दुभंगतात. एक शाखा केरळकडून कर्नाटकमार्गे पश्चिम किनारपट्टीवरून वर सरकते. तर दुसरी बंगालच्या उपसागरावरून पूर्व किनारपट्टीजवळून वर चढते. पहिली शाखा केरळ, कर्नाटक, गोवा करत कोकणात येते. पुढे माॅन्सूनचे ढग मध्य भारतातल्या सपाट प्रदेशातून हिमालयाच्या दिशेने प्रवास करतात. हेच ढग थेट पाकिस्तानपर्यंत पाऊस पाडतात. हिमालय आडवा आल्यामुळे तिथे ढग अडतात आणि वरवर सरकतात. उंचावरच्या थंड वातावरणामुळे बाष्पाचं पाणी होतं आणि पर्वतांमध्येही मजबूत पाऊस कोसळतो.

➡️ दुसरी शाखा ओडिशामार्गे बंगालपर्यंत येते. बंगालमध्ये दुसऱ्या शाखेच्या आणखी दोन पोटशाखा होतात. एक पोटशाखा आसाम, मेघालयच्या दिशेने जाते. याच पोटशाखेमुळे मेघालयातला चेरापुंजी-मौसिनराम हा पट्टा जगातला सगळ्यांत ओलागच्च प्रदेश आहे.

_*📍भारतात कुठे पाऊस कमी तर कुठे जास्त का पडतो?*_
➡️ एकदा माॅन्सूचे ओले वारे भारताच्या भूमीत शिरले, की कुठे आणि किती पाऊस पडेल हे प्रत्येक ठिकाणचं तापमान, दबाव, समुद्रसपाटीपासूनची उंची, समुद्रापासूनचं अंतर, वाऱ्यांच्या मार्गापासूनचं अंतर, वनीकरण, अंतर अशा अनेक गोष्टींवर अवलंबून असतं. कुठे नेमका किती पाऊस पडेल, हे शोधून काढण्यासाठी अनेक माॅडेल्स आहेत.

➡️ ब्लँडफोर्डनी मोसमी पावसाच्या अभ्यासासाठी आशिया खंडात जिथं जिथं ब्रिटिश अंमल होता तिथं तिथं वेधशाळा उभारल्या. आंतरजालच काय दूरध्वनी सेवा उपलब्ध नसताना या सर्व वेधशाळांनी गोळा केलेली माहिती एकत्र करून अभ्यासायची, त्यानंतर त्या माहितीच्या आधारे काही निष्कर्ष काढता येतात का आणि हे निष्कर्ष काळाच्या कसोटीवर टिकतात का, याचा पडताळा घ्यायचा, हे काम खरंतर आजही सोपं नाही. त्या काळात ब्लँडफोर्डनी ते करायचा प्रयत्न केला. यावरून त्यांची अथक परिश्रम घ्यायची तयारी, चिकाटी आणि अशा तऱहेच्या अभ्यासाची कल्पना मनात आणून ती राबवणं, यावरून त्यांच्या बुद्धिमतेची चमक आपल्या लक्षात येते. एक इंग्रज त्याच्या मातृभूमीपासून दूर राहून हे काम आयुष्यभर करतो, अशी ध्येयनिष्ठा क्वचितच बघायला मिळते.

➡️ अफगाणिस्तान ते ब्रह्मदेश (आता म्यानम्यार) येथून तारा येत. या दैनंदिन संगतवार लावणं हेच मोठं कटकटीचं काम होतं. ब्लँड फोर्डनी शक्य होतं, तिथं पर्वत शिखरावर वेधशाळा उभारल्या. पतंगाच्या साहाय्यानं वातावरणाचा अभ्यास करायची कल्पना त्यांचीच. या पतंगांची जागा आता बलूननी घेतली आहे. अनेक भारतीय तरुणांना त्यांनी हवामान खात्यात नोकऱया दिल्या.

➡️ ब्लँडफोर्ड यांच्या निवृत्तीनंतर (सर) जॉन एलियट हे भारतीय हवामान खात्याचे प्रमुख बनले. त्यांचं महत्त्वाचं कार्य म्हणजे मोसमी पावसाचा अभ्यास हा आंतरराष्ट्रीय सहकार्यानेच होऊ शकतो, हे ओळखून त्यांनी त्या दृष्टीनं पावलं उचलली. त्यांच्या पुढाकारानं इ. स. 1897 हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय मेघ अभ्यास वर्ष’ म्हणून घोषित केलं गेलं. एलियटनी तिसेराँ द बोर्ट या प्रेंच शास्त्रज्ञाच्या सहकार्यानं मोठय़ा प्रमाणात भारतीय वातावरणाच्या अभ्यास सुरू केला. वातावरणाच्या या अभ्यासात द बोर्ट यांनी स्तरितांबराचं अस्तित्व शोधून काढलं. वातावरणातला हा स्तर फार महत्त्वाचा मानला जातो. मोसमी पावसाबद्दलचा अंदाज जाहीर करण्याची कल्पनाही सर जॉन एलियट यांचीच. अगदी सुरुवातीस हा अंदाज हे राष्ट्रीय गुपित असे. अत्यंत वरिष्ठ सनदी अधिकाऱयांनाच तो पहायला मिळत असे.

➡️ एलियटनंतर त्यांचे एक साहाय्यक गिल्बर्ट वॉकर यांच्याकडं हवामान खात्याची सूत्रं आली. वॉकरनी मोसमी पावसाच्या अभ्यासाला गती दिली. मोसमी पावसाच्या त्यांच्या अभ्यासामुळं त्यांना जागतिक स्तरावरचे शास्त्रज्ञ म्हणून मान्यता मिळाली. भारतीय हवामान खात्याच्या इतिहासातही त्यांचं नाव अग्रणी शास्त्रज्ञ म्हणून आदरानं घेतलं जातं. वॉकर यांना प्रत्येक गोष्टीबद्दल कुतूहल वाटत असे. प्रत्येक नैसर्गिक घटनेमागचं वैज्ञानिक कारण शोधणे, त्याची खात्री करून घेणे आणि ती कारणमीमांसा पूर्णत्वास नेणं, हा त्यांचा पिंडच होता. सर विल्यम विल्कॉक्स यांनी इजिप्तमधील जलसाठा नियोजन प्रकल्पाच्या महासंचालकपदी कार्यरत असताना ‘नाईल नदीला येणाऱया पुरांचा आणि भारतीय मोसमी पावसाचा काहीतरी निश्चित संबंध आहे.’ असे एक विधान केलं होतं. या विधानाची सत्यता पडताळून पाहण्याच्या निश्चयाने वॉकर कामास लागले. त्यासाठी त्यांनी बरीच आकडेवारी गोळा केली. वृक्षतोड आणि मोसमी पाऊस यांच्या परस्पर संबंधांचा त्यांनी अभ्यास केला. सौर डाग आणि मोसमी पाऊस यांच्यातील संबंधांचा त्यांनी अभ्यास केला. त्याचबरोबर भारतातील मोसमी पाऊस हा जागतिक हवामान चक्राचा एक भाग असावा, हे सांगून त्यांना तो सिद्ध करता येईल का, यासाठीही प्रयत्न केले.

➡️ वॉकर यांच्या संशोधनानं त्या काळात खूप खळबळ माजली. वॉकर प्रसिद्धीसाठी काय वाट्टेल ते वैज्ञानिक पाया नसलेलं बोलतात, असंही म्हटलं गेलं. खरंतर वॉकर एक द्रष्टे वैज्ञानिक. सखोल निरीक्षणातून ते त्यांचे निष्कर्ष काढत असत. ऑस्ट्रेलियातील सिडनी आणि अर्जेंटिनामधील ब्यूनोस आयर्स अशा पृथ्वीच्या दोन टोकांच्या शहरांच्या हवेचा दाब आणि पश्चिम घाटातील पाऊस, अंटार्क्टिकातील हिमखंड आणि भारतातील पाऊस यांचा संबंध असावा, अशी त्यांची विधानं काही काळ टीकेचा विषय ठरली. या बाबी पुढे शंभर वर्षानंतर खऱया असल्याचे पुरावे मिळाले. पॅसिफिक महासागराचा आणि मोसमी पावसाचा संबंध असावा, त्याच बरोबर पॅसिफिक महासागरावरील जास्त दाबाचा हवेचा पट्टा, त्याच वेळी हिंदी महासागरावरील कमी दाबाच्या हवेच्या पट्टय़ाची निर्मिती, तसंच हवेचा हा कमी दाबाचा पट्टा हिवाळाभर टिकून राहणं यांचा आणि भारतीय उपखंडामध्ये भरपूर प्रमाणात पाऊस पडण्याचा संबंध आहे, असंही वॉकर म्हणत असत. त्यामुळं आता सर गिल्बर्ट वॉकर इज फादर ऑफ मॉन्सून स्डटीज असं म्हटलं जातं.

➡️ आज भारतासह अनेक देश मोसमी पावसासंबंधीच्या माहितीची देवाण घेवाण सातत्याने करीत असतात. मोसमी पावसाच्या अभ्यासासाठी खास उपग्रह अवकाशात भ्रमण करतात. दूरध्वनी उचलला की जगाची दोन टोकं जोडली जातात. या पार्श्वभूमीवर या संशोधकांनी मोसमी पावसाच्या संशोधनात जे पथदर्शक काम करून ठेवलंय त्याला दाद द्यावी तेवढी कमीच आहे. भारत वर्ल्ड मेटिऑरॉजिकल असोसिएशनचा सदस्य आहे. या संघटनेचे 160 सदस्य आहेत. त्यांनी मोसमी पावसाच्या उन्हाळी हालचालीचं केंद्र दिल्लीत स्थापन केलंय. त्यावरून मोसमी पावसाच्या संशोधनातील भारताचे महत्त्व दिसून येते.
➖➖➖➖➖➖➖
🧙🏻‍♂️🌧️💦🧙🏻‍♂️💦🌧️🧙🏻‍♂️

Tag your friends who motivate you....
08/06/2020

Tag your friends who motivate you....

As a human we are sorry....
03/06/2020

As a human we are sorry....

03/06/2020

*Abp माझा*
चक्रीवादळ अलिबाग मध्ये धडकले
*झी 24 तास*
चक्रीवादळ मुंबईच्या दिशेने
*news 18 लोकमत*
चक्रीवादळ नाशिकच्या दिशेने
*जय महाराष्ट्र*
चक्रीवादळ पुण्याच्या घाटामध्ये
*साम tv*
चक्रीवादळ डोंबिवली मार्गे कर्जतला
*tv 9 मराठी*
चक्रीवादळ मुंबईचा धोका टळला

हे सर्व बघून चक्रीवादळ नेमके विसरले कुठे जायचे...

*बघा नाहीतर म्हणेल महाराष्ट्रात आलो आहे तर राज्यपालांना भेटूनच जातो...*
चक्राहून टाकले, चक्री वादळाने. चॅनलचे TRP वाढले.

🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

Address

Pune
Pune
411030

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pune MH 12 posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share