05/03/2026
हॉटेल गोविंद प्युअर व्हेज रेस्टॉरंट, सोलापूर-धुळे महामार्ग
सोलापूर–धुळे राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करताना छान, स्वच्छ आणि शुद्ध शाकाहारी जेवण मिळावे अशी अनेकांची इच्छा असते. अशा प्रवाशांसाठी कचनेर फाटा येथे असलेले हॉटेल गोविंद हे उत्तम ठिकाण ठरत आहे. छत्रपती संभाजीनगर शहरापासून बीडच्या दिशेने अवघ्या २५ किलोमीटर अंतरावर पांढरी पिंपळगाव परिसरात हे हॉटेल आहे.
शेतकरी कुटुंबातून आलेले मुकेश सूर्यवंशी यांनी ग्रामीण चवीचा आणि शुद्धतेचा विचार करून हे हॉटेल सुरू केले आहे. स्वच्छता, शुद्धता आणि ग्राहकांना समाधानकारक सेवा देणे यावर हॉटेल गोविंदमध्ये विशेष भर दिला जातो. त्यामुळे स्थानिकांसह महामार्गावरून जाणारे अनेक प्रवासी येथे जेवणासाठी आवर्जून थांबतात.
हॉटेलमध्ये पारंपरिक काळ्या मसाल्यातील भाज्या ही खासियत आहे. तसेच ठेचा पराठा हा पदार्थ खवय्यांच्या विशेष पसंतीस उतरला आहे. याशिवाय उंबर हंडी, काळ्या मसाल्यातील विविध भाज्या, बाजरीची चपाती असे ग्रामीण चवीचे पदार्थ येथे रास्त दरात मिळतात. घरगुती पद्धतीची चव आणि ताजे जेवण हीच हॉटेलची ओळख बनली आहे.
सकाळी आठ वाजल्यापासून येथे साऊथ इंडियन आणि महाराष्ट्रीयन नाश्ता उपलब्ध असतो. त्यामुळे सकाळच्या प्रवासात असलेल्या लोकांसाठीही हे हॉटेल सोयीचे ठरते.
फक्त जेवणच नाही तर हॉटेल गोविंदमध्ये मुक्कामासाठी प्रशस्त आणि आरामदायी रूम्स देखील उपलब्ध आहेत. त्यामुळे कुटुंबासह प्रवास करणाऱ्या लोकांना सुरक्षित आणि आरामदायी निवासाची सुविधा येथे मिळते. विशेष म्हणजे हॉटेलच्या बाजूलाच पेट्रोल पंप असल्यामुळे परिसर सुरक्षित आणि सोयीस्कर आहे.
याशिवाय हॉटेलमध्ये बँक्वेट हॉल देखील उपलब्ध आहे. येथे वाढदिवस, साखरपुडा, कौटुंबिक कार्यक्रम तसेच ऑफिस मिटिंग यांसारखे विविध कार्यक्रम आयोजित करता येतात.
ग्रामीण चव, स्वच्छता, उत्तम सेवा आणि रास्त दर या सर्व गोष्टींचा उत्तम संगम म्हणजे हॉटेल गोविंद. त्यामुळे सोलापूर–धुळे हायवेवरून प्रवास करत असाल तर एकदा तरी येथे थांबून चविष्ट जेवणाचा आनंद नक्की घ्या.
पत्ता : हॉटेल गोविंद, कचनेर फाटा, ता. जि. छत्रपती संभाजीनगर
सोलापूर–धुळे राष्ट्रीय महामार्ग
मो. 8237177070