Adv Vikas Musale, Pune

Adv Vikas Musale, Pune Practicing Lawyer at Civil, Family, Banking, Corporate and Conveyance side.

मेहनत केल्याशिवाय महत्त्वकांक्षा पूर्ण होत नाहीत, म्हणून मेहनती शिवाय पर्याय नाही....
27/04/2025

मेहनत केल्याशिवाय महत्त्वकांक्षा पूर्ण होत नाहीत, म्हणून मेहनती शिवाय पर्याय नाही....

शासकीय कार्यालयात तसेच न्यायालयासमोर करण्यात येणाऱ्या प्रतिज्ञापत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी न करणेबाबत.....          A...
10/03/2025

शासकीय कार्यालयात तसेच न्यायालयासमोर करण्यात येणाऱ्या प्रतिज्ञापत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी न करणेबाबत.....

Adv Vikas Musale

दै प्रभात...वर्धापनदिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा....Adv Vikas Musale      #प्रभात
05/01/2025

दै प्रभात...
वर्धापनदिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा....
Adv Vikas Musale
#प्रभात

01/01/2025

Happy New Year
2025

23/12/2024

घरमालक आणि भाडेकरू...
Landlord and Tenant... Defaulter

जर एखादा भाडेकरू वेळच्या - वेळी घरामालकास भाडे देत नसेल किंवा खुप महिन्यापासून भाडे देण्याचे टाळत असेल तर त्या भाडेकरूला महाराष्ट्र भाडे नियंत्रण कायाद्यातील कलम 15 अंतर्गत योग्य भाडे व वाढीव भाडे ( standard rent and permitted increases) संदर्भात घरमालक मागणी नोटीस पाठवून भाड्याची मागणी करू शकतो. जर भाडेकरू ने मागणी नोटीस प्रमाणे पूर्तता न केल्यास, नोटीस पाठविल्या नंतर 90 दिवसांनी घरामालक हा भाडेकरू विरुद्ध थकीत भाडे वसुली साठी व भाड्याने दिलेली जागा खाली करून मिळणे कामी मे. कोर्टात दावा दाखल करून वाद मिळकतीचा ताबा मागू शकतो.

ॲड विकास मुसळे, पुणे
संपर्क - ९६०४५०८३९०

22/12/2024

अतिक्रमण व त्याबाबत करावयाची कायदेशीर कारवाई...

रमेश आणि महेश शेजारी - शेजारी राहतात. रमेशने त्याचे घराचे बांधकाम काढले, सदर बांधकाम करत असताना रमेशने महेशच्या जागेत अतिक्रमण केले व बांधकामास सुरवात केली. महेशला, रमेश विरुद्ध कोणती कायदेशीर कारवाई करता येईल?

- महेश, रमेश सोबत चर्चा करून बांधकाम थांबवू शकतो व एकत्रात अथवा स्वतंत्र जमिनीची सरकारी अथवा खाजगी मोजणी करून घेऊ शकतात.

- महेश पोलीस स्टेशनला अतिक्रमण काढून मिळणेकामी लेखी तक्रार देऊ शकतो.

- महेश, वकीला मार्फत रमेशला नोटीस पाठवून बांधकाम थांबविणे बाबत व अतिक्रमण काढून घेणे बाबत कळवू शकतो.

- महेश कोर्टात मनाई संदर्भात व अतिक्रमण काढून मिळणे कामी तसेच नुकसान भरपाई पोटी रक्कम मागणे कामी मे. कोर्टात दावा दाखल करू शकतो.

ॲड विकास मुसळे, पुणे
संपर्क -९६०४५०८३९०


Adv Vikas Musale

22/12/2024
किरकोळ कारणावरून वाद-विवाद ; पती-पत्नीतील नात्यासाठी धोक्याची घंटा.. पती-पत्नीने एकमेकांना समजून घेणे, एकमेकांना वेळ देण...
11/12/2024

किरकोळ कारणावरून वाद-विवाद ; पती-पत्नीतील नात्यासाठी धोक्याची घंटा.. पती-पत्नीने एकमेकांना समजून घेणे, एकमेकांना वेळ देणे काळाची गरज आहे....
धन्यवाद.. दै प्रभात
Digital Prabhat

Vijaykumar Kulkarni

06/12/2024

Mere non-performance of an Agreement to Sale by itself does not amount to cheating and criminal breach of trust.

Adequate remedy of filing a Civil Suit for relief of specific performance of a contract.

Filing criminal case is an arm-twisting mechanism to pressurize to execute the Sale Deed or to extract money.

Thus, every civil wrong cannot be converted into a criminal wrong.

04/12/2024

Power of Attorney / कुलमुखत्यारपत्र
The Power of Attorney Act, 1882

1A. Definition.—In this Act, “Power-of-Attorney” includes any instrument empowering a specified person to act for and in the name of the person executing it.

A power of attorney (POA) is a legal document that gives someone the authority to act on another person's behalf:

The person who gives the authority is called the principal, grantor, or donor.

The person who receives the authority is called the agent or attorney-in-fact.

Adv Vikas Musale

ऑनलाईन फसवणूक व त्याबाबत करावयाची तक्रारआपण आपल्या दैनंदिन आयुष्यात सकाळपासून रात्री झोपेपर्यंत बहुतेक सर्वच व्यवहार ऑनल...
28/11/2024

ऑनलाईन फसवणूक व त्याबाबत करावयाची तक्रार

आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात सकाळपासून रात्री झोपेपर्यंत बहुतेक सर्वच व्यवहार ऑनलाईन करत आहोत, रोख व्यवहारापेक्षा आपण डिजिटल व्यवहारांना जास्त प्राधान्य देत आहोत आणि इथून पुढे देखील डिजिटलायझेशनमुळे रोख व्यवहार बंद होऊन आपण ऑनलाईन व्यवहारांना प्राधान्य देणार आहोत. त्यामुळेच ऑनलाइन फसवणूक करणाऱ्यांची संख्याही देखील वाढली आहे.
दररोज कोणीना कोणी ऑनलाइन फसवणुकीचा बळी ठरत आहे. जर कोणी ऑनलाईन फसवणुकिचे बळी ठरले असतील, तर त्याबद्दल तक्रार पोलीस ठाण्यापेक्षा नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवर करता येऊ शकते.

जर तुमची ऑनलाईन फसवणूक झालेली असेल तर तुम्ही घटनेच्या २४ तासांच्या आत तक्रार नोंदवणं गरजेचं आहे. जेणेकरुन पोलिसांना तात्काळ कारवाई करता येईल. अशा परिस्थितीत तुमच्यासोबत झालेल्या फसवणुकीचे पैसे तुम्हाला लगेच मिळण्याची शक्यता आहे.

ऑनलाइन फसवणुकीची तक्रार कशी करावी?

सर्वप्रथम https://cybercrime.gov.in. पोर्टलवर जा.

त्यानंतर होम पेजला भेट द्या आणि तक्रार नोंदवा ऑप्शनमध्ये जाऊन तक्रार नोंदवा

त्यानंतर टर्म आणि कंडिशनवर क्लिक करा आणि पुढील मेन पेजवर जा.

यानंतर सायबर क्राईम रिपोर्ट बटणावर क्लिक करा.

त्यानंतर नाव, ईमेल आणि फोन नंबर टाकून लॉगिन करा.

यानंतर नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर ओटीपी टाका.

त्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा.

यानंतर, तुमच्यासोबत झालेल्या फसवणुकीची तक्रार नोंदवा.

त्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा.

यानंतर एक नवीन पेज उघडेल, जिथे गुन्ह्याचा उर्वरित तपशील द्यावा लागेल. त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट बटणावर क्लिक करा.

पुढील पेजवर, संभाव्य संशयिताची माहिती देऊन, सबमिट बटणावर क्लिक करा.

यानंतर तक्रार नोंदवल्याचा मेसेज येईल आणि पोलिसांकडून कारवाई सुरु होईल.

ऑनलाइन व्यवहार करताना प्रत्येकाने काळजीपूर्वक व्यवहार करणे आवश्यक आहे. आपली कोणतीही खाजगी व गोपनीय माहिती, खात्यासंदर्भातील माहिती, ओटीपी ऑनलाईन कोणालाही देऊ नये तसेच कोणत्याही आमिषाला, भूल व थापांना बळी पडू नये.

धन्यवाद
ॲड. विकास मुसळे, पुणे
संपर्क -९६०४५०८३९०
Adv Vikas Musale

Address

Shaniwar Peth
Pune
411030

Opening Hours

Monday 10:30am - 7pm
Tuesday 10:30am - 7pm
Wednesday 10:30am - 7pm
Thursday 10:30am - 7pm
Friday 10:30am - 7pm
Saturday 10:30am - 7pm

Telephone

+9604508390

Alerts

Be the first to know and let us send you an email when Adv Vikas Musale, Pune posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Adv Vikas Musale, Pune:

Share