Sarnath Buddha Vihar Kharadi

Sarnath Buddha Vihar Kharadi भवतू सब्ब मंगलम!!

सर्वांना मैत्रीपूर्ण जयभीम..🌸🌸🙏🏻🌸🌸आज सारनाथ बुद्ध विहार खराडी पुणे येथे साप्ताहिक पूजा वंदना तसेच ज्येष्ठ पौर्णिमा ही खू...
31/05/2026

सर्वांना मैत्रीपूर्ण जयभीम..
🌸🌸🙏🏻🌸🌸
आज सारनाथ बुद्ध विहार खराडी पुणे येथे साप्ताहिक पूजा वंदना तसेच ज्येष्ठ पौर्णिमा ही खूप आनंदात आणि उत्साहात साजरी करण्यात आली.
आज विहारात मार्गदर्शनासाठी उद्याचा मोठा वक्ता लाभला. अश्या या आपल्या बाल वक्त्याने मोठ्यांना लाजवेल अश्या आपल्या विशिष्ट शैलीत आजची पौर्णिमा प्रभावीपणे विश्लेषित केली, ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिनी घडलेल्या बौद्धकालीन घटनेच्या छोटे छोटे बारकावे आमच्या वक्त्याने मोठ्या कसाबने सांगितले आणि सर्वांना मंत्र मुग्ध करून ठेवले. प्रत्येकास प्रेरणा असावी असा आमचा आजचा वक्ता होता...
*सम्यक सुजाता नवनाथ कुचेकर*
कमिटी कडून या आमच्या वक्त्यांचे खूप खूप कौतुक, अभिनंदन आणि शुभेच्छा....
आज विहारात मंगलमय वातावरणात पूजा वंदना, आनापान सती ध्यान, सुंदर असे प्रवचन , मंगलमैत्री आणि धम्म पालन गाथा असा कार्यक्रम पार पडला.
सर्व उपस्थित श्रद्धावान उपासक उपासिका यांचे मनःपूर्वक आभार...
सूत्र संचालन: देवेंद्र दिपके
तर आभार : संदीप कांबळे यांनी पार पाडले..

काल सायंकाळी सारनाथ बुद्ध विहार खराडी पुणे येथे *धम्म चिंतन सोहळा* हर्षोल्लासात पार पडला.काल विहारातील वीज खंडित झाली हो...
29/05/2026

काल सायंकाळी सारनाथ बुद्ध विहार खराडी पुणे येथे *धम्म चिंतन सोहळा* हर्षोल्लासात पार पडला.
काल विहारातील वीज खंडित झाली होती पण मोबाईल टॉर्च, मेणबत्त्या आणि धम्म श्रवण करण्याची आंतरिक ऊर्जा ह्यामुळे विहार उजळून गेले होते आणि उल्हास अजिबात कमी झाला नव्हता किंबहुना तो अधिकच होता.
कालच्या सत्रात *पूजनीय भिक्खू रत्नदीपजी थेरो* यांनी *मन शांत करणारे ध्यान, जुने संस्कार सोडून नवीन संस्कार अंगीकारणे, इतरांचे काही न घेता आपले सहज वाटत राहावे हा धम्म विचार, मंगलमैत्री आणि आशीर्वाद* असा मंगलमय कार्यक्रम सुंदर रित्या घडविला.
भिक्खू रत्नदीपजी थेरो यांचे खूप खूप आभार.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन: आयु सोमा भोसले.
आभार प्रदर्शन: आयु राजेश कांबळे साहेब यांनी पार पाडले.

बोधीसत्व वर्गातर्फे ऐनवेळी स्पीकर, इमर्जेन्सी बल्ब उपलब्ध केल्या बद्दल आपले विशेष आभार.
सर्व श्रद्धावान उपासक उपासिकांचे तसेच ह्या कार्यक्रमासाठी कष्ट घेणाऱ्या सर्वांसाठी सुद्धा खूप खूप धन्यवाद.
काल साईनाथ नगर या भागातून जास्त प्रमाणात उपासक उपासिका उपस्थित होते त्यांचे सर्वांचे विशेष कौतुक...

आपलेच
सारनाथ बुद्ध विहार
खराडी पुणे

*⛩सारनाथ बुद्ध विहार⛩*                *आणि*🔆*अमर ज्योत मित्र मंडळ*🔆    *⛩ खराडी, पुणे⛩*💠============💠  *🔆भंते रत्नदीप थे...
28/05/2026

*⛩सारनाथ बुद्ध विहार⛩*
*आणि*
🔆*अमर ज्योत मित्र मंडळ*🔆
*⛩ खराडी, पुणे⛩*
💠============💠
*🔆भंते रत्नदीप थेरो यांची धम्म देसना 🔆*
💠============💠
🔹*गुरूवार दि. २८ मे २०२६*
🕖*सायं ठीक ७.०० वा.*
▶️ *प्रमुख मार्गदर्शक - पूजनीय भिक्खू रत्नदीपजी थेरो*
~~~~~~~~~~~~~~~
*सूत्रसंचालन: आयु सोमा भोसले.*
*आभार प्रदर्शन: आयु राजेश कांबळे.*
*👉कार्यक्रमाची रूपरेषा*
🔹 पूजा वंदना
🔹 अनापान सती
🔹 समाधी
🔹 धम्म देसना
🔹 मंगल मैत्री आणि
आशीर्वाद.
━━━━━━✦•✿•✦━━━━━
•─╼⃝𖠁 *नमो बुद्धाय* 𖠁⃝╾─•
━━━━━━✦•✿•✦━━━━━
*चला विहाराकडे.*
*नमो बुद्धाय*

सर्वांना मैत्रीपूर्ण जयभीम
🌸🌸🙏🏻🌸🌸

सर्व उपासक- उपासिकांना कळविण्यात आनंद होतो आहे की, आपल्या सारनाथ बुद्ध विहारात *पूजनीय भिक्खू रत्नदीपजी थेरो यांची श्रवणीय धम्म देसना* आयोजित करण्यात आली आहे, तेव्हां सर्वांनी ह्या सुवर्ण संधीचा अवश्य लाभ घ्यावा.
सर्व श्रद्धावान उपासक/उपासिकांनी सहपरिवार वेळेवर उपस्थित रहावे अशी नम्र विनंती.

_टिप : कमिटी कडून भोजनाची व्यवस्था करण्यात येणार आहे._

*आपलेच,*
*सारनाथ बुद्ध विहार,*
*खराडी पुणे.*

*☸भवतु सब्ब मंगलम☸*

25/05/2026

सारनाथ बुद्ध विहार खराडी पुणे येथे संपन्न झालेल्या १० दिवसीय श्रामणेर शिबिरातील काही चित्रफिती...
✅ पुण्यानुमोदन गाथा.
✅ सब्ब सुख गाथा
✅ धम्म पद यात्रा.
🌷 प्रमुख मार्गदर्शक : भिक्खू रत्नदीपजी थेरो...🌷

काल सायंकाळी कटारनवरे बाबा व मावशी यांच्या लग्नाचा ४५ वां वाढदिवस सारनाथ बुद्ध विहाराच्या टीम ने त्यांच्या घरी जाऊन साजर...
24/05/2026

काल सायंकाळी कटारनवरे बाबा व मावशी यांच्या लग्नाचा ४५ वां वाढदिवस सारनाथ बुद्ध विहाराच्या टीम ने त्यांच्या घरी जाऊन साजरा केला.
मंगल क्षणाची क्षण चित्रे....

19/05/2026

श्रामणेर धम्म संस्कार प्रशिक्षण शिबिर २०२६
धम्म पद यात्रा : साईनाथ नगर वडगाव शेरी पुणे.

19/05/2026

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
अक्षद आनंदा वाकोडे उर्फ श्रामणेर आर्यमित्त यांनी शिबिर संपल्यावर त्यांच्या घरी सुंदर असा छोटेखानी कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमात त्यांनी शिबिरात येऊन काय शिकले यावर जवळच्या मित्र मंडळी, नातलग यांना घरी बोलावून सांगितले व थोडक्यात देसना दिली.
असा बदल अपेक्षित आहे.
वाकोडे परिवाराचे खूप खूप अभिनंदन आणि कौतुक.
खरच अक्षद शिबिरात खूप शांत आणि शिस्तशीर पद्धतीने सहभागी झाला होता.
अक्षद चे सुद्धा खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा....
तसेच हर्षबोधी म्हणजेच हर्ष महेश भालेराव यांच्या घरी सुद्धा अध्याच प्रकारचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यांचे सुद्धा मनःपूर्वक अभिनंदन....
🌺 अंततः ज्यांना ज्यांना आपल्या मुलांमध्ये असा सकारात्मक बदल अपेक्षित आहे त्यांनी पुढील वर्षी नक्की आपल्या मुलांना श्रामणेर धम्म संस्कार प्रशिक्षण शिबिरात सहभागी करा....🌺
🌸🙏🏻🌸🙏🏻🌸🙏🏻

17/05/2026

श्रामणेर धम्म संस्कार प्रशिक्षण शिबिर २०२६...
सारनाथ बुद्ध विहार
खराडी पुणे येथे

🌸✨*श्रामणेर धम्म संस्कार प्रशिक्षण शिबिर २०२६ - सांगता मंगल सोहळा*🌸✨सर्वांना मैत्रीपूर्ण जयभीम,१४ मे रोजी सायंकाळी सारना...
16/05/2026

🌸✨*श्रामणेर धम्म संस्कार प्रशिक्षण शिबिर २०२६ - सांगता मंगल सोहळा*🌸✨

सर्वांना मैत्रीपूर्ण जयभीम,
१४ मे रोजी सायंकाळी सारनाथ बुद्ध विहार आणि अमर ज्योत मित्र मंडळ खराडी पुणे आयोजित श्रामणेर शिबिराचा समारोपिय कार्यक्रम मंगलमय वातावरणात आणि मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व शिबिरार्थिंना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले आणि *सर्वोत्तम अश्या श्रामनेराची* निवड करण्यात आली. तसेच शिबिरास अहोरात्र अशी सेवा देणाऱ्यास *उत्कृष्ट धम्मसेवक* हा पुरस्कार देण्यात आला.
या सोहळ्यात मोलाचे मार्गदर्शन *पूजनीय भिक्खू रत्नदीप थेरो* यांचे लाभले तर सोबतच *भंते धम्मानंद* यांचे सुद्धा सहकार्य लाभले.
*सर्वोत्कृष्ट श्रामणेर हा बहुमान श्रामणेर देवमित्त म्हणजे देवांश सचिन शिंदे*
तर *उत्कृष्ट धम्मसेवक म्हणून मान आयु संघर्ष अनिल चव्हाण* यांना मिळाला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन:
*आयु देवेंद्र दिपके.*
प्रास्ताविक :
*आयु मधुकर मोकळे*
आभार :
*आयु राजेश कांबळे.*
यांनी पार पाडले.
*या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी कष्ट केलेत त्यांचे तसेच संपूर्ण दान कर्त्यांचे मनःपूर्वक आभार....*

आपलेच
सारनाथ बुद्ध विहार.

Address

Sarnath Buddha Vihar, Kharadi Gaon, PMPML Last Bus Stop, Kharadi
Pune
411014

Telephone

+919922992079

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sarnath Buddha Vihar Kharadi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Sarnath Buddha Vihar Kharadi:

Share