Meme world

Meme world Just for entertainment n
for making people laugh...
page is full of love laugh sarcasm and many more

01/01/2025

▪️ही अद्भुत गोष्ट आहे इतिहासाच्या पानांमधून हरवलेल्या एका राजघराण्याच्या अंताची; आपल्या पित्याला बिंबिसार राजाला कैदेत ठेऊन त्याचं साम्राज्य हडपून स्वतःच्या अधिपत्याखाली आणणाऱ्या बुद्धकालीन मगधसम्राटाची, अजातशत्रूची ही थरारक कथा!▪️
▪️ह्या काळात एक क्रूर घटना नोंदवली गेली. मगधसम्राट बिंबिसाराचा खून त्याच्या स्वतःच्याच मुलाने केला. दानशूर आणि प्रजाप्रेमी असलेल्या बापाला मुलाने हालहाल करून मारून टाकलं. आणि मगध साम्राज्याच्या सिंहासनाला रक्ताभिषेक घालून स्वतः गादीवर बसला. त्या खुनी मुलाचं नाव अजातशत्रू ! ह्यामुळे अजातशत्रूच्या नावासोबत क्रूरकर्मा हा शब्द चिकटला तो कायमचाच.▪️
▪️पण हे वैचित्र्य इथंच थांबलं नाही. पुढे अजातशत्रूच्या मुलानेही सिंहासन बळकावण्यासाठी आपल्या बापाचा बळी घेतला. हे पिढ्यानपिढ्या चालतच राहिलं. अक्षरशः निर्वंश होईपर्यंत..▪️
▪️ह्या विचित्र क्रौर्यमालिकेची सुरुवात कशी झाली ह्याची ही प्राचीन कहाणी.▪️

कादंबरी - अजातशत्रू
लेखक - सुमेध
प्रकाशक - कॉस्मिक पब्लिकेशन, पुणे
किंमत - 380 रू (सवलत किंमत 340 रू घरपोच)
संपर्क - 090210 77066

25/12/2024

अभ्यासपूर्ण विणलेली एक अस्सल मराठी थ्रिलर,
वाचकाच्या डोक्यासोबत खेळणारी मेटाफिक्शन कादंबरी,
“महामाया निळावंती”

================================

ही गोष्ट आहे अश्या एका असामान्य बापाची,
त्या बापाने आपल्या मुलाचा मृत्यू मान्य केला नाही. त्याने मुलाचा मृतदेह बर्फात ठेवून सह्याद्रीत आणला. तिथं निळावंतीचा शोध घेऊन मुलाला जिवंत करण्यासाठी अफाट प्रयत्न केले. मुलाच्या मृतदेहाला उठवण्यासाठी निळावंतीनेही मदत केली. तिची भाषा शिकून घेण्यासाठी बापाला निळावंतीशी प्रेमाचं नाटक करावं लागलं.
पण जंगजंग पछाडूनही शेवटी मुलाचा मृतदेह जिवंत झाला का?
काय रहस्य दडलं होतं निळावंतीच्या भाषेत?
निळावंती नक्की कोण होती ?
निळावंतीची पोथी नक्की कशी होती ?

श्वास रोखायला लावणारी #निळावंती ची कथा..
निसर्गातील अचाट रहस्यांचा अद्भुत उलगडा..
मोक्षाच्या जगात वाचकाला घेऊन जाणारा वेगवान घटनाक्रम...
एका मानवाने निळावंती डाकिनीवर केलेल्या प्रेमाची रोमांचक कहाणी !

=================================

कादंबरी : महामाया निळावंती
लेखक : सुमेध
प्रकाशन : कॉस्मिक पब्लिकेशन, पुणे
पाने : 372
मूळ किंमत : 399 रू.
सवलत किंमत : 350 रु. (महाराष्ट्रभर #फ्रीडिलिव्हरी)

कादंबरी मागवण्यासाठी संपर्क करा :
090210 77066

10/09/2024

निळावंती वाचून माणसाला वेड का लागतं?
पशुपक्ष्यांची भाषा माणूस खरंच शिकू शकतो का?
मृतदेहाला जिवंत करता येऊ शकते का?
निळावंती वाचून जंगलाच्या पोटात दडलेल्या रहस्यांचा, पुरातन खजिन्याचा शोध घेता येतो का?
हे पुस्तक घरात ठेवावे का नाही?
ब्रिटिश सरकारने निळावंती ग्रंथावर बंदी का आणली असावी?

ह्या प्रश्नांचा मागोवा घेण्यासाठी तुम्हाला 'महामाया निळावंती' महाकादंबरी वाचावीच लागेल. निळावंतीची मूळ पोथी व आख्यायिकेचा ऐतिहासिक घटनांशी कसा संबंध आहे हे सांगणारी ही एक अद्भुतकथा. #महामाया_निळावंती
मराठी साहित्यातील एक अचाट प्रयोग असलेली ही महागाथा प्रत्येक वाचकाने आवर्जून वाचावी अशी आहे.

अठरा पौराणिक पोथ्या, अनेक ऐतिहासिक दस्तऐवज, तांत्रिक आख्यायिका व निळावंतीच्या दंतकथांचा अभ्यास करून लेखक सुमेध ह्यांनी निर्माण केलेली ही अद्भुत, जादुई, थरारक व मेंदूसोबत खेळणारी मेटाफिक्शन कादंबरी.

कादंबरी - महामाया निळावंती
प्रकाशक - Cosmic Publication
पाने - 372
किंमत - 399 , सवलत किंमत 350 रु /- (फ्री घरपोच डिलिव्हरी)
घरपोच मागविण्यासाठी संपर्क - 090210 77066

12/08/2024

निळावंतीची मूळ पोथी आणि आख्यायिकेचा खऱ्या घटनांशी संबंध सांगणारी अद्भुतकथा.
अठरा पौराणिक पोथ्या, अनेक ऐतिहासिक दस्तऐवज, तांत्रिक आख्यायिका व निळावंतीच्या दंतकथांचा अभ्यास करून लेखक सुमेध ह्यांनी निर्माण केलेली ही अद्भुत, जादुई, थरारक व मेंदूसोबत खेळणारी मेटाफिक्शन कादंबरी.

अलीकडच्या काळात, १९९२साली घडलेली एक अजब घटना. एक बाप निळावंतीची पोथी शोधत सह्याद्रीच्या जंगलात येतो. त्याच्यासोबत आहे त्याच्या मुलाचा बर्फात अन मिठात ठेवलेला मृतदेह. ह्या जतन केलेल्या मृतदेहाला जिवंत करण्यासाठी बाप जंगजंग पछाडतो. शेवटी त्याला अनपेक्षितरित्या जंगलात साक्षात निळावंतीचं अस्तित्व सापडतं. बाप आपल्या मुलाच्या मृतदेहाला जिवंत करू शकतो का? वनदेवता निळावंती अजूनही अस्तित्वात आहे का? तिची भाषा म्हणजे कोणती भाषा? निळावंती जर आजही अस्तित्वात असेल तर चारशे वर्षांपूर्वी ती मेली नव्हती का? बाजिंद्याने निळावंतीचा खून केला नव्हता का? तिचा खून कोणी केला होता? खून होऊनही निळावंती जिवंत कशी राहिली? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आहेत, 'महामाया निळावंती' या कादंबरीमध्ये.

कादंबरी - महामाया निळावंती
पाने - 372
किंमत -350/- (घरपोच पोस्टल चार्जेस फ्री)
प्रकाशक - Cosmic Publication
घरपोच मागविण्यासाठी संपर्क करा - 090210 77066

25/03/2023

Post the most recent photo you have downloaded.

12/01/2023

Address

Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when Meme world posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Meme world:

Share

Category