
09/04/2025
पुण्यात रहाणारे आणि बाहेरून येणारे उपचारासाठी जाण्याआधी हे अवश्य वाचा .
काॅपी करून योग्य ठिकाणी ठेवा .
पुण्यातील 56 रुग्णालयांकडून अंमलबजावणी होणार, पुणे शहरातील रुबी, जहांगीर, पुना हॉस्पिटल, संचेती हॉस्पिटल, सह्याद्री, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, आदित्य बिर्ला हॉस्पिटल ही सर्व हॉस्पिटल्स धर्मादाय आयुक्तालयाच्या अंतर्गत येत असल्याची मुळी कल्पनाच रुग्णांना नसल्यामुळे रुग्ण या रुग्णालयांच्या चकचकीत पणा कडे बघत घाबरत होते, मुळात ही सर्व मोठमोठी धर्मादाय रुग्णालये असुन सुद्धा या पंचतारांकित रुग्णालयांकडे अनेकदा गरीब रुग्ण घाबरुन मागे फिरतात.
याच गोष्टीची जाणीव ठेऊन आमदार लक्ष्मण जगताप यांनी वेळोवेळी विधान सभेमध्ये प्रश्न उपस्थित करुन, मुख्यमंत्र्यांना व धर्मादाय आयुक्तांना पत्रव्यवहार करून वेळोवेळी पाठपुरावा केला शासनाला जाग आणुन दिली आणि आज अखेर या प्रयत्नाला यश आले आहे, याचा फायदा संपुर्ण महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेला होणार आहे, उंच उंच चकचकीत रुग्णालयात धर्मादाय आहे याची कल्पना अनेक रुग्णांना नसते. त्यामुळे अनेक रुग्ण सवलतीच्या दरांतील तसेच मोफत उपचारांच्या योजने पासून वंचित राहतात. पुढील काळात असे होऊ नये म्हणून आता या धर्मादाय रुग्णालयांना त्यांच्या नावापुढे धर्मादाय हा शब्द लावणे बंधनकारक करण्यात आले आहे, यामुळे पुण्यातील 56 धर्मादाय रुग्णालयांना धर्मादाय हा शब्द त्यांच्या नावापुढे लावावा लागणार आहे.
राज्यातील सर्व रुग्णालयांना आदेश लागू
धर्मादाय शब्द लावण्या बाबतचा निर्णय संपूर्ण राज्यासाठी लागू आहे, राज्यात एकूण 430 धर्मादाय रुग्णालये असून त्यांतर्गत दहा टक्के खाटा या 1 लाख 80 हजार वार्षिक उत्पन्न असलेल्या आर्थिक दुर्बलांसाठी तर आणखी दहा टक्के खाटा या निर्धन 85 हजार वार्षिक उत्पन्न असणाऱ्या रुग्णांसाठी राखीव आहेत. आर्थिक दुर्बल रुग्णांना उपचारांमध्ये 50 टक्के सवलत तर निर्धन रुग्णांना पूर्णपणे मोफत उपचार मिळण्याची तरतूद उच्च न्यायालयाने 2003 मध्ये एका निकालाद्वारे केली आहे, राज्यातील सर्व धर्मादाय रुग्णालयांना त्यांच्या नावापुढे “धर्मादाय’ हा शब्द लावण्याचे निर्देश बैठकीत दिले आहेत, त्यामुळे सर्वसामान्यांना ते रुग्णालय धर्मादाय आहे की नाही याची माहिती होईल, वरून कॉर्पोरेट वाटणाऱ्या धर्मादाय रुग्णालयांत गरीब रुग्णांना उपचार घेता येईल.
धर्मादाय रुग्णालयाचे नाव/वैद्यकीय केंद्राचे नाव
१ रुबी हॉल क्लिनिक,४०, ससून रोड, पुणे-४११००१.
२ जहांगीर हॉस्पिटल,३२, ससून रोड, पुणे -४११००१.
३ एन एम वाडिया कार्डीओलॉजी हॉस्पिटल, जहांगीर हॉस्पिटल जवळ, ३२, ससून रोड, पुणे-
४ एन एम वाडिया हॉस्पिटल, २८३, शुक्रवार पेठ, पुणे-४११००२.
५ ईनलॅक्स अॅण्ड बुधराणी हॉस्पिटल, ७-९ , कोरेगाव पार्क, पुणे-४११००१.
६ के ई एम हॉस्पिटल,४९९ ,रास्तापेठ, पुणे-४११०११.
७ संचेती हॉस्पिटल, १६, शिवाजीनगर , पुणे-४११००४