Pune Live

दि १० शहापूर येथे बैलपोळा सण उत्साहात साजरा.नळदुर्ग : तुळजापूर तालुक्यातील शहापूर येथे परीसरात पारंपरिक पद्धतीने श्रावणी...
10/09/2026

दि १० शहापूर येथे बैलपोळा सण उत्साहात साजरा.

नळदुर्ग : तुळजापूर तालुक्यातील शहापूर येथे परीसरात पारंपरिक पद्धतीने श्रावणी बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे.

शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा आणि कृषी संस्कृतीशी नाते सांगणारा बैलपोळा सण शहापूर येथे उत्साहपूर्ण वातावरणात साजरा झाला. या निमित्ताने शेतकऱ्यांनी आपल्या बैलांना स्वच्छ अंघोळ घालून, आकर्षक सजावट व रंगरंगोटी केली. बैलांच्या शिंगांना रंग लावून तसेच गळ्यात घुंगरू, फुलांच्या माळा आणि विविध अलंकारांनी त्यांना सजवण्यात आले.

सजवलेल्या बैलांची पारंपरिक पद्धतीने पूजा-अर्चा करण्यात आली. शेतकऱ्यांनी आपल्या कुटुंबासह बैलांची मिरवणूक काढत हा सण आनंदात साजरा केला. यावेळी गावातील नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून बैलपोळ्याचा आनंद घेतला.

शेतकरी आणि बैल यांच्यातील अतूट नात्याचे प्रतीक असलेल्या या सणामुळे शहापूर परिसरात पारंपरिक ग्रामीण संस्कृतीचे सुंदर दर्शन घडले.

फोटो - धीरज गोरे शहापूर.

#बैलपोळा #बैलजोडी

विद्यानंद बापट प्रकरण : डीजेच्या आवाजापासून कॅमेऱ्यासमोर झालेल्या हल्ल्यापर्यंत नेमकं काय घडलं?
04/09/2026

विद्यानंद बापट प्रकरण : डीजेच्या आवाजापासून कॅमेऱ्यासमोर झालेल्या हल्ल्यापर्यंत नेमकं काय घडलं?

आमचे कर्मचारी श्री अंबादास गोरे यांचे चिरंजीव कु आशिष अंबादास गोरे यास...पुणे लाईव्ह समूहाकडून वाढदिवसाच्या हार्दिक हार्...
29/08/2026

आमचे कर्मचारी श्री अंबादास गोरे यांचे चिरंजीव कु आशिष अंबादास गोरे यास...
पुणे लाईव्ह समूहाकडून वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
शुभेच्छुक- सुनील ढेपे सर संपादक पुणे लाईव्ह धाराशिव लाईव्ह..

12/07/2026

असा आहे पुणे ते मुंबई ‘मिसिंग रोड’! 😱 | Pune Live

12/07/2026

संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा उरूळी देवाची ता हवेली 2026

09/07/2026

संत तुकाराम महाराज पालखी सोहळा पुण्यात | लाखो वारकऱ्यांचा ज्ञानोबा तुकाराम जयघोष

दि ०४ प्रतिनिधी सासवड आणि पंढरपूरकडे जाणाऱ्या वाहनचालकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे.आगामी आषाढी एकादशीच...
04/07/2026

दि ०४ प्रतिनिधी
सासवड आणि पंढरपूरकडे जाणाऱ्या वाहनचालकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे.आगामी आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर, पालखी सोहळ्याची तयारी म्हणून हडपसर ते दिवे घाट या दरम्यानच्या मार्गावर आज ४ जुलै २०२६ तातडीचे काम हाती घेण्यात आले आहे.

रस्ता बंद राहण्याची वेळ: वाहतूक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज दुपारी १२ ते २ या दोन तासांच्या कालावधीत हडपसर-दिवे घाट मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे.

या वेळेत या मार्गावरून कोणतीही वाहने ये-जा करू शकणार नाहीत अशी माहिती वाहतूक विभागाने दिली आहे.
वाहनचालकांनी पर्यायी रस्त्याचा वापर करावा असे आवाहन करण्यात येत आहे.

18/06/2026

वडकी ता हवेली
४२ विद्यार्थ्यांचा काळजाचा थरकाप! बस विहिरीत कोसळता कोसळता वाचली...मोठा अनर्थ टळला.

पुणे जिल्ह्यातील वडकी येथील पांडवनगर भागात (दि.१७ जुन २०२६) सकाळी एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे .

मोडक इंटरनॅशनल स्कूलची ४२ विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस अचानक रस्त्याशेजारील एका विहिरीच्या दिशेने गेली. बस चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे बसने विहिरीचा मुख्य संरक्षण कठडा तोडला, मात्र सुदैवाने विहिरीला लावलेल्या मजबूत लोखंडी कंपाउंडला तसेच जाळीला अडकून बस हवेत लटकली. बस थेट विहिरीत कोसणार परंतु लोखंडी जाळीने बसला रोखून धरल्यामुळे एक अत्यंत मोठा अनर्थ टळला आहे.

गाडीतील चिमुरड्यांनी आरडाओरड सुरू करताच स्थानिक ग्रामपंचायत सदस्य सागर मोडक व सहकारी नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत सर्व ४२ विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढले. अचानक घडलेल्या या प्रसंगामुळे लहान मुले प्रचंड घाबरली होती, परंतु कोणतीही जीवितहानी न झाल्याने सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.

पंढरपूर पिकप घटनेच्या पार्श्वभूमीवर अशा पद्धतीने रस्त्याच्या बाजूला असलेल्या सर्व विहीरीना संरक्षक भिंत बंद जाळी इ करण्याची मागणी जोर धरत आहे.
#हवेली_बातमी

30/05/2026

तिर्थक्षेत्र नारायणपूर दत्त मंदिर परीसरात दर गुरुवारी वाहतुक कोंडी...
रस्त्यावर नो पार्किंग करून ठोस उपाययोजना करण्याची मागणी.

🔥 गावाकडचा रुबाब… ढोलकीचा जबरदस्त ताल… आणि दादागिरीचा भन्नाट स्वॅग! 🔥🎵 “दादाचा नादच करायचा नाय”🎵 “समद्या तालुक्यात लै भा...
27/05/2026

🔥 गावाकडचा रुबाब… ढोलकीचा जबरदस्त ताल… आणि दादागिरीचा भन्नाट स्वॅग! 🔥

🎵 “दादाचा नादच करायचा नाय”
🎵 “समद्या तालुक्यात लै भारी”

हे नवीन मराठी लोकगीत आता सोशल मीडियावर धुमाकूळ घालायला सज्ज! 💥

ताशा, ढोलकी, हलगी आणि दमदार शब्दांनी भरलेलं हे गाणं एकदा ऐकलंत तर पुन्हा पुन्हा ऐकाल! 😍🔥

👉 Reels बनवा
👉 Status ठेवा
👉 मित्रांना शेअर करा
👉 आणि कमेंटमध्ये सांगा — “दादाचा नादच करायचा नाय!” 😎🔥

🎧 New Marathi Lokgeet 2026
🎶 DJ Dholki Song
📢 MUKTRANG MUSIC

#समद्यातालुक्यातलैभारी #दादाचानादचकरायचानाय

Address

Darsh Niwas, Near Janseva Bank
Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pune Live posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Pune Live:

Shortcuts

Share