
16/09/2024
चुकली दिशा तरीही हुकले न श्रेय सारे
वेड्या मुशाफिराला सामील सर्व तारे...
आपणा सर्वांच्या सहकार्य आशीर्वाद, प्रेमाने गेली बारा वर्षे सिंहगड मित्र न्युज पेपरच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधत आहोत.. परंतु काळानुसार बदलत आम्ही गेल्या तीन वर्षांपूर्वी सिंहगड मित्र न्यूज हे यूट्यूब चैनल सुद्धा सुरू केले. विविध कार्यक्रम, यशोगाथा, परिसरातील बातम्या आपल्यावर आपल्यापर्यंत पोहोचवल्या.
काही गोष्टींच्या मर्यादा असल्यामुळे नाईलाजास्तव सिंहगड मित्र न्यूज हे नाव बदलून आपण 'अपडेट नाईन न्यूज' असे नामकरण करत आहोत. वैशिष्ट्यपूर्ण विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार हे चॅनेल व कार्यक्रम आपल्याला नक्कीच आवडतील. अशी मला आशा वाटते.
धन्यवाद!
शरद श्रीपती पवार
मुख्य संपादक - अपडेट नाईन न्यूज