
11/10/2024
आज दि .११/१०/२०२४ वार शुक्रवार
श्री तुळजाभवानी मातेची महिषासुरमर्दिनी रुपात अलंकार महापूजा करण्यात आली.
महत्व :
साक्षात पार्वती असणाऱ्या जगदंबा तुळजाभवानीने दैत्यराज असणाऱ्या महिषासुराचा वध केला. त्यामुळे भोपे पुजारी यांचे कडुन महिषासूरमर्दिनी ही अलंकार पुजा बांधण्यात येते. या दिवशी तुळजाभवानी मंदिरात असणाऱ्या यज्ञ कुंडामध्ये होमहवन करून पूर्णाहुती दिली जाते.
आई भवानी आम्हांला
एवढेच सुख दे की '
आयुष्यभरासाठी पुरेल
नात्यामध्ये.एवढी आपुलकी असुदे की
जी फक्त प्रेमाने निभावली जातील
डोळ्यात एवढी लाज असुदे की '
थोरामोठ्यांचा मान राखला जाईल
आयुष्यात एवढेच श्वास असुदे की '
कुणाचे तरी भले करता येईल
बाकीचे आयुष्य तुझ्याकडेच ठेव '
म्हणजे लोकांना माझे ओझे होणार नाही.....
आणि माझा येणारा प्रत्येक जन्म हा
तुझ्या सेवेसाठी असु दे....!!
*आईराजा उदो उदो...!!*🙏🏻🌸