Lokmat Pune

Lokmat Pune पुण्यातील कानाकोपऱ्यातील महत्त्वाच्या बातम्यांसाठी फक्त एकच व्यासपीठ.

15/08/2025

पुनीत बालन ग्रुप आयोजित संयुक्त दहिहंडी होणार डिजे मुक्त साजरी

गायीला मिळाला 'राज्यमाते'चा दर्जा; पण वासरांची अवस्था दयनीय का?
15/08/2025

गायीला मिळाला 'राज्यमाते'चा दर्जा; पण वासरांची अवस्था दयनीय का?

महाराष्ट्रात दररोज हजारो नर जातीची गायीची नवजात संकरित वासरे रस्त्यावर हंबरडा फोडतात, हे कुणाला कसे दिसत नाही. र.....

पुणे शहरातील 23 नामांकित सार्वजनिक गणेश मंडळाची पुनीत बालन ग्रुप आयोजित संयुक्त दहिंहडी यंदा डिजे मुक्त साजरी केली जाणार...
15/08/2025

पुणे शहरातील 23 नामांकित सार्वजनिक गणेश मंडळाची पुनीत बालन ग्रुप आयोजित संयुक्त दहिंहडी यंदा डिजे मुक्त साजरी केली जाणार आहे. डिजे न लावता पारंपारिक ढोल ताशांसह प्रभात बॅन्ड, मुंबईतील नामांकित वरळी बिट्स यांच्या वाद्य संगीताच्या तालावर यंदाची दहिहंडी फोडली जाणार असल्याची माहिती पुनीत बालन ग्रुपचे अध्यक्ष व युवा उद्योजक पुनीत बालन यांनी दिली.
छत्रपती शिवाजी रस्त्यांवरील ऐतिहासिक लाल चौकात गतवर्षीपासून पुनीत बालन ग्रुपच्या माध्यमातून संयुक्त दहिहंडी उत्सव सुरू करण्यात आला आहे. यावर्षी पुनीत बालन यांनी डिजे मुक्त गणेश उत्सव साजरा करण्याची भुमिका घेतली आहे. त्यामुळे यंदाच्या दहिहंडीत उत्सवातही डिजे न लावण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे यंदा पारंपारिक वाद्यांच्या गजरात दहिहंडी फोडली जाणार आहे.

पोटहिश्श्याच्या मोजणीचे नियम धाब्यावर; 'त्या' वहिवाट मोजणीचे नकाशे होणार रद्द
15/08/2025

पोटहिश्श्याच्या मोजणीचे नियम धाब्यावर; 'त्या' वहिवाट मोजणीचे नकाशे होणार रद्द

Jamin Mojani Nakasha पोटहिश्श्याच्या मोजणीसाठी जमाबंदी आयुक्तांनी दिलेल्या निर्देशांना धाब्यावर बसवून हद्द कायम करून देण्....

15/08/2025

स्वातंत्र्यदिनी पुण्यात पहिल्यांदाच 'तिरंगा फेस्टिवल' साजरा होतोय, स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने भारतीय लष्करातील सैनिकांना आणि त्यांच्या कार्याला अभिवादन करण्याच्या उद्देशाने पुण्यात 'तिरंगा फेस्टिवल २०२५' चे आयोजन करण्यात आले आहे.ढोल ताशा महासंघ महाराष्ट्र अंतर्गत असलेल्या पुण्यातील ढोल ताशा पथकांतील ५००हून अधिक वादकांनी एकत्रितपणे वादन केले, ढोल ताशाच्या वादनातून ऑपरेशन सिंदूर ऑपरेशन महादेवमधील वीरांना मानवंदना दिली.

e P*k Pahani : आता पिक पाहणी होणार झटपट; वापरा अपडेटेड व्हर्जनचे 'हे' मोबाईल अ‍ॅप
15/08/2025

e P*k Pahani : आता पिक पाहणी होणार झटपट; वापरा अपडेटेड व्हर्जनचे 'हे' मोबाईल अ‍ॅप

e p*k pahani राज्य सरकारच्या 'ई-पीक पाहणी' योजनेंतर्गत खरीप हंगामातील पीक नोंदणीला शेतकऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद म.....

बारामतीच्या जिरायती भागात केळी लागवडीचा यशस्वी प्रयोग; पहिल्याच प्रयत्नात इराणला निर्यात
15/08/2025

बारामतीच्या जिरायती भागात केळी लागवडीचा यशस्वी प्रयोग; पहिल्याच प्रयत्नात इराणला निर्यात

Keli Lagwad बारामती आणि ऊस शेतीचे समीकरण सर्वत्र प्रसिध्द आहे. निरा डावा कालव्यावर येथील ऊस शेती बहरली आहे.

राज्यात सर्वप्रथम 'या' साखर कारखान्याने दिली त्रिपक्षीय समिती करारानुसार कामगारांना पगारवाढ
15/08/2025

राज्यात सर्वप्रथम 'या' साखर कारखान्याने दिली त्रिपक्षीय समिती करारानुसार कामगारांना पगारवाढ

sakhar kamgar vetan vadh महाराष्ट्र राज्यातील साखर कारखान्यांमधील कामगारांच्या मागण्यांबाबत महाराष्ट्र शासनाने नियुक्त केल.....

15/08/2025

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेश अध्यक्ष रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांच्या अडचणी आता आणखी वाढल्या आहेत. संमतीशिवाय महिलेचे फोटो आणि व्हिडिओ काढल्याप्रकरणी त्याच्याविरोधात पुण्यातील सायबर पोलीस ठाण्यात नवा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Farmer Success Story : आधी भाडेतत्त्वावर केली शेती; आता झाले कृषी व्यवस्थापनातील गुरू
15/08/2025

Farmer Success Story : आधी भाडेतत्त्वावर केली शेती; आता झाले कृषी व्यवस्थापनातील गुरू

कष्ट, जिद्द, चिकाटी आणि शेतीप्रेम यांच्या जोरावर दापोली तालुक्यातील कुडावळे गावातील कृष्णा बाबू मोरे यांनी आदर्....

15/08/2025

इंदापुरात जमिनीच्या वादावरून स्वातंत्र्यदिनी तरुणीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय. इंदापूरमधील प्रशासकीय भवनाच्या आवारातच ध्वजावंदन सुरू असताना पूजा शिंदे नावाच्या तरुणीने अंगावर पेट्रोल सदृश्य पदार्थ ओतून घेतला. दरम्यान इंदापूर पोलिसांनी या तरुणीला ताब्यात घेतलंय. जमिनीच्या वादाच्या प्रकरणावरून पूजा शिंदे या तरुणीने आपल्या कुटुंबावर अन्याय होत असून धनदांडगे ही जमीन लुटत आहेत असा आरोप केला होता. तर स्वातंत्र्यदिनी आपण आत्मदहन करू असा इशारा प्रशासनाला दिला होता.त्यानंतर आज इंदापूर मधील प्रशासकीय भावनांच्या परिसरात तिने ध्वजारोहणावेळी आत्मदहनाचा प्रयत्न केलाय.त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे...

15/08/2025

महिलेची तक्रार, रोहिणी खडसेंच्या पतीवर गुन्हा; रूपाली चाकणकर म्हणाल्या..

Address


Alerts

Be the first to know and let us send you an email when Lokmat Pune posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

  • Address
  • Alerts
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Media Company?

Share