Deshmukh and Company

Deshmukh and Company Deshmukh and Company, established in 1938, is a leading publishing house in Maharashtra. This page

१९३८ साली स्थापन झालेल्या देशमुख आणि कंपनीने मराठी प्रकाशन विश्वात एक दर्जेदार साहित्य निर्मिती करणारी संस्था असा आपला ठसा निर्माण केला आहे. ललित साहित्य, कादंबरी, वैचारिक, ऐतिहासिक, विनोदी, कविता, आणि बालवाङ्मय अशा सर्व साहित्य प्रकारातील उत्तोमोत्तम साहित्य देशमुख कंपनीतर्फे वेळोवेळी प्रकाशित केले जाते . देशमुख कंपनीच्या पुस्तकांना ज्ञानपीठ व साहित्य अकॅडेमी पुरस्कारांनी गौरविले गेले आहे. याच सोबत अनेक ग्रंथाना राज्य सरकारची आणि इतर संस्थांची प्रतिष्ठा आणि सन्मानाची पारितोषिक मिळाली आहेत .

लेखक, कथाकार,कादंबरीकार, ललितलेखक रवींद्र शोभणे यांचा आज जन्मदिवस त्यांना देशमुख आणि कंपनीतर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभ...
15/05/2025

लेखक, कथाकार,कादंबरीकार, ललितलेखक रवींद्र शोभणे यांचा आज जन्मदिवस त्यांना देशमुख आणि कंपनीतर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

ही वसंता नावाच्या तरुणाचा जीवनप्रवास, ग्रामवास्तवाच्या विविध पातळ्या साकारत गावातील धनदांडग्यांची, रोजगाऱ्यांची, शेतकऱ्यांची जीवनशैली तसेच ग्रामीण भागातील यात्रा, गारुड्याचे खेळ, बहुरुप्यांची सोंगे व त्यांचे जगणे तसेच ग्रामीण भागातील जातीव्यवस्था असे अनेक घटक या कादंबरीत चित्रित करण्यात आले आहे.

पुस्तकाचे नाव - कोंडी

लेखक - रवींद्र शोभणे

मूळ किंमत - २५०/-

कादंबरीची नायिका प्रज्ञा हिची ही कहाणी विसाव्या शतकाच्या अखेरीच्या, एकविसाव्या शतकाच्या सुरवातीच्या महाराष्ट्रातील सुशिक्षित स्वभान असलेल्या स्त्रीची कहाणी आहे. तिच्या मनाचे सर्व ताणतणाव जाणण्यात व ते शब्दबद्ध करण्यात आले आहेत.

पुस्तकाचे नाव - चिरेबंद

लेखक - रवींद्र शोभणे

मूळ किंमत - १६०/-

सवलतीत दोन्ही पुस्तकं ३२०/- मध्ये घरपोच मिळतील.

संपर्क -
देशमुख आणि कंपनी
९३७०८४९०५६ / ७७९८५०९००७

#देशमुखआणिकंपनी
#जन्मदिवस
#रवींद्रशोभणे

मराठी लेखक मंगेश उदगीरकर यांचा आज जन्मदिवस त्यांना देशमुख आणि कंपनीतर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!एक होतं जगणं या क...
14/05/2025

मराठी लेखक मंगेश उदगीरकर यांचा आज जन्मदिवस त्यांना देशमुख आणि कंपनीतर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

एक होतं जगणं या कादंबरीत काही मित्र स्वतःच्या पायावर उभे राहून जगण्याच्या इच्छेने मुंबईत येतात.बोरिवलीच्या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या झोपडपट्टीतील एका झोपडीत राहून एका औषध कारखान्यात सुरक्षा कर्मचाऱ्याची नोकरी करत वाट्याला आलेले जगणे आपली मने न काळवंडू देता उमेदीने व प्रामाणिकपणे कसे जगतात याची कहाणी साध्या सरळ पद्धतीने,कोणताही अविर्भाव न आणता या कादंबरीत सांगितली आहे.

पुस्तकाचे नाव - एक होतं जगणं !

मूळ किंमत - १२०/-

सवलतीत १२०/- रुपयांत घरपोच मिळेल.

संपर्क -
देशमुख आणि कंपनी
९३७०८४९०५६ / ७७९८५०९००७

#देशमुखआणिकंपनी
#जन्मदिवस
#मंगेशउदगीरकर

लेखक,अर्थतज्ञ् ,माजी केंद्रीय गृहसचिव आणि निवृत्त आयएएस अधिकारी डॉ.माधव गोडबोले यांचा आज स्मृतिदिन.त्यांचा स्मृतीस विनम्...
25/04/2025

लेखक,अर्थतज्ञ् ,माजी केंद्रीय गृहसचिव आणि निवृत्त आयएएस अधिकारी डॉ.माधव गोडबोले यांचा आज स्मृतिदिन.त्यांचा स्मृतीस विनम्र अभिवादन!

केंद्रीय गृहसचिव माधव गोडबोले यांनी या पुस्तकात प्रथमच सरकारी नोकरीतून निवृत्ती मागायला कोणती कारणे घडली हे विस्ताराने सांगितले आहे. घटनांचे वर्णन स्पष्ट, प्रामाणिक आणि पुर्वग्रह विरहित असून वाचकाला खिळवून ठेवणारे आहे. प्रशासकीय सेवेत कर्तव्यनिष्ठ, प्रामाणिक म्हणून ख्यातनाम असलेल्या लेखकाने वाचकाला भारतीय नोकरशाही आणि खरे राजकारणी यांच्यातील पडद्यामागील संघर्षाची ओळख करून दिली आहे.
या पुस्तकाचे मुख्य वैशिष्ट्य हे आहे की नोकरशाहीच्या जगाचे अंतर्बाह्य चित्रण करता करता व्यक्तिगत आयुष्यातील चढउतारही लेखकाने दाखविल्यामुळे केवळ प्रशासकीय सेवक आणि राजकारणी तत्वचिंतक यांनाच नव्हे, तर सामान्य वाचकालाही ते खिळवून ठेवते.
माधव गोडबोले यांच्या ‘अनफिनिश्ड इनिंग्ज’ या इंग्रजी पुस्तकाचा ‘अपुरा डाव’ हा मराठी अनुवाद आहे.

पुस्तकाचे नाव - अपुरा डाव

लेखक - डॉ. माधव गोडबोले

मूळ किंमत - ३५०/-

सवलतीत ३००/- रुपयांत घरपोच मिळेल.

#देशमुखआणिकंपनी
#अपुराडाव
#डॉ.माधवगोडबोले
#स्मृतिदिन

23/04/2025

जागतिक पुस्तक दिनानिमित्त देशमुख आणि कंपनीकडून सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

देशमुख कंपनीने प्रकाशित केलेल्या टॉप १० पुस्तकांवर आज सवलत जाहीर करीत आहोत.

संपर्क:-
देशमुख आणि कंपनी
९३७०८४९०५६ / ७७९८५०९००७

#देशमुखआणिकंपनी
#जागतिकपुस्तकदिन
#वाचक

२३ एप्रिल हा रवींद्र गोडबोले यांचा जन्मदिवस त्यांचा स्मृतीस विनम्र अभिवादन!रवी गोडबोले - सुलोचना देशमुख यांचा भाचा - देश...
22/04/2025

२३ एप्रिल हा रवींद्र गोडबोले यांचा जन्मदिवस त्यांचा स्मृतीस विनम्र अभिवादन!
रवी गोडबोले - सुलोचना देशमुख यांचा भाचा - देशमुख कंपनीचे ते संचालक देखील होते. त्यांनी लिहिलेल्या सम्राट अकबर पुस्तकाबद्दल -

कै. नरहर कुरुंदकर यांच्या 'आकलन' या पुस्तकात अकबरावर लिहिलेला एक विस्तृत लेख आहे. हा लेख १९७६ सालच्या 'सोबत' च्या दिवाळी अंकात प्रसिध्द झाला होता. मी हा लेख प्रथम कधी वाचला ते आता आठवत नाही. पण तो लेख मला आवडला होता आणि अकबराविषयीचे कुतूहल या लेखाने जागृत केले होते.

यानंतर मी, 'औरंगजेब - शक्यता आणि शोकांतिका' हे पुस्तक लिहिले. औरंगजेबाच्या धार्मिक धोरणांचा विचार करीत असताना अकबराचे धर्मविषयक धोरण समजावून घेणे आवश्यक होते. या निमित्ताने अकबराची अधिक ओळख झाली. हा माणूस सामान्य नव्हता एवढे लक्षात आले आणि कुरुंदकरांच्या लेखाने जागृत झालेले कुतूहल आणखी वाढले..
कामाच्या व्यापातून थोडी सवड मिळाली तेव्हा अकबरावर लिहिलेली पुस्तके वाचायला सुरुवात केली. पहिला धक्का बसला तो मराठीत अकबरावर असलेल्या लिखाणाच्या अभावाचा. अकबरावर स्वतंत्र लिहिलेले एकच मराठी पुस्तक सापडले. दुसरे पुस्तक नुकतेच नॅशनल बुक ट्रस्टने प्रकाशित केलेले अनुवादित पुस्तक होते. मुसलमानी रियासत आणि इतिहासाच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रमाला उपयुक्त असलेल्या पुस्तकांमध्ये अकबराची ठरीव आणि ठाशीव माहिती होती. मराठीचा नाद सोडून मी इंग्रजीकडे वळलो. इंग्रजी ग्रंथही संख्येने फार नव्हते पण परिश्रमपूर्वक आणि अभ्यासू वृत्तीने ते लिहिले होते. बहुतेक ग्रंथांमधून अकबराच्या राजकीय कारकिर्दीचा सखोल आढावा होता आणि धार्मिक धोरणांविषयीची चर्चा होती. मतभेद होते तिथे खंडन-मंडन पध्दतीने आपले म्हणणे आवेशपूर्ण पध्दतीने मांडले होते. अकबराची अर्थव्यवस्था, समाजसुधारणा, लष्करी ताकद, परराष्ट्र संबंध यांची जुजबी माहिती होती. पण यात कुठेही अकबराचे माणूसपण आणि त्याचा त्याने करून घेतलेला विकास याचा शोध घेतला नव्हता. ही पुस्तके
वाचूनही मी असमाधानीच राहिलो.
यानंतर ‘ऐन-इ-अकबरी' हा ग्रंथ हातात पडला. या ग्रंथाच्या रचनेने आणि त्यात दिलेल्या माहितीच्या स्वरूपाने मी थक्क झालो. चारशे वर्षांपूर्वी आपल्या देशात एका विद्वान गृहस्थाने हा ग्रंथ लिहिला आणि त्याची माहिती इतिहासाचे अभ्यासक सोडल्यास कोणालाच नसावी! या उपेक्षेमुळे मी अस्वस्थ झालो. त्यातच कै. कुरुंदकरांच्या लेखातील एका परिच्छेदाने भर घातली,
‘मी भारतीय आहे हा मुद्दा अकबर जन्मभर जपत होता. तो लोककल्याणकारी समाज निर्माण करण्यास झटत होता. भारतीय मुसलमान स्वतःला जेतेच समजत आले. हिंदू हे राज्य परकेच समजत आले. अकबराची फर्माने प्रथम दफ्तरात राहिली व नंतर विसरली गेली, हे कटुसत्य आहे. स्वेच्छेने उपलब्ध करून घेतलेला सर्व भोग अनिर्बंधपणे भोगणा-या, लोकांना आक्रमक वाटणा-या क्रांतिकारी सम्राटाला पुढच्या शतकातील इतिहासाचे अभ्यासक कौतुकाने वाखाणतील इतकेच भवितव्य असते.'
माझी इच्छा तर अकबराला सर्वसामान्य वाचकांपर्यंत पोचविण्याची होती. त्यासाठी मी अकबराच्या मूळ चरित्रकारांकडे वळलो.
अबुल फजल आणि मुल्ला अब्दुल कादिर बदायुनी हे अकबराचे दोन समकालीन चरित्रकार. त्यांनी लिहिलेली अकबराची चरित्रे, त्यांतील छोट्या-मोठ्या घटना आणि व्यक्त केलेली मते हा माझ्यासाठी जणू एक खजिनाच होता. या माहितीच्या आधाराने मी अकबराचे एक व्यक्तिचित्र मनात उभे करू शकत होतो.
पण मला सापडलेली ही माहिती, मी लावलेले अन्वयार्थ वाचकापर्यंत कसे पोचवायचे या प्रश्नाचे उत्तर मिळत नव्हते. अकबराचे बहुआयामी, बहुरंगी व्यक्तिमत्व वाचकांपर्यंत पोचविण्यासाठी इतिहासाच्या परंपरागत लेखनपध्दती अपु-या वाटत होत्या. कादंबरीत निर्माण होणारी काल्पनिकता अन्याय्य वाटत होती आणि पुस्तकाला जर वाचनीयता नसेल तर ते बहुसंख्य वाचकांना आवडणार तरी कसे हा प्रश्न भेडसावत होता.
मी माझ्या परीने एक नवा प्रयोग या लेखनाच्या रूपाने केला आहे. अकबराच्या चरित्रातील महत्त्वाच्या घटना, त्याच्या निकट असणा-या व्यक्ती, राज्यकारभाराच्या पध्दती, अकबराचे धर्म-तत्त्वज्ञान यांविषयी असणारे विचार आणि यांमधून प्रकट होणारे अकबराचे व्यक्तिमत्त्व अशी विभागणी करून एकूण बासष्ट प्रकरणे लिहिली आहेत. चरित्रातील घटना सोडल्या तर इतर प्रकरणांना विशिष्ट अशी संगती नाही. प्रत्येक प्रकरण स्वतंत्रपणे वाचता येईल अशी रचना जाणीवपूर्वक केली आहे. या प्रत्येक प्रकरणातून अकबर, त्याची शासनव्यवस्था आणि तत्कालीन सामाजिक स्थिती यांच्यासंबंधी काही माहिती वाचकाला मिळेल.

पुस्तक - सम्राट अकबर

लेखक - रवींद्र गोडबोले

मूळ किंमत - ४५०/- रुपये

संपर्क :
देशमुख आणि कंपनी
९३७०८४९०५६/ ७७९८५०९००७

#देशमुखआणिकंपनी
#रवींद्रगोडबोले
#सम्राटअकबर
#इतिहास

२३ एप्रिल हा रवींद्र गोडबोले यांचा जन्मदिवस त्यांचा स्मृतीस विनम्र अभिवादन!रवी गोडबोले - सुलोचना देशमुख यांचा भाचा - देश...
21/04/2025

२३ एप्रिल हा रवींद्र गोडबोले यांचा जन्मदिवस त्यांचा स्मृतीस विनम्र अभिवादन!
रवी गोडबोले - सुलोचना देशमुख यांचा भाचा - देशमुख कंपनीचे ते संचालक देखील होते. त्यांनी लिहिलेल्या महाभारत संघर्ष आणि समन्वय पुस्तकाबद्दल -

आपल्या मनोगतात गोडबोले लिहितात.

महाभारत हा ग्रंथ म्हणजे जणू एक अथांग, अमर्याद असा सागर आहे. त्याच्या तळाचा ठाव कधी लागत नाही आणि पैलतीरही दृष्टिक्षेपात येत नाही. खुद्द महाभारतातच असे म्हटले आहे की, ‘जगात जे आहे ते या ग्रंथामध्ये आहे आणि या ग्रंथामध्ये जे नाही ते जगात क्वचितच सापडेल.

हा ग्रंथ निर्माण झाल्यापासून आतांपर्यंत हिंदुस्थानातील कवि, धर्मशास्त्री विद्वान् किंवा सामान्य जन या सर्वांचे या ग्रंथाकडे लक्ष लागलेलें आहे, परंतु पाश्चिमात्य शिक्षणानें किंवा शोधांनी जी एक विचक्षणता प्राप्त होते त्या विचक्षणतेनें या ग्रंथाचें परीक्षण आमच्यापैकी कोणीं तरी पुनः करावयास पाहिजे होतें. अशा परीक्षणानें ग्रंथाच्या महत्त्वाची हानि होईल अशी जर कोणाची समजूत असेल, तर ती चुकीची आहे... त्यांतील कथानकांचें, आख्यानांचें, विषयांचें आणि इतिहासाचें महत्त्व सदर ग्रंथ नव्या कसोटीस लावण्यानें कमी होईल अशी आम्हांस बिलकुल भीति वाटत नाही. व्यासांनी जी ही देणगी आम्हांस देऊन ठेविली आहे ती चिरकाल टिकणारी आहे; आम्ही मात्र त्या देणगीचें स्वरूप न विसरतां तिचा उपयोग करून घेतला पाहिजे.

- लोकमान्य बाळ गंगाधर टिळक केसरी अग्रलेख
- दि. १४ मार्च १९०५

पुस्तक - महाभारत संघर्ष आणि समन्वय

लेखक - रवींद्र गोडबोले

किंमत - रु ६००

#देशमुखआणिकंपनी
#रवींद्रगोडबोले
#महाभारतसंघर्षआणिसमन्वय
#इतिहास

२३ एप्रिल हा रवींद्र गोडबोले यांचा जन्मदिवस त्यांचा स्मृतीस विनम्र अभिवादन!रवी गोडबोले - सुलोचना देशमुख यांचा भाचा - देश...
20/04/2025

२३ एप्रिल हा रवींद्र गोडबोले यांचा जन्मदिवस त्यांचा स्मृतीस विनम्र अभिवादन!
रवी गोडबोले - सुलोचना देशमुख यांचा भाचा - देशमुख कंपनीचे ते संचालक देखील होते. त्यांनी लिहिलेल्या वेदांचा तो अर्थ पुस्तकाबद्दल -

आपल्या मनोगतात गोडबोले लिहितात..

ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद, आणि सामवेद, आरण्यके, उपनिषदे, ब्राह्मण आणि सूत्र ग्रंथ.
मानवी इतिहासाचा एक प्राचीन, विशाल आणि अद्भुत ठेवा !

इन्द्र आणि वायू, मित्र आणि वरुण, रुद्र आणि मरुद्गण, आश्विनीकुमार आणि 'वामन' रुपातील त्रिविक्रम विष्णू. या वैदिक देवांचे नेमके स्वरूप काय होते ?

जलांमध्ये अग्नी उत्पन्न करणारा, अमरत्व देणारा, हिरण्याचे मूळ असलेला आणि • स्वर्गातून धरतीवर आलेला 'सोम' म्हणजे कोणता पदार्थ होता ?

अनेक प्रकारचे अग्नी ! स्वर्गात राहणारे वैश्वानर आणि मातारिश्वन् अंतरिक्षातील पवित्र अग्नी जातवेदस्, आणि यज्ञकुंडात प्रज्वलित केलेला मानवनिर्मित अग्नी यांच्यातील . परस्पर-संबंध काय होता?

यज्ञयाग करणारे भटके - पशुपालक वैदिक आर्य, महाभारतात वर्णन केलेली नगरे आणि राज्ये, सिंधू संस्कृतीच्या भग्न अवशेषांमधून प्रतीत होणारे तिचे भव्य, प्रगत आणि वैभवशाली रूप! हा एकाच प्राचीन संस्कृतीचा आविष्कार होता का ?

आजपर्यंत अनुत्तरित राहिलेल्या अशा अनेक प्रश्नांची खगोलशास्त्राच्या आधाराने आणि आधुनिक विज्ञानाच्या मदतीने शोधलेली 'तर्कनिष्ठ' आणि 'प्रांजळ' उत्तरे...

पुस्तक - वेदांचा तो अर्थ

लेखक - रवींद्र गोडबोले

किंमत - रु ५००

#देशमुखआणिकंपनी
#रवींद्रगोडबोले
#वेदांचातोअर्थ

२३ एप्रिल हा रवींद्र गोडबोले यांचा जन्मदिवस त्यांचा स्मृतीस विनम्र अभिवादन!रवी गोडबोले - सुलोचना देशमुख यांचा भाचा - देश...
19/04/2025

२३ एप्रिल हा रवींद्र गोडबोले यांचा जन्मदिवस त्यांचा स्मृतीस विनम्र अभिवादन!
रवी गोडबोले - सुलोचना देशमुख यांचा भाचा - देशमुख कंपनीचे ते संचालक देखील होते. त्यांनी लिहिलेल्या इंद्राचा जन्म पुस्तकाबद्दल -

आपल्या मनोगतात गोडबोले म्हणतात..

इंद्राचा जन्म' हे पुस्तक म्हणजे ऋग्वेदातील इंद्रजन्माच्या कथेची आधुनिक विज्ञानाच्या मदतीने संगती लावण्याचा केलेला एक प्रयत्न आहे.

सुमारे तीन वर्षांपूर्वी श्री विश्वास दांडेकर यांनी महाभारतातील कृष्णाच्या राजकारणावर लिहिलेले एक हस्तलिखित वाचण्याचा योग आला.निमित्ताने मी भारताच्या प्राचीन इतिहासाची मांडणी करणारे काही ग्रंथ वाचले. याच संदर्भात एका विद्वान प्राध्यापकांशी फोनवरून बोलणे झाले. मी प्राध्यापकांना सांगितले, 'या विषयात गेल्या काही वर्षांत बरेच नवीन संशोधन झाले आहे, त्याचा तुम्ही विचार करावा असे मला वाटते.' प्राध्यापकांनी मला सांगितले, 'हे संशोधन हिंदुत्ववादी असल्याने मी त्याच्याकडे दुर्लक्ष केले आहे.' हे उत्तर ऐकून मला धक्काच बसला. संशोधक हिंदुत्ववादी, साम्यवादी, वसाहतवादी, आंबेडकरवादी अशा कोणत्याही विचारसरणीचा असू शकतो. ते त्याचे व्यक्तिगत तत्त्वज्ञान किंवा श्रद्धा असू शकते. परंतु त्याचे संशोधन चांगल्या दर्जाचे किंवा सामान्य दर्जाचे असे असावे लागते. त्याचे निष्कर्ष बरोबर का चुकीचे हे समजून घ्यावे लागते. चुकीचे असतील तर त्याची कारणमीमांसा करावी लागते. ते प्रतिपादन खोडून काढता येते. परंतु त्याच्याकडे दुर्लक्ष करणे योग्य नसते.

इंद्राच्या जन्माचा हा सिद्धांत मी प्रथम मांडला तेव्हा तो 'तर्कदृष्ट्या योग्य वाटतो' अशी ग्वाहीही दिली. माटेसरांच्या मदतीशिवाय मी हे लिखाण करू शकलो नसतो.
काही घटना योगायोगानेही घडतात. माझे स्नेही, एम. बी. डब्ल्यू. लिमिटेड, यु.के. चे मॅनेजिंग डायरेक्टर श्री. ग्रेग सॅण्डिफोर्ड यांनी मला 'युरिएल्स मशीन' हे पुस्तक भेट म्हणून इंग्लंडहून पाठविले. अन्यथा हे पुस्तक माझ्या वाचनात येण्याच्या शक्यता फार कमी होत्या.

'युरिएल्स मशीन' या पुस्तकात धूमकेतू आणि पृथ्वी यांची टक्कर होण्याची शक्यता, अशा टकरीचे होणारे परिणाम व भूतकाळात अशा घटना घडून गेल्या असल्याचे पुरावे यांचे विवेचन केले आहे. हे विवेचन माझ्या स्मरणात राहिले. ऋग्वेदाचे इंग्रजी भाषांतर वाचत असताना त्यातील इंद्राच्या जन्माचे व जन्मताच केलेल्या संघर्षाचे वर्णन करणाऱ्या ऋचा म्हणजे आकाशात दिसलेल्या धूमकेतूचे व त्याच्या पृथ्वीशी झालेल्या टक़रीचे लाक्षणिक वर्णन असू शकेल असे माझ्या लक्षात आले. अर्थात हा कल्पनाविलास असणेही सहज शक्य होते. जर ॠग्वेद रचनेच्या काळात व ज्या प्रदेशात ऋग्वेद रचला गेला त्या प्रदेशात खरोखरच धूमकेतू पडला असेल तर त्याच्या काही भौतिक खुणा शिल्लक राहणे आवश्यक होते. अशा खुणा कुठे सापडू शकतील याचा संदर्भ मला ऋग्वेदातच सापडला. या भौतिक पुराव्याच्या आधारानेच मी या सिद्धांताची मांडणी केली आहे.

'सोम' आणि 'सोमरस' हे ऋग्वेदातील आणखी एक कोडे. हे कोडे अजून समाधनकारकरित्या सुटलेले नाही. इंद्र आणि सोम यांचा घनिष्ट संबंध सर्वज्ञात आहे. इंद्रजन्माच्या या सिद्धांताच्या आधाराने मी 'सोम' हे कोडे उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. 'अश्विनीकुमार' या जुळ्या देवांच्या जन्माविषयी प्रसिद्ध ज्योतिर्विद श्री. अभ्यंकर यांनी लिहिलेला एक लेख माझ्या वाचनात आला होता. त्याच्या आधाराने मी अश्विनीकुमार आणि इंद्र यांच्यामधील दुवा जोडण्याचा प्रयत्न केला आहे.

पुस्तक - इंद्राचा जन्म

लेखक - रवींद्र गोडबोले

मूळ किंमत - २००/- रुपये

संपर्क :
देशमुख आणि कंपनी
९३७०८४९०५६/ ७७९८५०९००७

#देशमुखआणिकंपनी
#रवींद्रगोडबोले
#इंद्राचाजन्म

२३ एप्रिल हा रवींद्र गोडबोले यांचा जन्मदिवस त्यांचा स्मृतीस विनम्र अभिवादन!रवी गोडबोले - सुलोचना देशमुख यांचा भाचा - देश...
18/04/2025

२३ एप्रिल हा रवींद्र गोडबोले यांचा जन्मदिवस त्यांचा स्मृतीस विनम्र अभिवादन!
रवी गोडबोले - सुलोचना देशमुख यांचा भाचा - देशमुख कंपनीचे ते संचालक देखील होते. त्यांनी लिहिलेल्या औरंगजेब शक्यता आणि शोकांतिका पुस्तकाबद्दल -

औरंगजेबाचा अभ्यास करणे का महत्त्वाचे आहे याविषयी प्रा. नरहर कुरुंदकर यांनी म्हटले आहे,

'आलमगीर म्हणजे धर्मवेडा पिसाट पुरुष नाही. तो पुरेसा क्रूर होता. पण तसाच युद्धतज्ज्ञ, राज्यकारभारप्रवीण, धूर्त व संथ होता. कर्तबगार, चाणाक्ष आणि व्यवहारवादी होता. औरंगजेब जे करीत होता, ते पिसाट धर्मवेड नव्हते. ज्या जेत्यांचा तो प्रतिनिधी होता, त्यांचे वर्चस्व टिकविण्याचा तो निर्णायक लढा होता. अशा निर्णायक लढ्यात तडजोड शक्य नसते. औरंगजेबाचा पराभव हा त्याचा पराभव नव्हता, गझनीपासून त्याच्यापर्यंतच्या इस्लामविजयाचा तो शेवट होता. हा औरंगजेब आपण कधी समजून घेत नाही. म्हणून शिवाजी आपल्याला समजत नाही.'

औरंगजेबाचा संपूर्ण कार्यकाळ आणि त्याची सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक पार्श्वभूमी समजून घेण्यासाठी 'औरंगजेब : शक्यता आणि शोकांतिका' हे 'देशमुख आणि कंपनी'ने प्रकाशित केलेले पुस्तक अतिशय उपयुक्त आहे. या काळात घडलेल्या घटनांचे हिंदुस्थानच्या इतिहासावर पुढे जे दूरगामी परिणाम झाले त्यांचाही आढावा लेखक रवीन्द्र गोडबोले यांनी पुस्तकात घेतला आहे. ते आपल्या मनोगतात म्हणतात,

'औरंगजेबाची सम्राट म्हणून कारकीर्द जवळपास पन्नास वर्षांची आहे. या पन्नास वर्षांमध्ये यशापयशाचे अनेक चढउतार औरंगजेबाने पाहिले. त्याचे व्यक्तिमत्त्व, विचार करण्याची पद्धत आणि निकटचे सहकारी हे सगळेच या कालखंडांमध्ये बदलते राहिले. त्याची धर्मनिष्ठा आणि त्याचे शत्रू मात्र फारसे बदलले नाहीत. बदलत्या परिस्थितीनुसार बदलत गेलेल्या औरंगजेबाच्या व्यक्तिमत्त्वाचा मी विचार केला आहे. एक सम्राट म्हणून औरंगजेब तत्कालीन हिंदुस्थानातील सर्वात सामर्थ्यवान पुरुष होता. आपल्या सामर्थ्याचा वापर करण्याच्या हर तऱ्हेच्या शक्यता त्याला प्रत्येक महत्त्वाच्या प्रसंगी उपलब्ध होत्या. त्याच्यावर मर्यादा असलीच तर ती इस्लामच्या उपदेशाचे कठोर आचरण करण्याची होती; आणि ही मर्यादा त्यानेच स्वतः वर लादून घेतली होती. या एकाच मर्यादेमुळे अनेक शक्यतांचा संकोच झाला, इतकेच नव्हे तर अनेक शोकांतिकांनाही सुरुवात झाली. या शोकांतिका औरंगजेबाच्या वैयक्तिक आणि राजकीय आयुष्यापुरत्याच मर्यादित राहिल्या नाहीत; तर त्यांच्या काळ्या सावल्या संपूर्ण हिंदुस्थानच्या इतिहासावर पसरल्या गेल्या. या सावल्यांपासून आज तीनशे वर्षांनंतरही आपण संपूर्णपणे मुक्त झालेलो नाही.'

पुस्तक - औरंगजेब : शक्यता आणि शोकांतिका

लेखक - रवीन्द्र गोडबोले

मूळ किंमत - ५०० रुपये

संपर्क :
देशमुख आणि कंपनी
९३७०८४९०५६/ ७७९८५०९००७

#देशमुखआणिकंपनी
#शिवाजीमहाराज
#औरंगजेब
#इतिहास

Address

N C Kelkar Road
Pune
411030

Opening Hours

Monday 10am - 6pm
Tuesday 10am - 6pm
Wednesday 10am - 6pm
Thursday 10am - 6pm
Friday 10am - 6pm
Saturday 10am - 6pm

Telephone

+917798509007

Alerts

Be the first to know and let us send you an email when Deshmukh and Company posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Deshmukh and Company:

Share

Category