Imedge Media

Imedge Media Founded in 2012. Navneet Deshpande and Deendayal Vaidya are current partners.

पायोनिअरिंग फॉर टुमॉरो...विलो माथर अँड प्लाटची गोष्टदीडशेहून अधिक वर्षांचा इतिहास असणारे दोन उद्योगप्रवाह एकत्र येऊन, शं...
06/02/2026

पायोनिअरिंग फॉर टुमॉरो...
विलो माथर अँड प्लाटची गोष्ट
दीडशेहून अधिक वर्षांचा इतिहास असणारे दोन उद्योगप्रवाह एकत्र येऊन, शंभर वर्षांहून प्रदीर्घ वारसा असणाऱ्या एका उद्योगसंस्थेचे भविष्य साकारू लागतात आणि ही वाटचाल पुस्तकरूपात टिपण्याची संधी आपल्याला मिळते... क्वचितच जुळून यावा असा हा योग!
मँचेस्टरमध्ये एकोणीसाव्या शतकात जन्म घेतलेली आणि भारतात विसाव्या शतकाच्या सुरुवातीला प्रवेश केलेली माथर अँड प्लाट ही कंपनी २००५पासून विलो या जर्मन समूहाचा भाग झाली आहे. पंप आणि पंपिंग यंत्रणांच्या क्षेत्रात काम करणाऱ्या या कंपनीची (https://wilo.com/in/en/) उत्पादने आपल्या देशातील आणि देशाबाहेरीलही अनेक लक्षणीय प्रकल्पांचा अविभाज्य भाग झाली आहेत. देशातील सर्वांत पहिल्या कोलकता मेट्रोपासून आपल्या जवळच्या पुणे मेट्रोपर्यंत, नुकत्याच कार्यरत झालेल्या नवी मुंबई विमानतळापासून सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जगातील सर्वाधिक उंचीच्या पुतळ्यापर्यंत आणि देशाच्या प्रगतीची मानके ठरलेल्या नामवंत उद्योगसंस्थांपासून आजच्या काळाची गरज असणाऱ्या डेटा सेंटर्सपर्यंत अनेकविध प्रकल्पांशी विलो माथर अँड प्लाट पंप्स हे नाव आता जोडलेले आहे.
अशा एका प्रथितयश उद्योगसंस्थेची वाटचाल आणि कार्यरूप ‘पायोनिअरिंग फॉर टुमॉरो’ या पुस्तकाच्या स्वरूपात इमेज मीडियाने नुकतेच साकारले. त्याचे प्रकाशन कंपनीच्या नुकत्याच झालेल्या वार्षिक संमेलनात, कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत वाटवे यांनी केले.
विलो माथर अँड प्लाटचे चीफ सेल्स ऑफिसर डॉ. रवींद्र उटगीकर यांनी या पुस्तकाचे काम करण्याची संधी आम्हाला उपलब्ध करून दिल्याबद्दल आणि त्यांचे सहकारी चंद्रशेखर ठाकूरदेसाई, अंशुमन बडे व दीपाली सक्सेना यांचे या प्रकल्पात समरसून सहभागी झाल्याबद्दल मनःपूर्वक आभार.

इमेज मीडियाच्या डॉक्युमेंटेशन प्रकल्पांची संख्या यानिमित्ताने पाऊण शतकाच्या दिशेने आणखी पुढे सरकली. अनेकविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान व्यक्ती, संस्था आणि कॉर्पोरेट विश्वाची वाटचाल आम्ही गेली तेरा वर्षे टिपत आहोत. या वाटेवरील नवनवी वळणे पार करण्यासाठी आपल्या सर्वांचे प्रोत्साहन आम्हाला यापुढेही मिळत राहील, याची खात्री आहेच.

Explore Ajanta & Ellora! 'Timeless Ajanta & Timeless Ellora' is an unputdownable world class photo-book about two World ...
15/05/2023

Explore Ajanta & Ellora!

'Timeless Ajanta & Timeless Ellora' is an unputdownable world class photo-book about two World Heritage Sites. With more than 200 beautiful photographs, it captures the monumental legacy of Ajanta & Ellora in a true sense. It has two covers and can be read through two different perspectives. Again, a unique design!

The photo book has well researched content that complements aesthetically rich visual content. It is a perfect souvenir to gift to yourself and your dear ones.

You can buy this book on Amazon by using below link

https://www.amazon.in/Timeless-Ajanta-Timeless-Ellora-Imedge-Media/dp/8193576527

सिद्धार्थ ते गौतम बुद्ध हा प्रवास मार-विजयाशिवाय पूर्ण होत नाही.
26/05/2021

सिद्धार्थ ते गौतम बुद्ध हा प्रवास मार-विजयाशिवाय पूर्ण होत नाही.


'सेवा सर्वोपरी'पुण्यात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला त्याला एक वर्ष झालं आज. मार्च २०२० नंतरच्या काही महिन्यांमध्ये भीतीदा...
09/03/2021

'सेवा सर्वोपरी'

पुण्यात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला त्याला एक वर्ष झालं आज. मार्च २०२० नंतरच्या काही महिन्यांमध्ये भीतीदायक, नकारात्मक व निराशाजनक वातावरणात श्वास घेणंही मुश्किल झालं होतं. काळरात्र संपता संपत नव्हती. चॅनेल्स, सोशल मीडियावरून आरोप-प्रत्यारोपांचं घमासान सुरू होतं. त्यापासून दूर राहून काही लोक आपद्धर्म पाळण्यात व्यग्र होते. संकटात सापडलेल्या समाजाच्या मदतीला धावून जाणं हा त्यांचा त्या क्षणाचा धर्म होता. आपल्यापैकी अनेकांपर्यंत त्यांचं काम पोचलं नाही तेव्हा. जे पोचलं तेही पूर्णांशानं नव्हतं.

रा.स्व.संघ जनकल्याण समितीनं (महाराष्ट्र प्रांत) कोरोना आणि त्या आधीच्या चार आपत्तींच्या वेळी केलेल्या मदतकार्याचं डाॅक्युमेंटेशन करण्याचा विषय आमच्यासमोर आला तेव्हा खरंतर आम्हाला या कामाच्या व्यापकतेचा अदमास नव्हता. सप्टेंबर महिन्यात आम्ही काम सुरू केलं. तीन-चार महिन्यांत जवळपास ७५ व्यक्तींच्या मुलाखती झाल्या. कोरोनाच्या काळात जनकल्याण समितीनं केलेलं काम खरोखरच अभूतपूर्व आहे. भोजन, शिधा, औषधे, काढा वाटपाचे आकडे अवाक करणारे आहेत. लाॅकडाउनच्या काळात अनेक प्रकारची बंधनं असताना ही कामं झाली. 'जनकल्याण' एवढ्यावरच थांबली नाही. एप्रिल-मे महिन्यात कोरोनाचा वेगानं प्रसार होत असलेल्या हाॅट स्पाॅट्स व रेड झोन भागांमध्ये संघाचे स्वयंसेवक व समितीचे कार्यकर्ते मास स्क्रीनिंग करायला उतरले. पुण्यात तब्बल एक लाख नागरिकांचं स्क्रीनिंग 'जनकल्याण'नं केलं. यात पाचएकशे कोरोना रुग्ण सापडले. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी समितीच्या कार्यकर्त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घातला.

आठवून पाहा आपण तेव्हा काय करत होतो आणि आसपासचं वातावरण कसं होतं?

मास स्क्रीनिंगनंतर समितीनं वेगवेगळ्या भागांत आरोग्य शिबिरं घेतली, दवाखाने चालवले. यापुढचं समितीचं पाऊल अधिक धाडसाचं होतं. घरात वेगळं राहणं शक्य नाही अशा कोरोना रुग्णांसाठी जनकल्याण समितीनं पुण्यात गरवारे महाविद्यालयात कोविड केअर सेंटर सुरू केलं. समाजाला आवाहन करून व्हाॅलेंटिअरच्या मदतीनं स्वयंसेवी संस्थेनं चालविलेलं हे एकमेव सेंटर. याची देखरेख व व्यवस्था संघ व समितीनं केली. अठरा ते पन्नास वयोगटातल्या, स्वयंस्फूर्तीनं पुढं आलेल्या २५९ पुरुष व ८९ महिला व्हाॅलेंटिअरनी कोरोनाचा धोका पत्करून तब्बल तीन महिने कोविड केअर सेंटर चालविलं. संघ व समितीच्या कार्यकर्त्यांनी राज्यभर समुपदेशनाचं कार्य केलं. उद्विग्नता, नैराश्य, भीती अशा भावनांमुळे खचलेल्या मनांना त्यामुळं उभारी मिळाली. जनकल्याण समितीच्या कामाशी अनेक डाॅक्टर, समुपदेशक, मानसोपचारतज्ज्ञ जोडले गेले होते. 'जनकल्याण'चं काम फक्त पुणे, मुंबईपुरतं मर्यादित नव्हतं. देवगिरी (मराठवाडा), कोकण, पश्चिम महाराष्ट्र अशा सगळ्या भागांत एकावेळी मदतकार्य सुरू होतं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची यंत्रणा, परिवारातील सेवाभारती, सेवा इंटरनॅशनल आदी संस्था यांच्यात अफलातून समन्वय होता. स्थानिक संस्था, कार्यकर्ते, गणेश मंडळे, राजकीय पक्षही सोबत होते. पुण्यात झालेल्या 'सेवा संगम'चा विहंगम आविष्कार कोरोनाच्या काळात झाला. कोरोनाच्या संकटानं चोहोबाजूंनी घेरले असतानाही समाजानं दाखवलेलं दातृत्व तर अचंबित करणारं. त्याविषयी स्वतंत्रपणे लिहावं लागेल.

याच काळात कोकणाला निसर्ग चक्रीवादळानं झोडपलं. तिथंही जनकल्याण समितीनं मोठं मदतकार्य उभारलं. तत्पूर्वी २०१९चा सांगली-कोल्हापूरचा जलप्रलय, २०१८-१९ चा दुष्काळ, केरळचा २०१८चा जलप्रलय अशा आपत्तींच्या निवारणकार्यातही समितीनं स्वतःला झोकून दिलं होतं. या सगळ्याचं डाॅक्युमेंटेशन व त्यातून एका डाॅक्युबुकची निर्मिती हे आमच्यापुढचं (इमेज मीडिया Imedge Media) टास्क होतं. या कामाची फलनिष्पत्ती म्हणजे 'सेवा सर्वोपरी' हे डाॅक्युबुक. मा. सरसंघचालक मोहनजी भागवत यांची पुस्तकाला प्रस्तावना आहे. जनकल्याण समितीच्या वतीनं देण्यात येणाऱ्या श्री गुरुजी पुरस्कार वितरण सोहळ्यात रविवारी (७ मार्च २०२१) 'सेवा सर्वोपरी'चं प्रकाशन झालं.

सेवाकार्यातून 'मी' वजा झाल्यानंतर उरते ती निरपेक्ष सेवा. त्यामुळेच 'सेवा सर्वोपरी' या डाॅक्युबुकमध्ये एकाही पदाधिकाऱ्याचा, कार्यकर्त्याचा नामोल्लेख नाही. जनकल्याण समितीनेही कुठल्याही नावाचा आग्रह धरला नाही. डाॅक्युबुकचा हेतू सेवाकार्याची प्रेरणा, प्रक्रिया व परिणामांचा दस्तऐवज तयार करणे हाच होता. हा निखळ आनंद आम्ही या प्रकल्पानिमित्त घेतला.

('सेवा सर्वोपरी' या डाॅक्युबुकचे इ-बुक रा. स्व. संघ जनकल्याण समितीच्या (महाराष्ट्र प्रांत) वेबसाईटवर उपलब्ध आहे. खालील लिंकवर क्लिक करून ते पाहता येईल.)
https://www.rssjankalyan.org/Seva%20Sarvopari/index.html

'इमेज मीडिया'च्या प्रकल्पांविषयी जाणून घेण्यासाठी पाहा...
www.imedgemedia.com

 # वारसा महोत्सव २.१ कोरोना नसता तर 'इमेज मीडिया'च्या कल्पनेतून साकारलेल्या वारसा महोत्सवाचं २०२१ चं व्हर्जन अर्थात वारस...
04/01/2021

# वारसा महोत्सव २.१

कोरोना नसता तर 'इमेज मीडिया'च्या कल्पनेतून साकारलेल्या वारसा महोत्सवाचं २०२१ चं व्हर्जन अर्थात वारसा महोत्सव २.१ कदाचित या आठवड्यात तुमच्यासमोर सादरही झाला असता.

Warsaa: Documenting Legacies या अंतर्गत आम्ही म्हणजे 'इमेज मीडिया'नं आयोजित केलेला पहिला वारसा महोत्सव गेल्या वर्षी ४ जानेवारीला सुरू झाला होता. अजिंठा आणि वेरूळ या दोन जागतिक वारसा स्थळांवरचं Timeless Ajanta-Timeless Ellora हे फोटोबुक तयार केलं तेव्हाच या विषयावरचा महोत्सव पुण्यात करायचं आम्ही नक्की केलं होतं.

'इमेज मीडिया'नं काढलेली छायाचित्रं रसिकांपुढं ठेवणं एवढ्यापुरता हा महोत्सव मर्यादित असावा असं आम्हाला कधीच वाटलं नाही. अजिंठा-वेरूळचं दर्शन विविध कलाविष्कारांतून घडावं आणि जागतिक वारशाला शोभेल अशी अनुभूती रसिकांना मिळावी असा आमचा प्रयत्न होता. ब्रिटिश लायब्ररीकडील जुनी छायाचित्रं, नावाजलेल्या चित्रकारांनी काढलेली चित्रं, काही जुनी-काही नवी शिल्पं, कैलास लेण्यातील शिल्पांचे आणि अजिंठ्यातील चित्रांचे डिजिटल रिस्टोरेशन असे अनेक विषय ४ व ५ जानेवारीच्या वारसा महोत्सवात आम्ही मांडले. सोबत तज्ज्ञांच्या व्याख्यानांची मेजवानी होती. फिल्म डिव्हिजनकडून मिळालेले साठच्या दशकातील दुर्मीळ माहितीपटही राजा रविवर्मा आर्ट गॅलरीत आम्ही दाखविले. समारोपाला भरतनाट्यममधून शिव साकारला गेलाच, शिवाय बुद्धाचा शोधही नृत्यातून घ्यायचा प्रयत्न झाला.

महोत्सव होता अजिंठा-वेरूळचा, पण तो नंतर झाला कलासक्त मनांचा. पुरातत्त्वज्ञ डॉ. गो. बं. देगलूरकर, डॉ. श्रीकांत प्रधान, डॉ. राधिका टिपरे, प्रसाद पवार, रवींद्र बोरावके, श्रीकांत जाधव यांच्यासारखे अभ्यासक आमच्या सोबत होते. चित्रकार गोपाळ नांदूरकर, राहुल देशपांडे, प्रदीप तुपे, शिल्पकार दीपक थोपटे, विजय कानडे, 'कलावर्धिनी'च्या अरुंधती पटवर्धन यांचा कलाविष्कार‌ अजिंठा-वेरूळच्या वारशाला साजेसा होता. वारसा महोत्सव शक्य झाला तो 'इमेज मीडिया'च्या प्रत्येक स्वप्नाला भक्कम साथ देणारे 'वॅनसम इंडस्ट्रीज'चे संस्थापक सुनील वनारसे यांच्यामुळे. महोत्सवाला रसिकांनी दिलेली दाद तर काल-परवाच अनुभवली असावी इतकी आमच्या मनात ताजी आहे.

वारसा महोत्सव‌ २.१ आणखी मोठ्या स्केलवर करायचा आमचा प्लॅन होता. आजही आहे. विषय अर्थातच नवा असेल. कोरोनामुळे आम्हाला नियोजन बदलावं लागलं खरं...पण आमचा इरादा पक्का आहे. आणि या वर्षाचे बारा महिने अजूनही शिल्लक आहेत.
वक्तही तो है...
गुजर जाएगा...




'इमेज मीडिया' ही संस्था डाॅक्युमेंटेशनच्या क्षेत्रात पूर्ण वेळ कार्यरत आहे. व्यक्ती, संस्था, सामाजिक प्रकल्प, कंपन्यांचा...
30/11/2020

'इमेज मीडिया' ही संस्था डाॅक्युमेंटेशनच्या क्षेत्रात पूर्ण वेळ कार्यरत आहे. व्यक्ती, संस्था, सामाजिक प्रकल्प, कंपन्यांचा इतिहास आम्ही डाॅक्युमेंट करतो. आठ वर्षांत 'इमेज मीडिया'ने पन्नासहून अधिक प्रकल्प पूर्ण केले आहेत.

लिखित दस्तऐवजांसोबतच दृश्य दस्तऐवज तयार करण्याचे महत्त्वाचे काम 'इमेज मीडिया' करते. पुणे शहरावरील 12 Walks: An Imagery of Pune या फोटोबुकनंतर 'इमेज मीडिया'ने गेल्या वर्षी अजिंठा-वेरूळवरील Timeless Ajanta -Timeless Ellora हे फोटोबुक प्रकाशित केले. दोनशेहून अधिक छायाचित्रे, पूरक माहिती व दोन मुखपृष्ठे असलेल्या या फोटोबुकला देशभरातून व परदेशातूनही मागणी आहे. 'इमेज मीडिया'चे स्नेही, शिवसेनेचे उपनेते श्री. रघुनाथ कुचिक यांनी नुकतेच हे फोटोबुक महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे व पर्यटनमंत्री श्री. आदित्य ठाकरे यांना भेट दिले. स्वतः उत्कृष्ट छायाचित्रकार असणाऱ्या मा. मुख्यमंत्र्यांनी फोटोबुकचे विशेष कौतुक केले. श्री. कुचिक यांनी या वेळी 'इमेज मीडिया'च्या डाॅक्युमेंटेशन प्रकल्पांची माहितीही मा. मुख्यमंत्र्यांना दिली.

Timeless Ajanta-Timeless Ellora या फोटोबुकच्या १४०० प्रती आतापर्यंत रसिकांनी विकत घेतल्या आहेत. हे फोटोबुक amazon वर खालील लिंकवर उपलब्ध आहे. Corporate Bulk Booking साठी कृपया इमेज मीडियाशी संपर्क साधावा.

Available at
https://www.amazon.in/Timeless-Ajanta-Timeless-Ellora-Imedge-Media/dp/8193576527

www.imedgemedia.com





आमच्या डिजिटल प्रवासाची गोष्टप्राज इंडस्ट्रीज या औद्योगिक जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील जगातील आघाडीच्या कंपनीचे संस्थापक-का...
26/11/2020

आमच्या डिजिटल प्रवासाची गोष्ट

प्राज इंडस्ट्रीज या औद्योगिक जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील जगातील आघाडीच्या कंपनीचे संस्थापक-कार्याध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी यांना यंदाचा (२०२०) जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर पुरस्कार जाहीर झाला, त्याला आता दोन महिने उलटले आहेत. औद्योगिक जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील हा प्रतिष्ठेचा, सर्वोच्च सन्मान. त्याचा पुरस्कारसोहळा आणि त्यानिमित्त संस्थेच्या आस्थापनांमध्ये आयोजित अनौपचारिक कार्यक्रम होत असतानाच, डॉ. चौधरी यांनी उभे केलेले उद्योगविश्व आणि पुरस्काररूपाने घेतली गेलेली त्याची दखल यानिमित्ताने त्यांच्याविषयी औपचारिक स्वरूपात कृतज्ञता व्यक्त करण्याचा विचार प्राज परिवारामध्ये सुरू झाला. त्यातून डिजिटल कॉफी टेबल बुकच्या स्वरूपात त्यांची ही वाटचाल मांडण्याची कल्पना पुढे आली आणि सुमारे दीड महिन्यापूर्वी ती माझ्यापर्यंत येऊन धडकली. डॉ. चौधरी यांनी लिहिलेल्या "As Is, What Is" (मराठी आवृत्ती : "तर असं झालं") त्यांच्या वाटचालीतील निवडक आठवणींवर आधारित पुस्तकासाठीचे लेखनसाह्य २०१६मध्ये इमेज मीडियाने केले होते. त्यानंतरही प्राज आणि डॉ. चौधरी यांच्यासोबत काही प्रकल्पांच्या निमित्ताने संपर्क चालूच राहिला आहे. त्यातून हे डिजिटल बुक साकारण्याचीही जबाबदारी इमेज मीडियाकडे आली.
डॉक्युमेंटेशन हेच कार्यक्षेत्र असले आणि आता तशा प्रकल्पांची संख्या सुवर्णमहोत्सवी टप्पा ओलांडून पुढे गेली असली, तरी डिजिटल कॉफी टेबल बुकच्या निर्मितीचा आमचाही हा पहिलाच प्रयत्न होता. त्यातही सर्वांत मोठे आव्हान होते ते कालमर्यादेचे. पुस्तकाची संकल्पना ते त्याचे प्रकाशन हा जेमतेम महिनाभर बाकी असताना काम सुरू केले. २०१६मधील पुस्तकासाठीचे लेखनसाह्य, त्यानंतरच्या गाठीभेटी आणि प्राज परिवारातून मिळालेले संदर्भ ही शिदोरी उपयोगी पडली. संकल्पनाविस्तार, कॉपीलेखन, व्हिडिओतील संदर्भसंकलन, नव्याने चित्रण, छायाचित्रांची निवड, डिझाइन, फ्लिप बुक निर्मिती अशा एक ना अनेक टप्प्यांतून डेडलाइन गाठायची होती. कारण होते आजचे (गुरुवार, ता. २६ नोव्हेंबर) डॉ. चौधरी यांच्या वाढदिवसाचे औचित्य.
प्राज टॉवर्स या कंपनीच्या मुख्यालयी झालेल्या आणि प्राज परिवार जगभरातून ऑनलाइन उपस्थित राहिलेल्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात या पुस्तकाचे प्रकाशन झाले. "Carving out a NICHE" नावाचे हे पुस्तक प्राज कंपनीच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे. डिजिटल पटलावरचा हा आमचा पहिला ठसा पाहण्यासाठी क्लिक करा : https://praj.net/flipbook/wordpress/

- इमेज मीडिया, पुणे
www.imedgemedia.com

आम्ही कोण?'प्रत्येक प्रवासाची एक गोष्ट असते. चांगली-वाईट. जशी असेल‌ तशी. आपण ती भविष्यासाठी डॉक्युमेंट करूया...ती लिहून ...
05/11/2020

आम्ही कोण?

'प्रत्येक प्रवासाची एक गोष्ट असते. चांगली-वाईट. जशी असेल‌ तशी. आपण ती भविष्यासाठी डॉक्युमेंट करूया...ती लिहून ठेवणं, ती सांगणं, ती ऐकणं खूप गरजेचं असतं. केवळ तुमच्याआमच्यासाठी नाही. भविष्यातल्या पिढ्यांसाठी.'

२०१२ चा ऑगस्ट महिना होता. पत्रकारितेतील नोकऱ्या सोडून आम्ही डॉक्युमेंटेशन या पूर्ण नव्या क्षेत्रात उतरलो होतो. परिचितांना आणि संभाव्य क्लाएंटना आम्ही 'डॉक्युमेंटेशन'चा कन्सेप्ट पटवू पाहत होतो. मौखिक परंपरेला महत्त्व असलेल्या भूमीत लिखित नोंदी रुजवू पाहत होतो. 'डॉक्युमेंटेशन' या विषयात पूर्णवेळ काम करणारी 'इमेज मीडिया' imedgemedia.com ही महाराष्ट्रातली पहिली व एकमेव व्यावसायिक कंपनी.

'बरं पण मग डॉक्युमेंटेशन करता म्हणजे तुम्ही नेमकं काय करता?'

हा पुढचा हमखास प्रश्न. आजही विचारला जातो. फरक इतकाच की २०१२ च्या सुरुवातीला आमच्याकडे सांगायला फक्त आमचा कन्सेप्ट होता. आता, म्हणजे आठ वर्षानंतर, डॉक्युमेंटेशनचे वैविध्य दाखविणारे ५० प्रकल्प 'इमेज मीडिया'च्या पोतडीत आहेत.

आम्ही व्यक्तींचं डॉक्युमेंटेशन केलं का? तर केलं. दाजीकाका गाडगीळ यांच्यापासून माधवराव पवार यांच्यापर्यंत अनेक महत्त्वाच्या व्यक्तींचं केलं.

संस्थांचं केलं का? तर तेही केलं. 'इंदिरा ग्रुप' ते शिक्षण प्रसारक मंडळीपर्यंत अनेक संस्थांचं केलं.

कोयना प्रकल्प, 'बालभारती', सेंट्रल वॉटर पॉवर रीसर्च स्टेशन, पूना प्रेस असोसिएशनसारख्या प्रकल्पांचं-संस्थांचं डॉक्युमेंटेशन 'इमेज मीडिया'नं केलं. बालगुन्हेगारी व नक्षलवादाचे दस्तऐवज आम्ही तयार केले.

भारत फोर्ज, ए-रेमंड, मगरपट्टा सिटीसारख्या कॉर्पोरेटना आम्ही डॉक्युमेंटेशनचे प्रॉडक्ट दिले.

संशोधन, मुलाखती, छायाचित्रण, लेखन व डिझाइन अशा ‌टप्प्यांमधून तयार होणारे डॉक्युमेंटेशन आणि डॉक्युबुक हा 'इमेज मीडिया'चा 'यूएसपी' आहे. सतत नवं शोधण्याची ऊर्मी आम्हाला स्वस्थ बसू देईना तेव्हा आम्ही पुणे शहरावरचं आणि अजिंठा-वेरूळवरचं फोटोबुक तयार केले‌.

हे सगळं आम्ही का सागंतोय असा प्रश्न तुम्हाला पडणं साहजिक आहे. अगदी अपरिचित, नव्या कल्पना रुजू शकतात, बहरू शकतात हे आम्ही अनुभवलंय. 'इमेज मीडिया'नं पाहिलेल्या व पूर्ण झालेल्या स्वप्नांची गोष्ट आम्ही नुकत्याच तयार केलेल्या वेबसाइटवर आहे. आमच्या वेबसाइटला भेट देऊन आपण आमच्याविषयी अधिक जाणून घ्याल आणि आमचे सदिच्छादूत व्हाल, ही खात्री आहेच.

तुम्हीही नवी स्वप्ने पाहा...ती नक्की पूर्ण होतील यावर आमचा विश्वास आहे. आपण आजवर दिलेल्या शुभेच्छांसाठी मनःपूर्वक धन्यवाद.

क्लिक करा :
http://imedgemedia.com/
http://imedgemedia.com/whydoc
http://imedgemedia.com/services
http://imedgemedia.com/docubooks

(जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त)आद्य भारतीय छायाचित्रकारः राजा दीनदयाल.................‘अजब ये करते हैं तस्वीर में कमालउस...
19/08/2020

(जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त)

आद्य भारतीय छायाचित्रकारः राजा दीनदयाल.................

‘अजब ये करते हैं
तस्वीर में कमाल
उस्तादोंके है उस्ताद
लाला दीनदयाल’

हैदराबादचा निजाम मेहबूब अली पाशा यानं १८९४ मध्ये उत्स्फूर्तपणे दिलेली ही दाद होती आद्य भारतीय छायाचित्रकार लाला दीनदयाल यांच्यासाठी. भारतात छायाचित्रणाची पहिली नोंद १८४७ची आहे. विल्यम आर्मस्ट्राँग फेलन यांनी अजिंठा-वेरूळच्या लेण्यांचं छायाचित्रण केलं. ईस्ट इंडिया कंपनी आणि नंतरच्या ब्रिटीश सरकारनं भारतातल्या प्राचीन वास्तू-इमारतीचं छायाचित्रण करण्याचं काम या काळात काही ब्रिटीश अधिकार्‍यांवर सोपवलेलं दिसतं. भारतातील पहिली फोटोग्राफिक सोसायटी मुंबईत १८५४ ला स्थापन झाली. त्यानंतर तीन वर्षांनी बंगाल व मद्रासमध्येही अशा सोसायट्या तयार झाल्या. त्यामुळं भारतीय वारशाची अक्षरशः शेकडो छायाचित्रं काढण्यात आली. या छायाचित्रकारांत एकमेव भारतीय नाव होतं लाला दीनदयाल यांचं. काही संस्थांनांचे राजे-महाराजेही हौस म्हणून छायाचित्रण करत होते, मात्र लाला दीनदयाल यांच्या इतकं छायाचित्रण कुणी केलं नाही.

इंदूरच्या सार्वजनिक बांधकाम खात्यात लाला दीनदयाल ड्राफ्ट्समन होते. इंदूरच्या महाराजांनी त्यांना प्रोत्साहन दिलं. ब्रिटिश अधिकारी-संस्थानिकांच्या आश्रयाने कलांना बहर येण्याचे ते दिवस होते. सन १८७४च्या दरम्यान लाला दीनदयाल यांनी भारताच्या गर्व्हनर जनरलसाठी मध्य प्रांतातील प्राचीन स्थळांचे छायाचित्रण केलं. त्यानंतर ब्रिटीश राजवटीतील सगळ्या महत्त्वाच्या घटना, लष्करी मोहिमा आदींचं छायाचित्रण लाला दीनदयाल यांनी केलं. हैदराबादच्या संस्थानात त्यांनी केलेल्या छायाचित्रणावर खूष होऊन निजामानं त्यांना ‘राजा मुसव्विर जंग बहादूर’ (छायाचित्रणातील अव्वल योद्धा) हा किताब दिला. लाला दीनदयाल व्हाईसरॉयचे अधिकृत छायाचित्रकार होतेच, पण ब्रिटनच्या महाराणीचे अधिकृत छायाचित्रकारही झाले. मुंबई, इंदूर व सिकंदराबाद इथं त्यांचे स्टुडिओ होते.

संस्थानिक-ब्रिटिश अधिकार्‍यांची हौस-शाही विलास, भारतीय वारशाविषयीचं त्यांचं कुतूहल, भारतीय वारशाला-कलेला परदेशात मिळणारी किंमत या अनेक कारणांमुळे या काळात विपुल छायाचित्रण झालं. या छायाचित्रणाचे हेतू तेव्हा वेगवेगळे व काही प्रसंगी वादग्रस्तही होते. शेकडो पट्टेरी वाघांच्या अमानुष शिकारींची छायाचित्रं पाहणं वेदनादायक आहेच. असं असलं तरी आताच्या काळात या छायाचित्रांचं संदर्भमूल्य कल्पनेपलीकडचं आहे. भारतीय वारसा, लोकजीवन, समाज, पर्यावरण-वन्यजीवन, कला-संस्कृती, प्रथा-परंपरा अशा अनेक विषयांतील बदलांचं ते विश्वासार्ह डॉक्युमेंटेशन आहे. प्रत्येक छायाचित्रकार डॉक्युमेंटलिस्ट ठरतो तो असा.

तेव्हाचं वर्तमान छायाचित्रांमधून जतन केलेल्या राजा लाला दीनदयाल या आद्य भारतीय छायाचित्रकाराला आजच्या जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त सलाम!

-इमेज मीडिया, पुणे
(छायाचित्र सौजन्यः ब्रिटिश लायब्ररी, इंटरनेट)









Foundation Dayप्रत्येक वर्ष येतं, नवनव्या गोष्टी सांगून जातं...प्रत्येक वर्षी आम्ही नवनव्या गोष्टी उलगडत राहतो...*आमच्या...
16/08/2020

Foundation Day
प्रत्येक वर्ष येतं, नवनव्या गोष्टी सांगून जातं...
प्रत्येक वर्षी आम्ही नवनव्या गोष्टी उलगडत राहतो...

*आमच्या नवव्या वर्षाची गोष्ट तर आताच उलगडू लागली आहे...*

आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद असेच सोबत राहावेत.

*-इमेज मीडिया, पुणे*


deshpande

16/08/2020

प्रत्येक वर्ष येतं, नवनव्या गोष्टी सांगून जातं...
प्रत्येक वर्षी आम्ही नवनव्या गोष्टी उलगडत राहतो...

*आमच्या नवव्या वर्षाची गोष्ट तर आताच उलगडू लागली आहे...*

आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद असेच सोबत राहावेत.

*-इमेज मीडिया, पुणे*

Address

Tilak Road, Sadashiv Peth
Pune
411030

Opening Hours

Monday 9:30am - 5:30pm
Tuesday 9:30am - 5:30pm
Wednesday 9:30am - 5:30pm
Thursday 9:30am - 5:30pm
Friday 9:30am - 5:30pm
Saturday 9:30am - 5:30pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Imedge Media posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Imedge Media:

Share