MAJHA INDIA News

MAJHA INDIA News Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from MAJHA INDIA News, Media/News Company, pune, Pune.

MAJHA INDIA News

विश्वासार्ह मराठी बातम्या | Breaking News | Pune | PCMC | Maharashtra | Live Updates

📍 Maharashtra | Pune | Pimpri-Chinchwad
🎥 Breaking News | Live Updates | Exclusive Reports
📍 पिंपरी-चिंचवड (PCMC)

👍 आमचे page Follow करा

मंत्री  भरत गोगावले यांचा मनोज जरांगे यांना इशारा..?    #भरत गोगावले
10/09/2026

मंत्री भरत गोगावले यांचा मनोज जरांगे यांना इशारा..? #भरत गोगावले

कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा लढा; यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मानविधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते स...
10/09/2026

कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा लढा; यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन गौरव

पिंपरी-चिंचवड, दि. १० सप्टेंबर २०२६ (प्रतिनिधी) — कामगार, कष्टकरी आणि श्रमिकांच्या हक्कांसाठी गेल्या ३५ वर्षांहून अधिक काळ सातत्याने संघर्ष करून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे संस्थापक अध्यक्ष तथा कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

मराठी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित विशेष सन्मान सोहळ्यात महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते यशवंतभाऊ भोसले यांना स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. हा सोहळा दि. ८ सप्टेंबर रोजी ऑटो क्लस्टर सभागृहात उत्साहात पार पडला. यावेळी राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या सभासद व पदाधिकाऱ्यांनी मोठ्या जल्लोषात आनंद व्यक्त केला.

या कार्यक्रमाला पद्मश्री गिरीश प्रभुणे, विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, दैनिक लोकमतचे संपादक संजय आवटे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांनी यशवंतभाऊ भोसले यांच्या दीर्घकाळच्या कामगार चळवळीतील योगदानाचे कौतुक केले.

यशवंतभाऊ भोसले यांनी गेल्या ३५ वर्षांहून अधिक काळ कामगारांच्या न्याय्य मागण्या, सुरक्षितता, योग्य वेतन आणि कायदेशीर हक्कांसाठी सातत्याने लढा दिला आहे. राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे संस्थापक अध्यक्ष म्हणून त्यांनी राज्यभरातील कामगार वर्गात विश्वासाचे स्थान निर्माण केले आहे. कामगार आणि कंपनी व्यवस्थापन यांच्यात समन्वय साधतानाच कामगारांना त्यांचे कायदेशीर हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी विविध पातळ्यांवर संघर्ष केला आहे.

कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी त्यांनी केलेला सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि विविध प्रश्नांवर दिलेला लढा कामगार चळवळीसाठी प्रेरणादायी ठरला असल्याचे यावेळी मान्यवरांनी नमूद केले. तळागाळातील कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी काम करणारे अभ्यासू आणि आक्रमक नेते म्हणून भोसले यांची ओळख निर्माण झाली आहे.

“हा बहुमोल सन्मान माझ्या आयुष्यातील अत्यंत आठवणीत राहणारा क्षण असून, गेल्या अनेक वर्षांच्या प्रदीर्घ संघर्षाची ही पावती आहे,” अशी भावना सन्मानानंतर कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांनी व्यक्त केली.

या सोहळ्यात राजकीय संपादिका मृणालिनी नानिवडेकर, दैनिक पुढारीचे संपादक सुनील माळी, न्यूज १८ मराठीचे सहसंपादक विशाल परदेशी, सकाळ पुणेचे ज्येष्ठ पत्रकार राज काची आणि लेट्सअप पुणेचे संपादक योगेश कुटे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची ‘आमदारांचे हेडमास्टर’ या विषयावर विविध मुद्द्यांवर प्रकट मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीला उपस्थितांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

याच कार्यक्रमात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, एसएमबीपी स्कूलचे चेअरमन डॉ. डी. के. भोसले, ऑटो संघटनेचे अध्यक्ष बाबा कांबळे, ‘दान से उडान’चे संस्थापक रवी घाटे आणि आवटी ग्रुपचे चेअरमन बाबासाहेब आवटी यांचाही विशेष सन्मान करण्यात आला.

या भव्य सोहळ्याचे नियोजन मराठी पत्रकार संघाचे प्रदेश अध्यक्ष किरण जोशी, प्रदेश उपाध्यक्ष विवेक इनामदार आणि प्रदेश सचिव हरिभाऊ प्रक्षाळे यांनी केले होते.

कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांहून अधिक काळ अविरत लढा देणाऱ्या यशवंतभाऊ भोसले यांचा झालेला हा सन्मान राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या कार्यकर्त्यांसाठी अभिमानाचा क्षण ठरला. सन्मानाबद्दल आयोजक व सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.

— माझा इंडिया न्यूज
सत्य | निर्भीड | विश्वासार्ह

#यशवंतभाऊभोसले #कामगारनेते #कामगार #श्रमिक #कामगारांचेलढा #३५वर्षांचालढा #राहुलनार्वेकर #विधानसभाअध्यक्ष #विशेषसन्मान #राष्ट्रीयश्रमिकआघाडी #पिंपरीचिंचवड #कामगारहक्क #श्रमिकहक्क #कामगारचळवळ #महाराष्ट्र #पिंपरीचिंचवडन्यूज #माझाइंडियान्यूज

09/09/2026

बैलगाडा क्षेत्रात मालकाला कोट्यधीश बनवनारा बैलाच्या निधनानंतर समाधी बांधली मालकाने..!😘 #बैलगाडा प्रेमी #बैलगाडा शर्यत #वारंगेवाडी #मावळ तालुका #माझा इंडिया न्यूज

⚖️ मुंबई उच्च न्यायालयाच्या ५०व्या मुख्य न्यायमूर्तीपदी महेश चंद्र त्रिपाठीमुंबई | प्रतिनिधीदरबार हॉल, लोकभवन, मुंबई येथ...
09/09/2026

⚖️ मुंबई उच्च न्यायालयाच्या ५०व्या मुख्य न्यायमूर्तीपदी महेश चंद्र त्रिपाठी

मुंबई | प्रतिनिधी

दरबार हॉल, लोकभवन, मुंबई येथे मुंबई उच्च न्यायालयाचे ५०वे मुख्य न्यायमूर्ती मा. श्री. महेश चंद्र त्रिपाठी यांच्या शपथविधी समारंभास मान्यवरांनी उपस्थित राहून त्यांचे अभिनंदन करण्यात आले. महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते न्यायमूर्ती त्रिपाठी यांनी पद व गोपनीयतेची शपथ घेतली.

न्याय, निष्पक्षता आणि संविधानिक मूल्यांची जपणूक करत न्यायव्यवस्थेवरील जनतेचा विश्वास अधिक दृढ करण्यासाठी त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा निश्चितच लाभ होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

मुख्य न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी यांना पुढील कार्यकाळासाठी मनःपूर्वक शुभेच्छा! 💐

#मुंबई #मुंबईउच्चन्यायालय #महेशचंद्रत्रिपाठी #मुख्यन्यायमूर्ती

Please Jion my Channel 👇
09/09/2026

Please Jion my Channel 👇

नमस्कार मित्रांनो माझ्या MAJHA INDIA NEWS Channel वर स्वागत करतो सामाजिक, राजकीय,सांस्कृतिक, आर्थिक, व रोजच्या जीवनात घडलेल्या घ...

१५ ऑक्टोबरपासून राज्यात ऊस गळीत हंगाम सुरू; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन बैठकमुंबई : प्रतिनिधी | माझा...
09/09/2026

१५ ऑक्टोबरपासून राज्यात ऊस गळीत हंगाम सुरू; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन बैठक

मुंबई : प्रतिनिधी | माझा इंडिया न्यूज

राज्यातील ऊस गळीत हंगाम २०२६-२७ सुरळीत पार पाडण्यासाठी आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला उपस्थित राहून आगामी गळीत हंगामाच्या नियोजनाबाबत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

बैठकीत मागील ऊस गळीत हंगामाचा आढावा घेत यंदाच्या हंगामासाठी आवश्यक तयारी, ऊस गाळपाचे नियोजन आणि साखर कारखाने सुरू करण्याच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी राज्यातील ऊस क्षेत्र, अपेक्षित ऊस उत्पादन, साखर निर्मिती, इथेनॉलचा पुरवठा, शेतकऱ्यांना मिळणारी एफआरपी तसेच साखर कारखान्यांकडून होणाऱ्या विविध कपातींच्या मुद्द्यांवर विचारविनिमय करण्यात आला. तसेच सहकारी साखर कारखाना संघाच्या विविध मागण्यांवरही चर्चा झाली.

१५ ऑक्टोबरपासून गळीत हंगामाला सुरुवात

बैठकीत १५ ऑक्टोबर २०२६ पासून राज्यातील ऊस गळीत हंगाम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

शेतकऱ्यांच्या ऊसाचे वेळेत गाळप व्हावे, त्यांना त्यांच्या ऊसाचा योग्य मोबदला मिळावा आणि संपूर्ण गळीत हंगाम कोणत्याही अडथळ्याविना सुरळीत पार पडावा, यासाठी योग्य नियोजन करण्यावर बैठकीत विशेष भर देण्यात आला.

शेतकरी आणि साखर उद्योगाचे हित जपत आगामी ऊस गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

माझा इंडिया न्यूज
आपल्या बातम्यांचा विश्वासू आवाज

#माझाइंडियान्यूज #ऊसगळीतहंगाम #ऊसगळीतहंगाम2026 #ऊस #ऊसउत्पादकशेतकरी #शेतकरी #शेतकरीहित #साखरकारखाना #साखरउद्योग #एफआरपी #इथेनॉल #साखर #महाराष्ट्र #महाराष्ट्रबातम्या #देवेंद्रफडणवीस #मुख्यमंत्रीफडणवीस #ऊसगाळप

🚨⚡ “दुर्घटना झाल्यावर जागे होणार का?” — वेलींनी गुदमरलेल्या ट्रान्सफॉर्मरवरून प्रशासनाला जाब!कृष्णानगरमध्ये राष्ट्रवादी ...
09/09/2026

🚨⚡ “दुर्घटना झाल्यावर जागे होणार का?” — वेलींनी गुदमरलेल्या ट्रान्सफॉर्मरवरून प्रशासनाला जाब!

कृष्णानगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे मारुती गणपत जाधव आक्रमक; महावितरण व उद्यान विभागाच्या कारभाराचा बॅनर लावून निषेध

पिंपरी-चिंचवड : कृष्णानगर येथील सचिन गृह संकुल, सेंट अँन स्कूलच्या शेजारील ट्रान्सफॉर्मरची अवस्था पाहून हा ट्रान्सफॉर्मर आहे की बगीचा? असा संतप्त सवाल उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मारुती गणपत जाधव यांनी प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.
गेल्या कित्येक वर्षांपासून ट्रान्सफॉर्मरभोवती वेलींचे साम्राज्य निर्माण झाले असून, संपूर्ण विद्युत यंत्रणा वेलींनी अक्षरशः झाकून टाकली आहे. धोकादायक परिस्थिती निर्माण होऊनही महावितरण आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या उद्यान विभागाला याची दखल घेण्यासाठी मोठी दुर्घटना घडण्याचीच वाट पाहावी लागणार आहे का? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे.
विशेष म्हणजे, अवघ्या ५० मीटर अंतरावर भाजप नगरसेविकेचे कार्यालय असतानाही या गंभीर समस्येकडे डोळेझाक का केली जात आहे? नागरिकांच्या सुरक्षिततेपेक्षा राजकीय सोयी महत्त्वाच्या आहेत का, असा सवालही आता उपस्थित होत आहे.
⚠️ शाळेच्या अगदी शेजारी धोकादायक ट्रान्सफॉर्मर!
या परिसरात सेंट अँन स्कूल असल्याने दररोज मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक आणि नागरिकांची ये-जा असते. अशा ठिकाणी विद्युत ट्रान्सफॉर्मर वेलींनी पूर्णपणे वेढलेला असणे ही केवळ निष्काळजीपणाची बाब नसून नागरिकांच्या जीविताशी खेळण्याचा प्रकार असल्याचा आरोप मारुती गणपत जाधव यांनी केला आहे.
“बिजलीनगरसारखी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का?”
“करंट उतरून एखाद्या निष्पाप नागरिकाचा किंवा विद्यार्थ्याचा जीव गेल्यावर जबाबदारी कोण घेणार?”
“दुर्घटनेची वाट पाहत बसले आहे का प्रशासन?”
असे थेट सवाल करत जाधव यांनी प्रशासनाला धारेवर धरले आहे.
🔥 बॅनर लावून थेट इशारा!
प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मारुती गणपत जाधव यांनी घटनास्थळी “ट्रान्सफॉर्मर आहे की बगीचा?” अशा आशयाचा मोठा बॅनर लावून महावितरण व महापालिका उद्यान विभागाच्या दुर्लक्षाचा निषेध केला आहे.
त्यांनी मागणी केली आहे की, ट्रान्सफॉर्मरवरील सर्व वेली तात्काळ हटवाव्यात, परिसराची साफसफाई करावी, विद्युत यंत्रणेची सुरक्षितता तपासावी आणि भविष्यात अशा घटना घडणार नाहीत यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करावी.
“प्रशासनाने आता तरी जागे व्हावे. दुर्घटना होण्यापूर्वी उपाययोजना करा; दुर्घटनेनंतर पंचनामा करण्याची वेळ येऊ देऊ नका!” असा स्पष्ट इशारा मारुती गणपत जाधव यांनी दिला आहे.
⚡ नागरिकांचा सवाल एकच — “दुर्घटना होण्याची वाट का पाहताय?”

#विद्युत विभाग #कृष्णानगर

वैजापूर तालुक्यात दुष्काळसदृश स्थिती; तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणीनायब तहसीलदार महाजन यांना निवेदन; पिकांचे...
08/09/2026

वैजापूर तालुक्यात दुष्काळसदृश स्थिती; तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी

नायब तहसीलदार महाजन यांना निवेदन; पिकांचे पंचनामे, पाणी, चारा व रोजगाराच्या उपाययोजनांची मागणी

वैजापूर : प्रतिनिधी

वैजापूर तालुक्यात गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून समाधानकारक पाऊस झालेला नसून, गेल्या काही दिवसांपासून पावसाने पूर्णपणे उघडीप दिल्याने खरीप पिके गंभीर संकटात सापडली आहेत. अनेक भागांत जमिनीला भेगा पडल्या असून उभी पिके सुकण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे वैजापूर तालुका तातडीने दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकरी व नागरिकांना शासकीय मदत तसेच दुष्काळी सवलती लागू कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.

सामाजिक कार्यकर्ते विजय मोकळे करंजगावकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने नायब तहसीलदार श्री. महाजन यांची भेट घेऊन तालुक्यातील पावसाची तूट, खरीप पिकांची सद्यस्थिती, पाणीटंचाई आणि ग्रामीण भागातील विविध अडचणींबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी प्रशासनाला मागण्यांचे निवेदन साद करण्यात आले.

पिकांचे तातडीने पंचनामे करण्याची मागणी

तालुक्यातील सर्व महसूल मंडळांमध्ये पिकांची प्रत्यक्ष पाहणी करून नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे तातडीने करावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. तसेच तालुक्यातील पावसाची अधिकृत आकडेवारी आणि पावसातील खंडाचा तातडीने आढावा घेऊन पाणी उपलब्धता, पिकांची परिस्थिती व ग्रामीण भागातील सद्यस्थितीचा सविस्तर अहवाल तयार करावा, अशी मागणी करण्यात आली.

वैजापूर तालुक्यातील दुष्काळसदृश परिस्थितीचा अहवाल जिल्हाधिकारी व शासनाकडे पाठवून तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करावा, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

पाणी, चारा आणि रोजगाराचीही मागणी

पाणीटंचाई निर्माण झालेल्या गावांमध्ये आवश्यकतेनुसार टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करावा. जनावरांसाठी पुरेसा चारा व पाण्याची व्यवस्था करावी. तसेच रोजगार हमी योजनेअंतर्गत गावोगावी मोठ्या प्रमाणात कामे सुरू करून ग्रामीण नागरिकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली.

पात्र शेतकऱ्यांना पीक नुकसानभरपाई तसेच लागू असलेल्या दुष्काळी योजनांचा लाभ तातडीने मिळवून द्यावा आणि दुष्काळग्रस्त भागासाठी शासनाकडून उपलब्ध असलेल्या सर्व सवलती व मदत शेतकरी व नागरिकांना मिळवून द्यावी, अशी मागणीही करण्यात आली.

या निवेदनावर विजय मोकळे करंजगावकर, बाळासाहेब गायकवाड, महेंद्र सोनवणे, रमेश त्रिभुवन आणि विलास पठारे बोरसर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

तालुक्यातील परिस्थितीची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन तातडीने प्रत्यक्ष पाहणी, पिकांचे पंचनामे आणि आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

— माझा इंडिया न्यूज

#वैजापूर #छत्रपती संभाजीनगर #पिक पंचनामा #दुष्काळ

रुग्णांच्या जीवाशी खेळ सहन करणार नाही; सुविधा मिळेपर्यंत संघर्ष सुरूच! रिपाई  युवक आघाडी आक्रमक डॉ. धम्मरत्न गायकवाड यां...
08/09/2026

रुग्णांच्या जीवाशी खेळ सहन करणार नाही; सुविधा मिळेपर्यंत संघर्ष सुरूच! रिपाई युवक आघाडी आक्रमक

डॉ. धम्मरत्न गायकवाड यांचा पुणे जिल्हा रुग्णालय प्रशासनाला इशारा

पुणे | प्रतिनिधी (माझा इंडिया न्यूज ) ८ सप्टेंबर २०२६

पुणे जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना मूलभूत सुविधांसाठीही त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप करत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) युवक आघाडीने प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. रुग्णालय परिसरातील मोबाईल नेटवर्कची समस्या, शवागार व कोल्ड स्टोरेजच्या सुविधांसह विविध प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवावेत, अशी मागणी युवक आघाडीने केली आहे.

RPI (आठवले) युवक आघाडीचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष डॉ. धम्मरत्न गायकवाड यांनी पुणे जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा वैद्यकीय अधिकारी तथा सिव्हिल सर्जन अंबादास देवमाने यांची प्रत्यक्ष भेट घेऊन रुग्णालयातील विविध गंभीर प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली.

रुग्णालय परिसरात मोबाईल नेटवर्कची समस्या

पुणे जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात मोबाईल नेटवर्कची गंभीर समस्या असल्याने रुग्ण, नातेवाईक, डॉक्टर, परिचारिका तसेच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना संपर्क साधताना अडचणी येत असल्याचे डॉ. गायकवाड यांनी निदर्शनास आणून दिले.

दूरवरून उपचारासाठी आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना आपल्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्यात अडथळे येत आहेत. एखाद्या आपत्कालीन परिस्थितीत मोबाईल संपर्कच झाला नाही, तर त्याची जबाबदारी कोण घेणार? असा सवालही त्यांनी प्रशासनासमोर उपस्थित केला.

मोबाईल नेटवर्कची समस्या कायमस्वरूपी दूर करण्यासाठी रुग्णालय परिसरात मोबाईल सिग्नल बूस्टर अथवा आवश्यक तांत्रिक यंत्रणा तातडीने बसवावी, अशी मागणी असलेले निवेदन सिव्हिल सर्जन यांना देण्यात आले.

शवागार आणि कोल्ड स्टोरेज सुविधांचा आढावा घेण्याची मागणी

रुग्णालयातील कोल्ड स्टोरेज आणि शवागाराची क्षमता वाढवावी, तसेच आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने आणि योग्य सुविधा मिळणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. रुग्ण जिवंत असताना योग्य उपचार सुविधा आणि मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयांसाठी सन्मानजनक व्यवस्था सक्षम असणे आवश्यक असल्याचे युवक आघाडीने स्पष्ट केले.

“आश्वासन नको, प्रत्यक्ष काम पाहिजे!”

यावेळी डॉ. धम्मरत्न गायकवाड यांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा देताना सांगितले की, “सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित प्रश्नांवर आम्ही कोणतीही तडजोड करणार नाही. रुग्णालयात सुविधा देणे हा प्रशासनाचा उपकार नसून नागरिकांचा अधिकार आहे. वर्षानुवर्षे प्रश्न प्रलंबित ठेवून केवळ आश्वासने देण्याची पद्धत आता चालणार नाही.”

“निवेदन देऊन शांत बसणाऱ्यांपैकी आम्ही नाही. प्रश्न सुटेपर्यंत पाठपुरावा करू आणि गरज पडल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू,” असा इशाराही त्यांनी दिला.

RPI युवक आघाडीचा आंदोलनाचा इशारा

रुग्णालयातील प्रश्नांवर तातडीने ठोस कार्यवाही करून त्याचा अहवाल जनतेसमोर ठेवावा, अशी मागणी RPI (आठवले) युवक आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे.

“रुग्णांच्या प्रश्नांवर मौन नाही, आश्वासनांवर समाधान नाही; प्रश्न सुटेपर्यंत संघर्ष थांबणार नाही,” अशी भूमिका डॉ. धम्मरत्न गायकवाड यांनी मांडली.

यावेळी युवक आघाडीचे कार्याध्यक्ष भरत खरात, संपर्क प्रमुख निखिल केळगणे, सार्थक कवडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

— माझा इंडिया न्यूज

#आठवले गट

भंडारा डोंगरावर आढळली दीड वर्षाची चिमुकली; आई-वडिलांचा शोध सुरु!देहु/तळेगाव ( प्रतिनिधी): माझा इंडिया न्यूज पुणे जिल्ह्य...
07/09/2026

भंडारा डोंगरावर आढळली दीड वर्षाची चिमुकली; आई-वडिलांचा शोध सुरु!
देहु/तळेगाव ( प्रतिनिधी): माझा इंडिया न्यूज
पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र देहुजवळील भंडारा डोंगरावर काल अंदाजे दीड ते दोन वर्षांची एक चिमुकली एकट्या अवस्थेत आढळून आली आहे. जगद्गुरू तुकोबांच्या या चिंतनभूमीत हे लहान बाळ एकटे कसे पोहोचले, याबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले असून परिसरामध्ये खळबळ उडाली आहे.
सध्या या चिमुकलीला पिंपरी-चिंचवड येथील YCM रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिची प्रकृती एकदम ठाणठणीत आहे. तिची देखभाल महिला पोलीस कर्मचाऱ्यांकडून अत्यंत काळजीपूर्वक केली जात आहे.
चिमुकलीचे वर्णन:
वय: अंदाजे १.५ ते २ वर्षे
वर्ण: सावळा
उंची व वजन: उंची अंदाजे २ फूट, वजन सुमारे १० किलो
कपडे: पांढऱ्या रंगाचा फ्रॉक (ज्यावर लाल, पिवळ्या व गुलाबी रंगाच्या रेघा आहेत)
केस: काळे (निळ्या रंगाच्या रबरने शेपटी बांधलेली)
इतर ओळख: कपाळावर लाल रंगाची टिकली
आई-वडिलांचा शोध घेण्यासाठी आवाहन!
ही चिमुकली आपल्या ओळखीची आहे का? किंवा तुमच्या परिसरातील कोणाचे बाळ हरवले आहे का? याबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तळेगाव MIDC पोलीस स्टेशनशी तात्काळ संपर्क साधावा.
तळेगाव MIDC पोलीस स्टेशन: 8108800381
पोउपनि विशालू नवगिरे: 7756050265
जनहितार्थ आवाहन: आपली एक लहानशी पोस्ट किंवा शेअर या चिमुकलीला तिच्या आई-वडिलांपर्यंत पोहोचवू शकते. ही माहिती मित्रमंडळी, व्हॉट्सॲप ग्रुप्स आणि सोशल मीडियावर जास्तीत जास्त शेअर करा.

#भंडारडोंगर baby

Address

Pune
Pune
411028

Alerts

Be the first to know and let us send you an email when MAJHA INDIA News posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to MAJHA INDIA News:

Shortcuts

Share