
01/09/2025
सामान्य माणसांच्या कर्तृत्वाचा सन्मान करणारी संस्था !
असामान्य कामगिरी किंवा मोठ्या यशासाठी पुरस्कार दिले जातात. पण, 'सारद मजकूर' संस्थेचे संस्थापक अभिजीत सोनावणे यांनी हा विचार बदलला. त्यांनी आपल्या रोजच्या कामात प्रामाणिकपणा जपणाऱ्या सामान्य माणसांना गौरवण्याचा निर्णय घेतला.केवळ कौशल्याचं कौतुक न करता त्यांच्यातील माणूसपणाचाही सन्मान करणं हा पुरस्काराचा उद्देश आहे. म्हणूनच या पुरस्काराचं नाव 'मुळातून माणूस' असं आहे. समाजात असे अनेक धडपडे लोक आहेत, अशा व्यक्तींचा गौरव व्हावा म्हणून हा पुरस्कार दर महिन्याला दिला जातो. 'मुळातून माणूस' हा पुरस्कार माणुसकी जपणाऱ्या आणि समाजात सकारात्मकता पसरवणाऱ्या प्रत्येकाचा गौरव आहे.
तुमच्या आजूबाजूला अशी व्यक्ती कोण आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा!
#माणुसकी #सारदमजकूर #मुळातूनमाणूस #पुरस्कार #प्रेरणादायीकथा #सकारात्मक