31/07/2025
"कोणताही हिंदू दहशतवादी होऊ शकत नाही"; अमित शहा यांचे संसदेत वक्तव्य
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला २१ जुलैपासून सुरुवात झाली असून, सध्या पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर या विषयांवर दोन्ही सभागृहात चर्चा सुरू आहे.
या चर्चेदरम्यान राज्यसभेत बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ठाम भूमिका घेत म्हणाले, "मी गर्वाने सांगतो की, कोणताही हिंदू दहशतवादी होऊ शकत नाही." त्यांच्या या विधानामुळे संसदेतील चर्चेला विशेष रंग चढला आहे.
#अमितशहा #हिंदूदहशतवादीनाही #राज्यसभा #संसदवक्तव्य #ऑपरेशनसिंदूर #पहलगामहल्ला #भारतीयराजकारण #मराठीबातम्या #राष्ट्रीयसुरक्षा