
31/05/2025
आभार पोस्ट!!
एखादी गोष्ट सुरू करायची म्हटलं की आपल्याबरोबरच्या लोकांची साथ खूप महत्त्वाची असते.
पुणे वुमन्स क्लब वर तुम्ही करत असलेल्या प्रेमाचे मला खरंच खूप कौतुक वाटते.
गेल्यावर्षी एप्रिल महिन्यापासून आपली या ग्रूपच्या कन्सेप्ट्सला सुरुवात झाली. पुणे वुमन्स क्लब चे
Meet ups ❤️
आपले ज्वेलरी शूट
सेमिनारस अँड वर्कशॉप्स
Legal aid कॅम्पस
Psychology expert committee!!
आपल्या हळदी कुंकवाचा समारंभ
नृत्यरंग
पॉडकास्ट विथ Nira
आणि अजून बरच काही आपण यावर्षी पार पाडले. एक गोष्टीवर मी ठाम होते की जे काही करायचे ते आपल्या महिलांना पुढे घेऊन जाण्यासाठी करायचय.
आपल्या मैत्रिणीला आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी करायचे.
आर्थिकदृष्ट्या सक्षम यासाठी की तुम्हाला तुमचे निर्णय स्वतः घेता यावे कोणाला विचारायची गरज लागू नये आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये बिझनेस कसा तयार करायचा किंवा स्वतःचा उदरनिर्वाह कसा निर्माण करायचा हे जर का मी दहा लोकांना जरी शिकवू शकले तरी त्यांची पूर्ण फॅमिली ही वेगळ्या प्रकारे त्यांची ग्रोथ होणार आहे ते मला माहिती होतं, त्यामुळे हा प्रयत्न करताना आम्ही त्याच लोकांना डोळ्यासमोर ठेवलं आणि खूप साऱ्या गोष्टी करायला सुरवात केली.
आम्हाला कळून ale की डिजिटल मार्केटिंगचा या गोष्टींमध्ये काय रोल आहे ??
महिलांना स्वतःबद्दल बोलायला देण्यासाठीचा जो प्लॅटफॉर्म आहे तो अवेलेबल करन्याची गरज किती आहे??
जिथे वर्ल्ड चॅम्पियन झालेल्या महिला किंवा आपल्या कॉलेज लाईफ मध्ये खूप काही कमावलेल्या महिला आता आपल्या एका आयुष्याचा भाग असलेल्या जीवन चक्रामुळे जेव्हा कॉन्फिडन्स लूज करतात त्यांना परत त्यांच्या पायावर उभं करणं ही किती मोठी गोष्ट आहे!!
तेव्हा या सगळ्या गोष्टींमध्ये काम करण्याचा उत्साह माझा अजून वाढला!!
14 हजार पेक्षा जास्त महिला!!!
300 पेक्षा जास्त पॉडकास्ट!!
१० meetups!!
25 पेक्षा जास्त इव्हेंट आपण गेल्यावर्षी करू शकलो!!!
हे सगळं करत असताना तुमच्याबरोबर माझीही ग्रोथ खूपच वेगाने झाली!! एक वर्षाच्या मुलीकडे लक्ष देताना आणि त्याच बरोबरीने नवीन संकल्पना राबवताना मला खरंच खूप मजा आली!!
हे सगळं करत असताना खूप नव्या आयडिया येत होत्या खूप साऱ्या गोष्टी मला आपल्या उद्योजकांबरोबर करायचे आहेत फक्त बोलून किंवा फक्त ती आयडिया शेअर करून नाही तर प्रत्यक्षात उतरवायची आहे त्यामुळे आम्ही आता
पुणे वुमन्स क्लब एक्सक्लूसीम मेंबरशिप ची कन्सेप्ट अमलात आणली आहे.
जेणेकरून पर्सनली आपण पुणे वुमन्स क्लब चा प्लॅटफॉर्म त्यांच्यासाठी कसा युज करू शकतो या गोष्टीवर फोकस होऊन काम करता येईल. 14000 महिलांपैकी सगळ्याच लोकांना आपण एकत्र लक्ष देऊ शकत नाही . त्यामुळे सुरुवात आपण पहिल्या पन्नास पासून करत आहोत आणि मेंबरशिप ची घोषणा केल्यानंतर पुढच्या वीसच दिवसात आपला पहिला ग्रुप तयार झाला याचा मला खरंच खूप कौतुक वाटतं..दोन जूनला आपली पहिली मिट up मेंबर्स ची होणार आहे!!
हे खरंच इतक्या ताकदीने होतय पाहताना मला खूप आनंद होतो आणि अजूनही विश्वास बसत नाही पण याच फिलिंग मुळे मला अजून काम करण्याची इच्छा निर्माण होते आणि त्यातून खूप नवीन कन्सेप्ट बाहेर पडत आहेत!! आणि तुम्ही सर्वांनी त्याच्यामध्ये सहभाग घ्यावा अशी माझी खूप मनापासून इच्छा आहे.कारण पुणे वुमन्स क्लब "सगळ्यांच्या बरोबरीने वृद्धी" या संकल्पनेबरोबर पुढे जाणार आहे!! खरंच एकदा मनापासून धन्यवाद!!
इतक्या उदंड प्रतिसादाबद्दल खरंच खरंच खूप धन्यवाद आणि अशीच तुमची साथ बरोबर असू द्या जेणेकरून आपण खूप मोठ्या गोष्टी बरोबर करू शकू...🤗🤗🤗
भेटुयात!! ❤️❤️❤️
-Adv Nira धाडगे!!