04/10/2023
युवा उद्योजक पुनीत बालन यांना पुणे महानगरपालिकेची नोटीस आली त्याबद्दल सोशल मीडियावर विविध पोस्ट वायरल झाल्या, पण कोरोना काळातलं त्यांचं काम, समाजातल्या सर्वच लोकांना आर्थिक मदत तसेच जीवनावश्यक वस्तू या काळात त्यांनी दिल्या, कश्मीरमध्ये देशासाठी सुरू असलेलं काम, क्रीडा तसेच सांस्कृतिक क्षेत्रातील काम हे अतिशय मोठ आहे, अनेक राजकारणी नुसत्या थापा मारतात आश्वासन देतात, पण पुनीत बालन हे नेहमीच गरजूंच्या पाठीशी उभे असतात त्यामुळे आधी इतर राजकीय पक्ष त्यांचे नेते यांनी केलेली बॅनर बाजी महापालिकेला दिसत नाही, केवळ चांगल्या व्यक्तीकडून पैसे काढणे यातच त्यांना समाधान वाटते, त्यामुळे इतर लोकांवर देखील महापालिकेने कारवाई करावी, तसेच पैसे भरण्यासाठी दिलेली दोन दिवसाची मुदत ही देखील मनामध्ये शंका आणते, त्यामुळे कोणाच्या दबावाखाली महापालिका काम करते आहे का ? दंड आकारला तर तो सर्वांनाच आकारला गेला पाहिजे.
जाहीर निषेध !!