28/06/2023
भावा तुझे लई उपकार बघ. बातमी पाहिल्या पासून मनातून ती घटना जात नाही. भीति वाटतीये. काही संबंध नसताना, आम्ही प्रत्यक्षदर्शी नसताना जर मझ हे होत असलं तर त्या ताईच आणि तिच्या आईचं काय होत असेल ?, भावा शिवरायांच्या या महाराष्ट्रात त्यांचे हे मावळे आजही स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आयाबहिनीचा जीव वाचवतात, अब्रू वाचवतात हे बघून खरचं खूप आनंद झाला. वाटलं पुण्याची Delhi होती आहे की काय ?, पण नाही ही आमच्या शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली पुण्यनगरी च आहे जिथे तुमच्या सारखे मावळे आम्हा बहिणींचं रक्षण करायला समर्थ आहेत, कुठलाही सोम्या गोम्या येऊन भररस्त्यात आम्हाला हात लावू शकत नाही. आम्ही घाबरलेल्या आहोत पण सुरक्षित वाटतंय तुमच्या मुळे. त्या ताईच्या मदतीला धावून आलेल्या सर्वांचे मनापासून आभार. देव करो तुमच्या सारखे मावळे, तुमच्या सारखे भाऊ सगळ्या भारतभर असेच आम्हा बहिणींच्या मागे उभे राहोत.
#लेशपालजवळगे #हर्षदपाटील