Killee -किल्ली

Killee -किल्ली This is Killee, a Marathi digital magazine that brings you something new to be read everyday.

“विक्रम आता मला सांग या तिघांपैकी सर्वांत नाजूक कोण? लहान भाऊ की ज्याला सात गादी खालच्या केसामुळेही त्रास झाला. त्या इतक...
18/05/2025

“विक्रम आता मला सांग या तिघांपैकी सर्वांत नाजूक कोण? लहान भाऊ की ज्याला सात गादी खालच्या केसामुळेही त्रास झाला. त्या इतक्या मऊ गाद्यांमधून सुद्धा त्या केसाचा व्रण त्याच्या पाठीवर पडला तो लहान भाऊ? का मधला भाऊ? ज्या नर्तकीने लहानपणी बकरीचे दूध प्यायले होते त्या लहानपणीच्या बकरीच्या दुधाचा वासदेखील त्या मधल्या भावाला आला तो सर्वांत नाजूक आहे? का मोठा भाऊ? ज्याला भात खाताना प्रेतांचा दुर्गंध आला, कारण तो तांदूळ स्मशानभूमीच्या शेजारच्या शेतीती पिकला होता. या तिघांपैकी सर्वांत नाजूक कोण? बोल विक्रम बोल.
ऐका आणि सबस्क्राईब करा
भाग ८ सर्वांत नाजूक कोण?

https://youtu.be/7V3tJsQTurY?si=h9TD_odr5_WSn2nx

“राजा विक्रम आता मला सांग की, समुद्रामध्ये उडी मारण्याचे कोणी सर्वात जास्त धैर्य दाखवले? त्या दोघांपैकी समुद्रात उडी मार...
17/05/2025

“राजा विक्रम आता मला सांग की, समुद्रामध्ये उडी मारण्याचे कोणी सर्वात जास्त धैर्य दाखवले? त्या दोघांपैकी समुद्रात उडी मारणारा कोण सर्वांत जास्त साहसी आहे? राजा चंद्रसेन का सत्वशील? जर उत्तर माहित असूनही तू मला सांगितले नाहीस तर तुझ्या मस्तकाचे अनेक तुकडे होतील. बोल विक्रम. माझ्या प्रश्नाचं उत्तर दे.”
ऐका आणि सबस्क्राईब करा
भाग ७ खरा साहसी कोण?
https://youtu.be/qxoUIQJQIi8?si=hQy8O3mUhZiMJ8vb

वेताळाने राजा विक्रमादित्यला विचारले, “आता तू मला सांग विक्रम. अशा प्रकारे शरीर एकत्र झाल्यावर, शरीराची अशी अदलाबदली झाल...
16/05/2025

वेताळाने राजा विक्रमादित्यला विचारले, “आता तू मला सांग विक्रम. अशा प्रकारे शरीर एकत्र झाल्यावर, शरीराची अशी अदलाबदली झाल्यावर तिचा पती कोण आहे? तिचा खराखुरा पती कोण आहे? लग्नानंतर इतक्या वर्ष ज्या शरीरासोबत ती राहिली, ज्या शरीरासोबत ती झोपली, ज्या शरीराच्या सहवासात तिने स्वतःला सुरक्षित ठेवले, ते शरीर?
ऐका कथा क्रमांक ६ खरा पती कोण? आणि चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका.

https://youtu.be/dj-EEGvB8Tw?si=raJ16DidozAjb7kS

विक्रम आणि वेताळ मालिकेच्या सुरुवातीला पहिली कथा सादर करित आहोत  "मंदारवतीचा पती कोण?"सांग विक्रम सांग. जर तुला उत्तर मा...
26/04/2025

विक्रम आणि वेताळ मालिकेच्या सुरुवातीला पहिली कथा सादर करित आहोत "मंदारवतीचा पती कोण?"

सांग विक्रम सांग. जर तुला उत्तर माहित असूनही तू उत्तर दिले नाहीस तर तुझ्या डोक्याचे असंख्य छकले होतील....

पण त्या आधी काय घडते या कथेत?

https://www.youtube.com/watch?v=35vxr_nbvTs
ऐका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे एक एक कथा अपलोड होताच आपल्याला नोटीफिकेश्न मिळेल.

विक्रमादित्याच्या एका रहस्यमय प्रवासाचा अनुभव घ्या, जिथे त्याची भेट वेताळाशी होते. ज्ञान, प्रेम आणि नैतिक दुविधा...

विक्रम वेताळ मालिकेतील सर्व भाग श्रोत्यांसाठी मोफत उपलब्ध ऐका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे एक एक कथा अपलोड हो...
25/04/2025

विक्रम वेताळ मालिकेतील सर्व भाग श्रोत्यांसाठी मोफत उपलब्ध
ऐका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे एक एक कथा अपलोड होताच आपल्याला नोटीफिकेश्न मिळेल.
या मालिकेतील पाचवी कथा सादर करित आहोत-
योग्य वर कोणता?
"उज्जैनच्या मंत्री हरिस्वामीची कन्या सोमप्रभा ही अत्यंत सुंदर आणि बुद्धिमान तरुणी असते. विवाहासाठी ती एक अट घालते—वराकडे काहीतरी अद्वितीय, जादुई कला असावी.
तिच्यासाठी तीन वर सज्ज होतात—एक ज्योतिषी, एक मृताला जिवंत करणारा, आणि एक योद्धा. तिघेही विलक्षण. पण तिच्या हृदयाचा खरा जोडीदार कोण?
ही कथा बुद्धी, प्रेम आणि योग्य निवडीवर प्रकाश टाकते. शेवटी वेताळ विक्रमाला विचारतो — “योग्य वर कोणता?”
त्याचे उत्तर हटके अंदाजात ऐकू या विक्रम वेताळाच्या पाचव्या क्रमांकाच्या कथेतून.

"योग्य वर कोणता?"उज्जैनच्या मंत्री हरिस्वामीची कन्या सोमप्रभा ही अत्यंत सुंदर आणि बुद्धिमान तरुणी असते. विवाहासा...

एक निवृत्त जोडपं—मनोज आणि मनीषा देशमुख—आपली साठ लाखांची सर्व बचत एका ऑनलाईन फसवणुकीत गमावतात. पोलीस यंत्रणा व्यस्त असल्य...
09/04/2025

एक निवृत्त जोडपं—मनोज आणि मनीषा देशमुख—आपली साठ लाखांची सर्व बचत एका ऑनलाईन फसवणुकीत गमावतात. पोलीस यंत्रणा व्यस्त असल्यामुळे, ते खाजगी गुप्तहेर परशुराम याची मदत घेतात. तपास सुरू होताच समोर येते बनावट कंपन्यांचं जाळं. आणि बँकेतून मिळालेली अंतर्गत माहिती वेगळी कलाटणी देते , तेव्हा हा खटला वैयक्तिक होतो—आणि धोकादायकसुद्धा. डिजिटल युगातील फसवणूक आणि तपास यांचं उत्कंठावर्धक मिश्रण.
ऐका- जाळे फसवणुकीचे
https://www.storytel.com/in/books/jaale-phasavnukiche-11039316

Address

Pune
411038

Alerts

Be the first to know and let us send you an email when Killee -किल्ली posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Killee -किल्ली:

Share

Category