
22/07/2025
आधी मोगली आणि नंतर चिकु आल्यापासून टेरेसमधली झाडं , कुंड्या सगळं काढून टाकलं होतं , आता नव्यानं सगळं परत जमवते आहे .
काही रोपं अजून काळ्या पिशवीत आहे आपली लेबलं सांभाळत आमच्या गच्चीत येऊन बसली आहेत . नर्सरीतलं पाणी आणि अन्न यावर फुलली आहेत , काही फुलं येऊन सुकली काही कळ्या फुलू बघतायत .
गच्चीत फुलझाडं आहेत , फुलांचा सुगंध आहे प...ण
ही आयती आहेत फुलं , यात माझा जिव्हाळा नाही माझी मेहनत नाही , माझं संगोपन नाही .
हं ! छान दिसतेय गच्ची , हिरवं दिसतंय प्रसन्न वाटतंय , एवढंच !!!
अलिप्तता हीच का ?
का यात मी नाही म्हणून असणारा अहं ?