
22/04/2023
मित्रहो नमस्कार!
आजही लख्ख आठवतोय
१३ मे २०१३ हा अक्षय्य तृतीयेचा दिवस...
स्व-कल्पनेतील साहित्य आणि वाङ्मय निर्मितीचा प्रकल्प ‘सुनिधी पब्लिशर्स’च्या निमित्तानं सुरू झाला या घटनेला आज दहा वर्ष पूर्ण होत आहेत.
अनेकविध पुस्तकांच्या, प्रकाशनांच्या रूपानं ही ‘स्व-कल्पना’ सार्वजनिक झाली. हा एक दशकाचा कालखंड अनुभवसंपन्न, नवनिर्मितीचा आनंद देणारा आहे यात शंकाच नाही.
‘सुनिधी पब्लिशर्स’ हे आता एक व्यासपीठ म्हणून आकाराला आलंय. आमचे लेखक, अनुवादक, वाचक, संपादक, मुद्रितशोधक, वितरक, विक्रेते, हितचिंतक या काळात जोडले गेले. या सगळ्यांच्या सहकार्याने आजक्या अक्षयतृतीयेच्या दिवसी आम्ही ११व्या वर्षात पदार्पण करत आहोत.
यापुढील वाटचालीत अनेक नवोपक्रम घेणार आहोत. त्यातही आपण सर्वांचे सहकार्य असेलच याची खात्री आहे. सर्वांना मनापासून शुभेच्छा आणि आभार!