Lokmarathi News

Lokmarathi News News & Media Website

राज्यपाल आचार्य देवव्रत व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कुटुंबीयांचे सांत्वनबा...
29/01/2026

राज्यपाल आचार्य देवव्रत व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन

बारामती : राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले.

यावेळी केंद्रीय नागरी विमानवाहतूक मंत्री राममोहन नायडू किंजारापू, राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, शिक्षणमंत्री दादाजी भुसे, महिला व बाल विकास मंत्री कु. अदिती तटकरे, बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले, अजित पवार यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे, आमदार राहूल कुल, ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार आदी उपस्थित होते.
#अजितदादापवार

✈️ बारामती Learjet अपघात साध्या आणि सोप्या भाषेत(DGCA च्या प्राथमिक निवेदनावर आधारित एव्हिएशन सेफ्टी विश्लेषण)बारामती ये...
29/01/2026

✈️ बारामती Learjet अपघात साध्या आणि सोप्या भाषेत

(DGCA च्या प्राथमिक निवेदनावर आधारित एव्हिएशन सेफ्टी विश्लेषण)
बारामती येथे झालेल्या अपघातानंतर सुरुवातीला चर्चा pilot error की technical failure यावर केंद्रित होती. मात्र नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) च्या अधिकृत निवेदनामुळे आता अपघाताची ऑपरेशनल चित्र स्पष्ट होत आहे — जे एव्हिएशन सेफ्टी विश्लेषणातील परिचित अपघात पॅटर्नशी जुळते.
नुसार हे विमान मुंबई–बारामती उड्डाण करत होते आणि ते uncontrolled airfield वर उतरायला येत होते, जिथे precision approach system उपलब्ध नाही.
पहिल्या landing attempt वेळी Runway दिसत नसल्यामुळे crew ने योग्य निर्णय घेत go-around केला.
दुसऱ्या approach दरम्यान सुरुवातीला पुन्हा runway दिसत नसल्याचं सांगण्यात आलं, नंतर क्षणभर दिसल्याचं कळवण्यात आलं आणि landing clearance देण्यात आली. मात्र त्या clearance चा readback झाला नाही. काही क्षणांतच विमान runway threshold जवळ दुर्घटनाग्रस्त झालं. कोणताही Mayday call दिला गेला नाही.
ही संपूर्ण घटना non-precision visual approach मध्ये घडणाऱ्या classic continuation-bias accident chain कडे स्पष्टपणे निर्देश करते.

🌫️🛬 Non-Precision Airfield वर कमी Visibility मध्ये Landing चे धोके:-

#बारामती ( ) हे:
• uncontrolled aerodrome आहे
• ILS किंवा vertical guidance system नाही
अशा परिस्थितीत सुमारे 3000 मीटर visibility असली तरी खालील धोके निर्माण होतात:
• visual illusion
• depth perception कमी होणं
• situational awareness गमावणं
• final approach मध्ये workload प्रचंड वाढणं
ICAO नियम आणि बहुतेक airline SOPs स्पष्ट सांगतात की अशा marginal weather परिस्थितीत precision-equipped alternate airport कडे diversion करणे हा सर्वात सुरक्षित निर्णय असतो.

❓ मग पुण्याकडे diversion का झालं नाही??:-

पुणे विमानतळावर:
✅ पूर्ण ILS सुविधा
✅ ATC नियंत्रण
✅ stabilized approach environment
✅ कमी operational risk
व्यावसायिक एव्हिएशन दृष्टीने पाहता, पहिल्या missed approach नंतर पुण्याकडे diversion करणे हे योग्य risk-mitigation decision होते.
आकडेवारी सांगते की अशा परिस्थितीत दुसरा landing attempt हा सर्वात धोकादायक टप्पा असतो — विशेषतः non-precision aerodromes वर.

🧠 Human Factors आणि Continuation Bias:-

DGCA च्या टाइमलाइनमधून एक प्रसिद्ध psychological trap दिसतो ✓continuation bias.
म्हणजे परिस्थिती बिघडत असतानाही मूळ योजना चालू ठेवण्याची मानसिकता.
यामागे सहसा कारणे असतात:
• runway क्षणभर दिसणे
• परिस्थिती सुधारेल अशी अपेक्षा
• operational किंवा VIP दबाव
• short sector confidence
यामुळे unstable approaches सुरक्षित मर्यादेपलीकडे चालू राहतात.

🚨 Mayday call नसल्याचा अर्थ :

कोणताही distress call नसल्याचा स्पष्ट संकेत:
• अचानक engine failure नव्हते
• मोठा system malfunction नव्हता
बहुधा कमी उंचीवर परिस्थिती झपाट्याने हाताबाहेर गेली; जे unstable approach अपघातांमध्ये नेहमी दिसतं.

📓 प्राथमिक तांत्रिक निष्कर्ष:-

DGCA डेटा आणि safety models नुसार हा अपघात बहुधा:
degraded visual conditions मध्ये चुकीच्या operational decision-making मुळे घडलेला अपघात आहे
_मुख्य कारण:_
➡️ marginal visibility मध्ये non-precision visual approach continue करणे
योगदान देणारे घटक:
• precision approach aids नसणे
• human factors
• उशिरा diversion decision
• unstable approach parameters
Mechanical failure ची शक्यता सध्या कमी दिसते (black box analysis नंतर अंतिम निष्कर्ष येईल).

✈️ एव्हिएशन सेफ्टीचा मूलभूत नियम पुन्हा सिद्ध
“Go-around हा सुरक्षित maneuver आहे.
Late go-around म्हणजे अपघाताची सुरुवात.” आणि
“Diversion म्हणजे अपयश नाही; Diversion म्हणजे व्यावसायिकता.”

📝 निष्कर्ष:-

DGCA चे निवेदन आधीच अपघाताची साखळी स्पष्ट करत आहे.
जर पहिल्या missed approach नंतर पुण्याकडे diversion करण्यात आलं असतं, तर धोका मोठ्या प्रमाणात कमी झाला असता.
हा अपघात आपल्याला पुन्हा एक महत्त्वाचा धडा देतो:
"पोहोचणं optional आहे पण सुरक्षितता mandatory आहे."
- कॅप्टन प्रणिल जाधव

टीप:
( सदरचे विश्लेषण DGCA च्या उपलब्ध माहितीनुसार आणि ICAO/SOP एव्हिएशन सेफ्टी तत्त्वांवर आधारित वैयक्तिक विश्लेषण आहे. अंतिम निष्कर्ष अधिकृत तपास अहवालानंतरच स्पष्ट होतील.)
#अजितदादापवार

16/12/2025

Nashik : नाशिकमधून i20 चोरीला; घटना सीसीटीव्हीत कैद...

22/11/2025

Wood burning stove : लाकूड, कोळसा शेगडी बॅटरीवर कशी काम करते

21/11/2025

पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयोजित पिंपरी चिंचवड रिव्हर सायक्लोथॉन निमित्त रंगरंगोटीचे काम सुरू
🚴😎✌️

05/07/2025

: वाहनचालकाने गाडीचे चाक श्वानावर घालून क्रूरपणे चिरडले, गुन्हा दाखल

04/07/2025

13/06/2025

चऱ्होली : ओढ्यात अडकलेल्या गाड्यांना अग्नीशमक दलाने बाहेर काढले

06/06/2025

Mulshi : कासारसाईत जमीनीच्या ताब्यावरून वाद | व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल

  : निगडी प्राधिकरण येथे मोटीरीवर झाड कोसळले
28/05/2025

: निगडी प्राधिकरण येथे मोटीरीवर झाड कोसळले

भाजपा आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा भिसे या प्रसूती वेदनेने व्याकूळ असताना प्रसुत...
03/04/2025

भाजपा आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा भिसे या प्रसूती वेदनेने व्याकूळ असताना प्रसुतीसाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये दाखल होण्यासाठी गेल्या.
मात्र रुग्णालय प्रशासनाने दहा लाख रुपये अनामत रक्कम भरण्याची मागणी केली. अनिशा भिसे यांच्यासोबत असणाऱ्या नातेवाईकांनी आम्ही अडीच लाख रुपये आत्ता भरतो आणि उर्वरित पैसे लगेच भरले जातील असे सांगितले मात्र प्रशासन ऐकायला तयार नव्हतं. काही वेळानंतर पती सुशांत भिसे हे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक असल्याने त्यांनी मंत्रालयातून संबंधित रुग्णालय प्रशासनाला फोन केला. मात्र तरीही मंगेशकर रुग्णालयाचे प्रशासन हलायला तयार नव्हते.
अशा परिस्थितीत तनिषा भिसे यांना दुसऱ्या रुग्णालयात तातडीने हलवले गेले. त्यातच त्यांनी दोन जुळ्या बाळांना जन्म दिला. मात्र त्यांचा करुण अंत झाला.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या प्रशासनाने कदाचित थोडासा मानवीय दृष्टिकोन दाखवला असता तर आज तनिषा भिसे आपल्या जुळ्या बाळांना मातृत्व देण्यासाठी हयात राहिल्या असत्या.
सत्ताधारी आमदारांच्या निकटवर्तीयांची ही अवस्था असेल तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांचे जगणे किड्या मुंग्यांपेक्षाही बदतर होत आहे ज्याची कल्पनाच न केलेली बरी..
्वस्त_होत_आहे!
- सुषमा अंधारे

  : अभिनेत्री  #प्राजक्तामाळी यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर निवासस्थानी भेट घेऊन निवेदन दिले. त्यांच्य...
30/12/2024

: अभिनेत्री #प्राजक्तामाळी यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर निवासस्थानी भेट घेऊन निवेदन दिले. त्यांच्या सन्मानाला बाधा येईल, असे कुठलेही कृत्य खपवून घेणार नाही आणि त्यावर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केले. त्यांच्याविरोधात यूट्यूबवर आक्षेपार्ह व्हिडीओ प्रसारित करणाऱ्यांवरही कारवाईचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.

Address

Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when Lokmarathi News posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Lokmarathi News:

Share