BNA भारत न्युज एजन्सी

  • Home
  • India
  • Pune
  • BNA भारत न्युज एजन्सी

BNA भारत न्युज एजन्सी BNA भारतातील पहिली मराठी न्यूज एजन्सी

13/02/2025
संत तुकाराम महाराज यांचे 11 वे वंशज असलेल्या शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. श...
05/02/2025

संत तुकाराम महाराज यांचे 11 वे वंशज असलेल्या शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शिरीष महाराज मोरे (Shirish More) यांनी देहू येथील निवासस्थानी आत्महत्या केली. हलाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे शिरीष महाराजांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते. याबाबत अद्याप अधिकची माहिती समोर आलेली नाही. प्राथमिक माहितीनुसार, शिरीष महाराज मोरे मंगळवारी रात्री जेवण झाल्यानंतर आपल्या खोलीत झोपण्यासाठी गेले होते. मात्र, आज सकाळी बराचवेळ होऊनही त्यांनी दार उघडले नव्हते. दार वाजवूनही आतून कोणताही प्रतिसाद न आल्यामुळे दरवाजा तोडण्यात आला. त्यावेळी शिरीष महाराज मोरे यांचा गळफास लावलेल्या अवस्थेतील मृतदेह दिसून आला. त्यांनी आपल्या उपरण्याने खोलीत गळफास लावून घेतला. त्यांच्या पश्चात आई आणि वडील असा परिवार आहे. त्यांच्या आत्महत्येच्या घटनेमुळे देहूगावावर शोककळा पसरली आहे. घटनेचा अधिक तपास देहूरोड पोलीस करत आहेत.
शिरीष महाराज मोरे यांची आर्थिक परिस्थिती बेताची होती. त्याला कंटाळूनच त्यांनी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले. शिरीष महाराज यांनी खोलीत एक सुसाईड नोट लिहून ठेवली होती. त्यामध्ये आत्महत्येचे कारण स्पष्ट केले आहे. 20 दिवसांपूर्वीच शिरीष महाराज मोरे यांचा साखरपुडा झाला होता. नुकताच त्यांचा टिळा झाला होता. 20 फेब्रुवारीला रोजी मोरे यांचा विवाह होणार होता. ते उदरनिर्वाहासाठी प्रवचन आणि कीर्तन करायचे. त्यांचे निगडी येथे इडली उपहारगृह देखील होते. मात्र, यामधून त्यांना फारसे उत्पन्न मिळत नव्हते. त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची होती. शिरीष महाराज मोरे हे अवघ्या 30 वर्षांचे होते. पुढील काही महिन्यांमध्ये त्यांचे लग्न होणार होते. मात्र, त्यापूर्वीच त्यांनी टोकाचं पाऊल उचललं. तुकाराम महाराजांचे (Sant Tukaram Maharaj) वंशज असलेल्या शिरीष महाराज मोरे यांच्या आत्महत्येच्या बातमीने देहूनगरीत एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, प्राथमिकदृष्ट्या आर्थिक विवंचेनेतून त्यांनी आत्महत्येचे केल्याचे कळत असल्याचे देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी सांगितले. या घटनेचा अधिक तपास देहूरोड पोलीस करीत आहेत. हभप शिरीष मोरे महाराज यांच्या पार्थिवावर दुपारी चार वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

संत तुकाराम महाराजांचे वंशज, शिरीष महाराज मोरे (वय-30) यांनी आज सकाळी राहत्या घरात आपलं जीवन संपवलं आहे. घरामध्ये गळफास ...
05/02/2025

संत तुकाराम महाराजांचे वंशज, शिरीष महाराज मोरे (वय-30) यांनी आज सकाळी राहत्या घरात आपलं जीवन संपवलं आहे. घरामध्ये गळफास घेत त्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घटनेने परिसरात आणि वारकरी सांप्रदायात एकच खळबळ उडाली आहे. देहू परिसरामध्ये शोककळा पसरली आहे. आत्महत्येचे कारण समोर आलं आहे.शिवव्याख्याते म्हणून मोरे यांचा मोठा नावलौकीक होता. त्यांचा नुकताच त्यांचा विवाह ठरला होता. शिवव्याख्याते म्हणून मोरे यांचा मोठा नावलौकीक होता

देहूतील त्यांच्या राहत्या घरी शिरीष महाराज मोरेंनी आत्महत्या केली आहे. ते जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे 11वे वंशज होते. काल रात्री जेवण केल्यानंतर ते झोपायला गेले, मात्र सकाळी खोलीचे दार उघडले नाही. त्यामुळं दार तोडले असता त्यांनी उपरण्याच्या साह्यानं गळफास घेतल्याचं समोर आलं आहे. आर्थिक विवंचनेतुन हे पाऊल उचलल्याचं सुसाईड नोट मध्ये नमूद करण्यात आलं आहे. वीस दिवसांपूर्वी त्यांचा साखरपुडा झाला होता, तर एप्रिल महिन्यात त्यांचा विवाह होणार होता. ते प्रवचन आणि कीर्तन करायचे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून अर्थसंक्लपास सुरुवात | आर्थिक बजेट २०२५-२६ | Live
01/02/2025

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून अर्थसंक्लपास सुरुवात | आर्थिक बजेट २०२५-२६ | Live

22/01/2025
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील परधाडे गावाजवळ रेल्वेचा भीषण अपघात घडला असून, अपघात घडताच राज्याचे जलसंपदा मंत्री ग...
22/01/2025

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील परधाडे गावाजवळ रेल्वेचा भीषण अपघात घडला असून, अपघात घडताच राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन,खा. स्मिता वाघ ह्या काही वेळातच परधाडे येथे पोहचून परिस्थिती हाताळली. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी हेही घटना स्थळी थांबून होते.
मयत झालेल्यांना जळगाव शासकीय रुग्णालयात पाठवून. जखमी झालेल्यांना पाचोरा येथील वृंदावन हॉस्पिटल आणि विघ्नहर्ता रुग्णालय येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी या दोन्ही हॉस्पिटल मध्ये भेटून जखमी व्यक्तींची चौकशी करून त्यांना धीर दिला. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यावेळी त्यांच्या समवेत होते.

MNS | Jalgaon | मनसेला जळगावात धक्का महानगराध्यक्षासह शेकडो कार्यकर्ते भाजपात
28/10/2024

MNS | Jalgaon | मनसेला जळगावात धक्का महानगराध्यक्षासह शेकडो कार्यकर्ते भाजपात

महायुती मेळावा,एकनाथ खडसेंच्या पिचवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
21/10/2024

महायुती मेळावा,
एकनाथ खडसेंच्या पिचवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Contact for more details 7507040009
20/10/2024

Contact for more details 7507040009

Address

Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when BNA भारत न्युज एजन्सी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share