10/01/2017
छात्र प्रबोधन रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त निगडीत राज्यस्तरीय कुमार साहित्य संमेलनाचे उद्घाटन... छात्र प्रबोधन हे केवळ छात्र प्रबोधन नव्हे तर मुल्य प्रबोधन, विचार प्रबोधन आणि विज्ञान प्रबोधन आहे, सर्वात महत्वाचे म्हणजे ज्ञान विज्ञान, कृती आणि विचार यांचा उत्तम संगम छात्र प्रबोधनने केलेला आहे, असे मनोगत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्त केले. छात्र प्रबोधन रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त निगडी येथे राज्यस्तरीय कुमार साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी दै. सकाळचे ज्येष्ठ पत्रकार मल्हार अरणकल्ले, ज्ञान प्रबोधिनी निगडी केंद्राचे प्रमुख वा.ना. अभ्यंकर, छात्र प्रबोधनचे संपादक महेंद्र सेठीया, ज्ञान प्रबोधिनीचे संचालक डॉ. गिरीश बापट, शैलजा देशमुख, मनोज देवळेकर आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते 15 पुस्तकांच्या संचाचे प्रकाशन करण्यात आले.
News - http://mpcnews.in/index.php/component/k2/item/26707-2017-01-07-14-26-14
Jnana Prabodhini Nigdi Jnana Prabodhini Prashala Jnana Prabodhini Yuvati Vibhag Jnana Prabodhini (Solapur, Harali) ज्ञान प्रबोधिनी (सोलापूर, हरळी)