09/08/2025
रोचक खोचक
जंगल जंगल बात चली है, पता चला है...
जंगल बुक, वाचले नाही किंवा त्यावरील मालिका, चित्रपट पाहिली नाही, अशी व्यक्ती विरळाच असेल. या जंगल बुकचे लेखक म्हणजे रॉडीयड किपलिंग, यांचा जन्म ३० डिसेंबर १८६५ साली भारतात मुंबईत झाला. जंगल बुक हे पुस्तक त्यांनी लिहिण्याच्या मागची प्रेरणा म्हणजे त्यांचे भारताविषयी मनात राहिलेले प्रेम आणि आठवणी होत, असे मानले जाते. त्यांनी भारताच्या पार्श्वभूमीवर आणखीही काही कथा लिहिल्या आहेत. तर त्यांच्या २ कवितांची शीर्षके म्हणजे- मंडाले (लो. टिळक मंडाले येथील तुरुंगात होते- आठवतय न?) आणि गुंगा दिन (हो! हे अनुवादित शीर्षक नाही.)
१९०७ साली किपलिंग यांना नोबेल पारितोषिक देण्यात आले तेव्हा ते केवळ ४६ वर्षांचे होते. भारतात जन्मून एकप्रकारे बाळाने पाय पाळण्यातच दर्शवले होते, असे म्हणता येईल.
(मास्टर की दिवाळी विशेषांक २०२४ मधून )