13/04/2026
असं म्हणतात की बाळंतपण अवघड असतं. दुसऱ्या बाळंतपणातून गेलेल्या प्रियांकाने हे अनुभव मात्र लक्षात ठेवले आणि जो त्रास आपल्याला झाला तो इतर स्त्रियांना होऊ नये यावर तिने विचार केला. यातूनच पुण्यामध्ये लक्ष्मी रोडवर सुरू झाले, “मदरहुड किट” हे बाळ-बाळंतिणीसाठीचे एक एक्सक्लुझिव्ह स्टोअर. प्रेग्नंट स्त्रीला बाळंतपणात जे जे लागतं, त्या सर्व गोष्टी प्रियांकाने या स्टोअरमध्ये उपलब्ध करून दिल्या आहेत. एवढंच नव्हे तर कोणती गोष्ट केव्हा लागते, याबद्दलही प्रियांका आलेल्या सर्व प्रेग्नंट कस्टमर्सना मार्गदर्शन करते. ऑनलाईनच्या जमान्यातही प्रेग्नंट स्त्रीला बाळाच्या खरेदीचा फील प्रत्यक्ष घ्यायचा असतो. त्यामुळेच आजच्या आधुनिक युगातील कित्येक युवा तरूणी तिच्या स्टोअरमध्ये आवर्जून शॉपिंगला येत असतात. तिने या सर्व तरूणींचा विश्वास संपादन केला आहे आणि त्यामुळेच आज तिचे प्रॉडक्ट्स फक्त भारतातच नाही तर परदेशातही जातात.आई व बाळाच्या काळजी व आरामाला अधिक प्राधान्य देण्यासाठी “मदरहुड किट” स्टोअरमध्ये ती अनेक नवनवीन उत्पादने आणत असते. प्रियांकाच्या या आगळ्यावेगळ्या व्यवसायाच्या प्रवासाबद्दल जाणून घेण्यासाठी हा एपिसोड संपूर्ण पाहा आणि इतरांनाही शेअर करा.
https://youtu.be/EuBS5X2A1Kw?t=76&si=ydIlDBvP9G5Hip1U