19/02/2025
डिफेंस फोर्स लीग व डी आय एफ टी फाऊंडेशन तर्फे "परमवीरांगना - मिशन शक्ति" सोहळा संपन्न
पिंपरी (वास्तव संघर्ष): चिंचवड सायन्स पार्क येथे १६ फेब्रुवारी रोजी एक अनोखा परमवीरांगना सोहळा संपन्न झाला. डिफेंस फोर्स लीग व डी आय एफ टी फाऊंडेशन च्या वतीने भारतातील विविध क्षेत्रातीत उल्लेखनीय कामगिरी करण्याऱ्या महिलांचा परमवीरांगना पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला . डी एफ एल अवार्ड्स तर्फे पहिला परमवीरांगना जीवन गौरव पुरस्कार यावेळी भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपति श्रीमती प्रतिभाताई पाटील यांना देण्यात आला , प्रकृतीच्या काळजीने पूर्व राष्ट्रपतींच्या आवास मध्ये हा पुरस्कार त्यांना देण्यात आला व त्यांचे प्रायवेट सेक्रेटरी जी के दास यांनी त्यांच्या वतीने आभार मानले. या पुरस्कारासाठी सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून मिजोराम व अरूणांचल प्रदेश चे पूर्व राज्यपाल लेफ्टनंट जनरल निर्भय शर्मा उपस्थित होते, डी एफ एल चे संस्थापक श्री नरेश गोल्ला, पैरा विंग प्रेसिडेंट एक्स कमांडो रघुनाथ सावंत यांनी त्यांचे स्वागत केले. या प्रसंगी "इंडिया विजन 2047" सायन्स रिसर्च वर IISER चे डॉ. अरविन्द नातू यांनि आपले विचार मांडले , त्यांना डी एफ एल तर्फे विशेष "मेडल ऑफ ऑनर" प्रदान करण्यात आले. डॉ. नातू यांना जर्मनी च्या राष्ट्रपतींकडून ऑर्डर ऑफ मेरिट सन्मान प्राप्त आहे . "परमवीरांगना - मिशन शक्ति" या विषयावर लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर यांनी डिजिटल उपस्थितीत विचार मांडले. या विशेष कार्यक्रमात आपले पती शहीद कर्नल संतोष महाडीक (शौर्यचक्र) यांचा बलिदान नंतर भारतीय सैन्यात ऑफिसर म्हणून भरती झालेल्या मेजर स्वाती महाडीक यांचा विशेष परमवीरांगना सन्मान करण्यात आला, त्यांनी आपल्या शहीद पतींच्या प्रेरणे पासून सैन्यात भरती होण्याचा त्यांचा कठीण प्रवास उपस्थितांसामोर मांडला व एक पत्नी आणि एक नारी देशासाठी लढण्यास सक्षम आहे असे प्रोत्साहन दिले. या प्रसंगी परमवीरांगना सन्मानाने सन्मानित महिलांमध्ये बेलराईज इंडस्ट्रीज (बडवे इंजीनीरिंग) च्या एक्झिक्युटिव डायरेक्टर सुप्रिया बडवे , MIT ADT यूनिवर्सिटी च्या डायरेक्टर डॉ. सुनीता कराड , सूर्यादत्ता ग्रुप ऑफ इंस्टीट्यूट च्या वाइस प्रेसिडेंट सुषमा चोरडिया , पिंपरी चिंचवड यूनिवर्सिटी च्या प्रोफेसर डॉ शिला हुंडेकरी , रिसर्चर असिस्टंट प्रोफेसर प्रीतम चवाण, एस के एफ कंपनी च्या HR मॅनेजर नेहा मुखिया -परळकर यांचा समावेश होता. पद्मश्री शीतल महाजन (पैरा जंपर) व AICTE चे चेअरमन प्रोफेसर टी जी सीताराम, ASM ग्रुप चे चेअरमन डॉ. संदीप पाचपांडे यांनी कार्यक्रमास शुभेच्छा पाठवल्या. डी एफ एल तर्फे "मेडल ऑफ ऑनर" सन्मान औद्योगिक शिक्षण मंडळाचे ट्रस्टी डॉ. आशा पाचपांडे , लोणावळा येथील सामाजिक कार्यकर्ते श्री नंदकुमार वाळूंज, दिवाण हॉस्पिटल यांना प्रदान करण्यात आला . विविध क्षेत्रात विशेष कार्य करण्याऱ्या व्यक्तिमध्ये डिव्हाईन हिंदुस्तान प्राइड अवॉर्ड देण्यात ज्यात इंद्रायणी कॅन्सर हॉस्पिटल चे डायरेक्टर व रुबि हॉल मधील सीनियर कॅन्सर सर्जन डॉ. संजय देशमुख , पिंपरी चिंचवड सायन्स पार्क चे संस्थापक डायरेक्टर श्री प्रवीण तुपे , समाजसेवक मारुती जाधव , बकुल केटरर चे श्री राज गोल्ला याचा समावेश होता . डिफेंस फोर्स लीग च्या या विशेष सोहळ्यात १९७१ भारत पाक युद्धातील पूर्व सेनानी यांची विशेष उपस्थिती होती . प्रमुख पाहुणे पूर्व राज्यपाल यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आले , तसेच सर्व परमवीरांगना यांनी शहीद वीरांसाठी अमर जवान स्मृतीस पुष्पचक्र अर्पण केले . डिफेंस फोर्स लीग , औद्योगिक शिक्षण मंडळ व NextGenInnov8 यांच्या वतीने "Know your army" नॅशनल ऑनलाइन क्विज स्पर्धेचे पोस्टर लॉंच करण्यात आले. पूर्व सेनानी यांचा सोबत ASM ग्रुप च्या प्रीती पाचपांडे, डॉ. माथुर यावेळी उपस्थित होते . नॅशनल लेवल वर आयोजित करण्यात येणाऱ्या या स्पर्धेची माहिती कु. आदिती पाचपांडे व सुजीत दास विश्वास यांनी प्रेझेंटेशन द्वारे दिली . सामान्य जनतेने ही आर्मी बद्दल का जाणून घेतले पाहिजे यावर पूर्व राज्यपाल जनरल निर्भय शर्मा यांनी सुरेख स्पष्टीकरण दिले व छत्रपती शिवाजी महाराज घडवण्यासाठी आधी माता जिजाऊ झाली पाहिजे असे विचार यावेळी व्यक्त केले, डिफेंस फोर्स लीग च्या या कार्याचे कौतुक करताना त्यांनी या संस्थेच्या कार्यात सर्वांनी पुढाकार घेऊन शामिल झाले पाहिजे असे आवाहन केले . कार्यक्रमाचे आयोजन श्री नरेश गोल्ला, एक्स कमांडो रघुनाथ सावंत, सुबेदार मेजर यशवंत महाडीक , डी एफ एल चे डायरेक्टर - राजेंद्र जाधव, सिददाराम बिराजदार , मूजीब खान , नीलेश विसपुते, डी आय एफ टी फाऊंडेशन चे डायरेक्टर सुनील वडमारे, प्रेसिडेंट मिस दृष्टि जैन , स्नेहल चौधरी यांनी केले होते. विशेष सहकार्य सुबेदार कृष्णा काटेकर, ASM ग्रुप चे डॉ. संदीप पाचपांडे , मावळ वार्ता न्यूज चे संजय अडसूळे, सायन्स पार्क चे सीईओ नंदकूमार कासार, ऑफिसर करियर अकॅडेमी चे डॉ. अमित दुबे यांचे लाभले. सूत्रसंचालन नीलेश विसपुते , दिविता मेश्राम , सेजल लोखंडे यांनी केले . या सोहळ्याचे आभार प्रदर्शन एक्स पैरा कमांडो रघुनाथ सावंत यांनी केले .॰